National Today

National Today media
(4)

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये  त्र्यंम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते ।या देवी सर्व भुतेशु, शक्तिरुपेन स...
11/06/2024

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते ।

या देवी सर्व भुतेशु, शक्तिरुपेन संस्थित:
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:!!

एकाच रनवेवर दोन विमानं एकत्र आली आणि जे घडलं ते.. मुंबई -  विमानतळावरील विमानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे...
10/06/2024

एकाच रनवेवर दोन विमानं एकत्र आली आणि जे घडलं ते..

मुंबई - विमानतळावरील विमानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आधीपासून एक विमान विमानतळावर टेक ऑफ करण्याच्या तयारी होतं, त्या विमानानं उड्डाण केलं नव्हतं ते धावपट्टीवर होतं तोच दुसऱ्या विमानाचं लँडिंग झालं. हे दृश्य कॅमेऱ्यात झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करत असताना इंडिगोचं विमान लँड झालं.

एव्हिएशन न्यूज वेबसाइट आउटलेट सिम्पल फ्लाइंगने दिलेल्या माहितीनुसार देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून (आयडीआर) टेक ऑफ केल्यानंतर इंडिगो फ्लाइट 5053 रनवे 27 वर लँडिंग करत होती, तर एअर इंडियाचे फ्लाइट 657 तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (TRV) जाण्यासाठी उड्डाण करत होतं.

दहशतवादी हल्यात वैष्णोदेवीकडे जाणारे १० जण ठारनवी दिल्ली - दर्शनासाठी वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसवर रविवारी द...
10/06/2024

दहशतवादी हल्यात वैष्णोदेवीकडे जाणारे १० जण ठार

नवी दिल्ली - दर्शनासाठी वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसवर रविवारी दहशतवादी हल्ला झाला. 9 जूनला झालेल्या या हल्यात १० जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला, तर हल्ल्यानंतर लगेचच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खड्ड्यात पडली, त्यामुळे इतर 7 भाविकांचाही जागीच मृत्यू झाला.

इस्रायलच्या हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार,शेकडो जखमीनवी दिल्ली -  दी र अल-बलाह - हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यास...
10/06/2024

इस्रायलच्या हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार,शेकडो जखमी

नवी दिल्ली - दी र अल-बलाह - हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान २७४ पॅलेस्टिनी ठार तर शेकडो जखमी झाले, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.

महेंद्रसिंग धोनी सामना पाहण्यासाठी वेशांतर करून स्टेडियमवरनवी दिल्ली - टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहयजमान अमेरिका संघाने माजी ...
10/06/2024

महेंद्रसिंग धोनी सामना पाहण्यासाठी वेशांतर करून स्टेडियमवर

नवी दिल्ली - टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहयजमान अमेरिका संघाने माजी विजेत्या पाकिस्तानचा सुपरओव्हरमध्ये पराभव करत पहिला धक्कादायक आणि थरारक विजय मिळवला. युनायटेड स्टेट्सने सुपर ओव्हरमध्ये पाच गडी राखून विजय मिळवला. सामन्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीम्सचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आणि अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमच्या संघाला टीकेला सामोरे जावे लागले.
दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अमेरिका आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आला होता, तो पण वेशांतर करून अशी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥रवींदु दावान...
10/06/2024

