बेधडक बेळगाव

बेधडक बेळगाव बेळगाव सह देशातील सर्व घडामोडी व रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच पेज लाइक करा

९ वर्षा पूर्वी काढलेले चित्र आजही परिस्थिती तिच आहे .
26/02/2024

९ वर्षा पूर्वी काढलेले चित्र आजही परिस्थिती तिच आहे .

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
19/02/2024

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..

काल कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी कानडी पत्रकारांना खुश करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंडसुख घेतल. बेळगाव वर हक...
15/02/2024

काल कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी कानडी पत्रकारांना खुश करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंडसुख घेतल. बेळगाव वर हक्क दाखविण्यासाठी कर्नाटकच्या आणखीन एका मंत्र्याने केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. मराठी लोक हे कर्नाटकाचेच आहेत,इथलीच हवा , पाणी वापरतात , इथेच काम करतात वगैरे अनेक विधाने करत त्यांनी कानडी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. पण मंत्री महोदयांनी कितीही बडबड केली तर सत्य परिस्थिती बदलत नाही.हवा , पाणी या निसर्गाची देणं आहेत. आणि अगदीच मग तर्कशुध्द सांगायचं झालं तर उत्तर कर्नाटकाला मिळणारे पाणी हे महाराष्ट्रातून येणाऱ्या नद्यांवर अवलंबून आहे हे विसरू नका. आणि सीमाभागातील जमिनीचे उतारे हे मराठी लोकांच्या बापजाद्यांचे आहेत महत्वाचे म्हणजे इथला मराठी माणूस हा स्वकर्तृत्वावर उभा आहे. आज पर्यंत इथला व्यवसायआणि उद्योग वाढविण्यासाठी कर्नाटकाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. उलट कन्नड सक्ती वगैरे करून मराठी माणसाचे उद्योग तसेच स्थानिक लहान मोठे व्यवसाय बंद करण्यासाठीच कर्नाटक सरकार अग्रेसर राहिले.
हा भाग महाराष्ट्राचा घटक होता हे अगदी अलीकडे तुमच्याच एका सहकारी मंत्र्यांनी जाहीर सभेत हे बोलू दाखविले आहे. आणि हे सत्यच आहे. आम्ही कालही महाराष्ट्राचे होतो आणि न्यायालयातील न्याय मिळाल्यावर पुन्हा महाष्ट्रात जाऊ. अगदी जवळूनसमाजवुन सांगायचे झाले तर ज्या काँग्रेस पक्ष्याचे आपण सरकार चालवता त्याच पक्ष्याच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी हा प्रश्न न्यायचा आहे आणि मराठी माणसावर अन्याय झाल्याचे मान्य करत महाजन अहवालात नमूद गावांपेक्षा जास्त गवे महाराष्ट्रात गेली पाहिजे असे सुचविले होते.
उपमुख्यमंत्र्यांनी आधी सीमाप्रश्नाबद्धल स्वतःच्या पक्ष्याच्या नेत्यांची भूमिका काय राहिली होती हे तपासले तर पत्रकारांच्या फुटकळ प्रश्नांवर उत्तर देऊन त्यांना खुश करण्यासाठी समितीवर तोंडसुख घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही . आणि शेवटी ज्या इंदिरा गांधींचा संदर्भ दिला त्यांचेच एक पत्र समितीच्या माजी आमदारांना लिहलेले पुरावा म्हणून खाली प्रसिद्ध करत आहे. एवढेच नव्हे तर अनेक माजी पंतप्रधानांनी मराठी माणसाला न्याय मिळण्याचीच भूमिका घेतली आहे . मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्य करते . आज भलेही अनेक जण स्वार्थासाठी इकडे तिकडे गेले असतील पण त्यांचे मूळ समितीच आहे . त्यामुळे कितीही आगपाखड समितीवर केली तरी संयुक्त महाराष्ट्र पूर्ण होई पर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती लोकशाही पद्धतीने लढा देतच राहील.
#बेळगाव_महाराष्ट्राचेच
#संयुक्त_महाराष्ट्र
#महाराष्ट्र_एकीकरण_समिती

फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मतदान करा
10/05/2023

फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मतदान करा

07/05/2023
कपिलनाथ युवक मंडळ , तांगडी गल्ली, कपिलेश्वर रोड यांचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर चे अधिकृत उमेदवार श्री अमर ...
25/04/2023

कपिलनाथ युवक मंडळ , तांगडी गल्ली, कपिलेश्वर रोड यांचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर चे अधिकृत उमेदवार श्री अमर यळूरकर यांना जाहीर पाठिंबा.

