New Era Book Publisher

New Era Book Publisher New Era Publication House

पुस्तक: पिचकारी लेखक : दीपक गायकवाड पाने :१२८किंमत: २०० ₹कादंबरी घरपोहच मिळवण्यासाठी संपर्क- 087677 09992https://wa.me/m...
24/04/2023

पुस्तक: पिचकारी
लेखक : दीपक गायकवाड
पाने :१२८
किंमत: २०० ₹
कादंबरी घरपोहच मिळवण्यासाठी संपर्क- 087677 09992
https://wa.me/message/DRBKDRYZKX5WL1

अंगुलीमालाच्या इतिहासाची के लेली ही उजळणी !पुस्तक: अंगुलीमाल (ऐतिहासिक कादंबरी)लेखक : उल्हास निकमपाने : १९४किंमत: २५० ₹प...
21/04/2023

अंगुलीमालाच्या इतिहासाची के लेली ही उजळणी !
पुस्तक: अंगुलीमाल (ऐतिहासिक कादंबरी)
लेखक : उल्हास निकम
पाने : १९४
किंमत: २५० ₹
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क- 087677 09992
https://wa.me/message/DRBKDRYZKX5WL1

पुस्तक मागवण्यासाठी संपर्क / व्हाट्सएप करा :087677 09992
20/04/2023

पुस्तक मागवण्यासाठी संपर्क / व्हाट्सएप करा :
087677 09992

४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकड...
19/04/2023

४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. ह्या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो.
अलीकडच्या काळात, १९९२ साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, 'महामाया निळावंती'त.
अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.
महामाया निळावंती
मागवण्यासाठी संपर्क : 087677 09992

स्व.स्वप्निल कोलते पाटील लिखित  "मुकद्दर "
18/04/2023

स्व.स्वप्निल कोलते पाटील लिखित "मुकद्दर "

एक चित्तथरारक प्रसंग अनुबवण्यासाठी नक्की वाचा एक सत्य घटनेवर आधारित कहाणी  , महाराष्ट्रातील अनेक कुटुंबातील लोकांना जिने...
15/04/2023

एक चित्तथरारक प्रसंग अनुबवण्यासाठी नक्की वाचा एक सत्य घटनेवर आधारित कहाणी , महाराष्ट्रातील अनेक कुटुंबातील लोकांना जिने मारले त्या नरभक्षक वाघिणीची कथा ❤️📚🐅
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क / व्हाट्सएप करा :
087677 09992

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरु...
14/04/2023

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

'स्वामींच्या आज्ञेव्यतिरिक्त आम्ही काहीच नव्हतो. विश्वासाची जाती म्हणावी तरी स्वामींची आणी आमची शफत तुळशीबेलाच्या 'श्री'...
12/04/2023

'स्वामींच्या आज्ञेव्यतिरिक्त आम्ही काहीच नव्हतो. विश्वासाची जाती म्हणावी तरी स्वामींची आणी आमची शफत तुळशीबेलाच्या 'श्री' वरील आहे. स्वामींचे मांडीवर आम्ही उसे ठेऊन निजावे, आमचे मांडीवर स्वामींनी उसे ठेवावे, शरीर मात्र भिन्न, आत्मा एकच. आम्ही कोणे गोष्टीस अंतर पडलो नाही. आम्ही ऐसे सेवक नव्हे जे स्वामींचे स्मरण न करता आधी आपला बहुमान घेऊ. याचा पर्याय कागदी काय म्हणून लिहावा. स्वामी वडील, हे यश येते ते स्वामींचेच पुण्येकरून येते. आमचा अभिमान सर्व गोष्टीचा स्वामींशी. पूर्वीपासून स्वामींनीच गौरविले; तेथे वसाचेच काय म्हणून लिहावे. पूर्वीपासून अंगीकार आमचा स्वामींनी केला आणी आम्हास बंधू म्हणविलें, हाथ भाव सिद्धी पावला पाहिजे. स्वामीं व्यतिरिक्त आम्ही काही नाही. जैसी पूर्वी आज्ञेप्रमाणे वर्तणूक केली तसीच करू..'
संताजी घोरपडे यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना लिहलेले पत्र. 🚩🚩
रवी शिवाजी मोरे,,

