19/04/2024
लातूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी 33 नामनिर्देशनपत्रे दाखल.
एकूण 36 उमेदवारांची 50 नामनिर्देशनपत्रे दाखल
नामनिर्देशनपत्रांची शनिवारी होणार छाननी
लातूर, दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 41- लातूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवार, 19 एप्रिल 2024 रोजी अखेरच्या दिवशी एकूण 33 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. त्यामुळे एकूण दाखल नामनिर्देशनपत्रांची संख्या 50 झाली असून एकूण उमेदवारांची संख्या 36 इतकी आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 एप्रिल रोजी होणार आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे 19 एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्रे- काळगे शिवाजी बंडप्पा (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचे तीन अर्ज, आल्टे विश्वनाथ महादेव (बहुजन समाज पार्टी) यांचे दोन अर्ज, सुधाकर तुकाराम श्रंगारे (भारतीय जनता पार्टी), मुकेश गोविंदराव घोडके (अपक्ष), नरसिंगराव निवृत्ती उदगीरकर (वंचित बहुजन आघाडी), प्रवीण माधव जोहारे (स्वराज्य सेना (महाराष्ट्र)), शंकर हरी तडाखे (बळीराजा पार्टी), सुधाकर तुकाराम सूर्यवंशी (अपक्ष), उमेश अंबादास कांबळे (अपक्ष), बालाजी शेषराव बनसोडे (अपक्ष), पंकज गोपाळराव वाखरडकर (अपक्ष), श्रीकांत बाबुराव होवाळ (बहुजन मुक्ती पार्टी), पंचशील विक्रम कांबळे (अपक्ष) यांचे दोन अर्ज, लखन राजाराम कांबळे (राष्ट्रीय बहुजन पार्टी), बालाजी तुकाराम गायकवाड (भारत पीपल्स सेना), दीपक चंद्रभान केदार (अपक्ष), भारत हरिबा ननवरे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)), प्रदीप सौदागर चिंचोलीकर (अपक्ष), व्यंकट गोविंद कसबे (बहुजन भारत पार्टी), अमोल मालू हनमंते (अपक्ष), सूर्यवंशी अतिथी खंडेराव (स्वराज्य शक्ती सेना), विकास कोंडीबा शिंदे (महाराष्ट्र विकास आघाडी), अजय भारत पाचपिंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)), कमलाकर प्रभाकर कांबळे (देश जनहित पार्टी), बनसोडे रघुनाथ वाघोजी (अपक्ष), नरसिंह पांडुरंग घोणे (अपक्ष), दत्तू सोपन नरसिंगे (वंचित बहुजन आघाडी), अजनीकर विजय रघुनाथराव (वंचित बहुजन आघाडी), अभंग गंगाराम सूर्यवंशी (अपक्ष).दिनांक 18 एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्रे : नरसिंगराव निवृत्ती उदगीरकर (अपक्ष), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (बहुजन भारत पार्टी), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (अपक्ष), सुधाकर तुकाराम श्रंगारे (भारतीय जनता पार्टी), रवींद्र स्वामी (अपक्ष), काळगे शिवाजी बंडप्पा (इंडियन नॅशनल काँग्रेस), अॅड. प्रदीप एस. चिंचोलीकर (अपक्ष), लखन राजाराम कांबळे (राष्ट्रीय बहुजन पार्टी), डॉ. अनिल सदाशिव कांबळे (भारतीय जनता पार्टी), सुधाकर तुकाराम सूर्यवंशीं (अपक्ष), पपीता रावसाहेब रणदिवे (अपक्ष).
दिनांक 16 एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्रे : सुधाकर तुकाराम श्रंगारे (भारतीय जनता पार्टी), श्रीधर लिंबाजी कसबेकर (राष्ट्रीय संत संदेश पक्ष) यांची तीन नामनिर्देशनपत्रे, सुरेश दिगंबर कांबळे (अपक्ष).दिनांक 15 एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्र : भिकाजी गंगाराम जाधव (क्रांतिकारी जय हिंद सेना)