Vyas Creations

Vyas Creations व्यास क्रिएशन्स् - क्रियाशील नवनिर्म? सर्जनशीलतेला सतत आव्हान देत , दर्जेदार साहित्यकृती प्रकाशात आणणं ही व्यास क्रिएशन्स् ची खरी ओळख.

विविध विषयावर

13/11/2023

*बालगंधर्व, दीनानाथ, भीमसेनजी आणि अभिषेकी यांच्या गायकीचे 'गंधर्वगान'*
"यातील रक्कम भारतीय जवानांच्या मदतीसाठी"

दिवाळी म्हटली की जशी पदार्थांची आपल्या घरात रेलचेल असते त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांची सुद्धा मेजवानी असते. त्यात "दिवाळी पहाट" वर मराठी माणसाचं विशेष प्रेम! त्यामुळे सकाळी लवकर उठून, अभ्यंग स्नान करून, थोडा फराळ करून दिवाळी पहाट कार्यक्रम ऐकणे आणि पाहणे ही फार मोठी पर्वणी आहे. याही वर्षी दिवाळीमध्ये सुप्रसिद्ध गायकांच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना 'व्यास क्रिएशन्स ठाणे' आणि'सवाईगंधर्व एंटरटेनमेंट'ने एक विशेष दिवाळी पहाट आयोजित केली आहे, ज्यातील उत्पन्नाची रक्कम ही भारतीय जवानांसाठी देण्यात येणार आहे. स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली आणि आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे यांच्या सुमधुर आणि सुश्राव्य गायकीने सजलेला हा कार्यक्रम असणार आहे. मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर (दीपावली पाडवा) या दिवशी सकाळी ७:०० वा. विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ही पहाट असणार आहे. मटा कल्चर क्लब, विलेपार्ले कल्चर क्लब आणि स्मृतिगंध हे माध्यम प्रयोजक असणार आहेत. सहयोग 'व्यास क्रिएशन्स ठाणे'; पार्टनर इंडियन ऑइल, जाई काजळ; पॉवर्ड बाय 'एडिसन क्लब' प्रायोजक आहेत. डॉ. भरत बलवल्ली म्हणजे दीनानाथांच्या, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या गायकीचे; तर आनंद भाटे बालगंधर्व, पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचे वारसदार म्हणायला हवेत. त्यांच्या गायनाने सजलेले हे 'गंधर्वगान'! म्हणजेच ही दिवाळी कान आणि मन तृप्त करणारी ठरणार आहे. मकरंद कुंडले (ऑर्गन), एस आकाश (बासरी), प्रसाद करंबेळकर (तबला), दादा परब (पखवाज), एकनाथ परब (तालवाद्य) अशी प्रसिद्ध वादकांची फळी या कार्यक्रमाला साथसंगत करणार आहेत. संकल्पना आणि निर्मिती आकाश भडसावळे, निलेश गायकवाड यांची असून मिलिंद कुलकर्णी निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत.

13/11/2023

'व्यास क्रिएशन्स' सादर करीत आहे
'सवाईगंधर्व' निर्मित न भूतो न भविष्यती जोडीची दीप संध्या!

आर्या आंबेकर आणि पंडित आनंद भाटे एकाच मंचावर गाणार...

*Arya Ambekar & Anand Bhate Live*

कधी? : दीपावली पाडवा १४ नोव्हेंबर सायंकाळी ४ वा.
कुठे? : श्री शिवाजी मंदिर, दादर (प.)

तिकीट विक्री नाट्यगृहात सुरू
ऑनलाईन - bookmyshow वर

13/11/2023

बालगंधर्व, दीनानाथ, भीमसेनजी आणि अभिषेकी यांच्या गायकीचे 'गंधर्वगान'
"यातील रक्कम भारतीय जवानांच्या मदतीसाठी"

दिवाळी म्हटली की जशी पदार्थांची आपल्या घरात रेलचेल असते त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांची सुद्धा मेजवानी असते. त्यात "दिवाळी पहाट" वर मराठी माणसाचं विशेष प्रेम! त्यामुळे सकाळी लवकर उठून, अभ्यंग स्नान करून, थोडा फराळ करून दिवाळी पहाट कार्यक्रम ऐकणे आणि पाहणे ही फार मोठी पर्वणी आहे. याही वर्षी दिवाळीमध्ये सुप्रसिद्ध गायकांच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना 'व्यास क्रिएशन्स ठाणे' आणि'सवाईगंधर्व एंटरटेनमेंट'ने एक विशेष दिवाळी पहाट आयोजित केली आहे, ज्यातील उत्पन्नाची रक्कम ही भारतीय जवानांसाठी देण्यात येणार आहे. स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली आणि आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे यांच्या सुमधुर आणि सुश्राव्य गायकीने सजलेला हा कार्यक्रम असणार आहे. मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर (दीपावली पाडवा) या दिवशी सकाळी ७:०० वा. विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ही पहाट असणार आहे. मटा कल्चर क्लब, विलेपार्ले कल्चर क्लब आणि स्मृतिगंध हे माध्यम प्रयोजक असणार आहेत. सहयोग 'व्यास क्रिएशन्स ठाणे'; पार्टनर इंडियन ऑइल, जाई काजळ; पॉवर्ड बाय 'एडिसन क्लब' प्रायोजक आहेत. डॉ. भरत बलवल्ली म्हणजे दीनानाथांच्या, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या गायकीचे; तर आनंद भाटे बालगंधर्व, पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचे वारसदार म्हणायला हवेत. त्यांच्या गायनाने सजलेले हे 'गंधर्वगान'! म्हणजेच ही दिवाळी कान आणि मन तृप्त करणारी ठरणार आहे. मकरंद कुंडले (ऑर्गन), एस आकाश (बासरी), प्रसाद करंबेळकर (तबला), दादा परब (पखवाज), एकनाथ परब (तालवाद्य) अशी प्रसिद्ध वादकांची फळी या कार्यक्रमाला साथसंगत करणार आहेत. संकल्पना आणि निर्मिती आकाश भडसावळे, निलेश गायकवाड यांची असून मिलिंद कुलकर्णी निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत.