Happy Holi 🚩
07/03/2023

Happy Holi 🚩

बेळगाव येथे न्यायालयीन स्थगितीचा आदेश झुगारून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामध्ये शेतकऱ्...
18/11/2021

बेळगाव येथे न्यायालयीन स्थगितीचा आदेश झुगारून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामध्ये शेतकऱ्यांना उध्वस्थ करणाऱ्या हलगा-मच्छे बायपास चे काम सुरु केले आहे..याला पर्यायी मार्ग असून देखील सोबत रिंगरोड असून देखील निव्वळ राजकारण्यांच्या स्वार्थासाठी वर्षभर पीक देणारी शेती जमीन अधिग्रहित केली जात आहे..पिकं जमीनदोस्त केली जात आहेत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना देशीधडीला लावले जात आहे..याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचा आवाज दाबून केंद्र सरकार विकासाच्या नावाखाली दडपशाही करत आहे!



सौजन्य :- Gaurav Sarjerao

विधान परिषद  निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर बेळगाव चे जिल्हाधिकारी एम जि हिरेमठ यांची बदली. त्यांच्या जागी सध्या आर वेंकटेश ...
15/11/2021

विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर बेळगाव चे जिल्हाधिकारी एम जि हिरेमठ यांची बदली. त्यांच्या जागी सध्या आर वेंकटेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हलगा-मच्छे बायपास कुणाच्या स्वार्थासाठी ???सध्या बेळगाव परिसरात धगधगता विषय म्हणजे  हलगा-मच्छे बायपासचे काम  रद्द करण्या...
15/11/2021

हलगा-मच्छे बायपास कुणाच्या स्वार्थासाठी ???

