Voice of Belgaum News

Voice of Belgaum News "Awaza Belgaumkarancha" - Looking to reach people with genuine news about local
(2)

लायन्स क्लब ऑफ बेळगाव-टिळकवाडी     लायन्स क्लब ऑफ बेळगाव- टिळकवाडी 22 फेब्रुवारी 1974 रोजी स्थापनेपासून 50 वर्षे समर्पित...
16/11/2023

लायन्स क्लब ऑफ बेळगाव-टिळकवाडी

लायन्स क्लब ऑफ बेळगाव- टिळकवाडी 22 फेब्रुवारी 1974 रोजी स्थापनेपासून 50 वर्षे समर्पित समुदाय सेवा साजरी करत आपला सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. लायन्स इंटरनॅशनल, 1917 मध्ये स्थापन झालेल्या जगातील सर्वात मोठ्या सेवा संस्थेचा भाग म्हणून, आमचा क्लब जिल्हा 317 बी गोवा अंतर्गत आणि उत्तर कर्नाटक क्षेत्र गेल्या पाच दशकांमध्ये विविध सामुदायिक कारणांसाठी स्थिर योगदान देत आहे.

गेल्या काही वर्षांत, आमच्या क्लबने सामुदायिक सेवेच्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. डोळ्यांच्या काळजीतील उल्लेखनीय उपक्रमांमध्ये 100 हून अधिक नेत्र तपासणी शिबिरांचे यशस्वी आयोजन समाविष्ट आहे, ज्यामुळे 5000 हून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, आमच्या दृष्टी तपासणीचा फायदा 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना झाला आहे ज्यांना मोफत मिळाले आहे

चष्मा 150 हून अधिक आरोग्य तपासणी शिबिरांच्या संघटनेद्वारे शालेय मुलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी आमची बांधिलकी दिसून येते. ही शिबिरे आपल्या समाजातील तरुण मनांचे सर्वांगीण आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी मोफत सल्ला आणि औषधे देतात.

शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लब ऑफ बेळगाव - टिळकवाडीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना तीन लाखांहून अधिक किमतीच्या नोटबुकचे मोफत वाटप करण्यात आले. लायन्स क्वेस्ट कार्यक्रम 350 शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात महत्त्वाचा ठरला आहे, ज्याने 30,000 हून अधिक मुलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे.

आमचे समुदाय कल्याण उपक्रम वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि अंध शाळांना आर्थिक मदत आणि दयाळू योगदान या दोन्हींद्वारे समर्थन देण्यापर्यंत विस्तारित आहेत. बेळगाव आणि आजूबाजूला 25 बस निवारे बांधणे हे सामुदायिक पायाभूत सुविधा सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

आमच्या नियमित आरोग्य तपासणी आणि मधुमेह जागृती शिबिरांनी ग्रामस्थांना आणि समाजातील दलित सदस्यांना फायदा करून दिल्याप्रमाणे आरोग्य जागरूकता कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते. क्रीडा आणि सांस्कृतिक प्रयत्नांमध्ये, क्लब नियमितपणे खो-खो स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करतो आणि मिस्टर इंडिया आणि मिस्टर एशिया सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी बॉडीबिल्डर्स आणि खेळाडूंना आर्थिक सहाय्य प्रदान करतो.

वार्षिक जागरुकता कार्यक्रम आणि वृक्षारोपण मोहिमेमुळे निरोगी पर्यावरणासाठी योगदान देणारे पर्यावरणीय स्थिरता हे लक्ष केंद्रित करण्याचे आणखी एक क्षेत्र आहे. आपत्तीच्या काळात, लायन्स क्लब ऑफ बेळगाव - टिळकवाडीने मदत देण्यास मागेपुढे पाहिले नाही, पूरकाळात अन्न, कपडे, भांडी यासह 75 लाखांच्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.

सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात, आमच्या क्लबने मतिमंद मुला-मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. वर्षानुवर्षे 4000 हून अधिक रक्ताच्या बाटल्या गोळा करून नियमित रक्तदान शिबिरे हा एक महत्त्वाचा भाग आहे.

आम्ही हा महत्त्वाचा टप्पा साजरा करत असताना, लायन्स क्लब ऑफ बेळगाव - टिळकवाडीने समाजाची सेवा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि पुढील वर्षांमध्ये सतत योगदान देण्याची अपेक्षा केली.

*बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी**स्वातंत्र्य दिन स्केटिंग* *रॅली 2023*बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, मंगळवार 15 ऑगस्ट 2023 रो...
16/08/2023

*बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी*
*स्वातंत्र्य दिन स्केटिंग*
*रॅली 2023*