*व्यास क्रिएशन्सचा ठाण्यात रंगला सहा दिवाळी अंकांचा प्रकाशन सोहळा  प्रकाशित सर्वकष साहित्याचा सुरेख संगम!!!दीपोत्सव २०२३...
12/11/2023

*व्यास क्रिएशन्सचा ठाण्यात रंगला सहा दिवाळी अंकांचा प्रकाशन सोहळा प्रकाशित सर्वकष साहित्याचा सुरेख संगम!!!दीपोत्सव २०२३: तीन दिग्गज प्रकाशकांचा सत्कार ही कल्पना मुळात सात्त्विक : ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण पहा क्षणचित्रे...*

290 new items · Album by garba 2023

व्यास क्रिएशन्स प्रकाशित सर्वकष साहित्याचा सुरेख संगम!!! 💐💐१२००/- किमतीचे पाच दिवाळी अंक वाचकांच्या सवलतीत🙏🙏 फक्त रु. १०...
11/11/2023

व्यास क्रिएशन्स प्रकाशित सर्वकष साहित्याचा सुरेख संगम!!! 💐💐

१२००/- किमतीचे पाच दिवाळी अंक वाचकांच्या सवलतीत🙏🙏
फक्त रु. १०००/- घरपोच

सवलतीचा नक्की फायदा घ्या...
#दीपोत्सव #विशेषांक #दिवाळी

* दीपोत्सव २०२३: सहा दिवाळी अंकांचे प्रकाशन *दै पुण्यनगरी वृत्तपत्राला मनःपूर्वक धन्यवाद!व्यास क्रिएशन्स तर्फे तब्बल सहा...
11/11/2023

* दीपोत्सव २०२३: सहा दिवाळी अंकांचे प्रकाशन *

दै पुण्यनगरी वृत्तपत्राला मनःपूर्वक धन्यवाद!

व्यास क्रिएशन्स तर्फे तब्बल सहा दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन सहयोग मंदिराच्या सभागृहात वाचक रसिकांच्या साक्षीने संपन्न.

व्यास क्रिएशन्स आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाची आजच्या दि. 11 नोव्हेंबर 2023, पुण्यनगरी या वृत्तपत्राने दखल घेतल्याबद्दल अनेकोनेक धन्यवाद!!!💐💐
#दीपोत्सव #विशेषांक #दिवाळी

* दीपोत्सव २०२३: सहा दिवाळी अंकांचे प्रकाशन *दै लोकसत्ता वृत्तपत्राला मनःपूर्वक धन्यवाद!व्यास क्रिएशन्स तर्फे तब्बल सहा ...
11/11/2023

* दीपोत्सव २०२३: सहा दिवाळी अंकांचे प्रकाशन *

दै लोकसत्ता वृत्तपत्राला मनःपूर्वक धन्यवाद!

व्यास क्रिएशन्स तर्फे तब्बल सहा दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन सहयोग मंदिराच्या सभागृहात वाचक रसिकांच्या साक्षीने संपन्न.

व्यास क्रिएशन्स आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाची आजच्या दि. 11 नोव्हेंबर 2023, लोकसत्ता या वृत्तपत्राने दखल घेतल्याबद्दल अनेकोनेक धन्यवाद!!!💐💐
#दीपोत्सव #विशेषांक #दिवाळी

** दीपोत्सव २०२३: सहा दिवाळी अंकांचे प्रकाशन **व्यास क्रिएशन्स तर्फे आज तब्बल सहा दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन सहयोग मंद...
10/11/2023

** दीपोत्सव २०२३: सहा दिवाळी अंकांचे प्रकाशन **

व्यास क्रिएशन्स तर्फे आज तब्बल सहा दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन सहयोग मंदिराच्या सभागृहात वाचक रसिकांच्या साक्षीने संपन्न झाले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिलेले तीन दिग्गज प्रकाशन संस्थेचे संचालक. हा दुर्मिळ योग घडवून आणला व्यास क्रिएशन्स ने. मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे, डिंपल पब्लिकेशन चे अशोक मुळे आणि राजेंद्र प्रकाशनाच्या नीलिमा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून प्रकाशन विश्वातील अनुभव, प्रवास उलगडून दाखवला. व्यास तर्फे तिघांना मानपत्र, भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ खगोल तज्ञ दा कृ सोमण यांनी भूषविले. त्याअगोदर कार्यक्रमाचा प्रारंभ प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि सहकारी यांच्या सुमधुर गायनाने झाला. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर व्यासचे संचालक निलेश गायकवाड आणि राज्ञी वेलफेअर असो. संचालिका वैशाली गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पाच दिवाळी अंकांचे आणि एका डिजिटल अंकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते झाले. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री सुरभी भावे हेही उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान दामले यांनी नेटके केले. वाचक रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रामदास खरे यांनी व्यास तर्फे उपस्थितांचे आभार मानले. काही क्षणचित्रे.

