25/08/2023
रशियाचं 'लुना-२५' अपयशी झालं, म्हणून काही भारतीय त्याला ट्रोल करत आहेत. अति घाई, संकटात नेई, ससा कासवाची शर्यत वगैरे वगैरे कमेंट्स करत आहेत.
अरे मित्रांनो, रशियाने अंतराळ क्षेत्रात ते मिळवलं आहे, जिथपर्यंत भारताला पोहोचायला अजून २५-३० वर्ष लागतील. हे बोलून मला भारताचा कमीपणा दाखवायचा नाहीये, पण हे सत्य आहे. दुसरी गोष्ट 'लुना-२५' या नावातच सगळं आलं, त्यांची हे २५वी चांद्रमोहीम आहे. छपरी लोकांच्या माहितीसाठी सांगतो लुना कोणतीही बाईक नाही, लुना हे लॅटिनमध्ये चंद्रालाच म्हटलं जातं. भारत जेव्हा या क्षेत्रात struggle करत होता, त्यावेळी रशियाने मैत्रीचा हात पाठीवर ठेऊन भारताला बळ दिलंय. आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट कुठून उडाला ? रशियाच्याच कापुस्तिन यार अंतराळ स्थानकावरून. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा पहिल्यांदाच अंतराळात गेले, कसे गेले ? सोयुज टी-११ स्पेसक्राफ्ट मधून, तोही रशियाचाच...
जगातले सर्वात पहिले अंतराळवीर स्त्री (व्हॅलेंटिना तेरेश्कोवा) आणि पुरुष (युरी गागारीन) दोघेही रशियन... अंतराळात जाणारं पहिलं स्पेसक्राफ्ट स्पुटनिक रशियन... लायकालाही रशियानेच पाठवलं होतं... त्यामुळेच मनुष्याचं अंतराळात जाणं यशस्वी झालं. ज्या गोष्टी कळत नाहीत, तिथे एखाद्याला ट्रोल करून आपला मागासलेपणा दाखवू नका. चांद्रयान यशस्वी होण्यामागे रशियाने आपल्याला जी साथ दिलीय, ती विसरू नये.