सध्या बेळगाव परिसरात धगधगता विषय म्हणजे हलगा-मच्छे बायपासचे काम रद्द करण्यासाठी सुरु असलेले शेतकरी आंदोलन. शेतकऱ्यांचा हा लढा आजचा नसून गेली अनेक वर्षे हलगा-मच्छे बायपास आवाज उठवला जात आहे . पण गेल्या काही दिवसात याची तीव्रता अधिकच वाढली असून त्याला कारणही तितकेच महत्वाचे आहे . हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामासाठी बेळगावमध्ये पोलिसांनी केलेली बळजबरी हे आंदोलन पेटण्याचे प्रमुख कारण आहे . शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना देखील जबरदस्तीने जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ही घुसखोरीच म्हणावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव शहराच्या बाहेरून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते बेळगावहुन गोव्याला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ अ याला जोडणारा हलगा-मच्छे बायपास मार्गासाठी तयारी सुरु केली. पण शेतकऱ्यांनी अगदी सुरवातीच्या काळापासूनच या संपूर्ण प्रकल्पाला विरोध केला आहे . अगदी बैलगाड्या, ट्रॅक्टर ,जनावरे घेऊन मोर्चे काढले गेले. अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाचा शिलान्यास केला त्यावेळी देखील शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत या प्रकल्पाचे आलेखन केले तेव्हा पासूनच याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे . पण शेतकरी विरोधात असताना देखील प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करून जबरदस्तीने रस्त्याच्या कामाला सुरवात केली आहे.२२० फूट रुंद व ९.५ किमी लांबीच्या या बायपास साठी सुमारे १५३ एकर जमीन सुपीक घेतली जाणार असून ही सर्व जमिन शेतीसाठी उपयुक्त असून तिबार पेरणी याठिकाणी केली जाते. आपली सुपीक जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना देखील प्रशासनाने पोलीस दबावतंत्राचा वापर करून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी शेतकऱ्यांसह महिलांनीदेखील आंदोलनात सहभागी होत काम बंद करण्यासाठी शेतात ठिय्या मांडला, पण पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत आंदोलकांना हटविण्यासाठी पराकाष्ठा केली. अनेक शेतकऱ्यांनी हातात विळे घेऊन काम बंद करण्याचा पवित्र घेतला पण पोलिसांनी त्यांच्या हातातली विळे घेऊन त्यांना जबरदस्तीने बंदिस्त केले. अमीत अनगोळकर या युवक शेतकऱ्याने झाडावर चढून उडी मारण्याचा इशारा दिला. पण कंत्राटदाराच्या आणि राजकीय दबावाखाली पोलिसांनी शेतकऱ्यांवरच अधिक दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. आपली सुपीक जमीन जाणार या आक्रोशाने आकाश अनगोळकर या युवकाने स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी व आंदोलन स्थळी असलेल्या उपस्थितांनी त्याची आग विझवून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. ४० टक्के भाजल्यानंतर सध्या आकाशची परिस्थिती स्थिर असली तरी आपल्या काळया आईच्या रक्षणासाठी त्याने उचलेले पाऊल हे समाजाला विचार करायला लावणारे आहे.शेतकऱ्याचा जीव गेला तरी रस्ता करण्याच्या पावित्र्यावर ठाम राहिलेले कंत्राटदार नक्की कोणासाठी काम करत आहेत असा प्रश्न उपस्थित होतो आंदोलन करणाऱ्यांमध्ये एक महिला आपल्या ८ महिन्याच्या तान्हुल्यासह विरोध करण्यासाठी समोर आली असता पोलिसांनी दमदाटी करत तिला देखील हुसकावून लावले.
मुर्दाड प्रशासन शेतकऱ्यांची सुपीक जमीन घेण्यासाठी विकासाच्या नावावर शेतकऱयांना उध्वस्थ करण्याचा प्रयन्त करीत आहे. अनेक शेतकऱ्यांना बंदिस्त करून प्रशासनाने उभ्या पिकातून बुलडोझर फिरवला आहे. आंदोलन स्थळावरील आक्रोश हृदय पिळवटणारा असून हलगा-मच्छे बायपास विरोधात वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे.