व्यास क्रिएशन्स आयोजित दीपोत्सव कार्यक्रामाची आजच्या दि. 10 नोव्हेंबर 2023, ठाणे वार्ता या वृत्तपत्राने दखल घेतल्याबद्दल...
10/11/2023

व्यास क्रिएशन्स आयोजित दीपोत्सव कार्यक्रामाची आजच्या दि. 10 नोव्हेंबर 2023, ठाणे वार्ता या वृत्तपत्राने दखल घेतल्याबद्दल अनेकोनेक धन्यवाद!!!💐💐
#दीपोत्सव #विशेषांक #दिवाळी

08/11/2023

Watch Live Now...
व्यास क्रिएशन्स् तर्फे पहिल्यांदाच होणार तीन नामवंत प्रकाशकांचा सत्कार
सहयोग मंदिर, ठाणे
सेलिब्रिटी डॉ. गिरीश ओक, सुरभी भावे यांची विशेष उपस्थिती

हिंदी मराठी गीतांचा सांगितिक कार्यक्रम फर्माईश...

ठाणे :- दिवाळी सणात 6 दिवाळी अंकांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई, रांगोळी, दिव्यांची तेजोमयी आरास लक्ष वेधून घेते. याच आनंदी क्षणात भर पडते अनमोल दिवाळी अंकांची. दिवाळी अंकांच्या वाचन परंपरेत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यास क्रिएशन्स् प्रकाशित तब्बल 5 दिवाळी विशेषांकाच्या डिजिटल आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

#दीपोत्सव #विशेषांक #दिवाळी

Watch Live Now...व्यास क्रिएशन्स् तर्फे पहिल्यांदाच तीन नामवंत प्रकाशकांचा सत्कारसहयोग मंदिर, ठाणे सेलिब्रिटी डॉ. गिरीश ...
08/11/2023

Watch Live Now...
व्यास क्रिएशन्स् तर्फे पहिल्यांदाच तीन नामवंत प्रकाशकांचा सत्कार
सहयोग मंदिर, ठाणे
सेलिब्रिटी डॉ. गिरीश ओक, सुरभी भावे यांची विशेष उपस्थिती

हिंदी मराठी गीतांचा सांगितिक कार्यक्रम फर्माईश...

#दीपोत्सव #विशेषांक #दिवाळी
https://www.facebook.com/share/v/UaQaemDzn5TAcQUU/?mibextid=3mALyM

ठाण्यात व्यास क्रिएशन्स् मारणार 6 दिवाळी अंकांचा षटकार!व्यास क्रिएशन्स् संस्थेतर्फे पहिल्यांदाच होणार तीन नामवंत प्रकाशक...
07/11/2023

ठाण्यात व्यास क्रिएशन्स् मारणार 6 दिवाळी अंकांचा षटकार!
व्यास क्रिएशन्स् संस्थेतर्फे पहिल्यांदाच होणार तीन नामवंत प्रकाशकांचा सत्कार

सेलिब्रिटी डॉ. गिरीश ओक, सुरभी भावे यांची विशेष उपस्थिती

ठाणे :- दिवाळी सणात 6 दिवाळी अंकांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई, रांगोळी, दिव्यांची तेजोमयी आरास लक्ष वेधून घेते. याच आनंदी क्षणात भर पडते अनमोल दिवाळी अंकांची. दिवाळी अंकांच्या वाचन परंपरेत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यास क्रिएशन्स् प्रकाशित तब्बल 5 दिवाळी विशेषांकाच्या डिजिटल आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
#दीपोत्सव #विशेषांक #दिवाळी

आपण या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला नक्की यावे ही व्यास क्रिएशन्स कडून आपणांस आग्रहाची विनंती !🙏🚩🙏   #दीपोत्सव  #दिवाळी
06/11/2023

आपण या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला नक्की यावे ही व्यास क्रिएशन्स कडून आपणांस आग्रहाची विनंती !🙏🚩🙏
#दीपोत्सव #दिवाळी

प्रतिभा -घरअंगण विशेषांकसंपादक ः नीलेश वसंत गायकवाडस्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते,🏡घर देते सुरक्षितता.... घ...
06/11/2023

प्रतिभा -
घरअंगण विशेषांक

संपादक ः नीलेश वसंत गायकवाड

स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते,🏡
घर देते सुरक्षितता.... घर देते आधार.....
घर देते आसरा.... थकल्या भागल्या जिवास देते निवारा....
पुन्हा नव्याने जग कवेत घेण्यासाठी बळ देते
घर, आपले अंगण, आपली माणसं आणि नाती,
त्यांचे संवाद, भावना, घरातील बोलक्या वस्तूसुद्धा....🙏🙏

