Ekta Masik - एकता मासिक

Ekta Masik - एकता मासिक 'एकता' मासिक
स्थापना - 1948
राष्ट्रदेवतेचे शब्द पूजन
✍️📖📚🙏

18/01/2025

स्वकर्तृत्वावर प्रशासन आणि युद्धनितीमध्ये प्रखर राष्ट्राभिमान जागवणाऱ्या आणि हिंदू धर्म व धर्मस्थळांचा योग्य सन्मान राखणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वरील एकता मासिक विशेषांकाचा प्रकाशन सोहळा

एकता-जानेवारी-2025 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष अंकाची किंमत - 50 वार्षिक वर्गणी - 500त्रैवार्षिक वर्गणी - 1300 सं...
04/01/2025

एकता-जानेवारी-2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष

अंकाची किंमत - 50
वार्षिक वर्गणी - 500
त्रैवार्षिक वर्गणी - 1300
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे ‘अहिल्येचा चैतन्यमयी जागर’
आधुनिक काळात ‘वर्क –लाईफ बॅलन्स’-कुटुंब –करीयर सांभाळणे हे शिकवण्यासाठी कुण्या पाश्चिमात्त्य उदाहरणांची गरज भारतीय स्त्रियांना नाहीच. कारण कुटुंब आणि राजगादी सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या सारख्या असामान्य कर्तृत्त्ववान स्त्रिया या मातीत आपल्या पाऊलखुणांचे ठसे उमटवून गेल्या.भारताच्या इतिहासातील अशी उदाहरणे एकमेवाद्वितीय आहेत.

एकताच्या या अंकाला अतिथी संपादक म्हणून मा.सुमित्राताई महाजन लाभलेल्या असून त्यांनी –‘प्रेरणादायी देवी अहिल्या’ हा लेख खास एकतासाठी पाठवलेला आहे. चौंडी गावाच्या कन्येने माळव्याची राजगादी सांभाळली हा इतिहास किती प्रेरक आहे हे यात सुमित्राताईंच्या शब्दात वाचायला मिळते.

‘अहिल्या देवींचे ऐतिहासिक महत्त्व’ हा अभ्यासपूर्ण लेख आहे सुधीर थोरात Sudhir Thorat यांचा. हिंदू धर्मरक्षण आणि संवर्धन यासाठी अहिल्यादेवींचे इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.इस्लामी शासकांनी उध्वस्त केलेल्या हिंदू मंदिरांची पुन्हा बांधणी करून त्यांनी धर्मरक्षण केले.

अहिल्यादेवींच्या आर्थिक धोरणावर लेखन केले आहे डॉ.देवीदास पोटे यांनी. राज्यात मालाच्या दर्जा प्रमाणे कर आकारणी , भिलकवडी कर ,शेतसारा सगळ्यांचा आढावा घेणारा हा लेख अवश्य वाचावा.

अहिल्येच्या सामरिक पैलूंचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी Mohini Garge-Kulkarni यांनी. महिलांची सशस्त्र तुकडी तयार करणारी, राघोबादादांना परतवून लावणारी आणि इंग्रजांबद्दल पेशव्यांना सावध करणारी दूरदृष्टीची अहिल्या कशी रणरागिणी होती हे यात वाचावे .

‘अहिल्या देवी आणि पर्यावरण’ हा माहितीपूर्ण लेख आहे डॉ.राजेश मणेरीकर Rajesh Manerikar आणि चंद्रकला शिंदे यांचा . आज जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनलेली आहे. अहिल्यादेवींनी त्याकाळी बांधलेल्या विहिरी-बारव,प्रवास मार्गांवर झाडे लावणे, निसर्गपूरक साधने वापरणे हे त्यांच्या कल्याणकारी धोरणासह पर्यावरण जागृतीची साक्ष देतात.

औरंगजेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वत: टोप्या विणून आणि कुराणाच्या प्रती हाताने लिहून स्वत:च्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खुप वेळा आपण ऐकतो ,पण अहिल्यादेवी कित्येक वर्ष एकभुक्त राहिल्या, पांढरी माहेश्वरी साडी आणि रुद्राक्ष माळ परिधान करून स्वत:च्या पैशाने देवळे, घाट आणि धर्मकार्ये केली हे किती जणांना माहीत आहे ? असा प्रश्न विचारला आहे शेफाली वैद्य Shefali Vaidya यांनी त्यांच्या ‘व्रतस्थ विरागी राणी अहिल्याबाई होळकर’ या लेखात....

‘आमच्या मानबिंदू –लोकमाता अहिल्यादेवी’ हा प्रा.आरती तिवारी यांचा लेख अहिल्या देवींच्या समग्र गुणांचा आढावा घेणारा असून आजच्या पिढीने त्यातून अवश्य प्रेरणा घ्यावी.