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २॥
जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥
वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।उमानिवासा त्रिपुरांतकार । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥
उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥
ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरी सोमकांत ।गंगा शिरीं दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ।
कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हाळाहळें कंठ निळाचि साजे ।दारिद्र्यदु:खे स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥
स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देव चुडामणि कोण आहे ।उदासमूर्तीजटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥
भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ९ ॥
नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।सदाशिव व्यापक तापहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १० ॥
भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न।तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ११ ॥
इच्छा हराची जग हें विशाळ । पाळी रची तो करि ब्रह्मगोळ ।उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १२ ॥
भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १३ ॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदीं वहाती हरीच्या ।मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १४ ॥
कीर्ति हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।एकाग्रनाथ विष अंगिकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १५ ॥
सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।अंकीं उमा ते गिरिरूपधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १६ ॥
सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू ।गौरीपती जो सदा भस्मधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १७ ॥
कर्पूरगौर स्मरल्या विसावा । चिंता हरि जो भजकां सदैवा ।अंती स्वहीत सुचना विचारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १८ ॥
विरामकाळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।चिंतामणी चिंतनें चित्तहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १९ ॥
सुखावसानें सकळ सुखाचीं । दु:खावसानें टळती जगाचीं ।देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २० ॥
अनुहातशब्द गगनी न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय ।कथा निजांगें करुणा कुमारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २१ ॥
शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ।भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥२२ ॥
पीतांबरे मंडित नाभि ज्याची । शोभे जडित वरि किंकणीची ।श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २३ ॥
जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी ।शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥२४ ॥
निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ॥गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २५ ॥
मंदार बिल्वे बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।काशीपुरीं भैरव विश्व तारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २६ ॥
जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।प्रताप सूर्य शरचापधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २७ ॥
अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनी विकासे ।नेई सुपंथें भवपैलतीरीं ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २८ ॥
नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २९ ॥
एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्य नामीं ।शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ३०॥
शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थासि जाऊं नको ॥
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें ती नको ॥काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ॥
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥ ३१ ॥

*T20 world Cup.भारताचा पाकिस्तानवर 6 धावांनी सनसनाटी विजय*
09/06/2024

*T20 world Cup.भारताचा पाकिस्तानवर 6 धावांनी सनसनाटी विजय*

विक्रम नवा, आव्हाने नवी…………..भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मि...
09/06/2024

विक्रम नवा, आव्हाने नवी

…………..

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवणारे नरेंद्र मोदी हे गेल्या सात दशकातील दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने सलग तिसऱ्यांदा देशात ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे; पण हे सरकार एकट्या भाजपचे नाही, तर ‘एनडीए’चे आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते, तरीही त्याला अनेकदा तडजोडी कराव्या लागल्या. तीनही कृषी कायदे, भूसंपादन कायद्यासह अनेक कायदे मागे घेण्याची वेळ मोदी यांच्या सरकारवर आली होती. आता तर भाजपला बहुमतापेक्षा ३२ जागा कमी मिळाल्याने त्यांची भिस्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य घटक पक्षांवर आहे. या घटक पक्षांतील काहींची भूमिका देशव्यापी हितापेक्षा राज्यहिताला प्राधान्य देणारी आहे. गेल्या दहा वर्षांत भाजप कोणतेही मोठे पाऊल सहज उचलू शकेल, असा ट्रेंड तयार झाला होता. मोदी यांच्याकडे स्वबळावर बहुमत होते. भक्कम बहुमताने मोठे निर्णय ते सहज घेऊ शकत होते. कलम ३७० हटवण्यात आले. तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्यात आला. ‘सीएए’ लागू करण्यात आला. या वेळी त्या निर्णयांच्या जोरावर पुन्हा सरकार स्थापन करण्याची चर्चा होती. तिसरी टर्म मोठ्या बदलांची, मोठ्या सुधारणांची असेल, असे मोदी सतत सांगत होते. त्या सुधारणांमध्ये एक देश, एक निवडणूक, समान नागरी कायदा आणि काही प्रमाणात लोकसंख्या कायदा यांचा समावेश होता. माजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता ‘एनआरसी’ लागू करण्याचे सूतोवाच केले होते; पण असे निर्णय घेण्यासाठीचे बहुमत त्यांच्याकडे नाही. या वेळी मोदी यांचे नाही, तर ‘एनडीए’चे सरकार आहे. बहुमत नसताना मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे धोरण सर्वसमावेशक होते. त्यांच्याशी जुळवून घेणे परस्परविरोधी मतांच्या राजकीय पक्षांनाही शक्य होत होते; मोदी यांचे तसे नाही. त्यांच्या नेतृत्वाला विरोध करीत बाहेर पडलेले नेते आता त्यांच्यासोबत सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. आताच्या सरकारमध्ये एकत्र आलेले प्रादेशिक पक्ष केवळ स्वत:साठी मोठ्या मंत्रालयांची मागणी करणार नाहीत, तर सरकारच्या अनेक योजनांमध्ये हस्तक्षेपही करतील. या देशात नेहमीच एका गोष्टीवर वाद होत आला आहे. केंद्रात मजबूत सरकार बनवायचे की लाचार सरकार. तो वाद सुरू झाला. कारण आघाडीच्या सरकारच्या काळात धोरण लकवा दिसतो आणि सगळा वेळ एकमेकांची समजूत काढण्यात जातो, असा आरोप केला जात होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात मोदी आणि भाजपचे नेते टीका करीत होते, तीच टीका आता विरोधक मोदी यांच्या सरकारवर करू शकतील.