असे सर्व काही ज्याला घर ही उपाधी मिळते सर्व काही या दिवाळीला वाचकांना नामांकित लेखकांच्या सिद्धहस्त लेखणीने साकारलेली साहित्यतृप्ती द्यायला येणार आहे अर्थात व्यास क्रिएशन्स्चा प्रतिभा दिवाळी अंक - घरअंगण
#विशेषांक #दिवाळी

प्रतिभा -साहित्यवारीसंपादक ः नीलेश वसंत गायकवाडव्यास क्रिएशन्स् म्हणजे दर्जेदार नवनिर्मिती.प्रथितयश लेखकांसोबतच प्रतिभाव...
06/11/2023

प्रतिभा -
साहित्यवारी

संपादक ः नीलेश वसंत गायकवाड

व्यास क्रिएशन्स् म्हणजे दर्जेदार नवनिर्मिती.
प्रथितयश लेखकांसोबतच प्रतिभावंत नवकवी-लेखकांना सोबत घेऊन यंदाच्या दिवाळीत वाचकांना वैविध्यपूर्ण साहित्यिक फराळाची मेजवानी देत आहोत.

व्यास क्रिएशन्स्चा दिवाळी विशेषांक ‘साहित्यवारी’ च्या रूपाने आपल्या भेटीस येत आहे. उत्तम कथा, कविता व ललित लेखांतून रहस्य, बोली भाषा, स्फुट लेखन, विनोद, शृंगार, पर्यावरण अशा साहित्य रसांचे सुरेख मिश्रण आणि सोबत 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त 8 लेखांची विशेष मेजवानीने वाचकांची साहित्यभूक नक्की भागवेल याची खात्री आहे.🙏🙏
#विशेषांक #दिवाळी

पासबुक आनंदाचेगुंतवणूक विशेषांकसंपादक ः नीलेश वसंत गायकवाडपैसा💴 कमावणे जसे महत्त्वाचेतसेच त्याचे नियोजनसुद्धा महत्त्वाचे...
06/11/2023

पासबुक आनंदाचे
गुंतवणूक विशेषांक

संपादक ः नीलेश वसंत गायकवाड

पैसा💴 कमावणे जसे महत्त्वाचे
तसेच त्याचे नियोजनसुद्धा महत्त्वाचे आहे.

आपल्या पैशाला सुरक्षितपणे वाढवायचे असेल तर गुंतवणूक एक चांगला पर्याय आहे
आर्थिक नियोजन करण्यासाठी बरेच पर्याय आहेत!
जसे जमीन, बँक ठेवी, सोन्याची गुंतवणूक, शेअर गुंतवणूक.....

मग काय निवड असावी?
यासाठी व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्थेचा पासबुक आनंदाचे दिवाळी अंक 2023, जो आहे बँकिंग विशेषांक.
ज्यातले विषय आहेत गुंतवणूक आणि विमा....
#विशेषांक #दिवाळी

आरोग्यम्नेत्र विशेषांकरूप पाहतां लोचनीं ।सुख झालें वो साजनी ॥असे हे विठुरायाचे रूप दाखविणारे डोळे ही मनाची खिडकी आहे. सौ...
06/11/2023

आरोग्यम्
नेत्र विशेषांक

रूप पाहतां लोचनीं ।
सुख झालें वो साजनी ॥

असे हे विठुरायाचे रूप दाखविणारे डोळे ही मनाची खिडकी आहे.
सौंदर्याचे लक्षण म्हणूनही डोळ्यांना महत्त्व आहे. निरोगी स्वच्छ सतेज डोळे हे व्यक्तीच्या निरोगीपणाचे लक्षण समजले जाते. या महत्त्वपूर्ण ज्ञानेंद्रियाबद्दल आपण किती जाणतो, त्याची किती काळजी घेतो? या प्रश्नांचे उत्तर घेऊन येतो आहे...
व्यास क्रिएशन्स् प्रकाशन संस्थेचा दिवाळी आरोग्यम विशेषांक 2023. भगवान धन्वंतरी चरणी अर्पित.🙏🙏

वैद्य -डॉक्टर्स यांच्या लेखणीतून साकारलेला अभ्यासपूर्ण विशेषांक आरोग्यम् नेत्र विशेषांक.
डोळ्यांची रचना - क्रिया दृष्टी डोळे हे ज्ञानेंद्रिय
डोळ्यांचे आजार अंधत्व दृष्टीचे आजार नेत्रदान
#विशेषांक #दिवाळी

'व्यास क्रिएशन्स' सादर करीत आहे..'सवाईगंधर्व' निर्मित न भूतो न भविष्यती जोडीची दीप संध्या!आर्या आंबेकर आणि पंडित आनंद भा...
03/11/2023

'व्यास क्रिएशन्स' सादर करीत आहे..
'सवाईगंधर्व' निर्मित न भूतो न भविष्यती जोडीची दीप संध्या!

आर्या आंबेकर आणि पंडित आनंद भाटे एकाच मंचावर गाणार...

Arya Ambekar & Anand Bhate Live

कधी? : दीपावली पाडवा 14 नोव्हेंबर, 2023
सायंकाळी 4:00 वा.
कुठे? : श्री शिवाजी मंदिर, दादर (प.)