‘सामाजिक समरसतेच्या अग्रणी –अहिल्यादेवी’ हा लेख आहे डॉ.श्यामा घोणसे Shyama Ghonse यांचा आहे. भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्याला शूर तरुणाला –मग तो कोणतीही जातीचा असो –आपली कन्या देण्याचा निर्णय अहिल्यादेवींनी घेतला आणि आमलात आणला. सामाजिक समरसता त्यांनी हिंदू ऐक्य समोर ठेवत आचरणात आणलेली होती.

‘लोककल्याणकारी अहिल्यादेवी’ हा Anjali Tagade अंजली तागडे यांचा लेख अहिल्यादेवींच्या समग्र धोरणावर प्रकाश टाकतो. त्यांनी लोककल्याण हेच ध्येय ठरवून अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या. ‘एक भारत -श्रेष्ठ भारत,एक हिंदू -श्रेष्ठ हिंदू’ या जाणीवेची बीजे त्यांनी त्यांनी पेरली.

‘ऐतिहासिक साधनांच्या प्रकाशात अहिल्यादेवी’ हा अभ्यासपूर्ण ससंदर्भ लेख आहे प्रणव पाटील Pranav Patil यांचा.जॉन माल्कम यांच्या ग्रंथातील अहिल्यादेवींच्या दिनचर्येची नोंद असो की ‘अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस बायकात किंवा दौलतवंतांस कोणी योग्यतेस नाहीच नाही’ हे हैदराबादच्या निजामाचे पत्र असो. अशा ऐतिहासिक नोंदींचा उपयोग करून लिहिलेला हा लेख अवश्य वाचावा.

‘पुण्यश्लोक अहिल्या देवींची मंदिरे’ हा सर्वेश फडणवीस Sarvesh Fadnavis यांचा लेख हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी अहिल्यादेवींनी उभारलेल्या मंदिरांची नोंद घेतो. अनेक ठिकाणी स्वत: जमिनी विकत घेऊन मंदिरांची पुन्हा उभारणी त्यांनी केली. ही केवळ मंदिरांची उभारणी नव्हती तर उभारणी होती हिंदूंच्या स्वाभिमानाची !

अहिल्यादेवींच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त राष्ट्र सेविका समिति द्वारे राबवल्या गेलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आहे स्मिता पत्तरकीने यांनी.
तर ‘देवी अहल्या मंदिर –एक दीपस्तंभ’ हा राष्ट्र सेविका समिति नागपूर येथील वास्तू आणि सेवा यावर आधारीत लेख आहे मेधा नांदेडकर यांचा .

तसेच ‘राष्ट्रहिताचे करण्या चिंतन’ हा राष्ट्र सेविका समितीच्या सेवा कार्यावर प्रकाश टाकणारा लेख आहे राधा भिडे यांचा.

स्त्रियांनी आपला आत्मसन्मान अवश्य जपावा पण त्याच बरोबर नम्रता बाळगणे , समोरच्या व्यक्तीला योग्य तो मान देणे असे आपले संस्कार कधीच विसरू नये. अहिल्या देवींना त्यांच्या सासूबाईंनी पदराच्या पाच गोष्टी सांगितल्या त्या आजही स्त्रियांसाठी मार्गदर्शक आहेत . त्यावर आधारीत ‘जप तुझे स्त्रीत्त्व ,जप तुझी शालीनता’ हा लेख आहे स्मिता कुलकर्णी Smita Kulkarni यांचा.

अहमदनगर ते अहिल्या नगरी ही वाटचाल सोपी नव्हती. याविषयी अवश्य वाचावे ‘अहिल्या नगरीची कथा’ या रवींद्र मुळे यांच्या लेखात .

भारतीय ज्ञानाचा खजिना या लेख मालेतील ‘ओपनहायमरला हे समजलं पण..’हा प्रशांत पोळ Prashant Pole यांचा अप्रतिम लेख प्राचीन भारतीय विज्ञानाची महती स्पष्ट करतो. अणुबॉम्बचा जनक ओपनहायमरला अणुबॉम्बचे परीक्षण करतांना भगवतगीतेच्या ओळी आठवतात . गुरुत्त्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला हे आपण समजतो पण आपल्याच प्रश्नोपनिषधात दोन –अडीच हजार वर्षांपूर्वी गुरुत्त्वाकर्षणाविषयी लिहून ठेवलेले आहे याविषयी आपण अनभिज्ञ असतो... !

असा हा एकता मासिकाचा अंक संग्रही ठेवावा असा असून सुजाण वाचक याचे स्वागत करतील याची खात्री वाटते.

एकता डिसेंबर -2024 –अंक परिचय अंकाची किंमत -50 रु.वार्षिक वर्गणी -500 त्रैवार्षिक वर्गणी -1300 संपर्क – 8956977357 संपाद...
11/12/2024

एकता डिसेंबर -2024 –अंक परिचय
अंकाची किंमत -50 रु.
वार्षिक वर्गणी -500
त्रैवार्षिक वर्गणी -1300
संपर्क – 8956977357

संपादकीय आहे – ‘निवडणूकीच्या निमित्ताने’
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने काही महत्त्वाचे मुद्दे यात मांडलेले आहेत. विशेषत: ‘व्होट जिहाद’ ‘हलाल फूड’ तसेच ‘लव्ह जिहाद’, ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला समर्थन देतांना समोर ठेवलेल्या सतरा मागण्या आणि त्यातून ध्वनित होणारा अर्थ...वक्फ बोर्ड आणि बरेच काही...

