Rashtra Sanchar

Rashtra Sanchar राष्ट्रसंचार : सत्य , स्पष्ट आणि सखोल

पेपरविना दीन सूना!! पेपर वाचनाची आवड असणाऱ्या वाचक प्रेमींना एक दिवस जरी सुट्टी असली तरी उदास वाटत असते.  प्रजासत्ताक च्...
28/01/2025

पेपरविना दीन सूना!!
पेपर वाचनाची आवड असणाऱ्या वाचक प्रेमींना एक दिवस जरी सुट्टी असली तरी उदास वाटत असते. प्रजासत्ताक च्या सुट्टीमुळे सोमवारी पेपर वाचकांना पेपर वाचायला मिळाला नाही परंतु मंगळवारी पेपर वाचनाचा मनसोक्त आनंद घेताना एक वाचक. वाचनामुळे विचारांची जडण-घडण होते हाच संदेश राष्ट्र संचार चा एक वाचक देत आहे. हे दृश्य टिपले आहे ओमकार तरकसे, पिंपरी यांनी.




ओढ देशसेवेची आणि देश प्रेमाची...!देशसेवेची चळवळ ही मनामनातून रुजण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी घरातूनच ‘बाळकडू’ मिळाले तर...
26/01/2025

ओढ देशसेवेची आणि देश प्रेमाची...!

देशसेवेची चळवळ ही मनामनातून रुजण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी घरातूनच ‘बाळकडू’ मिळाले तर देशसेवेच्या या जिद्दीला आणखीनच बळकटी मिळत असते. देशप्रेमाची ओढ या बालकाला या बाल वयातही शांत बसू देत नसल्याने त्याने आपल्या पित्यासह संचलनाच्या माध्यमातून देशसेवेसाठी एक यशस्वी पाऊल टाकले आहे, त्याचे छायाचित्र टिपले आहे निखिल मोरे, (भारती विद्यापीठ) यांनी.
दैनिक राष्ट्र संचार कडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

25/01/2025

महाराष्ट्रातील पुणे येथे दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार 'गुइलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) ची एकूण 67 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यात 13 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत, या आजाराची व्याप्ती वाढतच असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

बाईट - डॉ.अविनाश भोंडवे

पेशव्यांचा राजवाडा...  'शनिवार वाडा' शनिवारवाडा म्हणजे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक. अशा शनिवारवाडयाची सुरक्षिततेला जास्...
25/01/2025

पेशव्यांचा राजवाडा... 'शनिवार वाडा'

शनिवारवाडा म्हणजे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक. अशा शनिवारवाडयाची सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन रचना करण्यात आली आहे. मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतिक असलेला शनिवारवाडा... पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाची साक्ष देणारा वाड्याचा प्रत्येक दगड आणि दरवाजा... दिल्ली दरवाजाची उंची आणि भव्यता... वाड्याच्या प्रत्येक पावलावर असणारा इतिहास आणि अशा इतिहासाचा साक्षीदार बनून शनिवारवाड्याने अनुभवलेल्या पराक्रमाच्या गाथा सांगणारा शनिवारवाड्याचा २९३ वा वर्धापनदिन थाटात साजरा करण्यात आला.
राष्ट्र संचार वाचक हार्दिक सुतार, रा. चिखली, ह्यांनी टिपलेले दिल्ली दरवाज्याचे भव्य छायाचित्र.

24/01/2025

वेगवान विकासाची नवी पहाट!!
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे मेट्रोचे स्वप्न २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरले. भल्या पहाटे पुणेकर मेट्रो स्टेशनवर जाण्यासाठी हजर होऊ लागला. सकाळी साडेसहाच्या कोवळ्या उन्हात विकासाची पहाट उजाडण्याचा फील देणाऱ्या नळ टॉप मेट्रो स्टेशनचे छायाचित्र मांजरी पुणे येथील सुरज बगावडे यांनी टिपले आहे.

| Pune Metro Rail Project

राष्ट्रसंचार : सत्य , स्पष्ट आणि सखोल

"कातरवेळ"   संध्याकाळ म्हणजे लगेच डोळ्यासमोर येते ती देवासमोर लावलेली मंद तेवत राहणारी आणि अंधाराचं उजेडात परिवर्तन करणा...
23/01/2025

"कातरवेळ"
संध्याकाळ म्हणजे लगेच डोळ्यासमोर येते ती देवासमोर लावलेली मंद तेवत राहणारी आणि अंधाराचं उजेडात परिवर्तन करणारी सांजवात. जेव्हा आपलं मन सैरभैर होतं तेव्हा ही सांजवात आपल्याला सहाय्य करते. संध्याकाळच्या मावळत्या सूर्याची पण मला कधी कधी मजा वाटते. तो पश्चिमेकडे रेंगाळत रेंगाळत मावळत असतो. त्याचा मोहक रंग, त्याचं दिवसभर असणारं आणि नंतर कमी-कमी होत राहणारं मोहक रूप, आपापल्या घरट्याची आस असणारे आणि त्यासाठी जीवाचं रान करणारे पक्षी काय किंवा माणसं काय, सगळं कसं अगदी आखून दिलेलं रोजचंच तरी रोजची घरी परतण्याची आस वेगळी. ओढ तीच पण मजा वेगळी. असे काहीसे व्यक्त करणारे पुण्यातील वेदांत मुलांगे यांनी टिपलेले छायचित्र.