देशात १९८४ नंतर थेट २०१४ मध्ये जनतेने एका पक्षाला स्पष्ट जनादेश देऊन सरकार स्थापन करण्याची संधी दिली. दुसऱ्यांदाही हाच प्रकार घडला; मात्र या वेळी अनेक वर्षे जनतेने पूर्ण बहुमत न दिल्याने देशात पुन्हा आघाडी सरकारचे युग आले आहे. त्यामुळेच हे सरकार मागील सरकारपेक्षा किती वेगळे असेल, या वेळी मोठे निर्णय होतील की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजप आपल्या मूळ अजेंड्यावर पुढे जाऊ शकेल का, सामाजिक न्यायाशी संबंधित इतर मुद्द्यांनाच प्राधान्य द्यावे लागेल का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नितीशकुमार असोत वा चंद्राबाबू नायडू; दोघेही गरिबांचे राजकारण करतात. त्यांचा खासगीकरण किंवा मोठ्या आर्थिक सुधारणांबाबतचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक दिसत नाही. त्यामुळे मोठ्या आर्थिक सुधारणांना ब्रेक लागेल का, अशी चिंता व्यक्त होत आहे. मोदी यांना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात काही मोठ्या आर्थिक पायाभरणीचा पाया घालायचा आहे. देशाला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवणे असो किंवा मोठे जमीन आणि कामगार कायदे आणणे असो; सरकारला तिसऱ्या कार्यकाळात अनेक कठोर पावले उचलायची आहेत; पण अशा पावलांचा वेग मंदावला जाऊ शकतो. आता सरकार इतर मित्रपक्षांवर अधिक अवलंबून राहणार आहे. संसदेत भाजपचे स्थान आणखी कमकुवत होईल. संसदेत प्रत्येक विधेयक मंजूर करणे अधिक कठीण होणार आहे. भाजपचा अजेंडा सर्व मित्रपक्षांना आवडलेला नाही, तर ते वेगळी भूमिका घेतात, हे अकाली दलासारख्या पक्षाने दाखवून दिले होते. पंजाबमधील अकाली दलासारख्या जुन्या मित्राने शेतीविषयक कायद्यांच्या नावाखाली ‘एनडीए’ सोडण्याचा निर्णय घेतला होता, हे विसरता कामा नये. अशा परिस्थितीत तिसऱ्या टर्ममध्ये अधिक आक्रमक होऊन मोठे आणि कठीण निर्णय घेणे मोदी यांना कठीण होऊ शकते. एक देश असो, एक निवडणूक असो किंवा लोकसंख्या कायदा; संसदेत मंजूर करणे अवघड होईल. त्याचे कारण पूर्वी काही तटस्थ पक्षांची मदत भाजप घेत होते. आता तशी परिस्थिती नाही. एकतर अशा मित्रांची संख्या कमी झाली आहे आणि त्यातच संसदेत भाजपकडे स्वबळावर बहुमत नाही. मोदी यांना बहुमत न मिळाल्याने आर्थिक सुधारणांच्या गतीवरही परिणाम होऊ शकतो. देशात ‘सीएए’ लागू करणे हे आव्हान आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीच या त्याला विरोध केला आहे.