पुस्तक : सरसेनापती संताजी घोरपडे...
लेखक : रवि मोरे
किंमत : २०० /-

पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा- 087677 09992

 #शिरसवाडी  ( किंमत : 250 रु ) माणुसकीच दर्शन घडवणारी कादंबरी ❤️गावातील छोट्या मोठ्या घडामोडी, किस्से, गावातील निखळ विनो...
11/04/2023

#शिरसवाडी ( किंमत : 250 रु )
माणुसकीच दर्शन घडवणारी कादंबरी ❤️
गावातील छोट्या मोठ्या घडामोडी, किस्से, गावातील निखळ विनोद, गावाकडचे समृद्ध जीवन, निर्मळ मनाची माणसे, एकंदरच या सर्व गोष्टींमुळे ही कादंबरी वाचायला एक वेगळीच मजा येते. त्या कादंबरीत काहीवेळाने आपण आपलाच गाव पाहतो की काय असं देखील वाटायला लागते.

फाफटपसारा टाळून लेखकाने कथानकाला एक प्रकारची गती दिली आहे. याची प्रचिती वाचताना येते. लेखकाने ज्या सफाईने ह्या कादंबरीचे कथानक बांधले आहे. ते पाहून लेखकाची ही पहिलीच कादंबरी आहे असे अजिबात वाटत नाही.

आणि वाचत असताना आपण जसजसे कादंबरीच्या उत्तरार्धाकडे येतो, आपण कल्पनाही करू शकणार नाही असा धक्कादायक शेवट लेखक आपल्यासमोर उभा करतो. त्याचक्षणी आपल्या अंगावर एक रोमांच उभा राहतो. कादंबरी वाचून झाल्यानंतर मन अगदी सुन्न होऊन जाते. कथानकातील प्रत्येक पात्र डोळ्यासमोर तरळू लागते. आणि शेवटी तानाजी तात्याच्या या वाक्याची मनात सारखी पुनरावृत्ती होत राहते.
"यक तर आपली वाडी कदी एक हूत न्हाय, आन यक झाली मजी कुणाच्या बापाला बी मागं हाटत न्हाय"
शिरसवाडी ही आजच्या काळातील कादंबरी आहे. ह्या आजच्या काळातील कादंबरी वाचकांसाठी लिहिलेली आहे.

➡️कादंबरी : शिरसवाडी
➡️लेखक : गणेश बर्गे
➡️किंमत : 250 रु
➡️प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
कादंबरी मागवण्यासाठी संपर्क :
087677 09992

बॅबिलॉन 📖हे प्रसिद्ध बेस्टसेलर पुस्तक आपल्याला आपल्या वैयक्तिक आर्थिक समस्येचे आकलन आणि निराकरण देते. पैसे मिळवणे, पैसे ...
08/04/2023

बॅबिलॉन 📖
हे प्रसिद्ध बेस्टसेलर पुस्तक आपल्याला आपल्या वैयक्तिक आर्थिक समस्येचे आकलन आणि निराकरण देते. पैसे मिळवणे, पैसे वाचवणे आणि पैसे कसे वाढवले जातात याविषयीची सगळी रहस्ये या पुस्तकात लेखकाने उघड केली आहेत.
बॅबिलॉनच्या प्रसिद्ध नीतिकथांचा हा संग्रह बचतीच्या महत्त्वापासून ते श्रीमंत कसं व्हावं हे सांगण्यापर्यंत सगळ्या प्रकारचं कालातीत आर्थिक शहाणपण देतो. या पुस्तकातून श्रीमंत कसं व्हावं याविषयीच्या अंतर्दृष्टी मिळतातच, शिवाय भाग्याला आपल्याकडे कसं आकर्षित करून घ्यावं तेही सांगितलं जातं. हे पुस्तक संपत्तीच्या पाच नियमांची चर्चाही करतं.
अर्थकारण समजून घेण्यासाठीचं परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक. वैयक्तिक संपत्ती मिळवणं आणि ती टिकवणं याविषयीच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या तत्त्वांचं हे ऊर्जाकेंद्र आहे. बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस हा वाचकांना पिढ्यानपिढ्यांपासून स्फूर्ती देत आला आहे. हे सातत्यानं उत्तम खपाचं म्हणून नावाजलं गेलेलं पुस्तक आहे.
------------------------------------------------------------------------------
पुस्तकाचे नाव - बॅबिलॉन
लेखक - जॉर्ज एस क्लासन
पाने -138
किंमत - 250 रुपये
------------------------------------------------------------------------------
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी आजच संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा, 087677 09992
------------------------------------------------------------------------------

