16/09/2023
जम्मू कश्मीरच्या अनंतनाग मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान सरकारचा तसेच या कटात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून आम आदमी पक्षातर्फे मराठा वॉर मेमोरियल ईस्ट स्ट्रीट कॅम्प या ठिकाणी जाहीर निषेध केला गेला. यावेळी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी भारतीय सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच गेल्या 75 वर्षात भारताने प्रगती केली तर दुसरीकडे पाकिस्तानने कश्मीरच्या नावाखाली केवळ भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रकार केला आहे या गोष्टींवर आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, आजपर्यंत आपल्या अनेक जवानांनी वेळोवेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वीरमरण पत्करले आहे आणि त्याचा सूड घेण्याची हिंमत भाजपा सरकारने दाखवावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केली.याप्रसंगी आम आदमी पक्षा तर्फे सुदर्शन जगदाळे, अमित म्हस्के,धनंजय बेनकर, अक्षय शिंदे, एकनाथ ढोले, सतीश यादव, ॲड. अमोल काळे, सचिन कोतवाल, रवि लाटे , महेश सूर्यवंशी, फॅबियन आणा, बालाजी कंठेकर,मनोज शेट्टी, सुनीता काळे, मुकुंद किर्दात, अभिजीत मोरे,तशेच आम आदमी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.