सीमांकनाबाबतही चर्चा बराच काळ सुरू आहे. ‘एनडीए’च्या अनेक घटक पक्षांचा याला पाठिंबा नाही, अशा परिस्थितीत मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही रखडण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘वन नेशन वन इलेक्शन’बाबत समितीने आपला अहवाल सादर केला असून, मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी प्राथमिकता मानली जात आहे. सध्या ४७ पैकी ३२ पक्ष समान नागरी कायद्याला पाठिंबा देतात; पण प्रश्न एकच आहे, की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूदेखील भाजपची विचारधारा स्वीकारू शकतील का? तसे न केल्यास ही दोन्ही विधेयके मंजूर होणे अवघड आहे. आता भाजपसमोरील आव्हान केवळ आपले प्रकल्प पूर्ण करण्याचे नाही, तर मोठी गोष्ट म्हणजे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघेही आपापल्या राज्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी करत आहेत. ही मागणी अशी आहे, की यापूर्वी हे दोन्ही नेते ‘एनडीए’पासून याच मुद्यावर वेगळे झाले होते. आता दोघेही ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असल्याने मोदी यांच्यावर अधिक दबाव असेल. याशिवाय नितीश कुमार यांना जात जनगणना करायची आहे. भाजपचा त्याला विरोध आहे. आता आघाडी सरकारमध्ये या मुद्द्यावरही दबावाचे राजकारण पाहायला मिळणार आहे. असे असले, तरी आव्हानांचा सामना कसा करायचा हे पंतप्रधानांना माहीत आहे. नायडू आणि नितीश कुमार यांनी संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड करताना ज्या प्रकारे संदेश दिला आहे, त्यावरून सर्व काही निश्चित असल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी विरोधक आक्रमक, दमदार आणि मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा संदेश देत आहेत. पुढील कार्यकाळात पंतप्रधानांना या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मित्रपक्षांशिवाय सत्ता चालणार नाही, हे पंतप्रधानांना नेहमीच लक्षात ठेवावे लागेल. तिसरा पक्ष म्हणजे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास पासवान). त्यात पाच सदस्य आहेत. या पक्षांचे नेते आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनाही महत्त्व द्यावे लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळात गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र ही चार प्रमुख मंत्रालये आहेत. मित्रपक्ष यातून कोणत्याही विभागाची मागणी करू शकतात. याशिवाय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास, रेल्वे, शिक्षण, आरोग्य, वाणिज्य, ऊर्जा, रस्ते आणि वाहतूक, दूरसंचार, नागरी विमान वाहतूक यासारख्या महत्त्वाच्या मलईदार खात्यांवर मित्रपक्ष दबाव आणू शकतात. हे आव्हानही पंतप्रधानांसमोर आहे. पंतप्रधानांनी आपल्या दोन कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेतूनुसार हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार दिली आहे. त्यांनी पुढील शंभर दिवसांच्या कामाचा अजेंडा तयार केला आहे; पण त्यात बदल करावा लागू शकतो. अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर पंतप्रधानांची खेळपट्टी कमकुवत झाली आहे. तिसऱ्या टर्ममध्ये त्यांचे आव्हान खूप मोठे आहे. समान नागरी संहिता, ‘एनआरसी’सह अनेक मुद्द्यांवर एकमत करावे लागेल. पंतप्रधानांना शेतकरी कल्याण आणि कृषी, ग्रामीण विकास आणि रोजगारावर विशेष लक्ष द्यावे लागेल. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि बिहारमध्येही राजकीय-सामाजिक समीकरणाचे आव्हान वाढले आहे. काही महिन्यांनी दिल्ली, हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. पंतप्रधानांनी लष्करातील अग्निवीर भरती योजनेचे वर्णन परिवर्तनवादी असे केले होते; परंतु त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मित्रपक्षही दबाव आणत आहेत. अशा परिस्थितीत मोदी काय करतात, हे पाहावे लागेल. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर युद्धासारखी परिस्थिती आहे. रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि व्यापार आव्हानाच्या काळातून जात आहे. अशा परिस्थितीत महागाईचा सतत दबाव असतो. अमेरिका, चीनशी संबंध, युरोप, युरेशिया आणि मध्य आशिया यांच्यातील समतोल हीही मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्यासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.

साभार - जेष्ठ पत्रकार भागा वारखडे

*T20 वर्ल्ड कप भारत - पाक सामना, पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला*
09/06/2024

*T20 वर्ल्ड कप भारत - पाक सामना, पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला*

*जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिन*   बेळगाव -  दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी नवीन घोषवाक्य...
09/06/2024

*जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिन*
बेळगाव - दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी नवीन घोषवाक्य ठेवली जातात. 2024 चे घोषवाक्य म्हणजे "तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे जेणे करून भावी पिढ्यांचे संरक्षण केले जाऊ शकते"
या राष्ट्रीय हेतूचा उद्देश साधून जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) व शहापूर येथील गोवा वेस स्थित न्यू गर्ल्स हायस्कूल च्या सहकार्यातून तंबाखू विरोधी मोर्चाचे भव्य आयोजन दि. 8 जून रोजी करण्यात आले. याप्रसंगी न्यू गर्ल्स हायस्कूल येथे पार पडलेल्या छोटेखाणी कार्यक्रमात स्कूलचे मुख्याध्यापक श्री जे यु घाडी , शिक्षक वर्ग, जायंटसचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील, सेक्रेटरी श्री यल्लाप्पा पाटील व जायंटसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री अविनाश पाटील यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली .ते म्हणाले की ,"आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांवर आहे. यासाठी जागृती कार्यक्रमांची गरज आहे." मुख्याध्यापक श्री घाडी यांनी देखील तंबाखू सेवनामुळे होणारे विकार याबाबत ची माहिती दिली.
या कार्यक्रमानंतर जायंट्स चे सदस्य, शिक्षक व विद्यार्थीनी यांची फेरी करण्यात आली. सुमारे साठ विद्यार्थिनीनी या फेरीत सहभाग घेतला. तंबाखू विरोधी सूचना देणारे फलक हातात घेतलेल्या विद्यार्थिनी बँडच्या तालावर घोषणा देत शहापूर भागात फिरल्या. याप्रसंगी जायंटसचे सभासद सर्वश्री शिवराज पाटील, अनंत लाड, लक्ष्मण शिंदे, आनंद कुलकर्णी, विजय बनसुर, संजय पाटील, दिगंबर किल्लेकर, प्रदीप चव्हाण, मधु बेळगावकर व हायस्कूल मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते. फेरीनंतर विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद महागावकर यांनी केले तर सचिव यल्लाप्पा पाटील यांनी आभार मानले

09/06/2024
।।जोतिबाच्या नावानं चांगभलं।।।। श्री जोतिबा आरती ।।भगीरथी मुळ शितल हिमाचल वासी । नलगत पल खलदुर्जन संहारी त्यासी ।तो हा ह...
09/06/2024

।।जोतिबाच्या नावानं चांगभलं।।

।। श्री जोतिबा आरती ।।

भगीरथी मुळ शितल हिमाचल वासी । नलगत पल खलदुर्जन संहारी त्यासी ।
तो हा हिम केदार करवीरा पाशी । रत्नागिरीवर शोभे कैवल्य राशी ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदारा । दासा संकटवारा भव भय निवारा ।।१।।
उत्तरेचा देव दक्षिणी आला । दक्षिण केदार नाम पावला
रत्नासूर मर्दूनी भक्ता पावला । दास म्हणे थोर भाग्या लाभला ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदारा । दासा संकटवारा भव भय निवारा ।।२।।

*रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं  निधन*हैदराबाद - ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी ...
08/06/2024

*रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन*

हैदराबाद - ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज पहाटे निधन झालं. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत मालवली. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात ५ जून रोजी दाखल करण्यात आलं होतं. आज ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

रामोजी राव यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा
१६ नोव्हेंबर १९३६ या दिवशी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे

जय हनुमान ज्ञान गुन सागर।जय कपीस तिहुं लोक उजागर।।जय बजरंग बली!'ओम हनुमते नमः।''ओम हनुमते रुद्रातिकयम हूं फट।''ॐ हं पवनन...
08/06/2024

जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।

जय बजरंग बली!

'ओम हनुमते नमः।'
'ओम हनुमते रुद्रातिकयम हूं फट।'
'ॐ हं पवननन्दनाय स्वाहा ।'
'ॐ नमो हरि मर्कट मर्कटाय स्वाहा ।'
'ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।'
'ॐ नमो भगवते हनुमते नमः । '
'दुर्गम काज जगत के जेते,
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।'
'और मनोरथ जो कोई लावै,
सोई अमित जीवन फल पावै ।'
'अष्ट सिद्धि नौ निधि के दाता,
अस बर दीन जानकी माता।'

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती 💫 आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…

अजर अमर एकच नाम रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान...