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा...शांत, संयमी आणि स्थिरगंभीर पाऊस-वाऱ्याला आव्हान देत कडाडत्या विजेकडे डोळे वटारून बघ...
08/04/2023

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा...
शांत, संयमी आणि स्थिरगंभीर पाऊस-वाऱ्याला आव्हान देत कडाडत्या विजेकडे डोळे वटारून बघणारा...
बाप असतो सूर्याविरुद्ध युद्ध पुकारणारा,उन्हाचा तळतळीत लेप पाठीवर रापवित, लेकरावर मायेची गार सावली पांघरणारा...
---------------------------------------------------------------------
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क / व्हाट्सएप करा :
087677 09992
---------------------------------------------------------------------
राज्यशासन पुरस्कारप्राप्त पुस्तक.
आईबाबांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून रचलेली कांदबरी !
सुर्याची सावली
लेखक - नितीन थोरात
किंमत - 250 rs /- ( free delivery charges for prepaid )
087677 09992

वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला आपण थोपवले पाहिजे. प्रश्न विचारण्याची संस्कृती...
07/04/2023

वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला आपण थोपवले पाहिजे. प्रश्न विचारण्याची संस्कृती जोपासली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्वतः समजून घेऊन इतरांना सांगितला पाहिजे. आपले भवताल हा त्यासाठीचा छोटा प्रयत्न आहे. लोकांना प्रश्न पडावे, त्याची त्यांनी उत्तरे शोधावी, एकमेकांत चर्चा करावी, ही अपेक्षा ठेवून हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत.

पुस्तकाचे नाव:-आपले भवताल
लेखक : डॉ.नितीन हांडे
प्रकाशक : न्यू एरा पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे: १२८
मूल्य : २००₹
पुस्तक मागविण्यासाठी संपर्क: 087677 09992

जगायला मिळणं ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे, ही दुर्मिळ गोष्ट प्रत्येक माणसाला मिळालेली असून बरेच लोक फक्त श्वास घेत आहे...
06/04/2023

जगायला मिळणं ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे, ही दुर्मिळ गोष्ट प्रत्येक माणसाला मिळालेली असून बरेच लोक फक्त श्वास घेत आहेत म्हणून अस्तित्वात असतात, ते खऱ्या अर्थाने जगतच नाहीत. घाईगर्दीच्या शहरी जीवनात येणारा ताण प्रत्येक भटक्याला येत असतो. त्याची घुसमट होऊन यातून बाहेर पडन्यासाठी तो सह्याद्रीत किंवा मग इतर निसर्गरम्य ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत राहतो.
दुनियाभरचे टेंशन फाट्यावर मारून जेव्हा मग एखाद्या दुरवरच्या ठिकाणी जायच ठरत असत तेव्हा साहजिकच आठवतो तो भव्य हिमालय...
आणि हिमालयात जाण्याचे वेगवेगळे मार्ग, ठिकाण तपासायला लागतो तेव्हा आपल्याला सर्वात मोठी मदत होते ती या #फिरस्ते पुस्तकाची.. य प्रवासवर्णनपर पुस्तकात अशाच काही मित्रांचे भन्नाट अनुभव लिहिलेले आहेत जे तुम्ही अगदी घरबसल्या वाचू शकता..
या पुस्तकात विशेष काय आहे म्हणाल तर यात त्या प्रवासात लागलेल्या प्रत्येक ठिकाणचा ऐतिहासिक इतिहास सांगितला आहे, थोडक्यात काय तर आपण ज्या ठिकाणी असू तिथला इतिहास. पुणे ते लेह लडाख ते पुणे या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक शहरांचा, त्यातील ऐतिहासिक ठिकाणांचा इतिहास आणि वर्तमान यात अगदी हसद - दुखत सांगितला आहे, प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः आहोत की काय प्रकारचे वर्णन तर अप्रतिमच..
मग ते लोणावळ्याचा घाट, किंवा गुजरात मध्ये गेल्यावर गुजरात मधले मराठा राजे, सुरतेची लूट, अहमदाबाद तिथून पुढे राजस्थान मध्ये गेल्यावर तिथले मराठे, तिथले किल्ले अजून पुढे गेल्यावर वाघा बॉर्डर वरील परेड वर्णन तर अगदी अंगावर शहारे आणणारेच आहे. हे वर्णन वाचून आपण नकळत youtube वर ही परेड सर्च करतो आणि काही क्षण तिथेच रमून जातो. सुवर्णमंदिर आणि तिथे झालेला आतंकवादी हल्ला, जालियनवाला बाग हत्याकांड वाचताना तर अगदी डोळ्यांत पाणी येत..
काही विनोदी कहाण्या तर अप्रतिमच, आणि ही सर्व वाचन्यासाठी, पुस्तक घरपोच मागविण्यासाथी संपर्क करा..
Call 087677 09992
Whatsapp 087677 09992
पुस्तक : #फिरस्ते
किंमत 250 रु ( घरपोच, पोस्टल चार्जेस मोफत )
पाने : 194
लेखक : अभिषेक कुंभार
प्रकाशक - न्यू ईरा पब्लिकेशन पुणे

