युवा संवाद न्यूज / Yuva Samvad News

  • Home
  • India
  • Pune
  • युवा संवाद न्यूज / Yuva Samvad News

युवा संवाद न्यूज / Yuva Samvad News गतीमान युगाकडे....!
(1)

12/10/2024

धनंजय मुंडेंचा दसरा मेळाव्यातून जरांगेंना टोला..

12/10/2024

Dhananjay Munde | Pankaja Munde |Dasra Melava | धनंजय मुंडे यांनी गाजवला दसरा मेळावा!

03/10/2024

F.I.R | Adv. Ravindra Narbhavar | Police | पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीत हा व्हिडिओ नक्की पहा.

03/10/2024

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा..जय महाराष्ट्र!!

*आई तुळजाभवानी' मालिकेबद्दल पूजा काळे सोबत साधलेला खास संवाद**अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’ 3 ऑक्टोब...
01/10/2024

*आई तुळजाभवानी' मालिकेबद्दल पूजा काळे सोबत साधलेला खास संवाद*

*अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’ 3 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 9 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर*

महाराष्ट्राच्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर 'आई तुळजाभवानी' ही मालिका येत्या 3 ऑक्टोबरपासून रात्री 9:00 वाजता सुरू होत आहे. अभिनेत्री पूजा काळे या मालिकेत 'आई तुळजाभवानी'चे पात्र साकारत आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका करताना पूजाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तसेच या मालिकेसाठी तिने खास शस्त्र प्रशिक्षणदेखील घेतलं आहे. 'आई तुळजाभवानी' मालिकेसंदर्भात अभिनेत्री पूजा काळेसोबत साधलेला खास संवाद

तुझ्या प्रशिक्षणाचा अनुभव सांग?

'आई तुळजाभवानी' ही संपूर्ण महाराष्ट्राची आराध्यदैवत आहे. या भूमिकेचं मला खूप दडपण आलं होतं. या भूमिकेसाठी 'तुळजा महात्म्य' या पुस्तकाचा मी खूप अभ्यास केला. रिसर्च टीम आणि मकरंद माने यांच्यासोबत चर्चा करून, अभ्यास करत मी पात्र साकारत गेले. त्याचा मला खूप फायदा झाला. मी लहानपणापासून भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. दररोज न चुकता मी रियाज करते.

युद्धकला आणि शस्त्रप्रशिक्षणाच्या अनुभवाबद्दल थोडक्यात सांग?

कोणतंही शस्त्र चालवण्याची एक खास पद्धत असते. त्यानुसार देहबोलीत फरक पडत असतो. त्यानुसार दानपट्टी, तलवारबाजी, लाठीकाठीचे प्रशिक्षण घेऊन त्याची तालिम करत राहिलो. त्याचा फायदा असा झाला की हालचाल करताना सहजता आली. खोटं न वाटता त्यात खरेपणा यावा यासाठी शस्त्रप्रशिक्षण खूप जास्त गरजेचं आहे.

स्टंट आणि सुरक्षिततेबद्दल काय सांगशील?

दोन्ही हातांनी तलवारबाजी करणं आणि त्रिशूल घेऊन युद्ध हे दोन्ही एकसाथ करणं खूप चॅलेंजिंग वाटलं. फक्त युद्ध नव्हतं..तर सहा-साडे सहा फुटांच्या राक्षसांसोबत युद्ध होतं. दमायला व्हायचं..पण सेटवरील सर्वांनी माझा उत्साह टिकवला.

सीनची तयारी कशी करतेस?

युद्धाच्या तयारीबाबत आम्ही बेसिक कोरिओग्राफी करुन व्हिडीओ रेकॉर्ड करतो. त्यामुळे शूटिंग करताना काहीही अडचण येत नाही. मकरंद सर आणि त्यांची टीम खूप सॉर्टेड आहे. त्यामुळे एखादा सीन वेळेत होण्यास मदत होते.

चारित्र्याची ताकद आणि व्यक्तिमत्त्वबद्दल बोलताना पूजा काळे म्हणाली,'आई तुळजाभवानी' ही जगाची आई असून एक थोर योद्धा आहे. जी असूरांशी लढते..तिच्या चारित्र्याची ताकद आणि व्यक्तिमत्त्व खूप थोर आहे".

शारिरीक आणि मानसिक सहनशक्ती कशी ठेवतेस?

