Maharashtra Times Pune

Maharashtra Times Pune इथे वाचा ‘मटा’च्या सर्व आवृत्त्यांचे ई-पेपर http://epapermt.timesofindia.com

महाराष्ट्र टाइम्सचा ई-पेपर सुरू झाल्यामुळे ‘मटा’च्या पुणे, मुंबईसह नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अहमदनगर अशा आठही आवृत्त्यांचे अंक जसेच्या तसे वाचता येणार आहेत. पुणे टाइम्स, संवाद यांसारख्या पुरवण्याही तेथे वाचता येणार आहेत. त्या ई-पेपरची ही लिंक.... http://epapermt.timesofindia.com/

17/10/2015
वर्गात फटाके फोडले - Maharashtra Times

वर्गात फटाके फोडले http://t.co/eWPek6LvwB

वाढदिवस साजरा करण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गातच फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी कासारवाडी येथे घडला. या प्रकारमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

17/10/2015
‘व्हॉट्सअॅप’द्वारे केली महिलेची फसवणूक - Maharashtra Times

‘व्हॉट्सअॅप’द्वारे केली महिलेची फसवणूक http://t.co/uMa0UJyPmR

‘व्हॉट्सअॅप’द्वारे कोण कोणाला कसे फसवेल याचा भरवसा नाही. असाच एक अनुभव आंबेगाव बुद्रुक येथील एका महिलेला आला. नोकरी लावण्याच्या बहाण्याने त्या महिलेला मनी ट्रान्स्फरद्वारे एक हजार रुपये भरण्यास लावून तिची फसवणूक करण्यात आली.

17/10/2015
‘किशोर’ गाठतोय एक लाखाचा टप्पा - Maharashtra Times

‘किशोर’ गाठतोय एक लाखाचा टप्पा http://t.co/I0bOZ91sxN

बालकुमारांच्या आवडीच्या असलेल्या ‘किशोर’ मासिकाचा दिवाळी अंक यंदा बराच मोठा पल्ला गाठत आहे. या दिवाळी अंकाच्या यंदा विक्रमी एक लाख प्रती छापण्यात आल्या असून, एवढ्या प्रतींची प्रथमच छपाई करण्यात आली आहे.

17/10/2015
शिक्षकाविरोधात गुन्हा - Maharashtra Times

शिक्षकाविरोधात गुन्हा http://t.co/c2z5yvxGBK

अभ्यास पूर्ण केला नाही, म्हणून अकरा वर्षांच्या मुलीला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. कोथरूडच्या मयूर कॉलनी भागातील पी. जोग शाळेत ही घटना घडली.

17/10/2015
आहे ‘पॉप्युलर’ तरी - Maharashtra Times

आहे ‘पॉप्युलर’ तरी http://t.co/FPOaK83rUj

अक्षर वाङ्मयाच्या वैभवशाली दालनांपैकी एक असलेले डेक्कन जिमखाना परिसरातील पॉप्युलर बुक हाउस बहुतांश इतर जुन्या पुस्तक विक्री केंद्रांप्रमाणेच अस्तित्वासाठी संघर्ष करते आहे.

17/10/2015
पुण्यात ६७ गावे दुष्काळी - Maharashtra Times

पुण्यात ६७ गावे दुष्काळी http://t.co/C58ze7DMuU

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या पुणे जिल्ह्यात ६७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या गावांमध्ये कृषिपंपांना वीजबील सवलती, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, जमीन महसुलामध्ये सूट अशा सवलती देण्यात येणार आहेत.

17/10/2015
प्यार का 'रटाळ' पंचनामा २ - Maharashtra Times

प्यार का 'रटाळ' पंचनामा २ http://t.co/2CKClkAuuR

तीन बॅचलर तरुणांच्या प्रेमाचे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच नसत्या उद्योगांचे दर्शन घडविणाऱ्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाला तसे बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकीच यश मिळविता आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन आता ‘प्यार का पंचनामा २’ या पुढील भागातून असाच एक ‘लव्ह अँड ब्रेक अप’चा खेळ मांडतात.