पारतंत्र्यात असताना देखील स्वातंत्र्याची ठिणगी मनात पेटवलेल्या रायगडाच्या अग्निपर्वाची ही कथा आहे. सदाशिवला रायगड चढण्य...
05/04/2023

पारतंत्र्यात असताना देखील स्वातंत्र्याची ठिणगी मनात पेटवलेल्या रायगडाच्या अग्निपर्वाची ही कथा आहे. सदाशिवला रायगड चढण्यापासून ते गडफेरी पूर्ण होईपर्यंत आलेले अनुभव सांगणारी कथा म्हणजे “अग्निपर्व”
पुस्तक: “अग्निपर्व”
लेखक : मयूर खोपकर
पाने : 268
किंमत: 250
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क- 087677 09992
https://wa.me/message/DRBKDRYZKX5WL1

04/04/2023

आपल्या महाराजांची महती विचारांनी समजून घेऊया
जय जिजाऊ जय शिवराय
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क- 087677 09992

1)पुस्तक: 'कंट्या' (किंमत: 250 ₹)लेखक :गणेश बर्गे पाने :182●जन्म देणाऱ्या आईचा खून कंट्याला का करायचा असेल?●सायकलवर ड्रा...
04/04/2023

1)पुस्तक: 'कंट्या' (किंमत: 250 ₹)
लेखक :गणेश बर्गे
पाने :182
●जन्म देणाऱ्या आईचा खून कंट्याला का करायचा असेल?
●सायकलवर ड्रायव्हर ठेवणारा तो जगातील बहुदा पहिलाच व्यक्ती असेल.
● शौर्य पुरस्कार ते चौर्य पुरस्कार, मिरवणूक ते गाढवावरून धिंड. कंट्या या सगळ्यातून कसा गेला असेल?
●ज्या मिरचीसाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी, ती मिरची त्याची झाली असेल?
●तोच खलनायक आणि तोच नायक असलेली कादंबरी 'कंट्या'
●प्रत्येक वाचकाला यावर चित्रपट बनावा असे मनापासून वाटलेली गणेश बर्गे यांची 'कंट्या' कादंबरी फक्त एकदाच वाचून बघा.

2)पुस्तक: 'शिरसवाडी' (किंमत: 250 ₹)
लेखक :गणेश बर्गे
पाने :176
आजच्या पिढीला काय वाचायचं आहे...?
प्रेम प्रकरणच ना ? मग शिरसवाडी कादंबरीतल्या लव आणि रुपाली पेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. एका मुलीच्या दृष्टीने पाहिलं तर प्रेमात सर्वात मोठा शब्द आहे आधार आणि या पूर्ण कादंबरीत लव आणि रुपाली एकमेकांचे आधार आहेत. प्रत्येक सुखदुःखातला प्रेमतला साथी कसा असावा हे या कादंबरीतुन जाणवतं. संपूर्ण कादंबरी थोड्या वेगळ्या पद्धतीने वाचली तर लक्षात येतं यात भरभरून प्रेम, आधार आणि विश्वास हा त्रिकोण पूर्ण केलेला आहे कधीही न तुटणारा..!
पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा- 087677 09992
https://wa.me/message/DRBKDRYZKX5WL1