कव्हरस्टोरी आहे – ‘मी सूर्य पाहिला...’ एकता मासिकाच्या संपादिका रुपाली भुसारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला. विशेष म्हणजे खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे जयराम फगरे, आकाशवाणीचे सुनील देवधर आणि पुणे नगर वाचन मंदिरचे मधुमिलिंद मेहेंदळे आणि भुसारी या पाच जणांसह पंतप्रधान मोदी यांनी पंधरा मिनिटे संवाद साधला.
पंतप्रधान मोदी यांच्या तेजस्वी व्यक्तित्त्वाची आभा त्यांच्याशी संवाद साधतांना प्रखरपणे जाणवते. त्यांच्या कर्तृत्त्ववान आणि व्रतस्थ तेजाच्या संपर्कात आल्यावर डोळे दिपून जातात, त्यांच्या प्रभावी आभामंडलाची दाहकता आणि वागण्यातील साधेपणा, आपुलकी हे सगळेच भारावून टाकणारे आहे. या प्रसंगाला शब्दबद्ध करणारा हा लेख असून या सगळ्यांची मनोगते सुद्धा यात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिका आपला प्रभाव पुढे कसा दाखवणार आहे यावर अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे प्रा.गौरी पिंपळे यांचा ‘अमेरिकेची अर्थसत्ता’

'डॉ.हेडगेवार आणि व्यवस्थापनाचे धडे’ या दत्तात्रय आंबुलकर यांच्या लेखाचा दुसरा आणि शेवटचा भाग या अंकात आहे. डॉक्टरांच्या व्यवस्थापनाची तत्त्वे आजही मार्गदर्शक असून ती शाश्वत मुल्ये आणि शिस्त यावर आधारीत आहेत. संग्रही ठेवावा असा हा लेख अवश्य वाचावा.

‘कथा 84 mm LWL च्या निर्मिर्तीची’ हा काशीनाथ देवधर यांच्या लेखाचा दुसरा आणि शेवटचा भाग अंकात आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ (निवृत्त) असणाऱ्या देवधर यांनी या शस्त्राची चाचणी स्वत:च्या खांद्यावर आधी केली आणि मग सैन्यात हे शस्त्र रुजू झाले. या विलक्षण अनुभवला अवश्य या अंकात वाचावे.

‘राष्ट्रीय एकात्मता यात्रा -२०२४-@जन्नत-ए-काश्मीर’ हा डॉ.संतोष फरांदे यांचा लेख बदलत्या काश्मीरची साक्ष देतो. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या अनोख्या उपक्रमाची माहिती या लेखात आहे.

एकदा, केवळ नाडीपरिक्षा करुन डॉक्टरांनी शर्वरी कुलकर्णीला हिला विचारले, “अगं,बरं नाही वाटत तर केक का खाल्लास ?” हे सत्य आपण काहीही न सांगता वैद्यांनी कसे काय ओळखले ? याचे आश्चर्य तिने कायमचे मनात कोरून घेतले. आणि आता शास्त्र आणि तत्त्वज्ञान,भारतीय मूलतत्त्व विचार, पंचमहाभूते, न्यूटन –मॅक्स प्लांक आणि भौतिकशास्त्र या सगळ्या कंगोऱ्यांना एकत्र करत ती बिटस पिलानी,गोवा येथे संशोधन करीत आहे. यावर आधारीत तिचा लेख ‘आधुनिक विज्ञान आणि भारतीय मूलतत्त्व विचार’ हा चिंतन करायला भाग पाडतो.

‘प्राचीन भारताचे प्रभावी व्यवस्थापन’ हा प्रशांत पोळ यांचा अप्रतिम लेख आपल्या पूर्वजांच्या व्यवस्थापन कौशल्यावर प्रकाश टाकतो. उपनिषदे, मुंडकोपनिषद, ईशावास्योपनिषद तसेच कठोपनिषद यांच्यातील संदर्भ देत अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती या लेखात आहे.

श्रीअरविंद घोष यांनी भारतभूमीची अखंडता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे स्वातंत्र्य अपूर्ण मानले जाईल असे मत मांडले होते. देवीदास देशपांडे यांनी ‘भारताचा उदय म्हणजे सनातन धर्माचा उदय’ या लेखात अरविंदांच्या विचारांचे विवेचन केलेले आहे.

जलवर्षाव संपत जातो आणि हिरवाईने नटलेली सृष्टी डिसेंबरमध्ये थंडीची शाल पांघरते...दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. एक अनोखे लावण्य लेवून ऋतू बदलतो याचे रसिकतेने केलेले वर्णन वाचा मयूर भावे यांच्या ‘उत्तरायण’ या लेखात.

