Majha Vidarbha News

Majha Vidarbha News My Maharashtra News is a digital news channel forum that discusses important events in Maharashtra and the voice of the general public.

तिसऱ्या टप्यातील कमी मतदान  कोण उमेदावार मारणार ११ जागे वर बाजी.
07/05/2024

तिसऱ्या टप्यातील कमी मतदान कोण उमेदावार मारणार ११ जागे वर बाजी.

Loksabha Election 2024 : 3rd Phase Polling Maharashtra ११ जागांवर कोण जिकणारI बारामती कोणाची देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैक....

तिसऱ्या टप्यातील लोकसभेच्या जागा भाजप आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेच्या. यावरच ठरणार महाराष्ट्रातील किंग कोण.
29/04/2024

तिसऱ्या टप्यातील लोकसभेच्या जागा भाजप आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेच्या. यावरच ठरणार महाराष्ट्रातील किंग कोण.

Lok sabha poll. तिसऱ्या टप्यातील जागा भाजप आणि महायुती साठी कठीण पडावं. या जागा सगळ्याना निर्णायक..महाराष्ट्रातील 48 पैकी 11 ज...

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा..
27/04/2024

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा..

#सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्व विदर्भातील 95 लाख पात्र मतदारां....

विदर्भका 700 साल पुराना शिवलिंग
27/04/2024

विदर्भका 700 साल पुराना शिवलिंग

देश में शिव के लाखो पुरातन मंदिर है , आज से तक़रीबन ७०० साल पहले ,महाराष्ट्र के वर्धा जिले के पोहोना गांव में ऐसा ही एक...

विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात
26/04/2024

विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात

यवतमाळ, वाशिम, वर्धा....लोकसभा महायुतीसाठी कठीण
25/04/2024

यवतमाळ, वाशिम, वर्धा....लोकसभा महायुतीसाठी कठीण

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ कोणाची शिवसेना जिंकणार
25/04/2024

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ कोणाची शिवसेना जिंकणार

Maharashtra Lok Sabha Elections 2024: Amravati, Wardha, Nanded - Voting for 8 seats in Phase 2

बच्चू कडू आणि राणा यांच्यामध्ये आरपारची लढाई!! बच्चू कडू यांचा राणांवर प्रहार!!
24/04/2024

बच्चू कडू आणि राणा यांच्यामध्ये आरपारची लढाई!!
बच्चू कडू यांचा राणांवर प्रहार!!

अमरावतीत प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) विरुद्ध रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद पेटला आहे. बच्चू कडू विनाकारण नौटंकी क.....

नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवळ
24/04/2024

नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवळ

Union minister and BJP leader Nitin Gadkari on Wednesday afternoon fainted during an election rally in Maharashtra's Yavatmal district. In a video doing roun...

भाजप साठी धोक्याची घंटा!! यवतमाळ, बुलढाणा, वर्धा अमरावती, वाशीम
24/04/2024

भाजप साठी धोक्याची घंटा!! यवतमाळ, बुलढाणा, वर्धा अमरावती, वाशीम

लोकसभा निवडणूक 2024 फेज 2: 26 एप्रिल रोजी 13 राज्यांमध्ये मतदान; मतदारसंघ आणि उमेदवार - तुम्हाला सर्व माहित असणे आवश्यक आ....

जागांच राजकारण, कुणाला किती जागा??लोकसभा निवडणूक 2024भाजपला सत्ता स्थापन  करायची असेल त्याचा गेटवे आहे महाराष्ट्र कारण म...
23/04/2024

जागांच राजकारण, कुणाला किती जागा??

लोकसभा निवडणूक 2024
भाजपला सत्ता स्थापन करायची असेल त्याचा गेटवे आहे महाराष्ट्र कारण महाराष्ट्रात 48 जागा आहे आणि मागच्या वेळेला 42 जागा भाजप युतीला मिळाल्या होत्या मुंबई ठाणे या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष तयार आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांना आपल्याकडे करण्याचा प्रयत्न केलेला पहिला टप्प्याचे मतदान कमी झालं परंतु दुसरा आणि तिसरा टप्प्यात मतदान जास्त व्हावं यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत दुसरीकडे शरद पवार यांनी चांगली बांधली आहे कारण महाराष्ट्रात 48 जागा आहे आणि मागच्या वेळेला 42 जागा भाजप युतीला मिळाल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रात कमीत कमी 35 जागाच टार्गेट भाजप ठेवला आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता विरोधकांनी ज्या पद्धतीने भाजपला टार्गेट केला आहे तो आकडा साधारणता 26 च्या पुढे दिसत नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि भाजपच्या संपूर्ण टीमला प्रचंड मेहनत करावी लागत आहे आणि मुंबईत तर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे

लोकसभा निवडणूक 2024, सत्ता स्थापन करायची असेल त्याचा गेटवे आहे महाराष्ट्र कारण महाराष्ट्रात 48 जागा आहे आणि मागच्या .....