आपले भवताल २०० रू ( free delivery for prepaid )वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला...
21/03/2023

आपले भवताल २०० रू ( free delivery for prepaid )

वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला आपण थोपवले पाहिजे. प्रश्न विचारण्याची संस्कृती जोपासली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्वतः समजून घेऊन इतरांना सांगितला पाहिजे. आपले भवताल हा त्यासाठीचा छोटा प्रयत्न आहे. लोकांना प्रश्न पडावे, त्याची त्यांनी उत्तरे शोधावी, एकमेकांत चर्चा करावी, ही अपेक्षा ठेवून हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत.
पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा-087677 09992

पुस्तक : गढीवरूनपाने : २८०किंमत : 300 रू ( Delivery charges free for prepaid )लेखक : राजा गायकवाडप्रकाशक : न्यू ईरा पब्ल...
18/03/2023

पुस्तक : गढीवरून
पाने : २८०
किंमत : 300 रू ( Delivery charges free for prepaid )
लेखक : राजा गायकवाड
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
___________________________________
पुस्तकासाठी आपला पुर्ण पत्ता , मोबाईल , पिन कोड
087677 09992 वर whatsapp करा.

द आंत्रप्रेन्युअर " या पुस्तकात लेखक शरद तांदळे यांनी मराठी तरुणांना कुठलेही पोकळ स्वप्न न दाखवता उद्योगविश्वाची ओळख करू...
17/03/2023

द आंत्रप्रेन्युअर " या पुस्तकात लेखक शरद तांदळे यांनी मराठी तरुणांना कुठलेही पोकळ स्वप्न न दाखवता उद्योगविश्वाची ओळख करून दिली आहे . स्वतःचा शून्यातून सुरु झालेला प्रवास लिहिताना शरद तांदळे यांनी महाराष्ट्रातील सर्वच मध्यमवर्गीय तरुणांचा प्रवास लिहिला आहे.
-------------------------------------------------------------------
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क/ व्हाट्सएप करा :
087677 09992

युद्ध करने निकले हैं रणभूमि से क्या डरनाएकलव्य के साथ खड़े हैंतीरों से क्या मरना एकलव्य  #एकलव्य   पुस्तक घरपोहच मागवण्य...
17/03/2023

युद्ध करने निकले हैं
रणभूमि से क्या डरना
एकलव्य के साथ खड़े हैं
तीरों से क्या मरना
एकलव्य
#एकलव्य


पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा- 087677 09992

१ ) Think and Grow Rich ह्या पुस्तकात पैसा कसा कमवायचा , स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा ,यासाठी नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या ग...
16/03/2023

१ ) Think and Grow Rich ह्या पुस्तकात पैसा कसा कमवायचा , स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा ,यासाठी नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी आहेत. ( पाने 184 , किंमत 250 रुपये free delivery for prepaid ) मराठी आवृत्ती.

२ ) Power of your subconscious mind या पुस्तकात जगप्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत यशस्वी जीवनाचे अंतिम रहस्य !
( पाने 210 , किंमत 250 रू free delivery for prepaid ) मराठी आवृत्ती..........................................................
🟢 पुस्तकाच्या order साठी संपर्क
आपले , नाव , पूर्ण पत्ता , पिनकोड , मोबाईल नंबर खालील नंबरवर whatsapp करा.
 ⁨08767709992........................................................
कधी निरुत्साही वाटत असेल,
प्रयत्न करूनही यश येत नसेल,
मार्गातल्या अडचणी हटत नसतील,
शारीरिक व्याधी सतावत असतील,
तर तुमच्यासाठी एक आशेचा दिवा म्हणजे कार्नेगी फॉर्म्युला.
- नेपोलियन हिल ( थिंक अँड ग्रो रीच )

अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही; तर मानसिक आरोग्यदेखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, दारिद्र्य, दुःख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर पळतील.
जोसेफ मर्फी यांनी मनोविज्ञान शास्त्रामध्ये पीएच.डी. केल्यानंतर त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ आशियाई धर्माचं अध्ययन करण्यात व्यतीत केला. या अभ्यासासाठी ते भारतातही येऊन गेले. विश्वातील प्रमुख धर्माच्या अभ्यासानंतर त्यांना असं आढळून आलं की, संपूर्ण विश्वावर एकच शक्तीचं राज्य आहे, ती शक्ती सर्वामध्ये स्थित आहे. ही शक्ती म्हणजे अंतर्मनाची ताकद.
- डॉ. जोसेफ मर्फी ( Power of your subconscious mind)