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, मंगळवार 15 ऑगस्ट 2023 रोजी गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक बेळगाव येथून स्वातंत्र्यदिनी स्केटिंग रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये 4 ते 16 वयोगटातील सुमारे 50 स्केटर सहभागी झाले होते. एकूण 2 किमी अंतर कव्हर करत कव्हरिंग. स्वातंत्र्यदिनाची ही रॅली "भारत माता की जय आणि वंदे मातरम्" ची घोषणा देत पूर्ण झाली.या रॅलीचे उद्धघाटन वकील कृष्णकुमार जोशी यांच्या हस्ते रॅली ची सुरवात करन्यात आली या वेळी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन समनित करन्यात आले या प्रसंगी, तुकाराम पाटील, आर सुरेश, सागर पाटील,सचिन साळोखे स्केटिंग प्रशिक्षक , योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, यशपाल पुरोहित, भक्ती हिंडलगेकर, करुणा वाघेला, बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी चे पालक व स्केटअर्स साईसमर्थ अजना
तेजस साळुंके, श्री रोकडे
आदिती साळुंखे, आर्यन साळुंखे, रचित नांगरे
आर्या कदम, सार्थक सामंत
सार्थक चव्हाण, दुर्वा पाटील
अर्शन माडीवाले, सत्यम पाटील
भव्य पाटील, प्रांजल पाटील
अथर्व साळुंखे, स्वरा सामंत
अनमोल चौगुले, श्री पाटील
खुशी अग्शिमणी, कुलदीप बिर्जे, अनघा जोशी
आदिेश हलियाल, आराध्या हलियाल, रुत्रा दलावी, रितेश दोडमणी, सौरभ साळोखे
साक्षम कलंगडी
रुही कलंगडी, दियान पोरवाल
उपस्थित होते.

15/08/2023
On the Occasion of 15 th August Today 250 trees Plantation done at Asad Khan Darga by the Cantonment Office Forest Offic...
14/08/2023

On the Occasion of 15 th August Today 250 trees Plantation done at Asad Khan Darga by the Cantonment Office Forest Office n Public .
RFO Pursuttam ,Dy RFO Vinay Goudar ,Ex Vice President Sajeed Shaikh Dr Rahila Shaikh ,Priyanka Petkar ,Naaz Badami ,Shirish Riyaz Mujawar ,Girish, Marty Cantonment Staff n Karamcharies n Public were present .

जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे एकता श्रेयकरचा सन्मानबेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर्स कु. एकता ज्ञानेश...
10/08/2023

जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे एकता श्रेयकरचा सन्मान

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर्स कु. एकता ज्ञानेश्वर श्रेयकर, ही उच्च शिक्षण साठी कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे शिक्षण घेत आहे. नुकताच तिचा जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे गोवावेस स्केटिंग रिंक वर सत्कार करन्यात आला आपटेक इन्वेव्हेनशन चे संचालक श्री विनोद बामणे व ज्योती बामणे, यांच्या हस्ते तिला शाल पु्शपगुच्छ, व स्मतिचिन्ह देवुन सन्मानीत करन्यात आले यावेळी स्केटींग प्रशिशक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, स्केटिंगपटू व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकलेबेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन स्केटर्स नी ख...
09/08/2023

ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन स्केटर्स नी खुल्या राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये भाग घेतला होता ही स्पर्धा दिनांक 5 आणि 6 ऑगस्ट 2023 रोजी बेंगळुरू येथे पार पडल्या या चॅम्पियनशिपमध्ये 7 जिल्हातुन सुमारे 150 च्या वर स्केटअर्स नी सहभाग घेतला होता बेळगावच्या स्केटर्सनी 5 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली एकूण 16 पदके
*पदक विजेत्या स्केटरचे नाव*
*फ्री स्टाइल स्केटिंग*
अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण, 1 रौप्य
देवेन बामणे 2 सुवर्ण
रश्मिता अंबिगा 1 सुवर्ण, 1 रौप्य
हिरेन राज 1 रौप्य
जय ध्यान राज 2 रौप्य
यशपाल पुरोहित 1 रौप्य
दृष्टी अंकले 1 कांस्य
आर एस उज्वल साई 1 कांस्य

*अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग*
साईराज मेंडके 1 सुवर्ण, 1 कांस्य
शुभम साखे 1 कांस्य

*अर्टिस्टिक स्केटिंग*
खुशी अगशीमानी २ रौप्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असून सर्व स्केटअर्सना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडूलकर, इंदुधर सीताराम
सरचिटणीस KRSA याचे प्रोत्साहन लाभत आहे.

06/08/2023
05/08/2023

*मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम:वर्षभरात १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप*

*बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक*

मुंबई, दि. ५: साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं...अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली...श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत या वर्षभरात १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. हा एक अनोखा विक्रम असून त्याबद्दल निधी कक्षाच्या टीमचे कौतुक करतानाच गरजू रुग्णांच्या मदतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधानभवनातील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या दालनात धर्मा सोनवणे यांना एक लाख रुपयांच्या वैद्यकीय मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हे तेच धर्मा सोनवणे आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईकडून ठाण्याला परतत असताना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ताफा थांबवून रुग्णाची विचारपूस केली..त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा श्री. सोनवणे यांना केवळ रुग्णवाहिकाच दिली नव्हती तर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार देखील केले होते. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला त्याचाच एक लाखांचा धनादेश काल श्री. सोनवणे यांना देण्यात आला. त्यावेळी मला तुमच्यामुळे नवं आयुष्य मिळाल्याची भावना सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली.

श्री. सोनवणे यांच्या चेहऱ्यावर दिसलेले कृतज्ञतेचे भाव हेच अलौकिक समाधान देऊन गेल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले होते. गरजूंना मदत देताना प्रसंगी सोपस्कार होत राहतील परंतु त्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे अशी भावना देखील व्यक्त केली होती.

*मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक*

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गेल्या वर्षभरात १०० कोटींची मदत वितरित करण्याचा टप्पा सर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कौतुक केले. या कक्षाने केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे हे साध्य झाल्याचे सांगत भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीम मध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय सहाय्यक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या कक्षाचा वैद्यकीय मदतीचा आलेख कायम चढता राहिला असून यापूर्वी ५० तर आता १०० कोटी वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा सर केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी हा निधी कक्ष हा एक आशेचा किरण ठरला आहे.
००००

बेळगाव बार असोसिएशन या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वकील सुधीर चव्हाण  यांचा सकल मराठा समाजाचे नेते आणि व...
01/08/2023

बेळगाव बार असोसिएशन या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वकील सुधीर चव्हाण यांचा सकल मराठा समाजाचे नेते आणि विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी सन्मान केला.

जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी क्रियाशील कार्यकर्ते, वकील सुधीर चव्हाण यांची निवड ही मराठा समाजाकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले.

झाली आहे.
तत्कालीन बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्याने बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पद काही दिवसापासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारणीने नवीन अध्यक्ष नियुक्त केला आहे.

जवळपास 30 हून अधिक वर्षांनी मराठी माणसाला बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद मिळाले आहे. सुधीर चव्हाण यांच्या क्रियाशील आणि सेवाभावी कार्याची ही पोचपावती असून ज्त्यांच्या या निवडीने मराठी माणसाची मान उंचावली आहे, असेही किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी किरण जाधव यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सुधीर चव्हाण यांचा गौरव केला तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.

23/07/2023

Canara Bank ATM robbery: Rs 14 lakh 86 thousand Grab the money and run away

Vob news: Thieves broke into the ATM of Canara Bank in the heart of Afjalapura town of Kalaburagi district and stole around 14 lakh 86 thousand rupees. The incident of looting the cash took place around 3 o'clock in the morning on Sunday.
Kalaburagi SP Isha Pant, Additional SP. SN. Srinidhi, DySP Gopi BR, PS Ibhimaraya Bunkli and dog squad have visited and inspected the incident. A case has been registered in Afjalapura police station and the investigation is on. Staff Negligence: It appears that the management board of the bank has not appointed any security guard for ATM security. has come

खानापूरतील ज्येष्ठ नागरिक संघटनेची प्रगतीची वाटचाल कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना र. घटक     यांची  खानापूर शहरात च...
17/07/2023