दिपाली देशपांडे यांचा ‘अविस्मरणीय यात्रा –चारधाम’ हा अनुभव सुद्धा या अंकात समाविष्ट केलेला आहे.

सुजाण वाचकांना हा अंक नक्कीच आवडेल याची खात्री वाटते.
एकता - जानेवारी -25 - देवी अहिल्या विशेष असून आजच आपली प्रत निश्चित करावी ही विनंती ...

25/11/2024

भेटीगाठी...पंतप्रधान मोदी यांच्या समवेत, खास १५ मिनिटांचा वेळ मिळू शकला... फगरे सरांना - वय ९४  (राष्ट्र भाषा समिती, पुण...
19/11/2024

भेटीगाठी...

पंतप्रधान मोदी यांच्या समवेत, खास १५ मिनिटांचा वेळ मिळू शकला...
फगरे सरांना - वय ९४ (राष्ट्र भाषा समिती, पुणे ) मोदीजींना भेटायचे होते. आम्ही फक्त मदत केली...त्यांच्याबरोबर आमचेही भेटीचे स्वप्न पुर्ण झाले.
खासदार मेधा कुलकर्णी ताईंचे विशेष आभार.
"एकता मासिक मै जानता हूँ, काफी पुराना है "- या
मोदीजींच्या वाक्यातच खूप काही आले...
त्यांचा औरा विलक्षण तेजस्वी... डोळ्यात चमक... वागण्यात अदब... तरीही साधेपण, असामान्यत्व आणि बरेच काही.....
सर्व काही कायमचे मनात साठवून घेतले. सोबत पुनवाचे मधुमिलींद मेहेंदळे, आकाशवाणीचे सुनिल देवधर.
पंतप्रधानांसह पंधरा मिनिटे गप्पा करता येणे, ते सुद्धा पुण्यात हे परम भाग्य...

#नरेंद्रजीमोदी

एकता दिवाळी अंकाचे प्रकाशन  एकता दिवाळी अंक प्रकाशन सोहळा पुण्यात 26 ऑक्टोबर, शनिवारी मोठया उत्साहात संपन्न झाला. एकताच्...
27/10/2024

एकता दिवाळी अंकाचे प्रकाशन

एकता दिवाळी अंक प्रकाशन सोहळा पुण्यात 26 ऑक्टोबर, शनिवारी मोठया उत्साहात संपन्न झाला. एकताच्या अंकाचे प्रकाशन प्राचार्य श्याम भुर्के, ॲड. एस. के. जैन (अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी), मैत्रेयी शिरोळकर (राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत बौद्धिक प्रमुख) रविंद्र घाटपांडे (एकताचे अध्यक्ष ) आणि रुपाली भुसारी (एकताच्या संपादिका ) यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्तविक केले.
ॲड. एस. के. जैन यांनी एकता मासिक सामाजिक - सांस्कृतिक मुल्ये जपणारे असल्याने घरोघरी पोहचावे असे प्रतिपादन केले. शिवाय, आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवार आणि योग्य पक्षाची निवड आपण सजग नागरिकांनी केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले . समाजाला, संस्कृतीला , आपल्या मुल्यांना जपणारा पक्ष हाच राज्याचे हित साधू शकतो हे भान ठेवले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
मैत्रेयी ताईंनी उद्बोधन करताना सांगितले की, एकतातील अनेक लेख संग्रही ठेवावे असे असतात. अनेक लेख बौद्धिक खाद्य पुरविणारे असतात. त्यामुळे वैचारिक दिशा मिळते. बालविभागासाठी थोडी जागा ठेवावी देखील अशी सुचना त्यांनी केली.
प्राचार्य श्याम भुर्के यांनी आपल्या खुसखुशीत विनोदी शैलीत सभागृहाला हसवत ठेवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा कुलकर्णी ने केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात एकताच्या प्रदीप उपासनी, मानसी ठाकूर आणि सुमेध बागाईतकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते.

एकता दिवाळी अंक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) परिचय -2024 एकता दिवाळी अंकसह वार्षिक वर्गणी –500 रु.त्रैवार्षिक वर्गणी -1300 रु.फक्...
16/10/2024