डॉ. मर्फिंनी तीसहून अधिक पुस्तकं लिहिली. त्यांचं प्रख्यात पुस्तक, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड हे सर्वोत्तम पुस्तकांमध्ये गणलं जातं.
______________
प्रकाशन : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
संपर्क 087677 09992

“पिचकारी..” काय विशेष आहे यात तेव्हा? एकूण काय तर शंभरएक पानांच पुस्तक, यात असून असून काय असणार हा विचार करत बसलो आणि सा...
15/03/2023

“पिचकारी..” काय विशेष आहे यात तेव्हा? एकूण काय तर शंभरएक पानांच पुस्तक, यात असून असून काय असणार हा विचार करत बसलो आणि सात आठ दिवस पुस्तक नुसत बाजूला ठेवून पाहत बसलो. रंगपंचमी च्या अगोदर सहज म्हणून वाचायला घेतलं आणि तीन तासात वाचून झालं सुद्धा.
वाचताना प्रत्येक वेळी मन त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जायचं, कित्येक वेळा डोळे शांत मिटून आपणही त्या गण्याच्या (मुख्य पात्र) जागेवर आहोत की काय असं वाटत राहायचं. आजच्या मुलांनी जर आपल्याला विचारलं, ‘काय करायचा तुम्ही लहानपणी होळीला किंवा रंगपंचमीला’ तर त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे योग्य उत्तर आहे असं म्हणावं लागेल.
आता कोणतीही वस्तू सहज उपलब्ध होते, पण आमच्यावेळी एका साध्या पिचकारीसाठी किंवा अशाच एखाद्या लहानशा खेळण्यासाठी रडून रडून डोळे सुजून यायचे पण वस्तू काय मिळायची नाही, वरून 'का रडतो' म्हणून मिळणारा मार वेगळाच!
बालमनाच्या छोट्या छोट्या स्वप्नांची किंमत मोठ्या माणसांच्या विश्वात शून्य असते हे खरं.
'पिचकारी' मध्ये लेखकाने अशाच प्रकारचा सात आठ दिवसांचा प्रवास सांगितला आहे, ज्यात प्रत्येक ठिकाणी आपण आहोत असं वाटत राहतं. शाळा, शिक्षक, वर्गातली मुलं, आई, वडील बहीण असे सगळे एकदम जवळचे वाटतात.
होळी च्या दिवशी चालू झालेला प्रवास रंगपंचमीदिवशी वेगळेच वळण घेतो आणि आपण सुन्न होऊन जातो.
ही कादंबरी म्हणजे गण्याचा पिचकारीसाठी केलेल्या हट्टाचा प्रवास असावा असं वाटत असतानाच लेखक वाचकाला हळुवारपणे समाजव्यवस्थेवर कसा घेऊन जातो हे वाचून थक्क व्हायला होतं.
दोन तीन तासांत मनाला समाधान देणारी ही कादंबरी वाचकांना अवश्य आवडेल यात शंका नाही...
संतोष पाचे
पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा- 087677 09992

 #बाभूळमायाखरंतर! बांधावरच बाभुळझाड आणि बाप यांच्यात फरक तरी काय असतो? जगणं दोघांचही एक,सहन करणं दोघांचही एक आणि मनात जि...
13/03/2023

#बाभूळमाया

खरंतर! बांधावरच बाभुळझाड आणि बाप यांच्यात फरक तरी काय असतो? जगणं दोघांचही एक,सहन करणं दोघांचही एक आणि मनात जिव्हाळा लपवून वरवर कठोरपणा दाखवणं दोघांचही एक.
--------------------------------------------------------------------------
कादंबरी ऑर्डर करण्यासाठी संपर्क तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर खालील नंबर पाठवा.
संपर्क - 087677 09992
--------------------------------------------------------------------------
बाभळीचा डिंक कधीच मातीपर्यंत पोहचत नाही,तिथंच त्या जखमेवर चिटकुन राहतो, तसच बापाचा अश्रू कधीच गालावरून ओघळत नाही,कडा पानवतात आणि तिथंच सुकून जातात,तो बाप तिथल्या गाभ्यासारख आपल्या मुलांना कठोरपणा दाखवतो पण त्यांच्यासाठी हजार संकटे त्या काट्यांसारखी सोसतो.