17/10/2015
आदर्शवादाची शाब्दिक मांडणी... सिटीझन - Maharashtra Times

आदर्शवादाची शाब्दिक मांडणी... सिटीझन http://t.co/ZclzN2OHHE

भाबडेपणा हा अवगुण नसतो. एखाद्याच्या भाबडेपणात आशावादही असतो. फक्त त्याचा तो आशावाद बदलत्या काळात भाबडेपणा वाटतो.

17/10/2015
आदर्शवादाची शाब्दिक मांडणी... सिटीझन - Maharashtra Times

आदर्शवादाची शाब्दिक मांडणी... सिटीझन http://t.co/ZclzN2OHHE

भाबडेपणा हा अवगुण नसतो. एखाद्याच्या भाबडेपणात आशावादही असतो. फक्त त्याचा तो आशावाद बदलत्या काळात भाबडेपणा वाटतो.

17/10/2015
ज्युली ख्रिस्तीलाही पडली होती स्मिताची भुरळ - Maharashtra Times

ज्युली ख्रिस्तीलाही पडली होती स्मिताची भुरळ http://t.co/zVb11P0OWV

आज, शनिवारी स्मिताची ६०वी जयंती. स्मिताने अल्पावधीत आपल्या अभिनयाने घालून दिलेले धडे भारतीय सिनेसृष्टी पुन्हा पुन्हा गिरवताना दिसते. पण तिची ही जादू केवळ महाराष्ट्र वा आपल्या देशापुरती नाही. तर अनेक पाश्चात्य कलाकार तिच्या अभिनयशैलीने अवाक झाले होते.

17/10/2015
‘असहिष्णू वातावरणात जीव गमवावा लागू नये’ - Maharashtra Times

‘असहिष्णू वातावरणात जीव गमवावा लागू नये’ http://t.co/bOqPORf9qT

‘सध्या सर्वत्र असहिष्णू वातावरण वाढत आहे. कवी अरुण कोलटकर यांचे अजून बरेच साहित्य अप्रकाशित आहे. मात्र, सध्याच्या वातावरणात हे साहित्य प्रकाशित करण्यासारखी स्थिती आहे का, असा प्रश्न पडतो. हे साहित्य प्रकाशित केल्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली तर एकवेळ चालू शकेल. मात्र, जीव गमवावा लागू नये,’ अशा शब्द…

17/10/2015
शिवसेनेचा आव्वाऽऽऽज पार्कातच! - Maharashtra Times

शिवसेनेचा आव्वाऽऽऽज पार्कातच! http://t.co/btIsYSFzlr

सत्तेत असूनही भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शुक्रवारी हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

17/10/2015
गाय तस्कराची जमावाकडून हत्या - Maharashtra Times

गाय तस्कराची जमावाकडून हत्या http://t.co/QlCwOCiSSH

उत्तर प्रदेशच्या दादरी गावातील अखलाख या व्यक्तीला गोमांस खाल्ल्याच्या आरोपावरून जमावाने ठार केल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी हिमाचल प्रदेशमध्ये एका कथित गाय तस्कराला जमावाने मारहाण करून ठार केल्याची घटना घडली.

16/10/2015
t.co

अभिनेता रवी किशनची मुलगी गायब http://t.co/qgNjX4Rc7y via

हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता रवी किशनने (४४) बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये स्वतःची १९ वर्षांची मुलगी गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

16/10/2015
पुरस्कार परत करणाऱ्या लेखकाची चौकशी - Maharashtra Times

पुरस्कार परत करणाऱ्या लेखकाची चौकशी http://t.co/NIqcK73OVj via

प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केल्यानंतर त्यांच्या घरी चौकशीसाठी पोलिस दाखल झाले. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर चौकशीसाठी आल्याचे पोलिसांनी देवी यांनी सांगितले.

16/10/2015
सत्ता नसल्याने पवारांचा कोंडमारा!- शिवसेना - Maharashtra Times

सत्ता नसल्याने पवारांचा कोंडमारा!- शिवसेना http://t.co/x5iIkUc4QH via

‘जलबिन मछली व नृत्यबिन बिजली’ तसे शरद पवारांचे आहे. सत्तेशिवाय त्यांच्यासाठी सारे जीवन व्यर्थ आहे. सत्ता नसल्याने त्यांच्या मनाचा कोंडमारा चालला आहे. म्हणूनच या मुंगळ्यांनी भाजपच्या ‘ढेपे’वर चढून गूळ खाण्याचा प्रयत्न केला होता.

