28/06/2022
सांजराई - ज्येष्ठांसाठी एक आधुनिक वानप्रस्थाश्रम @ देवघर, गुहागर (कोकण) 🌳🏘️🌴🌲🦜
मागच्या शुक्रवारी म्हणजेच २४ जूनच्या पोस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे आज पासून आम्ही दर मंगळवार आणि शुक्रवारी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्स वर सांजराई मध्ये असेलेल्या प्रत्येक सोयीसुविधेची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला सांजराईत निसर्गाच्या सोबतीत🦜🌳 राहण्याचे ज्येष्ठांना काय काय फायदे आहेत हे सांगणार आहोत 🔽
▶️ कोकण म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळणच.. हिरवेगार डोंगरकडे, नारळी पोफळीच्या बागा, नद्या आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे🌊. अश्या या निसर्गसंपन्न कोकणातील गुहागर जवळील देवघर या गावी ६. ७५ एकर जागेवर फक्त ज्येष्ठांसाठी असलेला आत्मनिर्भर गृहप्रकल्प🏡 म्हणजे "सांजराई"💓
▶️ शहरातील बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, गर्दी, ट्राफिक चा त्रास या सर्व चिंता सोडून निसर्गासोबत गुहागरच्या सांजराईत आरामात राहायचं. हिरवीगार वनराई, स्वच्छ, शुद्ध हवा, मनाला उभारी देणारं वातावरण, जवळच असलेला विस्तीर्ण समुद्र किनारा, प्राचीन मंदिरे🕉️ आणि इथे असलेले आपले स्वतःचे हक्काचे घर. सुख म्हणतात ते हेच✨🥰
▶️ सांजराईत आम्ही विविध प्रकारची झाडे लावली आहेत. आंबा, काजू, पेरू, अननस, सुपारी, नारळ आणि अजूनही विविध फळाफुलांची झाडं आहेत सांजराईत. याशिवाय आयुर्वेदीक औषधांची झाडे देखील आहेत सांजराईत. नक्षत्रवन प्रोजेक्ट पण आहे सांजराईत, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणारच आहोत.
▶️ तुमच्या बंगल्याच्या आजूबाजूला भरपूर झाडे, वनराई यामुळे सांजराईत ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला भासणार नाही. इथे शहराप्रमाणे प्रदूषण नाही त्यामुळे श्वसनाचे त्रास नाहीत आणि पर्यायाने प्रकृती उत्तम राहणार✴️.
▶️ निसर्गाच्या सानिध्यात 🪴☘️🌿 राहण्याचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे इथे तुमचं मानसिक आरोग्य ही चांगले राहते. रोज सकाळी उठल्यावर दृष्टीस पडणारे हिरवेगार डोंगरकडे, विविध प्रकारची झाडे, झाडांवरची फुले🌸🌻, फळे🥭🍐, पक्षांची किलबिल🦜 हे सर्व तुमचा Mood फ्रेश ठेवण्यात उपयोगी पडते. आयुष्यभर घडाळ्याच्या काट्यावर धावणे, रोजची गर्दी, वर्षानुवर्षे केलेली नौकरी, व्यवसाय या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला एक मानसिक थकवा आलेला असतो.
▶️ गुहागरच्या सांजराईत निसर्गाशी मैत्री करत हा थकवा दूर होण्यास नककीच मदत होईल कारण निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामूल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे.
▶️ सांजराईत आम्ही तुम्हाला फक्त घर बांधून देणार नाही तर सोफा सेट, टीव्ही, टेबल, फॅन, कुलर, Queen Size बेड, अत्याधुनिक स्वयंपाक घर, अत्यावश्यक आणि आरोग्य सुविधा देखील पुरवणार आहोत.
✅अजून कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत सांजराईत 🤔
या बद्दल आम्ही तुम्हाला येत्या शुक्रवारी माहिती देणारच आहोत.
🔆सांजराई - निसर्गाची सोबत, समुद्राची गाज, सांजराईत आयुष्यतील प्रत्येक दिवस असेल एक्दम खास.
स्वतंत्र व ट्विन बंगलो, क्लस्टरसहित स्टुडिओ अपार्टमेंट उपलब्ध
बुकिंगसाठी संपर्क☎️: ९९६७९६५२१९ / ९८२०२२३६४४
ई-मेल ID📧: [email protected]