लोकसभा निवडणूक 2024 मतदारांना आपल्या बाजूनी वळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मतदार कुठल्याच बाजूने वळताना दिसत नाही कारण ...
22/04/2024

लोकसभा निवडणूक 2024
मतदारांना आपल्या बाजूनी वळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मतदार कुठल्याच बाजूने वळताना दिसत नाही कारण पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं संपूर्ण देशामध्ये त्या देशाचा जर आपण विचार केला तर साधारणतः उत्तर प्रदेश राजस्थान बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड या एकूण 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं आपण या पूर्ण राज्यांचा विचार केला तर लोकांनी जवळपास 75 लाख लोकांनी हा आकडा जरी 4.6% असला पूर्ण देशातल्या 102 मतदारसंघाचा याचा अर्थ किती महत्त्वाचा आहे की रोलिंग पार्टीची आहे भाजप गेल्या दहा वर्षापासून सत्तेत आहे ग्राउंड वर जाऊन विचार केला तर तेव्हा अन्न वस्त्र निवारा या तीनच मूलभूत समस्या गेल्या 70,75 वर्षापासून प्रत्येक इलेक्शन मध्ये आहे आणि दरवेळेला काँग्रेस अन्न वस्त्र निवारा देण्याच्या गप्पा करतात नरेंद्र मोदी यांच्या भाषणात तोच तोच तुम्ही आता लोकांना कंटाळवाणा झालेला आहे आणि त्यामुळे खरंतर कुठल्याच पक्षाकडे विशेष मुद्दे नाहीये आणि जीडीपी असो चंद्रयान असो विदेशी संबंध असो काश्मीर ते 370 असो राम जन्मभूमी असो हे रोजच्या जीवनाशी संबंधित प्रश्न नाहीये परंतु गडचिरोलीच्या, वर्धेच्या अमरावतीच्या लोकांना मेळघाटच्या लोकांना नाहीये तो अतिशय धक्कादायक आहे याचं कारण आहे की याच आकड्यावर भाजपची जी आहे हृदयाची गती वाढलेली आहे आता आपण दुसऱ्या आकड्यावर विचार करूया सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 102 जागी जिथे मतदान झालं मध्ये साधारणता एन डी ए चे उमेदवार किंवा एनडीए भाजपचे जिथे खासदार आहे त्या भागामध्ये साधारणता सहा टक्के लोकांनी मतदान केलेलं नाही म्हणजे त्यांना काँग्रेसला मतदान करायचं नव्हतं पण भाजप नाही करायचं नव्हतं म्हणून त्यांनी मतदान केलेलं नाही आहे दुसरीकडे काँग्रेस म्हणजे इंडिया आघाडीचा जर विचार केला तर इंडिया आघाडीचे जे खासदार होते त्यापैकी तीन पूर्णांक दोन टक्के लोकांनी मतदान केलं नाही त्यांना काँग्रेस करायचं नव्हतं आणि भाजपचा विषय नव्हता त्याच्यामुळे हाच वापरा आहे साधारणतः 4.6% चा हा बदल आहे 4.6 म्हणजे 78 लाख 78 लाख मतदान केलं आपण ह्या महाराष्ट्र पुढचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या पाच लोकसभेमध्ये मतदान झालं होतं त्यामध्ये आपण पाहिलं चंद्रपूर नागपूर गडचिरोली चिमूर रामटेक आणि भंडारा गोंदिया याच्यामध्ये डिसेर्डिंग फॅक्टर आहे दलित आणि मुस्लिम मतदार 24 लाख मुळे आता मतदान आणि बरेच कायदे पण पारित झाले असतील सरकार कायदा असून ट्रिपल सलाक असो किंवा संविधान बदलण्या संदर्भात चर्चा मोठ्या प्रमाणात दलित समुदायांमध्ये होती. आपण पाहिलं तर साधारणतः दलितांची संख्या चंद्रपूरमध्ये 24% म्हणजे बौद्ध 24% 14.5% आणि एसटी जे आहे आदिवासी ते 17 टक्के आहे आणि हाच जो मतदार आहे याच्यावरच काँग्रेसचा गोळा गेल्या अनेक वर्षापासून होता नागपूर मध्ये जर आपण विचार केला तर साधारणतः मुस्लिम 9% आहे बौद्ध आहे 14.5% आहे 18% आहे आणि एसटी 9.5% आहे हे जे वोटर आहे हे भाजपला फार जवळ न करणारे वोटर आहे आणि त्यामुळे आपण ही सगळी परिस्थिती पाहतो आहे कारण हा जो तबका आहे मतदान करणारा हा मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आणि भाजपचा तथाकथित जो ओबीसी वर्ग किंवा सर्वसामान्य गटातले जे लोक येतात किंवा नरेंद्र मोदींवर प्रेम करणारे किंवा नितीन गडकरींवर प्रेम करणे लोक होते जे की कुठल्या समाजाचे जोपर्यंत यांना मतदान करतात ते लोक बाहेर पडले नाही भाजपचे नेते काही सांगत असतील की नाही हे जे पडलेले मतदान हे आम्हालाच मिळणार आहे परंतु हे पडलेले मतदान जर भाजपच्या बाजूने किंवा सरकारच्या बाजूने असतं तर भाजपला घाम सुटला नसता आता पुढच्या निवडणुकांमध्ये विदर्भातल्या अनेक पश्चिम विदर्भातल्या बऱ्याच लोकसभेमध्ये मतदान होणार आहे मुख्यमंत्री असो अजित पवार असो देवेंद्र फडणवीस असो अमित शहा असून नरेंद्र मोदी असो यांनी महाराष्ट्रातल्या 48 जागावर आपलं लक्ष केंद्रित केला आहे कारण दक्षिण भारतामध्ये फार मला चमत्कारिक बदल होईल असं अजिबात वाटत नाही मध्य प्रदेश सेंट्रल जे प्रवीण साहेब मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड इथे जास्तीत जास्त जागा भाजपला मिळवण्याची शक्यता आहे 48 जागा महाराष्ट्रात असताना 40 42 जागा एक वेळी भाजपला मिळाल्या होत्या त्या आता 25 26 वर दिसत नाही आता जे मतदान झालं त्याच्यामध्ये तर अनेक चर्चा अशी आहे की भाजपला पाच पैकी एकही जागा मिळू शकत नाही अशी शक्यता आहे भाजपच्या विरोधात मतदान गेलेला आहे आणि ही शक्यता नाकारता येत नाही कारण की मतदारांनी मतदान कोणाला पाहून केलं किंवा ते घरी राहिले तर का राहिले कोणाचा राग होता दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी पंतप्रधानांपासून प्रचारात उतरल्या सगळ्यांनी सांगितलं की मतदान करा परंतु जनता नेमकी कशावर नाराज आहे हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या बातम्या बघण्यासाठी सबस्क्राईब