खानापूरतील ज्येष्ठ नागरिक संघटनेची प्रगतीची वाटचाल
कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना र. घटक
यांची खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता मासिक बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष श्री बनोशी आणि प्रमुख पाहुणे श्री चांगाप्पा
निलजकर तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक अरविंद कुलकर्णी, योगगुरु हलकर्णी , सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चारिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉ. फरात मुल्ला व डॉ. नागराज राठोड व खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत भव्य असा जनहित व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ
श्रीमती उमा अंगडी यांच ईश्वर स्तवन व स्वागत गीताने झालं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सेक्रेटरी व पदाधिकारी प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती हे व्यासपीठावर विराजमान होते .
प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी स्वागत आणि कार्यक्रमाचा अहवाल सादर केला.
यामध्ये खानापूरचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा मागील मीटिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये सदस्यत्व स्वीकारून भव्य सत्कार केलेला त्यावेळी या संघटनेचे मार्गदर्शन आणि विकासाकरिता मी व माझी संघटना सदैव तत्पर असेल तसेच या संघटने करिता खानापूर शहरांमध्ये शासकीय राखीव जागा उपलब्ध करून संघासाठी कार्यालय बांधून देण्याचे व ज्येष्ठ नागरिक यांचा विकास करण्यासाठी शासन दरबारातुन सरकारी सुविधांचा लाभ करून देण्यास मी कटिबद्ध आहे कारण मी सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहे
असे आमदारानी आवाहन केले. यशस्वीरित्या सहकार सोसायटी निर्माण करावी त्यासाठी मी या संघटनेच्या नेहमी विकासासाठी कटिबद्ध राहीन असे आश्वासन दिले होते. या वेळेला आमदारांनी आपला प्रतिनिधी चांगाप्पा निलजकर तोपिंणकट्टी महालक्ष्मी ग्रुप चे संस्थापक, संचालक माजी अध्यक्ष
महालक्ष्मी ग्रुप साखर कारखान्याचे संचालक, शांतिनिकेतन स्कूलचे संचालक व माजी तालुका सदस्य खानापूर यांचे ज्येष्ठ नागरिकांनेचे
सदस्यत्व स्वीकारून सत्कार करण्यात आला व मार्गदर्शक व समन्वय म्हणून नेमणूक करण्यात आली यावेळी या संघटनेच्या विकासासाठी मी नेहमी कार्यरत राहील अशी ग्वाही दिली.
अरविंद कुलकर्णी हे खानापुरातील एक उद्योजक आहेत तसेच व्यक्ती विकासासाठी पतंजली योग संस्था खानापूर या ठिकाणी योगाची प्रशिक्षण देतात. यांची खानापूर तालुक्याला एक मोलाची देणगी समाज विकासासाठी दिली आहे यांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला तसेच सुभाष देशपांडे हे पतंजली योग गुरु आहेत मांगरीश हॉल योग प्रशिक्षणास नेहमी मोफत खुला करून देत असतात तसेच खानापूर तालुक्यातील उद्योगपती व समाज सहकाराचे ते सेवक आहेत श्री देवेगौडा चारिटेबल हॉस्पिटल बेळगाव ही संस्था बेळगाव जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत व हेल्थ कार्ड करून नोंदणीकृत सदस्यांना सवलतीमध्ये इलाज उपचार केला जातो.
या संघटनेने ज्येष्ठ नागरिकांचा जन्म प्रकट दिन साजरा करण्याची योजना प्रथम हलशी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक
एल .डी. पाटील यांचा जन्मदिन सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला. तसेच या महिन्यामध्ये जन्मदिन असणाऱ्यांचे जन्मदिन ऑगस्ट मासिक बैठकीमध्ये करण्याची ठरले.
योग गुरूंच्या समवेत जागतिक योगा दिन योगासने ,प्राणायाम, प्रत्याहार याची प्रात्यक्षिके करण्यात आली. श्री देवेगौडा चॅरिटेबल ट्रस्ट च्या डॉक्टरांच्या कडून मोफत आरोग्य तपासणी व बीपी व शुगर तपासून मोफत औषधे व हेल्थ कार्ड आयुष्मान भारत कार्ड करिता नोंदणी करण्यात आली. यावेळी 70 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला व योगा अभ्यास करण्यात आला.
अध्यक्षांनी या महिन्याचे उपक्रमामध्ये मोफत नेत्र तपासणी व उपचार आणि मोफत चष्मे देण्याकरिता शिबिर भरवण्याचे आवाहन केले आहे तसेच नवीन सभासद जास्तीत जास्त नोंदणी करावे असे आव्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आणि सहकारी सोसायटीच्या सभासद नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले
श्री एल डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले या संघटनेमध्ये या शिक्षक, डॉक्टर ,,सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी आणि उद्योजक प्रगतशील शेतकरी व सर्व श्रमिक शेतकरी कामगार या सर्वांनी सभासद होऊन स्वयं विकास व सामाजिक विकास करण्यासाठी परस्परावलंबी सेवा सहकार आम्ही मानव आहोत मानवीयता आमचा धर्म आहे याच उद्देशाने ही संघटना ना नफा ना तोटा आनंदी जीवनासाठी व जीवनात येणाऱ्या समस्या निवारणासाठी ही संस्था कार्य करत आहे आम्हाला साथ अभिमान आहे. खानापूर तालुका हा दुर्गम आहे पण माणुसकीने आणि श्रमाने व सत्वशीलतेने संपूर्ण जगाशी आपले नाते जोडलेले आहे .
हे कार्य करण्यासाठी डी. एम .भोसले प्राथमिक जेष्ठ शिक्षक संघटना अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि या संघटनेचे जनरलसेक्रेटरी श्रीयुत पवार जॉइंट सेक्रेटरी बेनकटी , वाघमारे , जिगजीनी, कोळींदरे , सावंत महिला प्रतिनिधी एल बोरजिस संघटनेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व सर्व सभासद तसेच खानापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे व समस्त तालुका नागरिकांचे तसेच श्री ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते

ज्येष्ठ नागरिकांची प्रगतीची वाटचाल कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना र. घटक  ता.खानापूर   सोमवार दिनांक 10.07.2023 रोज...
16/07/2023