तिकीट विक्री नाट्यगृहात सुरू
ऑनलाईन - Bookmyshow वर
#स्वराधीश

व्यास क्रिएशन्स घेऊन येत आहे गंधर्वांच्या गायनाची एक सुरेल दिवाळी पहाट...पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी ते बा...
03/11/2023

व्यास क्रिएशन्स घेऊन येत आहे गंधर्वांच्या गायनाची एक सुरेल दिवाळी पहाट...

पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी ते बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचे
गंधर्वगान

सादरकर्ते - स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली आणि आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे

कधी? : दीपावली पाडवा 14 नोव्हेंबर, 2023
सकाळी 7:00 वा.
कुठे? : मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले

तिकीट विक्री नाट्यगृहात आणि ऑनलाईन Bookmyshow वर सुरू
#बालगंधर्व #स्वराधीश

व्यास क्रिएशन्स प्रकाशित महर्षी व्यास ग्रंथासाठी लेखिका अनुराधा कुलकर्णी यांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे देण्यात येण...
25/10/2023

व्यास क्रिएशन्स प्रकाशित महर्षी व्यास ग्रंथासाठी लेखिका अनुराधा कुलकर्णी यांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे देण्यात येणारा लक्ष्मीकांत बाबुराव चंद्रगिरी स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि तो नामवंत उद्योजक धनंजय दातार यांच्या हस्ते दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी देण्यात येणार आहे.

अनुराधा मॅडम चे व्यास परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.💐💐🙏

सोहोळ्यासाठी प्रवेश खुला आहे. रसिकांनी नक्की उपस्थित राहावे.🙏
#अभिनंदन #उद्योजक #लेखिका

*व्यास क्रिएशन्सच्या सहकार्याने राज्ञी 'वूमन वेलफेअर असोसिएशन आयोजित "भोंडला" पहा क्षणचित्रे..*
24/10/2023

*व्यास क्रिएशन्सच्या सहकार्याने राज्ञी 'वूमन वेलफेअर असोसिएशन आयोजित "भोंडला" पहा क्षणचित्रे..*

356 new items · Album by Radnyee Vyas Creations

21/10/2023

व्यास क्रिएशन्सच्या सहकार्याने राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन आयोजित भोंडला सोहळ्याचे आयोजन सहयोग मंदिर

प्रसिद्ध वृत्त निवेदिका, लेखिका आणि अभिनेत्री शिबानी जोशी, भोंडला सोहळ्याबद्दल माहिती सांगत आहेत. यानिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

21/10/2023

व्यास क्रिएशन्सच्या सहकार्याने राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन आयोजित भोंडला सोहळ्याचे आयोजन सहयोग मंदिर

प्रसिद्ध वृत्त निवेदिका, लेखिका आणि अभिनेत्री शिबानी जोशी, भोंडला सोहळ्याबद्दल माहिती सांगत आहेत. यानिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

21/10/2023

व्यास क्रिएशन्सच्या सहकार्याने राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन आयोजित भोंडला सोहळ्याचे आयोजन सहयोग मंदिर, ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

प्रसिद्ध वृत्त निवेदिका, लेखिका आणि अभिनेत्री शिबानी जोशी, भोंडला सोहळ्याबद्दल माहिती सांगत आहेत. यानिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, हि विनंती.

व्यास क्रिएशन्सच्या सहकार्याने राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन आयोजित भोंडला सोहळ्याचे आयोजन आज दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सा...
21/10/2023

व्यास क्रिएशन्सच्या सहकार्याने राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन आयोजित भोंडला सोहळ्याचे आयोजन आज दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत करण्यात आले आहे. ठाणे येथील सहयोग मंदिर, दुसरा मजला, या ठिकाणी हा भोंडला सोहळा होणार आहे.

शिबानी जोशी, डॉ. दिपाली आठवले, डॉ. पल्लवी शेजवलकर, धनश्री दामले या मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात भाग घेऊन बक्षिसे जिंकावी असे आवाहन व्यास क्रिएशनचे सर्वेसर्वा निलेश गायकवाड यांनी केले आहे.

व्यास क्रिएशन्स च्या संचालिका सौ. वैशाली नीलेश गायकवाड यांच्यावर नवदुर्गा म्हणून लेख...नक्की वाचा...
18/10/2023

व्यास क्रिएशन्स च्या संचालिका सौ. वैशाली नीलेश गायकवाड यांच्यावर नवदुर्गा म्हणून लेख...

नक्की वाचा...

चौथी माळ: देवी कुष्मांडा
कौशल्य – सर्जनशीलता
आजची दुर्गा: सौ. वैशाली नीलेश गायकवाड

स्त्रिला निसर्गदत्त किंवा नैसर्गिकरित्या एवढ्या बिरुदावल्या बहाल केल्या आहेत की, त्यामुळे खरंतर ती स्वतःच स्वतंत्ररित्या सगळ्या संसाराची, अखंड चराचराची, ब्रह्मांडाची पालनकर्ती आहे. म्हणूनच आता वेळ आली आहे स्वतःच स्वतःची उद्धारकर्ती होऊन स्वतःमधील सुप्तगुण, दडलेल्या कला, अवगत असलेली कौशल्ये कुठेतरी लुप्त होण्यापूर्वी योग्यवेळी - योग्य ठिकाणी - योग्य लोकांसोबत - योग्य दिशेने मार्गक्रमण करण्याची, असे म्हणत रोजच्या जगण्यात नवनवीन गोष्टी शिकत प्रत्येक जबाबदारीत स्वतःची छाप उमटवणारी आजची आपली चौथी दुर्गा वैशाली गायकवाड.

शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

पदवी नंतरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैशाली गायकवाड यांनी ग्रंथपाल प्रमाणपत्र पदवी पूर्ण केली. विविध माध्यम क्षेत्रातील प्रशिक्षण कोर्स देखील त्यांनी पूर्ण केले आहेत. रेव्हेन्यू डिपार्टमेन्टमध्ये 8 वर्षे काम केल्यानंतर पितांबरी उद्योग समुहामध्ये मीडिया आणि जाहिरात विभागाचा सात वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. व्यास क्रिएशन्समध्ये गेल्या तीन वर्षापासून राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशनचा कार्यभार कार्यकारी संचालिका म्हणून हातात घेतला आणि त्या अत्यंत समर्थपणे हा पसारा सांभाळत आहेत.

काही वर्षांपुर्वी असाध्य व्याधींनी वैशाली गायकवाड यांना ग्रासले होते. परंतु एखाद्या असाध्य व्याधीमधून ऊर्जा घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत वैशाली गायकवाड यांनी कविता लेखन, ‘कस्तुरी’ अंकातील लेखन, महिलांसाठी विविध अंगी स्पर्धा, उपक्रम, शिबिर, कौशल्य या सगळ्यांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. आपण दुसर्‍यांना काय देऊ शकतो ही मनोमन भावना ठेवून त्या अखंड कार्य करीत राहिल्या आणि याच सगळ्या अविरत कार्यामधूनच त्या कार्यशीलपणे घडत गेल्या.

‘राज्ञी’ म्हणजे प्रत्येक स्त्रीमधल्या ‘ती’च्यातील ‘मी’साठीचा एक प्रवास. जबाबदार्‍या, कर्तव्ये, सामाजिक, कौटुंबिक दडपणे अशा एक ना अनेक गोष्टींमुळे प्रत्येकीतील ‘ती’ मधील ‘मी’ कुठेतरी हरवून जाते. ‘राज्ञी’ मध्ये हेच खोडून काढून प्रत्येकीचा ‘ती’च्यातील ‘मी’पर्यंतचा प्रवास हा आनंद, उत्सव आणि उत्कर्षाने भारावून टाकणारा असावा यासाठी वैशालीताई विविध उपक्रमांचे आयोजन करतात. जसे कि बौद्धिक विचारांची देवाणघेवाण करणारा ‘संवाद कट्टा’, ‘ती वसुंधरा, मी वसुंधरा’ असा अनोखा असलेल्या कपड्यांचा फॅशन शो, ‘पर्यावरण पूरक घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा’, ‘सेल्फी स्पर्धा’, ‘विश्वास गतिमंद शाळे’तील मुलांसाठी ‘पुस्तक हंडी’, ‘चैतन्य’ शाळेतील दिव्यांग मुलांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्या मुलांनी तयार केलेल्या राख्या, ग्रीटिंग कार्ड्स वेगवेगळ्या शोभिवंत वस्तू या विकत घेऊन त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम देखील गेले तीन वर्ष राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन संस्था अविरतपणे करत आहे. तसेच महिलांसाठीची एक अनोखी ‘पुस्तक भिशी’ त्याबरोबरच फिरत्या वाचन कट्ट्या’चे आयोजन, महिलांचे मानसिक आरोग्य नीट राहावे यासाठी राज्ञी मनाचा कोपरा हा मानसोपचारतज्ञांच्या मदतीने चालू केलेला सदर तसेच किचन टिप्स अशा वेगवेगळ्या उपक्रमाची निर्मिती सर्जनशीलपणे वैशाली गायकवाड करत असतात.

राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या 2020 मध्ये जवळपास 700 मैत्रिणी एकत्र आल्या आणि राज्ञी मंचाची स्थापना करण्यात आली आणि आज राज्ञी मंचाच्या 1500 हून अधिक महिला सभासद आहेत.

प्रत्येक क्षणात स्वतःची नव्याने ओळख करुन घेत सर्जनशीलपणे नवनवीन ध्येयांना गवसणी घालत कुष्मांडा देवीच्या सर्जनशीलता या गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नवदुर्गेला माईंडफुल मंत्राजतर्फे मानाचा मुजरा.

देवी कुष्मांडा श्लोक :
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अश्या महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.