सतत शूट असल्यामुळे थकवा जाणवतो. पण नवीन सीन हातात आल्यानंतर एक नवेपणा येतो. उत्साह येतो. मानसिकतेसाठी तर 'आई तुळजाभवानी' स्वत: माझ्यासोबत आहे असं मला जाणवतं. कारण ही भूमिका साकारताना मन आणि डोकं खूप शांत ठेवावं लागतं. मन शांत ठेवण्यासाठी गायत्रीमंत मी मनात बोलत असते.

दिग्दर्शन आणि मालिकेच्या टीमबद्दल काय सांगशील?

'आई तुळजाभवानी' मालिकेची संपूर्ण टीम अनुभवावी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मला सतत होत आहे. दिग्दर्शक मकरंद माने सर, विक्रम पाटील सर, डीओपी शेखर नगरकर सर अशी अनेक मंडळी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. एखादा सीन समजावताना मकरंद माने सर छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप भर देतात. सीनमधील प्रत्येक गोष्टीवर त्यांचं खूप बारकाईने लक्ष असतं. सगळेच खूप मदत करणारे आहेत. 'आई तुळजाभवानी'ची ख्याती महिषासूर, मर्दिनी आहे. तोच धागा पकडून योद्धा असणारी तुळजाभवानी मांडली जात आहे. मालिकेबद्दलची आता खूप उत्सुकता आहे.

01/10/2024

ज्यादिवशी राज्यसरकारने देशी गाईला राज्यमाता-गोमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला त्याचदिवशी गोमातेचे पूजन करण्याची सुखद अनुभूती...

(संत समावेश कार्यक्रम | 30-9-2024 | कोल्हापूर)

29/09/2024

मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

29/09/2024

ओबीसींना शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द

महायुती सरकारचा निर्णय
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय

भटके-विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत
शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्न अट रद्द
ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत..

27/09/2024

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची यशस्वी वाटचाल सुरू ..
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

26/09/2024

तरूणांनी गिरीराज सावंत यांचा आदर्श घ्यावा - श्रीमंत कोकाटे

कात्रज येथे 'कार्यसिद्धी प्रतिष्ठान'चे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांचा अभीष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांने साजरा.

गिरीराज सावंत यांनी दक्षिण पुण्याचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे - मान्यवरांचा सूर

25/09/2024

कोल्हारच्या जैन श्रावक संघाचा "समाजशिल्पी पुरस्कार"आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांना प्रदान.!

25/09/2024

राजर्षी शाहू विद्या मंदिर आंबेगाव पठार येथे हिंदी दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा.

15/09/2024

*सौर पंपामुळे २५ वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज ;शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला.*

26/08/2024

शेत रस्ता | गाडी रस्ता | पायवाट | शेताच्या वहिवाटीचा रस्ता अडविलेस |

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी**लाडक्या भ...
17/08/2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी*

*लाडक्या भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण*

*लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा-मुख्यमंत्री*

पुणे, दि. १७: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाही.

महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल याचे खूप समाधान आहे, अशा शब्दात श्री. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

*महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू - देवेंद्र फडणवीस*

राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रीकेंद्रित योजना सुरू केल्या. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या गेल्या. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे.

ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असेही ते म्हणाले.

*भाऊबीज सणानिमित्ताने भावांकडून बहिणीला ओवाळणी-उपमुख्यमंत्री अजित पवार*

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे. भाऊबीज सणानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे.

माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हीत बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा- अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी श्री. सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिताकरीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

*योजनेमुळे महिलांना दिलासा मिळेल-डॉ.नीलम गोऱ्हे*
तीन दशकांच्या महिला धोरणाच्या इतिहासात या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत मान्यवरांच्या नावापुढे आईचे नाव लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महिलांची संख्या निम्मी असून दोन तृतीयांश तास त्या काम करतात. जगातील १ टक्के संपत्ती महिलांच्या नावावर आहे. अशा स्थितीत या योजनेमुळे महिलांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबोधनाची परंपरा आणि महिला विकासाचा वारसा असलेल्या पुण्यात या योजनेचा समारंभ होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

*योजनेद्वारे २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न-कु. आदिती तटकरे*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री कु.तटकरे यांनी केले. दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. १ कोटी ३५ लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी १ कोटी ३ लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यशस्विनी प्लॅटफॉर्म' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
0000

*पुरस्काराने  सामाजिक कामासाठी प्रेरणा मिळते व अधिक जबाबदारी वाढते - केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपा...
17/08/2024

*पुरस्काराने सामाजिक कामासाठी प्रेरणा मिळते व अधिक जबाबदारी वाढते - केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन.*

'आनंद दरबार' दत्तनगर च्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय 'गुरु आनंद' पुरस्कार देऊन सन्मान.