लोकसभा निवडणूक 2024 मतदारांना आपल्या बाजूनी वळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मतदार कुठल्याच बाजूने वळताना दिसत नाह....

चंद्रपूर महाकाली चैत्र यात्रा
22/04/2024

चंद्रपूर महाकाली चैत्र यात्रा

श्री महाकाली मातेच्या मंदिराचे रचना कशी आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत श्री महाकाली मातेचे मंदिर चौरस ....

mahrashtrapolitics                   राजकीय पक्षांचे समीकरण बिघडले, कमी मतदानाचा ट्रेंड काय सांगतो? भाजप च्या पोटात गोळा...
21/04/2024

mahrashtrapolitics राजकीय पक्षांचे समीकरण बिघडले, कमी मतदानाचा ट्रेंड काय सांगतो? भाजप च्या पोटात गोळा

लोकसभेच्या 102 जागांवर शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर कमी मतदान झाल्याची जोरदार चर्चा आहे. तज्ज्ञांच्या मते या मतदानातून कोणताही ठोस कल काढणे कठीण आहे. तसेच यावरून एकूण मतदानाचा कल मोजणे योग्य नाही. मात्र, पहिल्या टप्प्यात तुलनेने कमी मतदान झाल्याने सर्वच पक्षांचे गणित बिघडले आहे. कमी मतदानामुळे कोणाचा फायदा होणार किंवा कोणाचे नुकसान होणार, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या मतदानात सुमारे 63% मते पडली होती तर 2019 च्या #सार्वत्रिक निवडणुकीत त्याच जागांवर एकूण मतदान 66.44% होते.