एकता दिवाळी अंक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) परिचय -2024
एकता दिवाळी अंकसह वार्षिक वर्गणी –500 रु.
त्रैवार्षिक वर्गणी -1300 रु.
फक्त दिवाळी अंक – 200 रु.(कुरीयर खर्च वेगळा)
संपर्क – 8956977357
1) संघ शताब्धी – भैय्याजी जोशी
2) संघ आणि हिंदूंचे राष्ट्रीय मानस-दिलीप करंबेळकर
3) डॉ. हेडगेवार आणि व्यवस्थापन -दत्तात्रय आंबुलकर
4) संघ -आक्षेप आणि वास्तव -दिलीप क्षीरसागर
5) संघ- संकट काळातील देवदूत -अमोल पुसदकर
6) युगप्रवर्तक डॉ.हेडगेवार -डॉ.शरद कुंटे
7) नव दधीचि-नाना ढोबळे -सुहास हिरेमठ
8) भारतमाता जगविख्याता -प्राचार्य प्रमोद डोरले
9) भारताचे परराष्ट्र धोरण (नेहरू ते मोदी)- शांभवी थिटे
10) अफगाणिस्तानच्या बामियान बुद्धमूर्ती -मीना साठे
11) मानसिक तणावाचे व्यवस्थापन -दीपाली नारखेडे
12) इमोशनल इटिंग -साईशा कुलकर्णी
13) डॉलर - जणू आर्थिक शस्त्र -प्रा.गौरी पिंपळे
14) मल्हारराव -अहिल्यादेवी -नातं गुरु शिष्याचं -प्रणव पाटील
15) शिवरायांचे जलदुर्ग -देवदत्त गोखले
16)प्राचीन कृषी ज्ञानाचा खजिना –प्रशांत पोळ
17) मुंग्यांचे अद्भुत विश्व –नूतन कर्णिक
18)कथा 84 mm LWLच्या निर्मीतीची – काशीनाथ देवधर
19) किम जोंग ऊन आणि उत्तर कोरिया –निखील कासखेडीकर
20) अघटित –अश्विनी जांभेकर-पितळे (भयकथा)
21)सावलीचं रहस्य –रेखा पिटके (भयकथा)
22) सगेसोयरे –अनामिका बोरकर (भयकथा)
23)माझे पहिले प्रेम –अनिल अभ्यंकर (विनोदी कथा)
24)भयावह स्मृती संसार (आल्फ्रेड हिचकॉक) –रमेश पोफळी
25) स्मृतींची उलगडतांना पाने – बापूराव कुलकर्णी (शब्दांकन मानसी ठाकूर )
26)पर्यावरण संवर्धनाचे ‘परि’पूर्णम उत्तर - भाग्यश्री पाठकजी (पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या पूर्णम इकोव्हीजनच्या राजेश मणेरीकरांच्या कार्यावरचा लेख)
27)आनंदाचे पासबुक – प्राचार्य श्याम भुर्के यांची डॉ.अनुजा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत .
28) माझं घर, माझा संसार – नीलिमा बोरवणकर
29)कहाणी नावाड्याची- सुखेशा (बंगाली रचनेचा मराठी अनुवाद –स्वाती दाढे )
30)कविता – आठवणीत मन रमते -अरुण देशपांडे
31) कविता –काळ- श्रीनिवास शारांगपाणी
32)कविता -प्रणाम स्वातंत्र्यवीरास –सुभाष बी.जोशी.
33)कविता- शिदोरी –सुषमा वडाळकर
34) कविता पाझरते जीवन होऊन –रंजना शितोळे
35)कविता –आकाशदिवा-महेंद्र वाघ
(एकताच्या दिवाळी अंकात हे विषय असून त्वरीत अंकाची नोंदणी करावी)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  शताब्दी ही खूप मोठी महत्त्वाची आणि मोठी ऐतिहासिक बाब आहे . डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेला ...
04/10/2024

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी ही खूप मोठी महत्त्वाची आणि मोठी ऐतिहासिक बाब आहे . डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेला संघ इतके वर्षे यशस्वीपणे वाटचाल करत आहे याचे कुतूहल समाजात आहे . डॉक्टरांच्या व्यवस्थापनात असे कोणते पैलू होते की आजही ते शाश्वत आहेत ?
अशी एक संघटना त्यांनी कशी घडवली , की हजारो स्वयंसेवक स्वतःचे संपूर्ण जीवन त्यासाठी वाहून घेत आहेत ...
या लेखात अवश्य वाचा ..

03/10/2024
एकता सप्टेंबर -अंक परिचय वार्षिक वर्गणी -500त्रैवार्षिक वर्गणी - 1300 संपर्क - 8956977357संपादकीय आहे – ‘भारताशेजारील आव...
06/09/2024

एकता सप्टेंबर -अंक परिचय

वार्षिक वर्गणी -500
त्रैवार्षिक वर्गणी - 1300
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे – ‘भारताशेजारील आव्हान – बांगला देश’
बांगला देश –चीन यांचे संबंध पहाता आता ते अधिक दृढ होत जातील आणि भारतापुढील आव्हान तीव्र होणार यात शंका नाही.

गोपाळ जोशी यांचा लेख- ‘आव्हान उध्वस्त बांगला देशाचे’ हा उत्तम लेख असून त्यात बांगला देशच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेतलेला आहे. कुकीलँड आणि अमेरिकेतील डीप स्टेट पासून म्यानमारचा राखाईन आणि आग्नेय आशिया यांचे विश्लेषण त्यात केलेले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे डॉ.राजू श्रीरामे यांनी त्यांच्या ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ या लेखात.

‘पुण्यातील गणपती मंडळांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान’ हा संग्रही ठेवावा असा लेख आहे सुप्रसाद पुराणिक आणि स्वप्नील नहार या गणेशभक्त अभ्यासकांचा ...