या संपूर्ण प्रकरणात उच्च न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडणारे वकील रवी गोकाककर यांनी माहिती देताना सांगितले कि , न्यायालयाचा स्थगितीचा आदेश असून झिरो पॉईंट न दाखवताच प्रशासनाने कामाला सुरवात केली आहे.या संपूर्ण प्रकरणात २००९ , २०११ आणि २०१८ असे तीन वेळा न्यायालयाने निर्देश दिले आहेत. पण या सगळ्या निर्देशाकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केलं आहे . सध्याचा झिरो पॉईंट हा शहरातील फिश मार्केट जवळ आहे.भारत सरकारच्या राजपत्रात देखील फिश मार्केट येथील झिरो पॉईंट पासून ते मच्छे असे ९.५ कि मी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण म्हणून नमूद करण्यात आले आहे. बायपास चे काम हाती घेतल्या नंतर हा झिरो पॉईंट बदलणे अपेक्षित आहे.पण तसे न करता, न्यायालयाने वारंवार विचारल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने नवीन झिरो पॉईंट हा हलगा येथे असल्याचे न्यायालयात सांगितले.पण राष्ट्रीय महामार्ग ४ अ वर असणारा झिरो पॉईंट राष्ट्रीय महामार्ग क्र ४ वर कसा असा प्रतिप्रश्न करून न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाला स्थगिती दिली. व झिरो पॉईंट संबधी जिल्हा दिवाणी न्यायालयातून आदेश घेण्याचे निर्देशित केले. महामार्ग प्राधिकरणाने येथे देखील झिरो पॉईंट संबधी कोणतेही प्रतिज्ञा पत्र सादर न केल्याने जिल्ह्या न्यायालयाने देखील झिरो पॉईंट दाखविल्याशिवाय बायपास काम सुरु करता येणार नाही असा निर्देश दिला. पण तरी देखील महामार्ग प्राधिकरण राजकीय दबावाखाली काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी जोर जबरदस्ती करून याचे काम सुरु केले आहे. २००९ साली निघालेल्या अध्यादेश प्रमाणे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे मुळात त्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात अजूनही गेली नाही. त्या ठिकाणी अजूनही पिके घेतली जातात. पण शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बोगस शेतकऱ्यांच्या नावे खाती तयार करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. व सध्या अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे . महत्वाची गोष्ट म्हणेज बायपास साठी शेतकऱ्यांनी प्रस्तावित मार्ग देखील सुचविला असून सदर मार्ग हा पडीक जमिनीतून जातो त्यामुळे सरकारला देखील कमी खर्चामध्ये हा बायपास तयार करता येईल. पण त्या ठिकाणी देखील राजकीय स्वार्थासाठी सदर प्रस्ताव दुर्लक्षित केलं अजात आहे आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. निर्दयी प्रशासनाने शेतकऱ्यांना उध्वस्थ करण्यासाठी सुपीक जमिनीतूनच रस्ता करण्याचा हट्ट चालविल्यामुळे शेतकरी न्याय मिळे पर्यंत तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत न्यायालयीन स्थगिती मिळवून देखील प्राधिकरणाने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्धवस्त करत रस्त्याचे काम सुरु केल्याने हा विषय अधिकच चिघळताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसापासून पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कंत्राटदार दाखल होत असून आता शेतकऱ्यांना त्यांची भात शेती कापण्यासाठी दबाव टाकला जात आहे. ११ नोव्हेंबर रोजी कंत्राटदाराने उभ्या असलेल्या उसाच्या शेतात जेसीबी फिरवून रस्त्याचे काम सुरु केले होते. यावेळी शेतीमालक आणि इत्तर शेतकरी विरोध करीत असताना देखील त्यांना न जुमानता काम सुरु ठेवण्यात आले आहे . शेतकरी शिवारात ठाण मांडून बसले असले तरी त्यांच्यावर पुन्हा जबरदस्ती केली जाणार यात शंका नाही. सदर घटनेत न्यायालयात अवमान याचिका दाखल केली जाणार असून न्याय मिळे पर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.स्थानिक लोक शेतकऱ्यांच्या बाजूने असले तरी विकासाच्या नावावर निवडून आलेले याठिकाणीचे लोकप्रतिनिधी मात्र या सगळ्या प्रकरणात मूग गिळून गप्प आहेत. बळकाविण्यात येणारी शेती ही बारा महिने पीक देणारी असून बासमती तांदळासारखी दर्जेदार उत्पादने या जमिनीत घेतले जातात.पण तरी देखील कोणतेही ठोस कारण नसताना त्याच जागेतून रस्ता कशाला ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून सुरु असलेला हा कारभार नक्की कुणाच्या स्वार्थासाठी आहे ? या चर्चेला आता उधाण आले आहे.सोशल मीडियावर देखील या प्रमाणात मोठया प्रमाणात विरोध दर्शविला जात असला तरी शासन या सगळ्याची कितपत दखल घेईल हे पहावे लागेल.