पहिल्या फेरीत कमी मतदान झाल्यानंतर सर्वच पक्ष आपापल्या बूथ व्यवस्थापनात व्यस्त झाले. जाणकारांच्या मते, निकराच्या लढतीत जे राजकीय पक्ष आपल्या मतदारांना बूथवर पाठवण्यात यशस्वी होतील, त्यांना अधिक फायदा होईल. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शहरी भागात मतदान कमी झाले आहे. विशेषतः तामिळनाडूच्या शहरांमध्ये. भाजपचे म्हणणे आहे की त्यांचे मतदार मोठ्या उत्साहाने मतदान करत आहेत. विरोधी पक्षांचाही असाच दावा आहे. या दाव्यांमध्येही चिंता आहेत. सर्वसाधारणपणे, जास्त मतदानामुळे बदलासाठी रॅली होत असल्याचा संदेश जातो, तर हा समजही मोडीत निघाला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही पहिल्या दोन टप्प्यात मतदान कमी होण्याचा ट्रेंड होता पण नंतर उर्वरित टप्प्यांमध्ये तो वाढला.

कमी फरकाच्या जागांवर परिणाम होईल 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या अशा सुमारे 75 जागा होत्या जिथे निकराची लढत होती. या सर्व जागांवर विजय-पराजयामधील फरक 20 हजारांपेक्षा कमी होता. कमी मतदानाचा अशा जागांवर मोठा परिणाम होईल आणि निकाल दोन्ही दिशेला झुकू शकतो. मतदारांना बूथपर्यंत आणण्यासाठी कोणत्या पक्षाने जास्त मेहनत घेतली हे निकालावरून ठरेल. त्यामुळेच शनिवारी मतदानानंतर सर्वच पक्षांनी रणनीतीची बैठक घेऊन ग्राऊंड फीडबॅक घेतला. हवामान खात्यानुसार येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार आहे. यामुळे चिंता आणखी वाढणार आहे.

अशी परिस्थिती पहिल्या टप्प्यात आहे

फक्त छत्तीसगडमध्ये पूर्वीपेक्षा जास्त मतदान झाले. - उत्तर प्रदेशात सुमारे 7% मतदान घटले बिहार आणि मध्य प्रदेशातही 2019 च्या तुलनेत मतदान 6% कमी झाले आहे.

- पश्चिम बंगालमध्ये 4% मते कमी झाली

राजकीय पक्षांचे समीकरण बिघडले, कमी मतदानाचा ट्रेंड काय ...

लोकसभा निवडणूक 2024 काँग्रेसने आपल्या कार्यकाळात बऱ्याचशा चांगल्या गोष्टी केल्या पण त्या जाहिरातीद्वारे लोकांपर्यंत पोहो...
21/04/2024

लोकसभा निवडणूक 2024
काँग्रेसने आपल्या कार्यकाळात बऱ्याचशा चांगल्या गोष्टी केल्या पण त्या जाहिरातीद्वारे लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत
परंतु मोदी यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जाहिरातींचा भडीमार झाला...
असा घनाघाती आरोप सुषमा अंधारे यांनी लातूर येथेजाहीर सभेत बोलताना केला...

सध्याचे राज्यातील सरकार हे देणारे सरकार असेल तर सात दिवसांपासून जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू का करत नाही? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. महिलांना अर्ध्या तिकीटाची सवलत देण्यापेक्षा अकराशे रुपयांचा गॅस सिलेंडर चारशे रुपयांत द्या, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.निलंगा येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी पंचायत समिती येथे सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देत भेट दिली. (Latur) उपस्थित कर्माचाऱ्यांशी संवाद देखील साधला. सध्याचे सरकार केवळ विविध विषयामध्ये अभ्यास करण्यात मग्न आहे. (Shivsena) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एखाद्या प्रकरणाचा किती अभ्यास करता हे समजत नाही. जर परिक्षेलाच बसला नाहीत, तर मग अभ्यास कशाला करता, असा टोला देखील अंधारे यांनी यावेळी लगावला.

राज्यातील खासदार व आमदार या लोकप्रतिनीधींनी काय जगावेगळं काम केलंय, त्यांना लाखोच्या घरात पेन्शन आहे. ते स्वतः पेन्शन घेतात मग आम्हाला का देत नाहीत? पेन्शनमुळे असा कोणता अतिरिक्त भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे हे तरी कळू द्या. तो आम्ही सोडवू असे सांगून कोणत्याही निधीबाबत किती खर्च झाला तो कसा वापरला याचे परिक्षण कॅग करत असते, असा चिमटा त्यांनी काढला.

लोकसभा निवडणूक 2024 काँग्रेसने आपल्या कार्यकाळात बऱ्याचशा चांगल्या गोष्टी केल्या पण त्या जाहिरातीद्वारे लोकांपर....