५ सप्टेंबर या शिक्षकदिनाच्या निमित्ताने निवडक थोरामोठ्यांच्या विद्यार्थीदशा आणि त्यांची वाटचाल यावर माहितीपूर्ण लेख – ‘थोरांचा शैक्षणिक परिचय’- लिहिला आहे दत्तात्रय आंबुलकर यांनी...

‘संवेदनशील कलावंत’ – या लेखात यशस्वी युवा चित्रकार विवेक दहिवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय एकता ब्युरोद्वारे करून दिलेला आहे. सप्टेंबर अंकाच्या मुखपृष्ठावर त्यांचेच पेंटिंग प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

'भारतीय ज्ञानाचा खजिना ' या सदरात प्रशांत पोळ यांनी ‘प्राचीन गणितातील गमती’ या लेखात संदर्भासह अनेक दाखले देत भारताने जगाला दिलेल्या गणितातील देणग्यांविषयी विवेचन केले आहे. पायथागोरसचे प्रमेय किती तरी आधी बोधायन ॠषींनी मांडलेले आहे. ज्याला आपण ‘पास्कल ट्रँगल’ म्हणत डोक्यावर घेतले त्याचा उल्लेख पिंगल यांच्या ‘छंदशास्त्र’ याग्रंथात आधीच आहे. इतकेच काय कंबोडीयातील ‘अंकोरवाट’ मंदीर ज्या ‘मेरू प्रस्तर’ संकल्पनेवर आधारीत आहे ते मेरुप्रस्तर पिंगल ॠषींनी दिलेली देणगी आहे. अत्यंत मोलाची माहिती देणारा हा लेख अवश्य वाचावा.

रवींद्र गोळे यांनी ‘पुनश्च’ या सदरात ‘वळंबा’ या शिवमूर्ती भांडेकर यांच्या आत्मचरित्राचा परिचय करून दिलेला आहे. वडार समाजातील भांडेकर यांचा संघर्ष आणि प्रगतीचे वर्णन यात केलेले आहे.

राष्ट्रभाषा दिवस -१४ सप्टेंबरच्या निमित्ताने पुण्यातील राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष जयराम फगरे यांच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख दिला आहे पुणे नगर वाचन मंदिरचे मधुमिलिंद मेहेंदळे यांनी. ९३ वर्षीय फगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी एक मानचिन्ह तयार करून ठेवलेले आहे. फगरे सरांच्या हस्ते ते मोदीजी स्वीकारण्याचा योग कधी येतो याची आम्हा सगळ्यांच प्रतिक्षा आहे.

तुषार बोरोटीकर यांनी ‘कुटुंबांची आधुनिकता की अधोगती ?’ या लेखात भारतातील कुटुंब व्यवस्थेत झालेली स्थित्यंतरे आणि त्याचे परिणाम याविषयी उत्तम विश्लेषण केलेले आहे. विभक्त कुटुंबांकडे झालेली वाटचाल आता व्यक्तीकेंद्री होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे .

आशा भोसले वयाची ९१ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या सुरेल गीतांची गुंफण करून ‘स्वर –रागिणी – आशा भोसले’ हा तरल लेख लिहिला आहे जेष्ठ लेखक रमेश पोफळी यांनी. ओ.पी. नय्यर सोबत – ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ असो की आर. डी. बर्मनसह ‘चुरा लिया है तुमने’ असो.. आशाचा आवाज अनेक पिढ्यांना वेड लावत गेला आहे.

एकताचे प्रतिनिधी आणि संघाचे जेष्ठ कार्यकर्ते चंदू ओक यांच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि गोविज्ञान संस्थेचे सर्वेसर्वा बापूराव कुलकर्णी यांनी.

जेष्ठ मूर्तीविज्ञान संशोधक गो.बं.देगलूरकर यांचे ‘अथातो बिंब जिज्ञासा’ (अनुवाद-आशुतोष बापट) या स्नेहल प्रकाशनच्या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे शौनक कुलकर्णी यांनी तर ‘मनोबोध’ या प्रा.अ.दा. आठवले (पू.स्वामी वरदानंद भारती) यांच्या ग्रंथाचा परिचय करून दिला आहे अनंत पुस्तकालयच्या अनंत काटे यांनी.

असा हा एकताचा अंक असून सुजाण वाचकांना नक्की आवडेल याची खात्री आहे.

एकता मासिक - ऑगस्ट २०२४ - –मणिपूर विशेष - अंकाची किंमत - 50 + कुरीअर खर्च वेगळा वार्षिक वर्गणी - 500 त्रैवार्षिक वर्गणी ...
03/08/2024

एकता मासिक - ऑगस्ट २०२४ - –मणिपूर विशेष -
अंकाची किंमत - 50 + कुरीअर खर्च वेगळा
वार्षिक वर्गणी - 500
त्रैवार्षिक वर्गणी - 1500
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे ‘मणिपूरच्या निमित्ताने’ मणिपूरच्या परिस्थितीचे विवेचन यात केलेले आहे.