ज्येष्ठ नागरिकांची प्रगतीची वाटचाल
कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना र. घटक ता.खानापूर
सोमवार दिनांक 10.07.2023 रोजी खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता मासिक बैठक संघटनेचे अध्यक्ष श्री श्री बनोशी सर आणि प्रमुख पाहुणे श्री चांगाप्पा निंगाप्पा मि
निलजकर तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक डायरेक्टर व श्री अरविंद कुलकर्णी योगगुरु हलकर्णी खानापूर आणि श्री सुभाष देशपांडे योगगुरु मांगरीश टावर चे मालक खानापूर तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चारिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉक्टर श्रीमती फरात मुल्ला व डॉक्टर नागराज राठोड आणि टीम खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत भव्य असा जनहित व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य
श्रीमती उमा अंगडी यांच ईश्वर स्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व पदाधिकारी प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती हे व्यासपीठावर विराजमान होते इतर सर्व मंडळी व्यासपीठांसमोर विराजमान होते
प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष श्रीमान आबासाहेब दळवी यांनी स्वागत आणि कार्यक्रमाचा अहवाल सादर केला
यामध्ये खानापूरचे लोकप्रिय आमदार श्रीमान विठ्ठलराव सोमनाथ हलगेकर यांचा मागील मीटिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये सदस्यत्व स्वीकारून भव्य सत्कार केलेला त्यावेळी या संघटनेचे मार्गदर्शन आणि विकासाकरिता मी व माझी संघटना सदैव तत्पर असेल तसेच या संघटने करिता खानापूर शहरांमध्ये शासकीय राखीव जागा उपलब्ध करून संघासाठी कार्यालय बांधून देण्याचे व ज्येष्ठ नागरिक यांचा विकास करण्यासाठी शासन दरबारातुन सरकारी सुविधांचा लाभ करून देण्यास मी कटिबद्ध आहे कारण मी सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहे
असे आमदारानी आवाहन केले
व यशस्वीरित्या सहकार सोसायटी निर्माण करावी त्यासाठी मी या संघटनेच्या नेहमी विकासासाठी कटिबद्ध राहीन असे आश्वासन दिले तसेच या वेळेला आमदारांनी आपला प्रतिनिधी श्रीयुत चांगाप्पा निंगाप्पा निलजकर तोपिंणकट्टी महालक्ष्मी ग्रुप चे संस्थापक डायरेक्टर माजी अध्यक्ष
महालक्ष्मी ग्रुप साखर कारखान्याचे डायरेक्टर शांतिनिकेतन स्कूलचे डायरेक्टर व माजी तालुका सदस्य खानापूर यांचे ज्येष्ठ नागरिकांनेचे
सदस्यत्व स्वीकारून सत्कार करण्यात आला व मार्गदर्शक व समन्वय म्हणून नेमणूक करण्यात आली यावेळी या संघटनेच्या विकासासाठी मी नेहमी कार्यरत राहील अशी ग्वाही दिली
श्री अरविंद कुलकर्णी हे खानापुरातील एक उद्योजक आहेत तसेच व्यक्ती विकासासाठी व्यक्ती विकासासाठी पतंजली योग संस्था खानापूर या ठिकाणी योगाची प्रशिक्षण देतात यांची खानापूर तालुक्याला एक मोलाची देणगी समाज विकासासाठी दिली आहे यांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला तसेच श्रीयुत सुभाष देशपांडे हे पतंजली योग गुरु आहेत मांगरीश हॉल योग प्रशिक्षणास नेहमी मोफत खुला करून देत असतात तसेच खानापूर तालुक्यातील उद्योगपती व समाज सहकाराचे ते सेवक आहेत श्री देवेगौडा चारिटेबल हॉस्पिटल बेळगाव ही संस्था बेळगाव जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत व हेल्थ कार्ड करून नोंदणीकृत सदस्यांना सवलतीमध्ये इलाज उपचार केला जातो
या संघटनेने ज्येष्ठ नागरिकांचा जन्म प्रकट दिन साजरा करण्याची योजना प्र प्रथम श्रीयुत एल डी पाटील माजी मुख्याध्यापक हलशी यांचा जन्मदिन सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला तसेच तसेच या महिन्यामध्ये जन्मदिन असणाऱ्यांचे जन्मदिन अगस्ट मासिक बैठकीमध्ये करण्याची ठरले
योग गुरूंच्या समवेत जागतिक योगा दिन योगासने प्राणायाम प्रत्याहार याची प्रात्यक्षिके करण्यात आली तसेच डॉक्टरांच्या कडून मोफत आरोग्य तपासणी व बीपी व शुगर तपासून मोफत औषधे व हेल्थ कार्ड आयुष्मान भारत करिता नोंदणी करण्यात आली यावेळी 70 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला व योगा अभ्यास करण्यात आला
अध्यक्षांनी या महिन्याचे उपक्रमामध्ये मोफत नेत्र तपासणी व उपचार आणि मोफत चष्मे देण्याकरिता शिबिर भरवण्याचे आवाहन केले आहे तसेच नवीन सभासद जास्तीत जास्त नोंदणी करावे असे आव्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आणि सहकारी सोसायटीच्या सभासद नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले
श्री एल डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले या संघटनेमध्ये या शिक्षक डॉक्टर सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी आणि उद्योजक प्रगतशील शेतकरी व सर्व श्रमिक शेतकरी कामगार या सर्वांनी सभासद घेऊन स्वयं विकास व सामाजिक विकास करण्यासाठी परस्परावलंबी सेवा सहकार आम्ही मानव आहोत मानवीयता आमचा धर्म आहे याच उद्देशाने ही संघटना ना नफा ना तोटा आनंदी जीवनासाठी व जीवनात येणाऱ्या समस्या निवारणासाठी ही संस्था कार्य करत आहे आम्हाला साथ अभिमान आहे खानापूर तालुका हा दुर्गम आहे पण माणुसकीने आणि श्रमाने व सत्वशीलतेने संपूर्ण जगाशी आपले नाते जोडलेले आहे धन्य हो जय हो खानापूर ज्येष्ठ नागरिक संघटना
हे कार्य करण्यासाठी श्री डी एम भोसले सर प्राथमिक जेष्ठ शिक्षक संघटना अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि या संघटनेचे जनरलसेक्रेटरी श्रीयुत पवार सर जॉइंट सेक्रेटरी श्रीयूत बेनकटी सर श्री वाघमारे सर श्री जिगजीनी सर श्री वाघमारे सर श्री कोळींदरेसर श्री सावंत सर महिला प्रतिनिधी एल एन बोरजिस मॅडम संघटनेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व सर्व सभासद तसेच खानापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे व समस्त तालुका नागरिकांचे तसेच श्री ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्ट व श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपाशीर्वादाने ही सर्व कार्य निर्वीघ्नपणे संपन्न होत आहेत आपण सर्वजण या आणि मिळून मिसळून खानापूर तालुका म्हणजे एक कुटुंब याप्रमाणे आपण काम करूया तुमच्या अनुभवांची आम्हा तालुक्यातील जनतेस गरज आहे आम्ही सर्व किमान समान आहोत हीच अभिलाषा