गॅरंटी कशाला कुणाला? उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य असणाऱ्या  मोदींची गॅरंटी कशाची  असे अनेक प्रश्न जनसामान्यांमधून येत आहेत वि...
21/04/2024

गॅरंटी कशाला कुणाला?

उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य असणाऱ्या मोदींची गॅरंटी कशाची
असे अनेक प्रश्न जनसामान्यांमधून येत आहेत विदर्भातील बऱ्याचशा भागात नव्हे तर देशामध्ये.. अजूनही पाणी प्रश्न भेडसावत आहेत... जागतिक पातळीवर मोठ-मोठे प्रश्न सोडवणारे मोदी... घरातील प्रश्न कितपत लवकरात लवकर सोडवतील याकडे जनसामान्याचे लक्ष लागलेले असतानाच दहा वर्ष बघता बघता गेले... पाणी प्रश्न बेरोजगारी आणि दैनंदिन जीवनात जीवनात लागणाऱ्या गोष्टी... कितपत हाताशी येतील हाही प्रश्नच आहे... ब्युरो रिपोर्ट माझा विदर्भ

Loksabha poll. कमी मतदानाचा फटका भाजपला बसणार का ? पाच पैकी किती जागी भाजप संकटातसार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्या...
20/04/2024

Loksabha poll.
कमी मतदानाचा फटका भाजपला बसणार का ?
पाच पैकी किती जागी भाजप संकटात

सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्व विदर्भातील 95 लाख पात्र मतदारांपैकी जवळपास 60.,22 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एकूण 97 उमेदवार नागपूर, रामटेक (SC), भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर (ST) मतदारसंघात रिंगणात आहेत, हे सर्व राज्याच्या पूर्वेकडील भागात आहेत.

महाराष्ट्र मुख्य निवडणूक कार्यालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गडचिरोली-चिमूर मतदारसंघात ६७.१७ टक्के मतदान झाले, जे पाचही मतदारसंघांमध्ये सर्वाधिक आहे. नागपुरात सर्वात कमी 53.71 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंद्रपूरमध्ये 60.03 टक्के, रामटेकमध्ये 58.50 टक्के आणि भंडारा-गोंदियामध्ये 64.08 टक्के मतदान झाले.

सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्व विदर्भातील 95 लाख पात्र मतदारां.....

16/04/2024

केद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची सेल्फी मुलाखत

भावना गवळी यांची देवेंद्र फडणवीस यांना भेट लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीच्या वारे सर्व सर्व दूर वाहत असतानाच सर्व पक्षांच...
02/04/2024

भावना गवळी यांची देवेंद्र फडणवीस यांना भेट

लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीच्या वारे सर्व सर्व दूर वाहत असतानाच सर्व पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार युद्ध पातळीवर सुरू झालेला आहे पण अद्यापही यवतमाळ वाशिम येथे महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना एकनाथ शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अजूनही येथे उमेदवारी निश्चित झालेली नाही याच पार्श्वभूमीवर भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या या भेटीने भावना गवळी यांना उमेदवारी मिळेल का असा प्रश्न आहे माझा विदर्भ नागपूर

लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीच्या वारे सर्व सर्व दूर वाहत असतानाच सर्व पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार युद्ध पातळीव.....

अबकी बार 400 पार..??अब की बार चारसौ पार असा नारा देत भाजप ने प्रचाराला सुरूवात केली.  जोरदार प्रचार यंत्रणा. लाखोंची गर्...
01/04/2024

अबकी बार 400 पार..??