आपल्या भविष्यासाठी शेतात ठाण मांडून बसलेली हि चिमुकली. हलगा मच्छे बायपास विरुद्ध आज सलग चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन ...
14/11/2021

आपल्या भविष्यासाठी शेतात ठाण मांडून बसलेली हि चिमुकली. हलगा मच्छे बायपास विरुद्ध आज सलग चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे . झोपलेली सत्ता आणि निष्ठुर प्रशासन हि शेतकऱ्यांच्या या अवस्थेला कारणीभूत आहे .

हलगा मच्छे बायपासच्या  प्रस्तावित मार्गाच्या विरोधामध्ये शहापूरच्या  शिवारामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन...
13/11/2021

हलगा मच्छे बायपासच्या प्रस्तावित मार्गाच्या विरोधामध्ये शहापूरच्या शिवारामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे हलगा मच्छे बायपास साठी उपलब्ध असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करून बायपास करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आहे कारण बेकायदेशीरपणे सुरू असलेले सध्याचे बायपास रस्त्याचे काम हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे. बासमती तांदळाचा सारखे उत्तम दर्जाचे पीक ज्या जमिनीत घेतले जाते व ज्या ठिकाणी बाराही महिने शेतकऱ्यांना विविध पिके घेता येतात अशा सुपीक जमिनीतून न्यायालयाचा आदेश झुगारून कंत्राटदार पोलिसी बळाचा वापर करून काम करीत आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले सरकार याला तीव्र विरोध हा झालाच पाहिजे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गेले कित्येक दिवस देशाच्या राजधानी च्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. आज पुकारल...
27/09/2021

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गेले कित्येक दिवस देशाच्या राजधानी च्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. आज पुकारलेल्या भारत् बंद च्या पार्श्व भूमीवर बेळगाव मध्ये शेतकरी आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव हजर. बेळगाव येथील चन्नम्मा चौकात निदर्शन् आणि रास्ता रोको. आंदोलकांना नंतर अटक .

बेळगाव महापालिका निवडणूका या पारदर्शक पद्धतीने झाल्या नाहीत. यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सदर् नि...
09/09/2021

बेळगाव महापालिका निवडणूका या पारदर्शक पद्धतीने झाल्या नाहीत. यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सदर् निवडणूक हि रद्द करून नव्याने निवडणूका घ्याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय उमेदवारांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी बेळगाव महापलिका यांच्या कडे केली. यावेळी शंभरपेक्षा जास्त उमेदवार हजर होते.

छाया - अमृत बिर्जे

08/09/2021

बेळगाव महापलिका निवडणूक संदर्भात गोंधळ आणि संशय.

संपूर्ण देशात निवडणूकीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला असे असताना टास्क फोर्स ने नकार दिला असताना राज्य निवडणूक आयोगने बेळगाव महापालिका निवडणूक लादली.
निवडणूक गणेशोत्सवाच्या तोंडावर घेण्यात आल्या जेणे करून त्यातून निर्माण होणारा संभाव्य गोंधळ अक्रोश् सणाच्या काळात निवळुन् जाईल.
मतदार यादीमध्ये शेकडो नावे गहाळ करणे.
मतदार यादी मध्ये शेकडो नावे वेगवेगळ्या बूथ वर परत परत छापने.
अनेक वर्षा पूर्वी मृत असणाऱ्या लोकांची नावे मतदार यादी मध्ये समाविष्ट करणे.
महापालिका क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्या लोकांची नावे यादीत समाविष्ट करणे.
यादीत नाव असणाऱ्या लोकांना मतदार यादीत नाव नाही म्हणून मतदान केन्द्रावरुन् परत पाठविणे.
वार्ड मधील एका भागातील व्यक्तिचे नाव वार्ड च्या दुसऱ्या भागातील केंद्रात समाविष्ट करणे.
निवडणुकीत vvpat मशीन चा वापर अनिवार्य असून देखील (सर्वोच्च् न्यायालयातील आदेश) त्या न् वापरणे आणि त्या संबंधित विचारलेली लेखी तक्रार नजरेआड करणे.
मशीन संबधी उमेदवारांना मॉक ड्रिल न देणे.
निकालामध्ये अनेक ठिकाणी मतांची तफावत.
अनेक केंद्रावर उमेदवारांना स्वतःची मते न् दर्शविणे.
अनेक ठिकाणाचे न् पटणारे निकाल.

या सगळ्या गोष्टीची चौकशी आणि चर्चा झाली पाहिजे बेळगाव महपलिका निवडणूक लोकशाहीची क्रूर चेष्टा ठरत आहे.

