07/10/2023
लातूरकरांनो सावधान!
तुमचा 'सरकारी दवाखाना' विकला जातोय !
'माझं लातूर' या आंदोलनात सहभागी व्हा !
सरकार आरोग्याबाबतीत किती गंभीर आहे हे नांदेड प्रकरणात उघड झाले आहे,एकादी गोष्ट आपल्याला झेपत नाही तर ती दुसऱ्याला देण्यात येते अथवा त्याचा बट्ट्याबोळ होतो तसाच प्रकार लातूर शहरातील विलासराव देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं होणार आहे आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी या हॉस्पिटलचं खाजगीकरण करण्याचा डाव प्रशासनाचा आहे.शासकीय रुग्णालयात २० रुपयात सर्वच प्रकारची तपासणी होते परंतु शहरातील खाजगी दवाखान्याचे दर सर्वांनाच ज्ञात आहे,माहित आहे,लघवी तपासणी पासून ते इलाज होई पर्यंत किमान १०,००० रु तुम्हाला मोजावे लागतात,कॅन्सर,मधुमेह,ऍक्सीडेन्ट किडनी अशा मोठ्या ईलाजासाठी लाखो रुपये मोजावे लागतील मध्यमवर्गिय मागास दलित मुस्लिम आणि ग्रामीण भागातील गरजूवंत शेतकरी,शेतमजूर याच्यासाठी सरकारी दवाखाना संजीवनी आहे वरदान आहे आता या दवाखान्याचे खाजगीकरण करून मोठ्या कंपनीच्या हवालीं करून गरिबांच्या उपचारावर गदा अन न्यायाचे काम होत आहे या सरकारी दवाखान्याचे खाजगीकरण होऊ नए यासाठी माझं लातूर च्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे,आपण हि या उपोषणाला साथ द्यावी सहभाग नोंदवून आपल्या हक्काच्या दवाखान्याला खाजगीकरणाच्या 'कॅन्सर' चा जनआंदोलनाने इलाज करावा हि नम्र विनंती.
आंदोलन स्थाळ : गांधी चौक लातूर,संपर्क ७७२२०७५९९९-९८२२९९२०३२