16/10/2015
मुस्लिम देशात राहू शकतात, पण गोमांस सोडावे लागेल! - Maharashtra Times

मुस्लिम देशात राहू शकतात, पण गोमांस सोडावे लागेल! http://t.co/VNlBX8PRN6 via

उत्तर प्रदेशमधील दादरी येथे झालेली घटना चुकीची आणि गैरसमजातून झाली असल्याचे सांगत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या देशात मुस्लिम राहू शकतात पण त्यांना गोमांस खाणे सोडावे लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

16/10/2015
भारतात डाळींचा दुष्काळ, कॅनडा मालामाल - Maharashtra Times

भारतात डाळींचा दुष्काळ, कॅनडा मालामाल http://t.co/5oTio8hmZS via

सतत काही वर्षे दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे यंदा डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. डाळींच्या उत्पादनातील घट भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया आणि म्यानमारमधून डाळींची आयात सुरु केली आहे.

16/10/2015
'न्यायिक नियुक्ती आयोग घटनाबाह्य!' - Maharashtra Times

'न्यायिक नियुक्ती आयोग घटनाबाह्य!' http://t.co/bdNXQUdsTk via

न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी केंद्र सरकारनं स्थापन केलेला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी) घटनाबाह्य असल्याचा शेरा मारून सुप्रीम कोर्टानं आज मोदी सरकारला झटका दिला आहे.

16/10/2015
शिवसेना-भाजप मुंबई पालिका एकत्र लढणार! - Maharashtra Times

शिवसेना-भाजप मुंबई पालिका एकत्र लढणार! http://t.co/Qht7HJpeVW via

'शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही मुंबईसह पुणे, नागपूर या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका युतीनेच लढणार आहोत. याबाबत आमच्यात कोणतंही दुमत नाही', असं स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती 'भक्कम' असल्याचा दावा केला आहे.

16/10/2015
'गुलाम अली हवालाने पैसा ट्रान्सफर करतात' - Maharashtra Times

'गुलाम अली हवालाने पैसा ट्रान्सफर करतात' http://t.co/rBD4xeRXyS via

'पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली हे भारतात कमावलेला पैसा हवालाने विदेशात ट्रान्सफर करतात', असा गंभीर आरोप प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी केला आहे.

16/10/2015
t.co

मुंबईत रेस्टॉरंटमध्ये सिलेंडर स्फोट, ८ ठार http://t.co/Dj3ZkL8kaY via

कुर्ला येथील होली क्रॉस हॉस्पिटल जवळच्या सिटी किनारा रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

16/10/2015
t.co

'सुधारित' मॅगी बाजारात परत येतेय! http://t.co/PAGvACnGsB via

'दोन मिनिटांचा ब्रेकफास्ट' म्हणून घराघरांत आणि मनामनांत स्थान मिळवलेली, पण काही महिन्यांपूर्वी 'हानिकारक' ठरल्यानं हद्दपार झालेली 'मॅगी' पुन्हा बाजारात येण्यासाठी सज्ज झाली आहे.

16/10/2015
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच - Maharashtra Times

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच http://t.co/flvdnrP4Br via

हायकोर्टाने शुक्रवारी राज्य सरकार व शिवसेनेचा अर्ज सशर्त मंजूर करत शिवसेनेला गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी सुवर्ण महोत्सवी दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यास परवानगी दिली.

16/10/2015
राज्यात दुष्काळ जाहीर, उपाययोजना राबवण्याचे निर्देश - Maharashtra Times

राज्यात दुष्काळ जाहीर, उपाययोजना राबवण्याचे निर्देश http://t.co/flnYjYQQ9o via

सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने राज्यातील १४,७०८ गांवामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले असून दुष्काळ सदृष उपाययोजना ही जाहीर करण्यात आले आहे.