पुणे ; राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंदऋषीजी महाराज. सा. यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुरलीधर मोहोळ बोलत होते. महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक ,पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा 'आनंद दरबार पुणे'च्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना लोकमत चे संपादक संजय आवटे म्हणाले बुद्ध आणि महावीर त्या काळातील खरे क्रांतिकारक होते.जैन धर्माच्या शिकवणीकडे सर्वांनी वळले पाहिजे, भारत एकमेव असा देश आहे की , सर्वांना आपले विचार मांडता येतात. महावीर आणि बुद्ध यांचे विचार सध्याच्या पिढीला त्यांच्या भाषेत शिकवले पहिजेत.

यावेळी व्यासपीठावर जितोचे उपाध्यक्ष विजयजी भंडारी,उद्योजक अनिलकुमारजी कांकरिया, विजयकांतजी कोठारी, पोपटलालजी ओस्तवाल,रमणलालजी लुंकड उपस्थित होते. पुरस्काराचे मानकरी जैनरत्न पुरस्कार बाळासाहेब ओसवाल, युवा रत्न पुरस्कार महेंद्र सुंदेचा मुथ्था, गुरू आनंद कार्यक्षम पत्रकार लोकमत चे पत्रकार संतोष गाजरे, दैनिक प्रभात चे पत्रकार हर्षद कटारिया यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. मानपत्र,सन्मानचिन्ह ,शाल ,श्रीफळ , पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरस्कार समिती चे प्रकाश बोरा ,दिलीप संचेती, उमेदमल धोका ,परेश लोढा, प्रकाश बोरा ,पंकज बाफना,सुनील चोरडिया, सौरभ धोका , सुनील बुरड ,कौशभ धोका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले.
----------------------------------------------
फोटो ओळ - 'गुरु आनंद' राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मान्यवर.

13/08/2024

Bigg Boss फेम सुरज चव्हाण..📸

Suraj Chavan |

11/08/2024

आज *मनोजदादा जरांगे पाटील यांच्या "मराठा आरक्षण शांतता रॅली"* पुणे शहरामध्ये मी बनवलेले गाणं जोरदार वाजले..🎼 🎆 #मनोजजरांगेपाटील #मनोजजरांगे #मराठाआरक्षणशांततारॅली #मराठा
https://youtu.be/ammwVmyTbJY?si=slgdyb7VirsJOkeD

10/08/2024

Ajit Pawar meet Jayant Patil: अजित पवार जयंत पाटील भेटीने राजकारण तापलं

*शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत-सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील*पुणे, दि....
09/08/2024

*शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत-सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील*

पुणे, दि. ९: भारतीय राज्यघटनेने आदिवासी नागरिकांना दिलेले हक्क अबाधित राखून शिक्षणाच्या माध्यमातून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्यावतीने कोटमदरा येथे आयोजित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, सहायक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी विजया पंढुरे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश घोलप आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने समाजातील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान केले असून आदिवासी नागरिकांचे हक्क अबाधित राखून त्यांचे रक्षण करावे, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. आदिवासी समाजाच्या प्रगतीकरीता शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, शिष्यवृत्ती आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, या सुविधेचा शिक्षणाकरीता उपयोग केला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्यात परिवर्तन होत असल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवून त्यांना लाभ देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे याकरीता आश्रमशाळेच्या अत्याधुनिक इमारती, मुला-मुलींची स्वतंत्र वसतिगृहे उभारण्यात येत आहे. येथील विद्यार्थ्यांना पुणे येथे पुढील शिक्षण घेता यावे, याकरीता ७ हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याबाबत राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यासोबत चर्चा करण्यात आली आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचे फार मोठे योगदान असून आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळी विचारांची लढाई लढली, शांततेत आंदोलन करुन चर्चेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. आजही आदिवासी समाजानत सामुदायिक विवाह व सामूहिक निर्णयपद्धती, आवश्यकतेनुसार पीक पिकविणे, जंगलाचे रक्षण आदी चांगल्या प्रथांचे जतन केले जाते. आदिवासी समाज निर्सगाच्या विरुद्ध पाऊल न टाकता त्याचे रक्षण करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून इतर समाजाला बोध घेण्याची गरज आहे.