31/08/2021

बहुमताने विजयी करा 🚩

बहुमताने विजयी करा 🚩
29/08/2021

बहुमताने विजयी करा 🚩

महाराष्ट्र एकीकरण समिती चा विजय असो...🚩
27/08/2021

महाराष्ट्र एकीकरण समिती चा विजय असो...🚩

24/07/2021

भारताला टोकिओ ऑलिम्पिक २०२० मध्ये पहिले पदक मिळाले.

मीराबाई चानु हिने वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक मिळवत स्पर्धेच्या दुसर्याच दिवशी भारताचे खाते उघडले.

10/06/2021

गेल्या काही दिवसात सार्वजनिक माध्यमांवर एक विषय खूप चर्चेला येत आहे. तो म्हणजे गुगलने प्रसिद्ध केलेल्या उत्तराचा. गुगल च्या माहिती विभागात जर कुणी प्रश्न टाकला कि " भारतातील सर्वात कुरूप भाषा कोणती?" त्यावर उत्तर येत होते कन्नड. यामुळे भाषिक अस्मितेचा विषय जगभरातील कानडी लोकां मध्ये चर्चेला आला आणि त्या समवेत सर्वच् भारतीय भाषांची चर्चा होऊ लागली. मी जरी मराठी बहुल सिमा भागातील मराठी भाषिक असलो तरी गुगुल् द्वारे प्रसिद्ध या माहितिचा मी एक भाषिक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून निषेध करतो. कारण भारतातीलच नव्हे तर जग भरातील कोणतीही भाषा असो मग ती लुप्त का असेना किंवा हातावर मोजके लोक बोलत असतील , बोली भाषा असो किंवा जगातील समृद्ध भाषा असो कुठलीही भाषा हि वाईट किंवा कुरूप नाही. त्याना स्वतःचे अस्तित्व आहे, समृद्धता आहे, ओळख आहे. त्यामुळे कुठल्याही भाषेला कमी लेखने हे निशेधार्यच . त्याचे समर्थन होऊ शकत नाही.
पण या मुळे भाषिक अस्मितेचे अनेक मुद्दे या मुळे प्रकर्षाने लिहावे वाटत जेणे करून ते लोकांच्या निदर्शनास येतील. आणि त्यावर चर्चा होईल हि अपेक्षा.
१) कोणत्याही भाषेचा अपमान झाला तर फक्त त्या भाषेचे लोक त्या विरोधात बोलतात आणि इतर लोक गप राहतात. कन्नड भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला असता जग भरातील् कन्नड लोक पेटून उठले. कन्नड भाषे बद्धल फक्त एक ओळ अपमनास्पद् आली आणि हाहाकार् उठला. मग गेली ७ दशके कन्नड भाषेचे पालकत्व घेतेलेल्या कर्नाटक सरकारने सीमा भागातील मराठी भाषेची गळचेपी केली आहे त्या बद्धल जेव्हा आवाज उठतो तेव्हा आज बोलणारे लोक त्या गोष्टीचे समर्थन करतात हे नैतिक दिवाळखोरिचे लक्षण वाटते. त्यामुळे आपली भाषा जशी आपल्याला प्रिय असते तशी इतरांना देखील त्यांची भाषा प्रिय असते यांचे भान या लोकांनी ठेवावे हिच अपेक्षा.
२) अनेकनी यावेळी कन्नड भाषा कशी जुनी आहे . आणि किती कोटी लोक बोलतात यांचे दाखले दिले. त्यात तथ्य आहे हे निर्विवाद पण जेव्हा कन्नड भाषा २००० वर्ष जुनी सांगितली जाते त्यावेळी त्याचे मूळ शोधताना कन्नड भाषा प्राधिकरण ने दिलेले पुरावे समोर येतात. त्यात प्रामुख्याने त्यांनी गाथा सप्तशती चा दाखला दिला आहे जो २००० वर्ष जुना ग्रंथ आहे ज्यात कन्नड पदे लिखित स्वरूपात सापडतात. आणि याच पुराव्यामुळे कन्नड भाषेला अभिजात दर्जा मिळाला पण इथे मी एक मुद्दा समोर आणू इच्छितो तो मराठी भाषेचा कारण गाथा सप्तशती चा पुरावा अभिजात दर्जा मिळविण्यास मान्य केला असेल तर त्याच गाथा सप्तशती मध्ये मराठी कविता काव्य आहे मग मराठी भाषे बद्धल दुजा भाव का? मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही ?
मराठी भाषा हि जगातील दुसऱ्या क्रमांकाची समृद्ध भाषा आहे. जगात दहाव्या क्रमांकाची सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. जगात वार्षिक सगळ्यात जास्त मराठी भाषेतील पुस्तके प्रकाशित होतात तरी देखील भारतात मराठी भाषेला म्हणावा तसा सन्मान मिळाला नाही याची खंत वाटते.
खरतर या सगळ्या गोष्टी आज लिहाव्या लागत आहेत कारण फक्त ठराविक भाषा आणि भाषिकांना झुकत् मापं आपल्या देशात दिलं जातंय कि काय अशी शंका मनात तग धरत आहे. मराठी भाषिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी याकडे देश स्वातंत्र्य झाल्यापासूनच दुर्लक्ष्य झाले आहे असे म्हंटले तरी चुकीचे नाही.
तामिळ नाडू सह् दक्षिणेच्या इतर राज्या मध्ये तसेंच बंगाल- गुजरात- पुर्वोत्तर राज्ये याठिकाणी देशामधील नेते गेले तर ते भाषांतरकार चा वापर करून लोकांशी संवाद साधतात मग मराठी माणसाला ग्राह्य का धरले जाते ? आणि त्यांच्या वर हिंदी लादली जाते. मराठीचा वापर करणे बहुदा टाळले जाते.
अशी बरिच् उदाहरणं आहेत जिथे मराठी भाषा किंवा भाषिक डवललेले दिसतात.
काल परवा च्या या भाषिक तणावात हे मुद्दे प्रकर्षाने जाणवु लागले म्हणून तुम्हा सोबत सामायिक केले आहेत. यावर मराठी माणसाने विचार करणे गरजेचे आहे.