#हनुमान #शंकरमहाराज #नवनाथमहाराज #श्रीस्वामीसमर्थ #अवधूतचिंतन #श्रीगुरुदेवदत्त #जयमातादी #जगदम्ब

फडणवीसांना नेमके काय हवे आहे?लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या झालेल्या खराब कामगिरीची जबाबदारी माझी आहे, असे सांग...
07/06/2024

फडणवीसांना नेमके काय हवे आहे?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या झालेल्या खराब कामगिरीची जबाबदारी माझी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री व राज्यातील पक्षाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून मोकळं करावं व संघटनेचं काम द्यावं अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. फडणवीस यांनी मुंबईत पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन, आपल्याला सरकारमधून मुक्त करावे, अशी श्रेष्ठींकडे जाहीर मागणी केली, हे सर्व आश्चर्यकारक होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस कमालीचे अस्वस्थ आहेत. खरं तर देशभर भाजपाला फटका बसला आहे. देशभरात भाजपाच्या ६३ जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजपाला मोठा फटका बसला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठे यश मिळणार नाही, याची चर्चा अगोदरपासून होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांत मोठी फूट पडल्यापासून लोक नाराज होते. भाजपा केंद्रात व राज्यात दोन्हीकडे सत्तेवर असताना आणि मोदींसारखा दिग्गज, लोकप्रिय व मोठा करिष्मा असणारा नेता असताना राज्यात भाजपाचे केवळ नऊ खासदार निवडून आले हे पक्षाला मुळीच शोभादायक नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते, विधानसभेत विरोधी पक्षनेता होते, पाच वर्षे मुख्यमंत्री होते, आता गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री असून सर्वात मोठे अधिकाराचे गृहखाते त्यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील भाजपाचा चेहरा आहेत. नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा आशीर्वाद गेल्या दहा वर्षांपासून फडणवीस यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र म्हणजे देवेंद्र हे भाजपाचे समीकरण आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत पण त्यांच्या तोडीचे किंवा जास्त महत्त्व फडणवीसांना सत्तेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. ज्यांनी कोणी फडणवीस यांच्याशी पंगा घेतला किंवा जे कोणी फडणवीसांच्या मनातून उतरले त्यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले किंवा संपुष्टात आले, अशी पक्षात अनेक उदाहरणे आहेत. फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपाचे सर्वेसर्वा असताना व पक्ष श्रेष्ठींचे त्यांच्या मस्तकावर आशीर्वाद असताना, मला सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती करण्याची त्यांच्यावर का पाळी आली?
लोकसभा निवडणूक प्रचारात फडणवीस व बावनकुळे राज्यात महायुतीला ४८ पैकी ४५ जागा मिळणार असे वारंवार सांगत होते. पक्षाचे सर्वोच्च नेते मोदी, शहा व नड्डा हे सुद्धा अब की बार ४०० पार अशा घोषणा देत होते. भाजपाचे ३७० खासदार निवडून आणण्याचा संकल्प पक्ष श्रेष्ठींनी जाहीर केला होता. प्रत्यक्षात सर्व गणिते फसली. अंदाज चुकले. जनतेच्या मनात नेमके काय आहे हे सत्तेत असलेल्या नेत्यांना मतमोजणी होईपर्यंत समजलेच नाही. अगदी १ जून रोजी झालेल्या एक्झिट पोलमध्येही भाजपा साडेतीनशे व एनडीए ४०० अशी सरसकट आकडेवारी तेरा संस्था व वृत्तवाहिन्यांनी जाहीर केली होती. भाजपाचे नेते प्रचारात घोषणा करीत राहिले, पण सर्वसामान्य जनता व घोषणा यांत अंतर वाढत राहिले याचे कुणाला भानच नव्हते.
महाराष्ट्रात भाजपाचे एवढे पानीपत होईल, असे कुणाच्या स्वप्नातही आले नव्हते. भाजपाचे दोन अंकी खासदारही निवडून येणार नाहीत, असे कुणीही भाकीत केले नव्हते. अब की बार ४०० पार व फिर एक बार, मोदी सरकार अशा घोषणा देण्यातच नेते व कार्यकर्ते गुंग होते. निकालानंतर जेव्हा आकडे जाहीर होऊ लागले तशी भाजपामध्ये अस्वस्थता वाढू लागली. पक्षाचा मोठा अपेक्षा भंग झाला. काँग्रेस हा भाजपाचा राष्ट्रीय पातळीवरील एक नंबरचा राजकीय शत्रू आहे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा राज्य पातळीवरील शत्रू नंबर एक आहे. पण या दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपाचे नेते दहा वर्षांपूर्वी देत असत, आता त्या पक्षाचे महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले, तर उबाठा सेनेचे ९ खासदार विजयी झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ खासदार निवडून आले. महाआघाडीचे ३० खासदार विजयी झाले, तर सत्तेवर असलेल्या महायुतीचे १७ खासदार निवडून आले. त्यात भाजपाचे ९, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १ खासदार आहे.