*नांव स्मार्ट सिटिचे आणि काम निकृष्ट दर्जाचे*  बेळगांव vob news :-  कंग्राळी खुर्द गावातील रामनगर 3 रा क्राॅस येथील स्मा...
14/07/2023

*नांव स्मार्ट सिटिचे आणि काम निकृष्ट दर्जाचे*

बेळगांव vob news :- कंग्राळी खुर्द गावातील रामनगर 3 रा क्राॅस येथील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रोडवर 6 महिन्याच्या आतच मोठ-मोठे खड्डे पडुन स्मार्ट सिटिच्या कामातून कशी फसवणूक चालले हे उघडकीस आले.या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता. हे ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास येताच त्यानी तातडीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घेऊन ते खड्डे बुजविण्याच काम केलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्या गौंडाडकर यांचे सुपुत्र विशाल गौंडाडकर, आणि सदस्य वैजनाथ बेन्नाळकर,प्रशांत पाटील व तालिम मंडळाचे उपाध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.

10/07/2023

Massive silent protest in Chikkodi condemning the killing of Jainamuni Kamakumar Nandi Maharaj.

The citizens of Chikkodi educational district including the Jain community members held a silent protest and demanded severe punishment for the culprits, condemning the incident of murdering the Jain muni Kamakumara Nandi Maharaj of Hirekodi Nandi mountain by miscreants, cutting the dead body and throwing it into a bore well.

Citizens of Nippani, Chikkodi, Raibag, Athani, Kagawad, Hukkeri taluk of Chikkodi educational district and neighboring Maharashtra participated in silent protest demanding justice for the slain Jain monks.
The citizens gathered in the ground of RD College in the city for a silent protest and submitted a petition to the government through the sub-divisional officer at Bus Stand, Mahaveer Circle, N.M. Road, Basava Circle.
Varura Dharmasena Bhattacharya Swamiji, Nandani's Jeenasena Bhattacharya Swamiji, Kolhapur's Lakshmisena Bhattacharya Swamiji, Ex former MLA Sanjay Patil said that the killing of Jain Muni is a heinous act. This is not only for the Jain sages but also for the Swamijis of the rest of the society, such an incident should not recur. This incident is strongly condemned. He demanded that the perpetrators should be given severe punishment. In this context, MLA Ganesh Hukkeri, former MLA Mahantesh Kavatagimath, ex former MLA Veerakumar Patil, Mohan Shah, Nippani youth leader Uttam Patil, Vardhamana Sadalge, Ranjeeta Sangrolle, Anil Sadalge, Uttam Patil, Dr. Padmaraja Patil. , Basavaprasada Jolle, Raju Khichade, Ravi Hampannavara, Dr. NA Magadumma, Sanjay Patila, Bharatesha Banavane, ST Munnolli and a large number of citizens participated.

08/07/2023

बेळगाव vob news : बासडी येथून अचानक बेपत्ता झालेल्या जैनमुनीचा खून झाल्याची घटना .

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात उघडकीस आली आहे. हिरेकोडी गावातील नंदीपर्वता जैन आश्रमाचे आचार्य श्री 108 कमकुमार नंदी महाराज यांची हत्या झाली. ६ जुलै रोजी सकाळी तो आश्रमातून बेपत्ता झाला होता. पहाटे आश्रमात भाविक दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. जैन मुनी गेल्या 15 वर्षांपासून नंदीपर्वत आश्रमात राहत होते.
दोघांना अटक : आश्रमाभोवती शोध घेऊनही जैन मुनींचा पत्ता न लागल्याने काल भाविकांनी जैन मुनी बेपत्ता झाल्याची तक्रार चिक्कोडी पोलिस ठाण्यात केली. याप्रकरणी चिक्कोडी न्यायालयाने गुन्हा नोंदवून तपास सुरू करत दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. तपासादरम्यान जैनमुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचे रहस्य उलगडले.
स्पष्ट माहिती न देणारे आरोपी : जैनमुनींची हत्या करून मृतदेह कोठे फेकून दिला याची स्पष्ट माहिती न देता आरोपींवर अत्याचार केले जात आहेत. त्याने सांगितले की एकदा त्याने खून करून मृतदेह कापला आणि कटकबावी गावात उघड्या बोअरवेलमध्ये टाकला. दुसऱ्या वेळी त्यांनी मृतदेह कापडात गुंडाळून नदीत फेकल्याचे सांगत आहेत. काटकबावी गावात त्यांनी रात्रभर पाहणी केली. आज सकाळी 6.30 वाजल्यापासून जैनमुनी कामकुमारनंदी यांच्या मृतदेहाचा शोध सुरू झाला आहे. स्वामीजींचे आश्रमातून अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींनी जबानी दिली आहे.
शोध मोहिमेच्या ठिकाणी जनता आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. एसपी डॉ.संजीव पाटील यांनी घटनास्थळी तळ ठोकला आहे. एसडीआरएफची टीम आणि फॉरेन्सिक टीम शोधस्थळी दाखल झाली आहे.
गावात पाण्यासाठी शांतता : हिरेकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमात पाणी साचले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हिरेकोडी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जैन मुनींना रोज भोजन देणारी कुसु गौरव ही महिला जैन मुनींचे स्मरण करून अश्रू ढाळत आहे. कामकुमार नंदी स्वामीजींचे भाऊ लक्ष्मण हेही अश्रू ढाळत आहेत.