अब की बार चारसौ पार असा नारा देत भाजप ने प्रचाराला सुरूवात केली.
जोरदार प्रचार यंत्रणा. लाखोंची गर्दी आणि सोशल मिडीयाचा भरपुर वापर.
यात मोदींच्या लाखोच्या सभा देश बघत आहे.
पण १० वर्षाच्या मोदींच्या राज्यात सामान्य माणूस खरोखर खुश आहे का ?
१० वर्षा नंतर परत एकदा मोदींना लोक पसंती देतील का ?
मोदी सोडून कोणीच अन्य नेता भाजप कडे नाही का ?
गरीब माणूस अधिक गरीब आणी श्रीमंत अधिक श्रीमंत झाला आहे का ?
असे सामान्यांना पडणारे प्रश्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाखोच्या सभा बघून सर्वाना वाटेल की अबकी बार ४०० पास खरंच शक्य आहे. पण दुसरी कडे देशातील विविध संस्थांनी केलेले सर्वे मात्र वेगळे आकडै सांगत आहे
आणि त्यामुळेच भाजप चिंतेत आहे.
देशातील अन्य जागे चे सोडा पण उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीचे ४५ जागांचे गणित बिघडते की काय अशी शक्यता आहे.
म्हणूनत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सुरूवातच महाराश्ट्ातील यवतमाळ मघून केली.
शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या सह अशोक चव्हाण याना सोबत घेऊन ही भाजपला ४५ आकंडा गाठणे कठिण झाले आहे. एकतर स्थानिक खासदारांची असलेली ॲन्डी इकबसी आणि. कुरघोडीचे राजकारण यामुळे भाजप सह महायुतीतीलल सर्वत पक्षाला फटका बसणार आहे. विदर्भातील. चंद्पूर. अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ अकोला जागा डेंजर झोन मध्से आहे. तिकडे अनेक जागांवर महायुतीते एकमत होत नाही आहे
दुसरी कडे महाविकास आघाडी मध्ये ही कुरबुर आहेच. तिकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपली वेगळी चुल मांडल्याचा फायदा भाजप ला होऊ शकतो असे बोलले जात आहे.
जस जशी निवडणुक जवळ येईल निवडणुकीचे वाचावरण तापले तसे अधिक चित्र स्पष्ट होईल.
ब्युरो रिपोर्ट माझा विदर्भ नागपूर.

loksabha election2024अब की बार चारसौ पार असा नारा देत भाजप ने प्रचाराला सुरूवात केली. जोरदार प्रचार यंत्रणा. लाखोंची गर्दी आणि स...

यवतमाळ वाशिम शिंदेंच्या "भावना कुणाच्या "यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याच...
01/04/2024

यवतमाळ वाशिम शिंदेंच्या "भावना कुणाच्या "

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याचे जाहीर झाले.

मात्र या मतदारसंघात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना (शिंदे गटा)च्या भावना गवळी खासदार आहेत त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार मुख्यमंत्री शिंदे हेच ठरवतील असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केल होत.
मात्र, विद्यमान खासदारांऐवजी विजयाची खात्री असलेला अन्य उमेदवार द्यावा, अशी भाजपची छुपी अट असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
भाजपच्या या अटीमुळे येथील उमेदवाराची घोषणा रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसघात मराठा-कुणबी तसेच बंजारा बहुल भाग अधिक आहे.

आदिवासी समाजाची मतेही निर्णायक आहेत.

त्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत जातीय समीकरणे प्रभावी ठरलेली आहेत.

या मतदार संघात यवतमाळ जिल्ह्यातील चार तर वाशीम जिल्ह्यातील दोन विधानसभा या सहा मतदार संघांचा समावेश आहे.
१९९९ पासूनच्या सलग पाच निवडणुकीत भावना गवळी या निवडून आल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर त्या शिंदे गटात गेल्या.
आता मात्र त्यांना उमेदवारीसाठी पाठपुरावा करावा लागत आहे

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील संजय देशमुख यांची प्रचाराला सुरुवात . झाली आहे
भावना गवळी यावेळीही इच्छुक आहेत मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटात ही जागा मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू आहे.

शिंदे गटाचेच मंत्री संजय राठोड हे भाजपकडून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या मतदारसंघात १४ तालुक्यांचा समावेश असून शहरापेक्षा ग्रामीणचा अधिक समावेश
हे मुद्दे प्रभावी ठरणारआहे

कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, महिलां रोजगार उद्योग अभाव.

सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव.

वर्धा-यवतमाळ-नांदेड, शंकुतला रेल्वेचा लांबलेला प्रवास

यवतमाळमधील अमृत पाणीपुरवठा योजना

महाविकास आघाडीतही उमेदवारीवर अद्याप एकमत झालेले दिसत नाही.

शिवसेना फुटण्यापूर्वी ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे होती. त्यामुळे या जागेवर शिवसेना ने दावा सांगितला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे

माजी मंत्री संजय देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या चार सभाही मतदारसंघात गेल्या आठवड्यात झाल्या.

मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही
माझा विदर्भ यवतमाळ वाशिम

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र या मतदारसंघ.....