आदिवासी भागांचा विकास करताना वन कायदा, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, परिसराला लागून अभयारण्य, पर्यावरणाचे रक्षण या बाबींचा विचार करुनच विकास करावा लागतो, परिसराचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही श्री. वळसे पाटील यांनी दिली.

प्रकल्प अधिकारी श्री. पाटील म्हणाले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय योजना, न्यूक्लियस बजेट योजना, ठक्करबप्पा आदिवासी वस्तीसुधार योजना, प्रधानमंत्री आदि आदर्श योजना, शबरी घरकुल योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना आदी विविध योजना राबविण्यात येत आहे. तसेच रस्ते, वीज, पाणी, विद्युत योजना अशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थी, शासकीय वसतिगृह व आश्रमशाळेतील स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आदिवासी बचत गटाच्यावतीने मांडण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.
0000

09/08/2024

कोल्हापूरचा नाद खुळा; हलगीच्या तालावर ठेका धरणारा चिमुकला तुफान व्हायरल!

*हजारोंच्या संख्येने धडकला पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा*- 'रिपाइं'तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचनभवन, महानगरपालिकेकडे ...
08/08/2024

*हजारोंच्या संख्येने धडकला पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा*

- 'रिपाइं'तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचनभवन, महानगरपालिकेकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा

पुणे : नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचनभवन आणि पुणे महानगरपालिका असा धडकला.

'रिपाइं' कार्यकर्त्यांसमवेत शेकडो पूरग्रस्त नागरिक यामध्ये भरपावसात सहभागी झाले. तीनही विभागांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन देत पूरग्रस्तांना त्वरित २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी 'रिपाइं'च्या वतीने करण्यात आली. 'रिपाइं'चे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, ऍड. मंदार जोशी, माजी नगरसेवक अशोक कांबळे, महेंद्र कांबळे, यशवंत नडगम, बाबुराव घाडगे, वीरेन साठे, निलेश आल्हाट, तानाजी ताकपेरे, बसवराज गायकवाड, सुनील जाधव, शाम सदाफुले, उमेश कांबळे, अमोल खंडागळे, स्नेहा पवार, सुधामती चौधरी, विनोद टोपे, संदीप धांडोरे, अविनाश कदम, गौतम कदम, शिवाजी उजागरे, नाना ढेपे, अकबर शेख, फिरोज खान, शमसुद्दीन शेख, बाबा सोनlवणे, रितेश पिल्ये, विकी वाळके, मिनाताई गlलते, चांदणी गायकवाड, माणिक माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय सोनवणे म्हणाले, "पाण्याचा विसर्ग करताना पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त पुणे आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाच्या अभावी पुणे शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधीत झाली आहेत. शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. येत्या काळातही नदीकाठच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत."

बाळासाहेब जानराव म्हणाले, "कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग केल्याने ही पूरपरिस्थिती उद्भवली. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांचा विसर्ग खडकवासला धरणात होतो. त्यामुळे ही टांगती तलवार कायम असून, याला पर्याय न दिल्यास १९६२ सारखी पूरपरिस्थिती येऊ शकते. हे टाळण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून रायगडच्या दिशेला पाणी सोडण्याचा विचार व्हावा. जेणेकरून खडकवासला धरणावर ताण येणार नाही."

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, "पुण्यात झालेल्या जोरदार पवसामुळे मुळा-मुठा नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. परिणामी, अनेकांचे संसार उघड्यावर पडले. लाखों रुपयांचे नुकसान झाले. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी. प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत त्वरीत मिळावी."

परशुराम वाडेकर म्हणाले, "नदीसुधार योजनेमुळे नदीपात्राची रूंदी कमी झाली आहे. मेट्रो मार्गाचे बांधकाम, नदीमध्ये राडारोडा टाकण्यासह मनपाची विविध विकासकामे, नदीपात्रातील अतिक्रमणे, नाल्यावरील अतिक्रमणे यामुळे पाणी नागरी वस्तीत शिरत आहे. पूर्वी ९० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्यावर येणारा पूर आता २८ हजार क्युसेस पाणी सोडल्यावर येतो, हे गंभीर आहे."

शहरामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. वाहतुककोंडीमुळे पुणेकर हवालदिल झाले आहेत. तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच पूरग्रस्तांना शासनाने त्वरित मदत करावी, अशी आग्रही मागणी सुनीता वाडेकर यांनी केली. या आक्रोश मोर्चात शांतीनगर, आदर्शनगर, बोपोडी, खडकी, येरवडा आणि इतर भागांतील पूरग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी झाले होते.

आक्रोश मोर्चाच्या ठळक मागण्या:
- पुरग्रस्तांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई द्यावी.
- प्रत्येक कुटूंबास २५,०००/- रुपयांची तातडीची मदत करावी.
- पूरस्थिती हाताळण्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे.
- पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत
- पुररेषा (रेडलाईन, ब्लू लाईन) नव्याने आखण्यात यावी.
- आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करावी
- सर्वसामान्य माणसापर्यंत माहिती पोहचविण्याची व्यवस्था करावी.
- पुरग्रस्तांचे खोटे पंचनामे करणारे अधिकारी, खोट्या लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करावी.
- पाण्याचा विसर्ग करण्याला पर्यायी मार्ग तयार करावा.
- शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी समन्वय समिती करावी
- ड्रेनेज लाईनचा व्यास वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
---------------------------------------------
*नदीसुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू : आयुक्त*
'रिपाइं'च्या या आक्रोश मोर्चाला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, नदीसुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू. तसेच नव्याने ब्ल्यू लाईन व रेड लाईन निश्चित करणार आहोत. नाले आणि नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु केलेली असून, लवकरच पाणी जाण्याचे मार्ग खुले होतील. कॅनॉलमधून पाणी ओसंडणे थांबविण्यासाठी फुरसुंगीपर्यंत जमिनीखालून पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरच होईल. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही आपत्ती व्यवस्थापन वॉर रूम उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*पूरग्रस्तांना दोन-दिवसांत मदत मिळेल : जिल्हाधिकारी*
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले की पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी शासनाकडे मागणी केली असून, दोन-तीन दिवसांत मदतीची वाटप सुरु होईल. ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांचे पंचनामे नव्याने करून त्यावर कारवाई केली जाईल. कोणाही पुरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सध्या अन्नधान्य किट वाटप सुरु असून, त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरु असून, लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिवसे यांनी दिले. यापुढे धरणातून पाणी सोडताना सर्व प्रकारची काळजी घेऊ, असे आश्वासन पाटबंधारे विभागाने दिले.

*‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, 22 ते 28 जुलै समाधी सोहळा, संध्या. 6:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर*कल...
08/08/2024

*‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, 22 ते 28 जुलै समाधी सोहळा, संध्या. 6:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर*

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात अन् विविध अवतारात बाळूमामांनी त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि 'कलर्स मराठी'च्या प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केले. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण आता ही लोकप्रिय भक्तिरसपूर्ण मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक प्रसंग रसिकांना ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पाहायला मिळाले आहेत. शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामांचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला.

महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठीवर काही वर्षांपूर्वी सुरू झालेली 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजली. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभर प्रेम दिले.

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामांनी परत पाठवून समाधी घेतल्याचं पाहायला मिळेल. एकंदरीतच बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. अवघा महाराष्ट्र 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या जयघोषाने दुमदुमला.

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'रमा राघव' आणि 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्या तरी बहुप्रतीक्षित 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चा Grand Premiere या रविवारी 28 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि वर.

*'आई तुळजाभवानी' लवकरच येणार 'कलर्स मराठी'वर*महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन श...
08/08/2024

*'आई तुळजाभवानी' लवकरच येणार 'कलर्स मराठी'वर*

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे 'आई तुळजाभवानी'. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी 'कलर्स मराठी'वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धाऊन येणारी, स्वराज्य रक्षिण्या तळपती तलवार भेट देणारी 'आई भवानी', अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा संवाद न्यूज / Yuva Samvad News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to युवा संवाद न्यूज / Yuva Samvad News:

Videos

Share