07/07/2023

कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना उपघटक तालुका खानापूर अध्यक्ष व समिती यांच्याकडून करण्यात येते की सोमवार दिनांक 10.07.2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता मासिक.

मीटिंग स्थळ श्री ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविले आहे तरी सर्वांनी वेगळीच उपस्थित राहावे असे जाहीर निवेदन केले आहे.

मिटींगचे विषय

विश्व योगा दिन साजरा करने बाबत योगाचे योग गुरु श्रीयुत अरविंद कुलकर्णी खानापूर यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.

आणि इतर महत्त्वाचे विषय चर्चा करून पारित करण्याचे आहेत.
पुढील सहामाही कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आहे.
इतर विषय अध्यक्षांच्या परवानगीने घेण्यात येतील
तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे व सहभाग व्हावे म्हणून निवेदन केले आहे .

*केव्ही झोनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप* *२०२३ मध्ये सत्यम* *पाटील चमकला* बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर स...
06/07/2023

*केव्ही झोनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप* *२०२३ मध्ये सत्यम* *पाटील चमकला*

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर सत्यम तुकाराम पाटील हा केव्ही झोनल रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता 1 ते 3 जुलै 2023 बेंगळुरू येथे या स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये 250+ स्केटर सहभागी झाले होते.

*पदक विजेत्या स्केटरचे नाव*
*स्पीड स्केटिंग*
सत्यम तुकाराम पाटील 2 गोल्ड

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसाने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यम KLE स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत आसून त्याला. डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे,केंद्रीय विद्यालय २ चे प्रिन्सिपल एस श्रीनिवास राजा, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए, पी इ टीचर मोहन गावडे, यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

05/07/2023
जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्व आहे.  म्हणूनच ' गुरुविण कोण दाखवील वाट '  असं म्हटलं जातं. प्रत्येकांनी गुरूंच्या मार्ग...
04/07/2023

जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच ' गुरुविण कोण दाखवील वाट ' असं म्हटलं जातं. प्रत्येकांनी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात वाटचाल करून यशोशिखर गाठावे असे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सखल मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले.
गोंधळी गल्ली बेळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या वह्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री दत्त मंदिरात पूजन आणि महाआरती करण्यात आली.
यानंतर किरण जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वितरीत करण्यात आल्या.

याप्रसंगी बबन भोबे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बबन भोबे, सौरभ कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर, लक्ष्मण पवार यासह मित्र मंडळाचे सदस्य आणि गल्लीतील पंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

30/06/2023

Karnatak Broking

देवदर्शन करून परत निघालेल्या भाविकांच्या जीपला टँकरची धडकेत सहा भाविकांचा मृत्यू
अपघातातील सर्वजण कर्नाटकातील आळंद तालुक्यातील अणूर गावचे रहिवासी असल्याची माहिती

अक्कलकोट मधील शिरवळवाडी येथे जीप आणि टॅकरचा अपघात झाला यामध्ये सहा भाविक ठार झाल्यची प्राथमिक माहिती आहे

सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात घडला असून अपघातात जखमी झालेल्या उर्वरित सहा ते सात जखमींना अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार देवदर्शनकडून करून गावाकडे जात असताना भीषण अपघात झाला आहे. पोलिसांनी दिली.

29/06/2023

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
गुरुवार दि- २९ जून २०२३
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🚩देवशयनी एकादशी🚩*
*🙏🏻आषाढी यात्रा🙏🏻*

भाग्यलक्ष्मी महिला संघ फलकाचे अनावरण खासबाग बेळगाव दि : बाडीवाले कॉलनी (टिचर्स कॉलनी) र बेळगाव येथील भाग्यलक्ष्मी महिला ...
25/06/2023

भाग्यलक्ष्मी महिला संघ फलकाचे अनावरण

खासबाग बेळगाव दि : बाडीवाले कॉलनी (टिचर्स कॉलनी) र बेळगाव येथील भाग्यलक्ष्मी महिला संघ फलकाचे अनावरण नुकतेच श्रीधून जयेश भातकांडे, समाज सेवक व फलकाचे देणगिदार, यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी श्री विजय साखळकर यानी उपस्थितांचे स्वागत केले. महिला संघाच्या अध्यक्षासौ स्मीता अनगोळकर व उपाध्यक्षा सौ संगिता बाडिवाले यानी मान्यवरांना पुष्पगुच्छ 1 देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी श्री जयेश भांतकांडे यानी महिला संघाच्या सदस्याना उद्देश्न मार्गदर्शनपर आपले विचार प्रगट करून भविष्यात सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांना शाल व श्रीफळ देवून त्यांचा संघातर्फे सत्कार देखील करण्यात आला. यावेळी श्री रमेश. देसूरकर यानी देखील महिलांना उद्देशून आपले विचार प्रकट केले यावेळी टिचर्स कॉलनीतील मान्यवर व्यक्ती लालू बाडिवाले श्री सुळेभावी, श्वरेकर, श्री तावरे, सौ शिल्पा हितलकेरसौ पुष्पा कणबरकर श्री प्रकाश पाटील संतोष श्रींगारी सूर्यकांत हिंडलगेकर विशाल सैनूचे अजित बांदेकर इत्यादी उपस्थित होते.