22/01/2025

पुण्यात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची?

आपण म्हणतो सोशल मीडियाच्या जमान्यात मुलं मोबाईलच्या विश्वात रमली आहेत. पण आज देखील आपण कुटुंबाचे एक घटक असून आपण देखील क...
22/01/2025

आपण म्हणतो सोशल मीडियाच्या जमान्यात मुलं मोबाईलच्या विश्वात रमली आहेत. पण आज देखील आपण कुटुंबाचे एक घटक असून आपण देखील कामाच्या भार थोडा सांभाळावा असा संदेश या भाऊ आणि बहिणीने दिला आहे.
दैनिक राष्ट्र संचार चे कर्वेनगर भागातले वाचक शशांक मून यांनी छायाचित्रातून टिपलेले भावा बहिणीचे एकजुटीचे नाते.

21/01/2025

पुण्यातील बिबवेवाडी भागात बार मधील कर्मचाऱ्यांकडून २ तरुणांना बेदम मारहाण.

काठी, दांडके, बांबू ने केली जबर मारहाण...

पुण्यातील बिबवेवाडी मधील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर. बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बार मध्ये तीन तरुण गेले होते, दारूच्या नशेत ते गोंधळ घालत होते. याचा राग आल्याने बार मधील कर्मचाऱ्यांनी या तरुणांना बेदम मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री १२ वाजता हा सगळा प्रकार घडला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बार मध्ये तीन तरुण दारू पिण्यासाठी गेले होते. दरम्यान, दारूच्या नशेत असल्याने त्यांनी बार मध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली.

बार चे नुकसान होईल यासाठी बार मधील कर्मचाऱ्यांनी त्या तरुणांना तिथून बाहेर काढले आणि मारहाण केली. मारहाण करताना त्यांनी लाठी, काठ्या, दांडके तसेच धारधार शास्त्राचा वापर सुद्धा केला.

या मारहाणीत २ तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कुणी भाजी घेता का भाजी!! शिक्षणाचे महामेरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या आणि शहराच्या मध्यवस्त...
21/01/2025

कुणी भाजी घेता का भाजी!!
शिक्षणाचे महामेरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या आणि शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या ‘महात्मा फुले मंडई’ ला एकेकाळी चांगलाच ‘भाव’ होता... याठिकाणी ग्राहकांची सकाळपासून रात्री उशीरापर्यंत चांगलीच वर्दळ होती. मात्र; शहराच्या बदलत्या शैलीनुसार त्या-त्या भागात भाजी मंडया तयार झाल्या आहेत. त्याचा परिणाम या मंडईवर झाला असून कोट्यावधी रुपये खर्चून करुन घेतलेल्या गाळयात ग्राहकाची वाट पाहाण्याची वेळ येथील विक्रेत्यांवर आली आहे.
त्याचे बोलके छायाचित्र टिपले आहे दैनिक राष्ट्र संचारचे वाचक रितेश काळे (वाघोली) यांनी.

20/01/2025

जाती-धर्मावर विखुरलेला माणूस साहित्य संमेलनामुळे जोडला जाईल: सुशीलकुमार शिंदे
सरहद, पुणे तर्फे ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ हे पुस्तक सखोल चिंतन करून लिहिलेले आहे, असे जाणवते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या वैचारिक भूमिकेतून 1954 साली दिल्लीत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाराष्ट्रासह देशात जाती-धर्मावर माणूस विखुरला गेला आहे, अशा परिस्थितीत दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाद्वारे माणूस माणसाला जोडला जाईल अशी आशा वाटते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सरहद, पुणे तर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 70 वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनातील भाषणांचे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, डॉ. शैलेश पगारिया मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला.

20/01/2025

'महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते रद्द करता कामा नयेत, त्याचे पुनर्निरीक्षण करा'; पुणे पोलीस आयुक्तालय येथील बैठकीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना.

पुणे शहरात सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपविण्यात यावी या प्रस्तावाचा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करतो- महाराष्ट्र गृहराज्यमंत्री योगेश कदम

पुणे दि. १७ : पुणे शहरांमध्ये नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत जे गुन्हे घडलेले आहेत त्याबाबत आज पुणे पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या कारवाईबाबत सादरीकरण केले. यावेळी घडलेल्या घटनांवर गांभीर्याने लक्ष देत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचना देत उपायोजना करण्याबाबत सांगितले आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. तसेच, पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "आज या बैठकीत मी चार-पाच प्रश्न समोर मांडले आणि त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे पुण्यातल्या वाहतूक कोंडी संदर्भातला आहे. यामध्ये सिग्नलची व्यवस्था, पुणे शहरांमध्ये स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपवण्यात यावी हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे, बऱ्याच वर्षापासून हा प्रयत्न चाललेला आहे. तर तो प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडे मी पाठपुरावा करतो असं गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी सांगितले. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन दंड सहितेनुसार, महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते B Summery केले जातात म्हणजे ते रद्द केले जातात परंतु, दंड संहितेत म्हटलेले आहे की असे कुठलेही गुन्हे रद्द करता कामा नयेत, तर त्याचे पुनर्निरीक्षण करा, अशा मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत.