या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा -
पहिली माळ - https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ - https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2
तिसरी माळ - https://bit.ly/MyndfulNavdurga23Day3

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner

आपल्या या ७ व्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात आपली उपस्थिती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक असेल. आपणांस हार्दिक निमंत्रण!!...
14/10/2023

आपल्या या ७ व्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात आपली उपस्थिती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक असेल. आपणांस हार्दिक निमंत्रण!!🙏🙏

धन्यवाद !🚩🙏

पर्यावरण जागृती आणि सजावट कलेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पर्यावरण ...
22/09/2023

पर्यावरण जागृती आणि सजावट कलेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पर्यावरण पुरक घरगुती श्री गणेश सजावट आणि सेल्फी विथ गणपती बाप्पा स्पर्धा सलग दुसर्‍या वर्षी🤩
‘गणपती’ म्हणजे अवघ्या देशाचे आराध्य दैवत. कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात आपण नेहमीच श्रीगणेश वंदनेने करतो. आपल्या महाराष्ट्रात भाद्रपदात अमाप उत्साहात घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राचा एक मानबिंदूच ठरला आहे. हा गणेशोत्सव मराठी माणसाच्या तनमनात खोलवर रुजला आहे, बहरला आहे.
साधारणतः श्रावण महिन्यापासूनच मराठी माणसाला गणेशोत्सवाचे वेध लागतात. तो मनातल्या मनात त्याची तयारी करू लागतो. यावर्षी मूर्ती कशी हवी? आरास कशी करायची? मखर कसे तयार करायचे याच्या योजना प्रत्येक भाविक आखू लागतो.
मित्रांनो, पाऊस थोडा थांबेल आणि ढोलताशांच्या गजरात श्रीगणेशाचे आगमन होईल. बाप्पा घरी येण्याची उत्सुकता तुम्हाला जशी लागली आहे तशीच व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनला देखील असते.
प्रकाशन व्यवसायात स्वतःची नाममुद्रा उमटवणारी एक सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था म्हणजे व्यास क्रिएशन्स्.
महाराष्ट्र राज्यात घराघरात साजरा होणार्‍या गणेशोत्सवासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि सेल्फी विथ गणपती बाप्पाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. विजेत्या स्पर्धकांना व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनद्वारे पारितोषिक आणि ई-सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. घरगुती श्रीगणेश सजावट स्पर्धा आणि सेल्फी विथ गणपती बाप्पा या स्पर्धेबाबतचा तपशील, नियम, अटी सोबत देत आहोत. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व गणेशभक्त कलाकारांनी या स्पर्धेत अधिक संख्येने जरूर भाग घ्यावा, अशी विनंती🙏 व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश वसंत गायकवाड आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ वैशाली गायकवाड यांनी केले आहे.
नियम व अटी -
1. या स्पर्धेत फक्त महाराष्ट्रात राहणारा कोणीही स्पर्धक भाग घेऊ शकेल.
2. ही गणेश सजावट स्पर्धा फक्त घरगुती गणपतींसाठीच असेल. या स्पर्धेत सार्वजनिक गणपतींचा समावेश नसेल.
3. गणेश सजावट ही मुख्यत्वे पर्यावरण पुरक (इको फ्रेंडली) स्वरूपाची असावी. थर्माकोल अथवा प्लास्टिकचा वापर असलेली सजावट स्पर्धेतून बाद ठरवण्यात येईल.
4. https://bit.ly/3sZntJ3 या लिंकवर जाऊन प्रत्येक स्पर्धकानी आपला गुगल अर्ज (Google form) भरणे बंधनकारक आहे.
5. गुगल फॉर्म च्या लिंकमधील दिलेल्या पोस्टरची प्रिंट काढून ठेवावी.
6. आपल्या घरातील गणपती भोवती केलेल्या सजावटीमध्ये ते पोस्टर समाविष्ट करावे, (वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले तीन फोटोज) गुगल फॉर्म लिंक मध्ये अपलोड करावेत
6. त्याच गुगल फॉर्म मध्ये एक छोटासा एक ते दोन मिनिटांचा व्हिडिओदेखील अवश्य पाठवावा. यात व्हिडिओ मध्ये सजावटकाराचे, स्पर्धकाचे मनोगत आम्हाला अपेक्षित आहे. सर्वात महत्वाचे स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातील गणपतीच्या सजावटीचाच फोटो पाठवायचा आहे. दुसर्‍यांच्या घरातला नाही. ज्या स्पर्धकांना व्हिडिओ पाठवणे शक्य नसेल त्यांनी आपल्या सजावटीची वैशिष्ट्ये एका कागदावर 10 ते 15 ओळीत लिहून त्या कागदाचा फोटो काढून पाठवावा.
7. स्पर्धकाने फोटो पाठवताना त्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
8. विजेत्या स्पर्धकांना व्यास क्रिएशन्स्च्या निवड समितीद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. अंतिम निर्णय हा निवड समितीचा असेल.
9. विजेत्या स्पर्धकांच्या बाप्पांच्या सजावटीचे फोटो व्यास क्रिएशन्स्तर्फे प्रकाशित होणार्‍या या वर्षीच्या ‘प्रतिभा’च्या दिवाळी विशेषांकात नावासह प्रसिद्ध केले जातील.
10. सेल्फी विथ गणपती बाप्पा स्पर्धा नियम व अटी
अ) संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो
ब) श्री गणेशाबरोबर आपला किंवा आपल्या कुटुंबाचा पारंपरिक वेषात सेल्फी अथवा फोटो काढून 8652233676 या क्रमांकावर पाठवावा.
क) प्रत्येक स्पर्धकाने फक्त एकच फोटो पाठवावा.
ड) फोटो पाठवताना स्पर्धकाने आपले नाव, तालुका आणि जिल्हा लिहून त्या व्यवस्थित दिसेल अशा फोटो सोबत पाठवावे.
11. पारितोषिक प्रदान समारंभ व्यास क्रिएशन्स्च्या दीपोत्सव-2023 मध्ये केला जाईल. याची विजेत्या स्पर्धकांना वैयक्तिकरित्या माहिती पुरवली जाईल.
12. सेल्फी स्पर्धेचे फोटो गुगल फॉर्म मध्ये पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी आपण 9967637255 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. स्पर्धेसाठी फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 ही आहे. त्यानंतर येणार्‍या फोटोचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही.
13. ही स्पर्धा विनामूल्य आहे. यासाठी स्पर्धकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. तसा व्यवहार केल्यास व्यास क्रिएशन्स् जबाबदार राहणार नाही.
14. सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र ऑनलाईन मिळेल.
15. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
गणेश सजावटीसाठी
प्रथम - रोख रु. 11,111/- + सन्मानचिन्ह
द्वितीय - रोख रु. 7,777/- + सन्मानचिन्ह
तृतीय - रोख रु. 5,555/- + सन्मानचिन्ह
- उत्तेजनार्थ -
प्रथम - रोख रु. 2501/- + सन्मानचिन्ह,
द्वितीय - रोख रु. 1501/- + सन्मानचिन्ह,
तृतीय - रोख रु. 1001/- + सन्मानचिन्ह
सेल्फी विथ गणपती बाप्पा साठी
प्रथम - रोख रु. 3,333/- + प्रमाणपत्र
द्वितीय - रोख रु. 2,222/- + प्रमाणपत्र
तृतीय - रोख रु. 1,111/- + प्रमाणपत्र
- उत्तेजनार्थ -
प्रथम - रोख रु. 777/- + प्रमाणपत्र
द्वितीय - रोख रु. 555/-+ प्रमाणपत्र
तृतीय - रोख रु. 333/- + प्रमाणपत्र