राजेश कुलकर्णी यांचा लेख ‘मणिपूर - सद्यस्थिती’ हा मणिपूरमध्ये घडलेल्या घटना आणि आताच्या परिस्थितीचे विश्लेषण करतो.

मृदुला राजवाडेचे ‘मणिपूरच्या इतिहासात डोकवताना’ हा लेख मणिपूरच्या प्राचीन इतिहासाचे विवेचन करतो.

‘मणिपूरचा हिंसाचार’ या अमिता आपटे यांच्या लेखात गेल्या वर्षीच्या हिंसाचाराची कारणे आणि एकूणच तेथील तणाव यावर प्रकाश टाकलेला आहे.

भैय्याजी काणे यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यांनी मणिपूरला उभारलेल्या कार्याचा मोठा विस्तार झालेला आहे. अमृता खाकुर्डीकर यांनी भैय्याजींच्या कार्याचा आढावा घेणारा माहितीपूर्ण लेख लिहिलेला आहे.

भैय्याजींनी एका बारा वर्षाच्या मुलाला आपल्यासोबत मणिपूरला आणले. नंतर हा मुलगा कायमचा मणिपूरचाच होऊन राहिला. तिथे अखंडपणे सेवा देत राहिला. हा मुलगा म्हणजेच जयवंतराव कोंडविलकर . ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ द्वारे अनेक शैक्षणीक प्रकल्प राबवून मणिपूरच्या सगळ्या जमातींच्या मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जागवण्याचे कार्य ते आज करीत आहेत. त्यांना भेटून त्यांची मुलाखत घेतली आहे अमृता खाकुर्डीकर यांनी.

एप्रिल २०२३ मध्ये पिंपरी चिंचवडमधील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या शिवराज पिंपूडे यांनी मनोज देवळेकर यांच्यासह मणिपूरचा दौरा केला होते. ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’च्या कार्याची ओळख आणि त्यांचे अनुभव आहेत त्यांच्या ‘शांततेच्या काळातील मणिपूर दर्शन’ या लेखात. ओजा शंकर स्कूल, चुराचांदपूर आणि तमिंगलॉंग या ठिकाणी असणाऱ्या शाळा आणि सेवा कार्य यांची माहिती यात वाचायला मिळते.

वीणा बेडेकर यांनी अनेक वर्षे मणिपूर येथे राहून सेवा दिली आहे. ‘कार्यकर्तीच्या डायरीतून मणिपूर’ या लेखात तिच्या डायरीतील काही पानांना प्रसिद्धी दिलेली आहे. २०१७ पासूनची डायरीची पाने तिचे उत्कट मनोगत आणि मणिपूरची परिस्थिती कथन करतात.

वसुधा पिंगळे ही सुद्धा ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांपैकी एक आहे. ‘आणि १५ ऑगस्ट सुरु केला’ या तिच्या लेखातून तिचा मणिपूरचा सुंदर अनुभव वाचायला मिळतो .

‘मणिपूर –एक सांस्कृतिक ओळख’ हा अभ्यासपूर्ण लेख आहे नयना कासखेडीकर यांचा. मणिपूरचे सणवार,भाषा,साहित्य,लोकपरंपरा,
नृत्य याविषयीची रंजक माहिती यात वाचायला मिळते.

सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्त्वाखाली १९४४ ला आझाद हिंद फौजेने मणिपूरमधील मोईरंग हे ठिकाण ब्रिटीशांकडून जिंकून घेतले. १४ एप्रिलला ‘अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद’चे सदस्य आता सुद्धा ‘मोईरंग दिवस’ तिथे नियमितपणे साजरा करतात. या माहितीसह लेफ्टनंट कर्नल डॉ.संजय बोरसे यांनी ‘मणिपूरच्या अविस्मरणीय आठवणी’ या लेखात त्यांचा मणिपूरचा सुखद अनुभव लिहिलेला आहे.

भारतीय ज्ञानाचा खजिना या सदरामध्ये प्रशांत पोळ यांनी 'प्राचीन भारतातील नगर नियोजन ' हा अत्यंत अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे यात कौटिल्याचे अर्थशास्त्र , दक्षिण भारतातील ' मयमतम ' हा ग्रंथ यांच्या संदर्भ देऊन प्राचीन काळाची नगर व्यवस्था किती उत्तम होती याचे दाखले दिलेले आहेत.

'पुनश्च ' या सदरामध्ये रवींद्र गोळे यांनी 'पारध्याचं जिणं ' या रन्नेश पिंग्या काळे यांच्या आत्मचरित्राचा परिचय अत्यंत संवेदशिलपणे करून दिलेला आहे. पारधी समाजाच्या चालीरीती, नातेसंबंध यांचे दर्शन यात घडते .

अमोल पुसदकर यांनी 'अजिंक्य भारत, अजिंक्य जनता' या लेखात स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरीकांच्या कर्तव्याचे स्मरण करून दिलेले आहे.