Neelam Gorhe


राष्ट्र संचार आयोजित आणि राज मसाले प्रायोजित, वसुंधरा परिवार 'ती' चे हळदी कुंकू. मलबार गोल्ड आणि डायमंड व झोय नेल सलोन प...
19/01/2025

राष्ट्र संचार आयोजित आणि राज मसाले प्रायोजित, वसुंधरा परिवार 'ती' चे हळदी कुंकू.
मलबार गोल्ड आणि डायमंड व झोय नेल सलोन पुणे कडून बक्षिसे!!

Yogita Gosavi - Shivarkar | RAJ Masale | Malabar Gold and Diamonds | Zoe Nails Pune |

जिथे सांस्कृतिक वारसा, पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक विचार यांचा संगम होतो अशा पुण्याची शान असलेल्या मंडई मध्ये आपले छायाच...
17/01/2025

जिथे सांस्कृतिक वारसा, पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक विचार यांचा संगम होतो अशा पुण्याची शान असलेल्या मंडई मध्ये आपले छायाचित्र क्लिक करून साताऱ्याच्या अजिंक्य माने यांनी राष्ट्र संचार च्या फोटो ऑफ द डे च्या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

शहरातील वाढत्या कॅब आणि त्यात आता भर पडली ती म्हणजे पुणे मेट्रो... यामुळे रिक्षावाल्यांच्या व्यवसायाला चांगला फटका बसला ...
16/01/2025

शहरातील वाढत्या कॅब आणि त्यात आता भर पडली ती म्हणजे पुणे मेट्रो... यामुळे रिक्षावाल्यांच्या व्यवसायाला चांगला फटका बसला आहे. आपल्या दैनंदिन रोजी-रोटीसाठी रिक्षावाला प्रवाशांची वाट पाहतानाचे छायाचित्र स्वारगेट रहिवाशी, जिनेंद्र जैन ह्यांनी टिपले आहे.

दैनिक राष्ट्र संचार हा या 'पावनखिंड रन' उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे. अनेक वर्षापासून राष्ट्रसंचार सहभागाने ही स्पर्धा प्र...
16/01/2025

दैनिक राष्ट्र संचार हा या 'पावनखिंड रन' उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे. अनेक वर्षापासून राष्ट्रसंचार सहभागाने ही स्पर्धा प्रायोजित होते. याचा आम्हा वृत्तपत्रसमूहाला देखील यथोचित अभिमान आहे. मॅरेथॉन ऐवजी पावनखिंड हा शब्द प्रयोग वापरण्याच्या मोहिमेमध्ये आपण सर्व सहभागी होऊयात!



https://rashtrasanchar.com/madha-docters-associaton-pawankhind-run-marathon-2025-61983/

इतिहासाची ओळख रुजविण्याचा अफलातून प्रयोग अनिरुद्ध बडवे,संपादक , राष्ट्रसंचार मॅरेथॉन या पठारावरून फेडापेद्दीस ...

15/01/2025

बांगलादेशींनो... सावधान | बांगलादेशी हटाव मोहीम

बांगलादेशी हटाव मोहीम पतित पावन संघटना, क्रांतिवीर सेना यांच्यासह सकल हिंदू समाज यांच्या संयुक्ताने गेली कित्येक वर्ष पुण्यात वास्तव्य असलेला बांगलादेशी यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले त्यावेळी त्याच्याकडे बनावट कागदपत्रांचा संच मिळाला यावेळी संजय शेळके, मनोज आप्पा क्षीरसागर, स्वप्निल नाईक, राजाभाऊ देडे, अक्षय डावरे, सोनू भाऊ चव्हाण, सविताताई खवळे, मीनाताई ऊमापे, रूपालीताई सुभेदार, अश्विनीताई जाधव, दिनेश वाघमारे, अमन मोरे, विकी मोहिते, लखन मिसाळ, विकास कांबळे, सोनू बारवकर, आदित्य मोरे, विनायक देसाई, महेंद्र चव्हाण, अनिकेत मिसाळ, शुभम भालगरे, अजय गायकवाड यांच्या सह सर्व हिंदू बांधव उपस्थित होते.

संक्रांतीला सोलापूरला सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते. तिथे नंदित्वज मिरवत अक्षता सोहळा साजरा होतो. बहुसंख्य लिंगायत वाणी ...
15/01/2025

संक्रांतीला सोलापूरला सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते. तिथे नंदित्वज मिरवत अक्षता सोहळा साजरा होतो. बहुसंख्य लिंगायत वाणी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या या महोत्सवात विभूती लावलेली असलेले अनेक भाविक भक्त दिसतात.
अशाच एका महिला भविकेचे छायाचित्र पुण्यातील धनकवडी भागातील आनंद धांडे यांनी टिपले आहे.


Address

Nal Stop, Erandwane
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtra Sanchar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rashtra Sanchar:

Videos

Share