सांगलीतून विशाल पाटील हे (काँग्रेस बंडखोर) एकमेव अपक्ष विजयी झाले. महाराष्ट्रात भाजपा व महायुतीची कामगिरी खराब झाली. मतदार महाआघाडीकडे जास्त संख्येने आकर्षित झाले, हा निकाल म्हणजे, चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीला धोक्याचा कंदील आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे भाजपाला जास्त गांभीर्य वाटते.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४३ टक्के मते मिळाली व महायुतीला त्यापेक्षा केवळ अर्धा टक्का मते कमी मिळाली. महाआघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाली, तर महायुतीला २ कोटी ४८ लाख मते पडली. मुंबईमध्ये महाआघाडीला जास्त जागा मिळाल्या.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २७.८४ टक्के मते मिळाली, यंदा २०२४ च्या निवडणुकीत २६.१७ टक्के मते मिळाली. यंदा भाजपाच्या मतांत किंचित घट झाली आहे.
जनसंघाच्या काळात पक्षाचे जेमतेम लोकप्रतिनिधी निवडून यायचे आणि पक्षाचे नेते निकालानंतर आम्हाला जागा कमी मिळाल्या तरी मतांची संख्या कशी वाढली असे सांगत असत. पण जो जिता वो सिकंदर हे निवडणूक निकालानंतर चित्र असते. राज्यात भाजपाच्या ११ उमेदवारांचा पराभव काँग्रेसने केला हे भाजपाच्या जास्त जिव्हारी लागले आहे.
रावसाहेब दानवे (जालना), कपिल पाटील (भिवंडी), भारती पवार (दिंडोरी), सुभाष भांभरे (धुळे), तसेच राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे (बीड) यांचा निवडणुकीत झालेला पराभव भाजपासारख्या शक्तिमान पक्षाला नामुष्की देणारा ठरला. नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), पीयूष गोयल (उत्तर मुंबई) आणि नितीन गडकरी (नागपूर) हे तीन केंद्रीय मंत्री चांगल्या मताधिक्यांनी विजयी झाले. पण त्यात त्यांचे वैयक्तिक योगदान मोठे आहे.
पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून खरोखरच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यासाठी श्रेष्ठींकडे परवानगी मागणारे पत्र देवेंद्र यांनी पाठवले आहे का? मला सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्रेष्ठींना करणे हे पक्षाच्या शिस्तीत बसते का?
देवेंद्र हे पाच वर्षे उपमुख्यमंत्री होते, दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचे ठरले तेव्हा ते सरकारमध्ये जाण्यास उत्सुक नव्हते. आपण सरकारमध्ये सामील होणार नाही असे त्यांनी मीडियासमोर जाहीरपणे सांगितले होते. आपण मुख्यमंत्री असताना ज्याने आपल्या हाताखाली मंत्री म्हणून काम केले त्यांच्या हाताखाली सरकारमध्ये आपण एक मंत्री म्हणून कसे काम करावे, असा त्यांना प्रश्न पडला असावा. पण नड्डा यांनी त्यांना सरकारमध्ये सामील व्हावे असा आदेशच दिला.
लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनाच मीडियातून जबाबदार धरले गेले. पक्षातही त्यांच्या नावाची कुजबूज सुरू झाली. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले तेव्हाही ते मिशन देवेंद फडणवीस यांनीच पार पाडले अशी चर्चा होती. निवडणुकीतील निकालानंतर उघडपणे आरोप होण्याअगोदरच आपण पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून बाहेर पडावे असे त्यांनी मनोमन ठरवले असावे. पण त्याचा सरकारवर काय परिणाम होईल याचा त्यांनी विचार केला आहे का?
चार महिन्यांवर ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभा निकालाचा परिणाम विधानसभेवर होणे अटळ आहे. सरकारमधील जबाबदारी सोडून पक्ष संघटनेचे काम करायला मिळावे अशी देवेंद्र यांची इच्छा आहे. ते श्रेष्ठींनी मान्य केले, तर त्यांना पद कोणते देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांना हटवून त्या जागेवर प्रदेशाध्यक्ष म्हणून फडणवीसांना नेमणार का?
निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस हे एकटेच स्वत:वर का घेतात हे समजलेले नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे किंवा मुंबईचे अध्यक्ष म्हणून आशीष शेलार यांची काहीच जबाबदारी नाही का? उत्तर प्रदेशात भाजपाचे पानीपत झाले. त्या राज्याने भाजपाचे सर्व गणित बिघडवले. मग तेथे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असे ऐकायलाही मिळाले नाही. देशभर भाजपाला फटका बसला म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी किंवा कोणी पदाधिकाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी अंगावर घेऊन राजीनामा देऊ केला असेही घडलेले नाही. उलट निकालाच्या दिवशीच दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात विजयोत्सव साजरा झाला व
जे. पी. नड्डा व राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा सत्कार करण्यात आला. मग फडणवीस स्वत:हून सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा का व्यक्त करीत आहेत? फडणवीस हे अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, पण त्यांना नेमके काय हवे आहे?