15/10/2015

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण ३१ ऑक्टोबरपासून सुरू : सुरेश प्रभू

15/10/2015
कुंभकर्णी झोपेमुळे 'त्याचं' कसोटी पदार्पण हुकलं! - Maharashtra Times

कुंभकर्णी झोपेमुळे 'त्याचं' कसोटी पदार्पण हुकलं! http://t.co/ez3UYABNli

मोबाइल न उचलल्यानं टीम इंडियाचा तेज गोलंदाज ईशांत शर्माची रणजी स्पर्धेत खेळण्याची संधी हुकल्याची घटना ताजी असतानाच, पाकिस्तानच्या एका उदयोन्मुख फिरकीपटूनं अतिझोपेमुळे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाची सुवर्णसंधी गमावल्याचा चमत्कारिक प्रकार घडला आहे.

15/10/2015
नेताजी फाइल्स उघड होणार! - Maharashtra Times

नेताजींच्या फायली ‘बोलू’ लागणार http://t.co/O9MilvNpHz

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधीच्या गोपनीय फाइल्स खुल्या करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारतर्फे पुढील वर्षी २३ जानेवारीपासून म्हणजेच नेताजींच्या जन्मदिनापासून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नेताजी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केली.

15/10/2015
दिघाप्रकरणी आता बिल्डर लक्ष्य - Maharashtra Times

दिघाप्रकरणी आता बिल्डर लक्ष्य http://t.co/cVpr8Wn18w

नवी मुंबईच्या दिघा परिसरातील बेकायदा इमारतींतील रहिवाशांना घरविक्री करताना बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आल्याचा एक प्रकार बुधवारी समोर आला.

15/10/2015
वाड्या वस्त्यांकडे वळली ‘वाट’ - Maharashtra Times

वाड्या वस्त्यांकडे वळली ‘वाट’ http://t.co/M10YGldxAy

स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही विकासाच्या ‘वाटा’ अद्याप अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्याचे सरकारने ठरवले आहे.

15/10/2015
हे सत्तेला लागलेले मुंगळे!: शरद पवार - Maharashtra Times

हे सत्तेला लागलेले मुंगळे!: शरद पवार http://t.co/FDmEduJn9e

‘गेले काही दिवस सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे नेते परस्परांवर आरोप प्रत्यारोपांची लाखोली वाहत असून हे दोन्ही पक्ष सत्तेला लागलेले मुंगळे आहेत. त्यामुळे गोडी आहे तोपर्यंत हे सरकार टिकणार आहे,’ असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

15/10/2015
शोभा डेंवर हक्कभंग कारवाई होणारच! - Maharashtra Times

शोभा डेंवर हक्कभंग कारवाई होणारच! http://t.co/feZzMxbo81

विधिमंडळ हे सार्वभौम सभागृह आहे. त्यामुळे कोर्टाने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करता कामा नये, असे स्पष्ट करतानाच वादग्रस्त लेखिका शोभा डे यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर सामोरे जावेच लागेल, असे मत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्त केले.

15/10/2015
जोडू पुस्तकांशी नाते! - Maharashtra Times

जोडू पुस्तकांशी नाते! http://t.co/pjYcV3QOvd

‘भारतरत्न’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आज, गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त मुंबईच्या अनेक शाळांमध्ये गुरुवारी ‘दप्तराविना वर्ग’ भरणार आहेत.

15/10/2015
युवा लेखकांना भावतेय ई-व्यासपीठ - Maharashtra Times

युवा लेखकांना भावतेय ई-व्यासपीठ http://t.co/IoRo5iHJ2l

कधी कधी नामवंत प्रकाशकही नवोदित लेखकांना संधी देऊ शकत नाहीत. अशा वेळी तरुण, नवोदित लेखकांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम ई-व्यासपीठामार्फत होत आहे.

Address

577, Times House, Second Floor, F. C. Road, Shivajinagar
Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Tuesday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Wednesday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Thursday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Friday 9am - 1pm
1:30pm - 6pm
Saturday 9am - 1pm
1:30pm - 6pm

Telephone

+912030112222

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Times Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra Times Pune:

Share

Nearby media companies