दुर्भाग्य आम्हा सीमावासियांचे एकेक शिलेदर आपल्यातुन् जात आहेत. बालिका आदर्श शाळेचे शिक्षक आणि सीमा भागातील मराठी संस्कृत...
23/05/2021

दुर्भाग्य आम्हा सीमावासियांचे एकेक शिलेदर आपल्यातुन् जात आहेत. बालिका आदर्श शाळेचे शिक्षक आणि सीमा भागातील मराठी संस्कृती आणि भाषा संवर्धनाकरिता सतत झटणारे एक खंदा कार्यकर्ता एकनाथ पाटील सर वयच्या ४९ व्या वर्षी आपल्यातुन् निघून गेले यावर विश्वास बसत नाही. सीमा भागातील मराठी भाषिक ,संस्कृतीक आणि शैक्षणिक विश्वाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. एकनाथ सर तुम्ही हवे होता. हे असे जाणे बरे नव्हे.

धक्के पचविणे कठीण होतय. अरुण काका तुम्ही असे सोडून जाल असे स्वप्नात वाटले नव्हते. सीमा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे ते...
19/05/2021

धक्के पचविणे कठीण होतय. अरुण काका तुम्ही असे सोडून जाल असे स्वप्नात वाटले नव्हते. सीमा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे ते सोडून तुम्ही गेलात. तुमच्या जाण्याने एक लढवय्या कार्यकर्ता , एक उत्तम पत्रकार, एक सीमा लढ्याचा अभ्यासक, एक उत्तम मार्गदर्शक् हरवला. अनेक गोष्टी आपण बोलत होतो. निखळ चर्चा करत होतो. रामलिंग खिंड गल्लीतून जाताना तुमचे स्मित हास्य आता परत दिसणार नाही याचे दुःख होत आहे.

16/04/2021

मी बेळगाव बोलतोय.

Address

Belgaum
590001

Alerts

Be the first to know and let us send you an email when बेधडक बेळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बेधडक बेळगाव:

Videos

Share