भेगाळलेल्या जमिनीत आपल्या सुखाच्या शोधात स्वतःला हरवून राबतो,त्या बाभळीसारखच त्याच जगणं लवकर नाही ध्यानी येत. इवल्याश्या घरट्यासाठी आणि पिलांसाठी ज्यानं भोगलं, ज्यानं सोसलं, बाबा म्हणून त्याचं जगणं लवकर नाही कळत.तो लढतो, हारतो, अश्रू पुसतो, तरीही पुन्हा चालतो. पिकलेल्या केसात अन् या दुनियेतील बाभळीसारख्या काट्यात पिलांसाठी तो "बाभुळमाया" जपतो.अशा बापाबद्दल मुलाची सवेंदना व्यक्त करणारी कादंबरी...

पुस्तक - बाभूळमाया
लेखक - विकास गुजर
पाने- 388
किंमत -350/-
--------------------------------------------------------------------------
कादंबरी ऑर्डर करण्यासाठी संपर्क तुमचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर खालील नंबर पाठवा.
संपर्क - 087677 09992

नावाजलेले प्रसिद्ध कवी फ. मू.शिंदे यांचा नवीन काव्यसंग्रह आपल्या भेटीला आला आहे.नक्की वाचा.Contact- 087677 09992        ...
13/03/2023

नावाजलेले प्रसिद्ध कवी फ. मू.शिंदे यांचा नवीन काव्यसंग्रह आपल्या भेटीला आला आहे.
नक्की वाचा.
Contact- 087677 09992

#मराठी
#कविता #मराठीपुस्तके #मराठीकविता
#लेख

कादंबरी वाचा मगच ठरावा,मी खलनायक होतो कि स्वसामर्थ्यवर उभा राहिलेला महानायकपुस्तक ऑर्डर करण्या करीत आजचा संपर्क करा - 08...
11/03/2023

कादंबरी वाचा मगच ठरावा,मी खलनायक
होतो कि स्वसामर्थ्यवर उभा राहिलेला महानायक
पुस्तक ऑर्डर करण्या करीत आजचा
संपर्क करा - 087677 09992

आज नाशिकवरून वैशाली ताईंनी  #बाभूळमाया कादंबरीसाठी पाठवलेला अभिप्राय मनपूर्वक धन्यवाद ताई🙏🙏🙏 #बाभूळमाया            सर बा...
08/03/2023