बारामती कुणाचीदेवेंद्र फडणवीस यांनी पहाटे अजित पवारांना घेऊन शपथविधी उरकून घेतला पण तेच सरकार 72 तासाला पडलं आणि 80 व्या...
31/03/2024

बारामती कुणाची

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे अजित पवारांना घेऊन शपथविधी उरकून घेतला पण तेच सरकार 72 तासाला पडलं आणि 80 व्या तासाला ते पूर्णपणे खाली आलं.....
कारण त्या वेळेला अजित पवारांकडे मतदारांची संख्या तेवढी नव्हती....
याच मागील अनुभवातून भाजप शिकली....
21 जून 2022 शिवसेना फुटली ....
2 जुलै 2023 जेव्हा राष्ट्रवादी फुटली....
तेव्हा दोन्ही मूळ पक्ष भाजपने बळकावले आणि आमदार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आले...
केंद्रीय निवडणूक आयोगाने ही दोन्ही पक्ष दोन्ही नेत्यांना दिले दोन्ही प्रकरण सुप्रीम कोर्टात अजून प्रलंबित आहेत...
आणि मूळ पक्ष ज्यांचा होता ते शरद पवार तुतारी घेऊन तर उद्धव ठाकरे मशाल घेऊन लढत आहेत...
अखेर बारामती मधून कोण निवडून येणार????
नणंद भावजयांच्या सामन्यात कोण बाजी मारणार.??
एकीकडे शरद पवार लढतील का असंही काहीसं बारामतीत वातावरण होतं ....!
आजवर शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात एकूण 14 निवडणुकीला लढल्या...
त्यापैकी 7 बारामती मधून लढल्या आहेत आणि मागील निवडणुकांमधून सुप्रिया सुळे घड्याळ चिन्हावरून लढल्या
आता परिस्थिती अशी आहे की....
त्या घड्याळचिन्ह विरोधी तुतारी चिन्हासाठी लढत आहेत....
तसं पाहिलं तर 2019 मध्ये बारामती येथे भाजप विरुद्ध पवार कुटुंब अशी लढत झाली होती
आणि ती भाजपला प्रतिष्ठेची होती
त्यासाठी त्यांनी संपूर्ण यंत्रता कामी लावली होती
2019 मध्ये भाजपतर्फे कांचन कुल यांना सुप्रिया सुळे यांनी एक लाख मतांनी मात दिली होती
पण या वेळेला भाजपने तसं न करता अजित पवार राष्ट्रवादीला येथे उमेदवारी दिली एकूणच ही भाजपची खेळी आहे का???
असंही काहीसा बोलला जात आहे...
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या 2009 पासून प्रतिनिधित्व करत आहेत
तिन्ही वेळा त्यांनी विजयश्री खेचून आणली
या वेळेला लढत घरात असल्याने कोण बाजी मारणार.??
हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर बारामतीकरांनाही पडलेला आहे..??

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे अजित पवारांना घेऊन शपथविधी उरकून घेतला पण तेच सरकार 72 तासाला पडलं आणि 80 व्या तासाला ते...

नाशिक जागेवरून महायुतीत वाद लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीतील मित्रपक्षांनी त्यांच्या वाट्याला आलेल्य...
31/03/2024

नाशिक जागेवरून महायुतीत वाद

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीतील मित्रपक्षांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, काही जागांबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार यावरुन युतीत धुसफूस सुरु आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोघांनीही या जागेवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ देखील इथून लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीतील मित्रपक्षांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातील उ.....

रामदास तडस यांच्यावर जनता नाराज लोकसभा निवडणूक 2024 वर्धा जिल्हा जिल्हा देशात आणि जगात प्रसिद्ध आहे पूर्वी वर्धेवर भाजपच...
31/03/2024

रामदास तडस यांच्यावर जनता नाराज

लोकसभा निवडणूक 2024 वर्धा जिल्हा जिल्हा देशात आणि जगात प्रसिद्ध आहे पूर्वी वर्धेवर भाजपचे प्राबल्य होते
परंतु गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये तिथे भाजपने बाजी मारली
झालेल्या उमेदवारांच्या यादी ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडली आश्चर्यकारक आहे काँग्रेसचे माजी आमदार आणि नेते अमर काळे यंदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सामना आहे येथील राजकारण हे बऱ्याच अंशी जातीनिहाय आहे
तेली विरुद्ध कुणबी असा सामना या जिल्ह्यात नेहमीच पाहायला मिळाला आहे
अमर काळे हे कुणबी समाजातून येतात आणि आणि रामदास तडस तेली समाजातून येतात
ही निवडणूक तेलीविरुद्ध कुणबी अशीच पाहायला मिळणार आहे
त्यांच्यासाठी सोपी नक्कीच नाहीये आणि रामदास सडक यांचं फारसं काम या जिल्ह्यात नाहीये
त्यामुळे भाजपमधूनच रामदास तडस यांच्या नावाला सुरुवातीपासून विरोध होता
काँग्रेस राष्ट्रवादीचे काटकोन या जिल्ह्यात आहे हि भाजपला लढत इतकी सोपी वाटते आहे तेवढी नाही रामदास तडस यांना पक्ष अंतर्गत बरेच विरोध आहेत
आणि रामदास तडस यांच्या बद्दल फार सहानुभूती लोकांमध्ये नाहीये,
माझा विदर्भ वर्धा

लोकसभा निवडणूक 2024 वर्धा जिल्हा जिल्हा देशात आणि जगात प्रसिद्ध आहे पूर्वी वर्धेवर भाजपचे प्राबल्य होते परंतु गेल्...

सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरची जागा म्हणावी तेवढी सोपी नाही...!!!
30/03/2024

सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरची जागा म्हणावी तेवढी सोपी नाही...!!!

होऊ द्या व्हायरल.....!!!
30/03/2024

होऊ द्या व्हायरल.....!!!

#नितीनगडकरी

यवतमाळ वाशिम जागा शिंदेंसाठी ठरते आहे डोकेदुखी??यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार ...
30/03/2024

यवतमाळ वाशिम जागा शिंदेंसाठी ठरते आहे डोकेदुखी??

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र या मतदारसंघात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना (शिंदे गटा)च्या भावना गवळी खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार मुख्यमंत्री शिंदे हेच ठरवतील असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केल होत. मात्र, विद्यमान खासदारांऐवजी विजयाची खात्री असलेला अन्य उमेदवार द्यावा, अशी भाजपची छुपी अट असल्याची विश्वसनीय माहिती आहे. भाजपच्या या अटीमुळे येथील उमेदवाराची घोषणा रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसघात मराठा-कुणबी तसेच बंजारा बहुल भाग अधिक आहे. आदिवासी समाजाची मतेही निर्णायक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत जातीय समीकरणे प्रभावी ठरलेली आहेत. या मतदार संघात यवतमाळ जिल्ह्यातील चार तर वाशीम जिल्ह्यातील दोन विधानसभा या सहा मतदार संघांचा समावेश आहे. १९९९ पासूनच्या सलग पाच निवडणुकीत भावना गवळी या निवडून आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर त्या शिंदे गटात गेल्या. आता मात्र त्यांना उमेदवारीविषयी झगडावे लागत आहे.
महाविकास आघाडीतील संजय देशमुख यांची प्रचाराला सुरुवात.
भावना गवळी यावेळीही इच्छुक मात्र भाजप व शिवसेना शिंदे गटात ही जागा मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू आहे.
शिंदे गटाचेच मंत्री संजय राठोड हे भाजपकडून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतदारसंघात १४ तालुक्यांचा समावेश असून शहरीपेक्षा ग्रामीणचा अधिक समावेश.हे मुद्दे प्रभावी ठरणार
कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, महिलांची रोजगार उद्योगाचा अभाव.
सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव.
वर्धा-यवतमाळ-नांदेड, शंकुतला रेल्वेचा लांबलेला प्रवास
यवतमाळमधील अमृत पाणीपुरवठा योजनामहाविकास आघाडीतही उमेदवारीवर अद्याप एकमत झालेले दिसत नाही. शिवसेना फुटण्यापूर्वी ही जागा शिवसेना (उबाठा)कडे होती. त्यामुळे या जागेवर शिवसेना (उबाठा) ने दावा सांगितला आहे. शिवसेना उबाठाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या चार सभाही मतदारसंघात गेल्या आठवड्यात झाल्या. मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप याबाबत स्पष्ट कौल आला नाहि

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र या मतदारसंघ.....

लोकसभा निवडणूक 2024  बच्चू कडू यांचा नवनीत राणांच्या निवडीविषयी जाहीर विरोध प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी भाजपच...
29/03/2024

लोकसभा निवडणूक 2024
बच्चू कडू यांचा नवनीत राणांच्या निवडीविषयी जाहीर विरोध

प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना उघड उघड आव्हान दिले असून विविध सभेमध्ये बोलताना त्यांनी कुठल्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना आम्ही सहकार्य करणार नाही... अशी जणू जाहीर घोषणास त्यांनी केली आहे

लोकसभा निवडणूक 2024 प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना उघड उघड आव्हान दिले अ.....

29/03/2024

भ्रष्टाचाऱ्यांना भाजपने जवळ करून लोकांचा रोष ओढवून घेतला आहे का. या बाबतचा स्पेशल रिपोर्ट.

Address

Nagpur
440015

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majha Vidarbha News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Majha Vidarbha News:

Videos

Share


Other Media/News Companies in Nagpur

Show All