किल्ले भूदरगढ़
25/06/2023

किल्ले भूदरगढ़

जिल्हा क्रीडांगण बेळगाव येथे ज्योती क्लब बेळगाव यांच्यामार्फत जागतिक योग दिन संपन्न     दिनांक 21जून2023रोजी सकाळी ठीक स...
23/06/2023

जिल्हा क्रीडांगण बेळगाव येथे ज्योती क्लब बेळगाव यांच्यामार्फत जागतिक योग दिन संपन्न
दिनांक 21जून2023रोजी सकाळी ठीक सात वाजता ज्योती क्लब बेळगावचे मार्गदर्शक ज्येष्ठ कोच
श्रीयुत एल जी कोलेकर गर्लगुंजी आणि त्यांच्या धर्मपत्नी व श्रीयुत सहाय्यक कोच अनिल गोरे व अथेलांटिक स्पर्धक सुमारे दैनंदिन सराव करणारे 35 स्पर्धक उपस्थित होते योगा योगासन व प्राणाया व प्राणायाम ही भारताची देणगी आहे आपल्या देशाचे कृषिमुनी योग गुरु पतंजली यांची देणगी आहे आज संपूर्ण जगाने या योगाचा अभ्यास सुरुवात केलेला आहे आणि तो जागतिक अभ्यास आहे मान्य केले आहे योगामुळे शरीर तंदुरुस्त मानशांती व समाधान लाभते मनुष्याचे आयुर्मान व निरोगीता लाभते हे सर्वांनी मान्य केले आहे असा हा योग मानवी जीवनाचा आणि निसर्गाचा समतोल राखत आहे हे जगातील सर्व मानवाने अनुभवले आहे व मान्य केले आहे
याचेच प्रतीक म्हणून अमेरिका येथे
श्रीमान भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी योगाचे प्रतिनिधित्व जागतिक योग दिना दिवशी करीत आहेत हे आमचे भाग्य आहे असे संबोधन श्रीयुत एलजी कोलेकर यांनी सांगितले
सर्व खेळांचा योग हा राजा आहे असे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी संवर्धन केले अशी मते सर्वांनी मांडली व विद्यार्थ्यांनी काही प्रात्यक्षिके सर्वांच्या समोर करून दाखवली आणि इतर आणि त्यांचे अनुकरण करत आपणही सराव केला जय हो योग व जयभारत असा नारा देण्यात आला यामध्ये खालील योग प्रेमींनी आपली उपस्थिती व योगदान दिले
उपस्थित मान्यवर. श्री लक्ष्मण भोसले
श्री लक्ष्मण पाटील. श्रीमनोहरगुंजीकर
श्री गंगाराम कदम. श्रीसतीश पाटील
श्री अर्जुन गणे बैल कर श्रीमहणते स़.
श्री भर्मानी पाटील. श्री सचिन नाईक
श्री गुंडू गुरव. श्री गंगाराम गुरव
श्री ईश्वर हलगेकर इत्यादी मान्यवर आणि योग्य प्रेमी व स्पर्धांचे पालक यानी या शिबिरामध्ये भाग घेऊन जागतिक योग दिन संपन्न केला

22/06/2023
22/06/2023

वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात उद्योजकांचा एल्गार

Vob news : भरमसाठ वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून उद्योजकांनी वीज दरवाढीचा निषेध करत ती मागे घेण्याची मागणी केली.

हेस्कॉमने उद्योगांना मनमानी करत 30 % ते 70% या प्रमाणात भरमसाठ वीज दरवाढ लागू केली आहे. परिणामी आधीच संकटात असलेले बेळगावचे उद्योग आणखी संकटाच्या गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे बेळगावातील उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारचा निषेध केला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली लघु उद्योजक संघटना, बेळगाव फौंड्री क्लस्टर, फौंड्रीमन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, हॉटेल ओनर्स असोसिएशन अशा 50हुन अधिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अभूतपूर्व मोर्चा काढला. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आलाजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चात सहभागी उद्योजक आणि कामगारांनी वीज दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्योजकांनी सरकार आणि वीज पुरवठा कंपनीच्या मनमानी वीज दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. भाजप नेते शंकरगौडा पाटील यांनी, काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यापासून मनमानी सुरु केल्याचा आरोप करून वीज दरवाढ हेत्याचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगितले. जनतेने तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे याचा अर्थ हवे ते करू असे धोरण राबवू नका, बेळगावचे उद्योग आधीच संकटात आहेत, त्यांना आणखी संकटात लोटू नका, अन्यायी पद्धतीने केलेली कोणालाही न परवडणारी वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. बाईट.
यावेळी व्यापारी व भाजपचे नेते शरद पाटील आणि उद्योजक सचिन सबनीस यांनी सांगितले की,

Address

Patil Galli, Khasbag
Belgaum
590003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice of Belgaum News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Voice of Belgaum News:

Videos

Share


Other News & Media Websites in Belgaum

Show All

You may also like