आज नाशिकवरून वैशाली ताईंनी #बाभूळमाया कादंबरीसाठी पाठवलेला अभिप्राय
मनपूर्वक धन्यवाद ताई🙏🙏🙏
#बाभूळमाया
सर बाभूळमाया कादंबरी वाचून पूर्ण झाली. ह्या कादंबरीत सर्वात जास्त मनाला भावलं, काळजात रोवल ते म्हणजे तुम्ही जे काही लिहील तो तो प्रसंग. वाचताना हुबेहूब डोळ्यासमोर चित्रपटासारखा उभा राहत होता. गावातील पार, पठारावरचा वड, गावाबाहेरील टेकडीवरील गणपती मंदिर, चावडी, बैल, गाडी, तालुक्याचं ठिकाण, वाडा हे सर्व जशेच्या तसे डोळ्यासमोर दिसत होते. जणू काही टी.व्ही. वरती बाभूळमाया चित्रपट सुरू आहे आणि तो मी बघतेय असंच वाटत होतं. डोळ्याच्या किनारी कितीतरी वेळा ओल्या व्हायच्या अन् आपसूक सुकूनही जायच्या पुन्हा ओल्या व्हायच्या, असं पूर्ण कादंबरी वाचताना सुरूच होतं. मनात वाटायचं कादंबरीचा शेवट असा होईल, तसा होईल. पण नागराज मंजुळे सरांच्या चित्रपटाप्रमाणे तो काही वेगळाच झाला शेवट पर्यंत मनात रुकरुक लागून राहिली असं नाही असं व्हायला पाहिजे होतं. पण झालं वेगळंच. कांत्यांच्या बापाची कहाणी जास्त होती तरीही मला कांत्याची आई सुद्धा तितकीच भावली. बापाचे काटे कादंबरीत दिसतात पण पडद्याआड असलेल्या आईला देखील बाभळीचे न दिसणारे काटे खूप टोचत होते.
बाभूळमाया कादंबरी एकदा वाचून झालीय पण ती पुन्हा कितीतरी वेळा मी वाचणार आहे, कारण संपूर्ण जीवन म्हणजे ती कादंबरी आहे. घरापासून ते रानापर्यंत, शाळेपासून ते दवाखान्यापर्यंत, चावडीपासून ते मंदिरापर्यंत, अज्ञानापासून ते ज्ञानापर्यंत, जन्मापासून ते मरेपर्यंत सारे काही कादंबरीत आहे. मित्रांची गोडी, बहीण भावाची वेडी माया, प्रियसीचं खरं प्रेम, गाव कारभारी सरपंच, म्हतारपणात असणारा राहिमचाचाचा एकटेपणा, मुक्या जनावरांच माणसावरचं प्रेम, शेतकऱ्याचा खुनी, अगदी सर्वकाही भरलेली अशी बाभूळमाया कादंबरी आहे.
डिंक म्हणजे बाभळीचे जणू काही अश्रूच असतात पण तो डिंक मानव कल्याणासाठी खूप गुणकारी आहे अगदी तसंच काही प्रमाणात, तुम्ही घेतलेल्या अनुभवातून समाजाचे अश्रूच तुम्ही बाभूळमाया कादंबरीत रेखाटलेले आहे असं मला वाटत. ते डिंकासारखेच आमच्या जीवनात खूप उपयोगात येतील असं मला वाटत.
बाभूळमाया कादंबरी प्रत्येक शेतकरी कुटुंबापर्यंत पोहच व्हावी व प्रत्येकाने ती वाचावी असं मला वाटतं‌. तुम्हाला, कादंबरी प्रकाशकांना व बाभूळमाया कादंबरीस खूप खूप शुभेच्छा.
वैशाली वाघ
नाशिक
पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा- 087677 09992

ती ला एक दिवस शुभेच्छा देऊन फायदा नाही,  ती चा आजीवन आदर करा. ह्याच तिच्यासाठी महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा असतील.
08/03/2023

ती ला एक दिवस शुभेच्छा देऊन फायदा नाही,
ती चा आजीवन आदर करा. ह्याच तिच्यासाठी
महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा असतील.

होळीच्या अग्नीत जळून जाऊ दे निराशेची छाया काळीएकमेकांचे तोंड गोड करू देऊनि पुरणपोळीआनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळीहीच ...
06/03/2023

होळीच्या अग्नीत जळून जाऊ दे निराशेची छाया काळी
एकमेकांचे तोंड गोड करू देऊनि पुरणपोळी
आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी
हीच प्रार्थना करतो सण साजरा करुनि होळी
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा.शांत, संयमी आणि स्थिरगंभीरपाऊस-वाऱ्याला आव्हान देत कडाडत्या विजेकडे डोळे वटारुन बघणार...
06/03/2023

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा.
शांत, संयमी आणि स्थिरगंभीर
पाऊस-वाऱ्याला आव्हान देत कडाडत्या विजेकडे डोळे वटारुन बघणारा.
बाप असतो सूर्याविरुद्ध युद्ध पुकारणारा.
उन्हाचा तळतळीत लेप पाठीवर रापवित, लेकरावर मायेची गार सावली पांघरणारा.
पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा- 087677 09992

जिज्ञासा, गुरुभक्ती, मातृप्रेम ते क्रोध, हिंसा, हाहाकार आणि त्यातूनच पुन्हा दया, शांती, अहिंसा सर्वच भावणांच्या चढउताराच...
04/03/2023

जिज्ञासा, गुरुभक्ती, मातृप्रेम ते क्रोध, हिंसा, हाहाकार आणि त्यातूनच पुन्हा दया, शांती, अहिंसा सर्वच भावणांच्या चढउताराचा म्हणजे 'अंगुलीमाल !
पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी आजच संपर्क करा- 087677 09992

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Era Book Publisher posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Book & Magazine Distributors in Pune

Show All