*350  व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित स्वराज्य@350 व्याख्यानमालेच्या शुभारंभीय कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फू...
24/07/2023

*350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित स्वराज्य@350 व्याख्यानमालेच्या शुभारंभीय कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहा क्षणचित्रे....*

102 new items added to shared album

व्यास क्रिएशन्स तर्फे आग्रहपूर्वक निमंत्रण 🙏🚩🙏समस्त शिवप्रेमींसाठी महापर्वणी ‘ स्वराज्य@350’ व्याख्यानमालेचा शुभारंभ (23...
21/07/2023

व्यास क्रिएशन्स तर्फे आग्रहपूर्वक निमंत्रण 🙏🚩🙏
समस्त शिवप्रेमींसाठी महापर्वणी
‘ स्वराज्य@350’ व्याख्यानमालेचा शुभारंभ
(23 जुलै 2023
रोजी सायंकाळी ५.००वाजता)

6 जून 1674 (शके 1596). या अमृतमय दिवसाचे महत्व हिंदुस्थानच्या इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहिले जावे इतके महत्त्वाचे. महाभयंकर सुलतानशाही मोडीत काढून हिंदवी स्वराजाचे स्वप्न साकार करणारे प्रभो शिवाजीराजा याच दिवशी सिंहासनावर बसले. अवघ्या भारतभूमीच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा उष:काल झाला. जिजाऊसाहेबांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या लाडक्या शिवबाने पूर्णत्वास नेले. याचे सारे श्रेय शिवबाला प्राणपणाने साथ करणार्‍या अनेक शिलेदारांना देखील जाते. शिवराज्याभिषेकाचा तो पवित्र दिवस. आज त्या घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्या घटनेचं स्मरण प्रत्येक भारतीयाने करणं काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या शिलेदारांचे स्मरण आपण पुढे वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करणार आहोत.
‘स्वराज्य@350’ या शीर्षकाने सजलेल्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आपण येत्या 23 जुलै 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 वाजता, सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे करीत आहोत. व्यास क्रिएशन्स्, मराठी सृष्टी डॉट कॉम आणि वन आईड ऑक्टॉपस यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव व्याख्यानमालेस प्रारंभ होणार आहे. विशेष सहकार्य - राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आणि फॅमिली कट्टा.
व्याख्यानाचा विषय आहे ‘नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा’ व्याख्याते - ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक. प्रमुख पाहुणे - प्रशांत ठोसर (सुप्रसिद्ध व्याख्याते - शिवकालिन इतिहासाचे अभ्यासक) आणि शंतनू खेडकर (कोषाध्यक्ष - राज्याभिषेक समारोह संस्था, ठाणे). या कार्यक्रमास समस्त रसिक, शिवप्रेमींनी जरूर यावे, अशी विनंती नीलेश वसंत गायकवाड (संस्थापक - व्यास क्रिएशन्स् ग्रुप ऑफ कंपनीज्), सप्तेश चौबळ (संस्थापक - वन आइड ऑक्टोपस स्टुडिओ) आणि निनाद प्रधान (संस्थापक - मराठी सृष्टी डॉट कॉम) यांनी केली आहे. धन्यवाद.🙏

Address

D-1, Samant Blocks, Shree Ghantali Devi Mandir Path, Naupada, Thane (W)
Thane
400602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vyas Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vyas Creations:

Videos

Share

Category

Nearby media companies


Other Publishers in Thane

Show All