Megh Dada FC

Megh Dada FC युवा नेते,
युवाकांचा बुलंद आवाज,
युवकांचा परिवार......
मेघ दादा.....

नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर मध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! #घटस्थापना ...
03/10/2024

नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर मध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
#घटस्थापना #नवरात्री

Ranajagjitsinha PatilMalhar PatilArchana Ranajagjitsinha PatilArchana Patil FCTuljabhavani Mata TuljapurDharashiv- धाराशिव 2.0

17/09/2024
09/09/2024

मुख्यमंत्री योजनादूत'च्या माध्यमातून काम
जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराची उत्तम संधी..

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.

या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी त्यांचे नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून आपला अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत करावा.

06/09/2024

धाराशिवचे सुपुत्र श्री.चेतन सपकाळ यांनी जागतिक डेफ नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत २५ मीटर (रॅपिड फायर पिस्तूल) मध्ये ब्राॅंझ पदकाची कमाई केली या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन..

२०२४ जर्मनी (हॅनहोअर) येथे सुरू असलेल्या दुसऱ्या जागतिक डेफ नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत चेतनने तिसरे स्थान प्राप्त करून २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मध्ये वैयक्तीक ब्राॅंझ पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतील चेतनचे हे दुसरे पदक आहे.

चेतन हा गेल्या सहा वर्षांपासून पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुलमध्ये तर गेल्या वर्षापासून भोपाळ येथील राष्ट्रीय क्रिडा संकुलाच्या रेंज मध्ये सराव करीत आहे.

प्रशिक्षक जयवर्धनसिंह, पी.एन.प्रकाश, कॅप्टन सी.के.चौधरी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एन.आर.ए.आय च्या प्रशिक्षक प्रिती शर्मा यांनी चेतनला मार्गदर्शन केले आहे.

चेतनने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून त्यामुळे देशात धाराशिव शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन.

#जर्मनी #डेफ_नेमबाजी_चॅम्पियनशिप

06/09/2024
05/09/2024

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुल्यसंवर्धक, ज्ञानप्रसारक, प्रशिक्षक, प्रबोधक अशा अनेक भूमिकांमधून संस्कारित युवा पिढी घडविण्यात शिक्षकांचा अमुलाग्र वाटा असतो..

म्हणूनच शिक्षक हादेखील विकासाचा एक अविभाज्य भाग आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही..

#शिक्षक_दिन #शुभेच्छा

05/09/2024

पुस्तकांच्याही पलीकडे जाऊन माझ्या अनेक शिक्षकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या माणुसकीच्या मूल्यांची रुजवणूक माझ्यात केली.. त्या सर्वांप्रती मी कृतज्ञ आहे!!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिक्षक_दिन

05/09/2024

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

'शिक्षक' हे भावी पिढीचे शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.. सर्व शिक्षक आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया!!

#शिक्षक_दिन #शुभेच्छा

04/09/2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठांच्या हितासाठी महायुती सरकारने घेतलेला एक सक्षम निर्णय.. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा!

राज्यातील वय वर्षे ६५ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे.. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्यासंबंधित गोष्टींची व सुविधांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यांना दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी हा प्रयत्न आहे.

ज्येष्ठांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अक्षक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र व्यक्तींना एकवेळ एकरकमी रू. ३ हजारच्या मर्यादेत लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देऊन त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवले जाणार आहे.

मिळालेल्या रकमेतून लाभार्थ्यांनी विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक व प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत संबंधित कार्यालयाकडे सादर करणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची ६५ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिक असणे व वार्षिक उत्पन्न रु.२ लाखांच्या आत असणे आवश्यक आहे..

*सर्व आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज समाजकल्याण विभागाचे कार्यालय तसेच त्या अंतर्गत येणारे वसतिगृह व शाळा येथे देण्याबाबत समाजकल्याण विभागाने कळविले होते. अनेक जेष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी प्रवास करून जाणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सदर अर्ज गावातच ग्रामपंचायत मध्ये जमा करून पुढे समाजकल्याण विभागाकडे देण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायत मध्ये अर्ज घेण्याबाबत कळविले असून जेष्ठ नागरिक आता आपला अर्ज गावातच जमा करू शकतील.*

*तरी जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या गावातच ग्रामपंचायत मध्ये अर्ज जमा करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.*

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार!

योजनेचा अर्ज पुढील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करता येईल..

https://tinyurl.com/Vayoshri-Yojna-Form

#मुख्यमंत्री_वयोश्री_योजना

03/09/2024
30/08/2024
29/08/2024

वर्ग-2 च्या जमिनीबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय - 5 टक्के नजराणा भरुन जमिनी होणार नियमानुकूल
मंत्रिमंडळ निर्णय दि.13 ऑगस्ट 2024
लाखो नागरिकांना लाभ
कामाचा वादा कामाचा दादा
#राणादादा

Address

Osmanabad
413501

Telephone

+917499439176

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Megh Dada FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Megh Dada FC:

Videos

Share

Nearby media companies