स्वाती दाढे या बंगाली भाषा तज्ज्ञ असून 'रवींद्रनाथांची साहित्य सृष्टी - एक अवलोकन ' यात रवींद्रनाथांच्या बंगाली साहित्याचा परिचय अत्यंत ओघवत्या शैलीत करून दिलेला आहे.
तर
स्वाती दाढे यांच्याच बंगालीतून मराठीमध्ये अनुवादित केलेले ' 'अनुभूती आणि इतर बंगाली कथा ' या पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे आश्लेषा महाजन यांनी ..

'कवितेतील श्रावण ' या लेखात रमेश पोफळी यांनी विविध गीते - कवितातून डोकवणाऱ्या श्रावणाला शब्दबद्ध केलेले आहे .

असा हा एकताचा अंक कायम संग्रही ठेवावा असा आहे. सुजाण वाचक स्वागत करतील याची खात्री आहे.

एकता जुलै -  अंक परिचय वार्षिक वर्गणी -500त्रैवार्षिक वर्गणी -1300 Gpay -9922427596एकताचा हा अंक वारी विशेष असून पुण्यात...
11/07/2024

एकता जुलै - अंक परिचय
वार्षिक वर्गणी -500
त्रैवार्षिक वर्गणी -1300
Gpay -9922427596

एकताचा हा अंक वारी विशेष असून पुण्यात दोन दिंड्यांमध्ये सहभागी होत या अंकाचे वारकऱ्यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले .

संपादकीय आहे - ' अनपेक्षित यशअपयश '. निवडणुकीनंतरचे विश्लेषण यामध्ये आहे .

'तिसरे पर्व मोदींचेच पण अधिक कसोटीचे ' हा उत्तम लेख आहे मनोहर कुलकर्णी यांचा तर 'काय घडेल मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात ? ' या लेखातून राजकीय भविष्याचा वेध घेतला आहे डॉ. शरद कुंटे यांनी .

'पंढरीची वारी जनजागरण सोहळा ' हा विवेचनात्मक लेख आहे विद्याधर ताठे यांचा तर 'वारी - एक भक्तिमय सोहळा ' या लेखात द्वारकाधीश जोशी यांनी वारकऱ्यांच्या भक्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे .

डॉ. पूजा भावार्थ देखणे यांच्या घरी पारंपारीक दिंडी असून त्यांनी वारीचे मानसशास्त्रीय दृष्या विवेचन केलेले आहे.

डॉ. रमा गर्गे यांनी 'विठोबाची वारी विषमता निवारी' या लेखामध्ये भक्ती आणि समता यांच्या अनुभूतीला शब्दरूप दिलेले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात खडकतकर दिंडी खूप जुनी आहे .तिला रथामागे पहिला क्रमांक आहे. या आपल्या पारंपारिक दिंडीला आजही पुढे नेणारे चंद्रकांत यशवंत तांबेकर खडकतकर यांनी 'राम कृष्ण हरी ' या लेखातून भक्तिमय अनुभव कथन केले आहे .

भारतीय ज्ञानाचा खजिना या सदरात ' व्यापारात सर्वोच्च स्थानावर असलेला भारत ' यात प्रशांत पोळ यांनी ओडिशामधील - बाली यात्रा उत्सव आणि चीनसह प्राचीन भारताच्या व्यापाराचे पुरावे दिलेले आहेत . भारताचा व्यापार किती प्राचीन होता हे पुराव्यासह स्पष्ट केले आहे .

पुनश्च - या सदरात भीमराव वस्ती यांच्या - बेरड - या आत्मकथनाचे विवेचन केलेले आहे .

काशिनाथ देवधर यांनी ' भारतीय प्रगत लढाऊ विमान ॲमका ' यात लष्कराच्या भरारीची माहिती दिलेली आहे .

' देशभक्त कोशकार ' यात कौमुदी परांजपे यांनी चंद्रकांत शहासने यांची मुलाखत घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत .

स्वातंत्र्य योद्धा सरदार उदमसिंह यांना 1940 च्या जुलैमध्ये फाशी देण्यात आली होती . त्यांच्या अतुलनीय त्यागाची माहिती देणारा लेख लिहिला आहे शशी पाटणकर यांनी .

दोन हजार वर्षापूर्वीच्या 'भरत मुनींच्या नाट्यशास्त्रचा परिचय ' करून देणारा विवेचनात्मक लेख आहे मकरंद शांताराम यांचा ...

तर - डिव्हाईन मीट - या अपर्णा परांजपे आणि - वारी पिलग्रिमेज - भक्ती बिईंग अँड बियाँड - या
डॉ . वरदा संभूस यांच्या पुस्तकांचा परिचय अंकात आहे .

' घेतला मी वसा ' ही प्रमोद वसंत बापट यांची कविता सुद्धा अंकात आहे.

एकताच्या वारी अंकाच्या फार कमी प्रती शिल्लक असून कुणाला हव्या असल्यास त्वरीत संपर्क साधावा .

Address

1360, Shukrawar Peth, Bharat Bhavan
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918956977357

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekta Masik - एकता मासिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ekta Masik - एकता मासिक:

Videos

Share