साभार - जेष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर

*मच्छे येथे शिवराज्याभिषेक दिन* *विविध उपक्रमानीं साजरा*बेळगाव-मच्छे (तालुका बेळगाव )येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्र...
07/06/2024

*मच्छे येथे शिवराज्याभिषेक दिन* *विविध उपक्रमानीं साजरा*
बेळगाव-मच्छे (तालुका बेळगाव )येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांच्या हस्ते करण्यात आले.
गावच्या विकासासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
गावच्या स्मशान भूमीमध्ये संपूर्ण स्वच्छता करून पाण्याची सोय, वृक्षारोपण व सुंदर बाग निर्माण करून दिव्यांची सोय, रस्ता अशी बरीच कामे केलेले कार्यकर्ते यल्लाप्पा सुळगेकर, भोमानी लाड,सिध्दार्थ चौगुले,उदय चौगुले,सूरज देसाई
यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच वटपौर्णिमेदिवशी वटवृक्षासमोर पूजेसाठी प्रसाद म्हणून ठेवलेली फळे संकलित करून ती अनाथाश्रम व गोरगरिबांना दरवर्षी वाटून अन्न हे संपूर्ण परब्रम्ह आहे त्याची विटंबना होऊ नये हे तत्त्व प्रसार करीत असलेल्या
रेणुका लाड,वीणा छप्रे, मालती लाड,रमा बेळगांवकर, प्रियांका धामणेकर,रेखा लाड, शारदा कणबरकर या महिलांचा सत्कार करण्यात आला.
गावातील मुलांसाठी, मर्दानी खेळ, योगासने, व्यायाम व लाठीचे प्रशिक्षण देणारे सचिन चोपडे, साक्षी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
शिवतेज युवा संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य व एन एम एम एस परीक्षेचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थी घडवणारे संतोष जैनोजी, विनायक चौगुले, सुशांत चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
सुरज भैरू लाड यांनी पाणी टंचाईच्या काळात आपल्या परिसरातील नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करून त्यांची सोय केली त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
गावच्या गरीब मुलांसाठी शैक्षणिक मदत करणारे साईनाथ शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची, राजनिती,आर्थिक धोरण, गनिमी कावा, समता, बंधुता, न्याय व शिवकालीन इतिहासावर विनायक चौगुले, कृष्णा अनगोळकर, बजरंग धामणेकर, संतोष जैनोजी यांनी विचार मांडले.
सूत्रसंचलन सागर कणबरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी व पाटील गल्लीतील शिवभक्त, गावातील युवक व नागरिकांनी परिश्रम घेतले. इतर ग्रामस्थांना आदर्शवत ठरावा असा हा कार्यक्रम पाहून अनेकानी गौरवोद्वार काढले

ब्रह्मा कुमारी ईश्वरीया विद्यापीठात,जागतिक पर्यावरण दिन साजरा बेळगाव : बेळगाव येथील काली अंबराई ब्रह्मा कुमारी ईश्वरीय व...
07/06/2024

ब्रह्मा कुमारी ईश्वरीया विद्यापीठात,जागतिक पर्यावरण दिन साजरा

बेळगाव : बेळगाव येथील काली अंबराई ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यापीठात ६ जून (गुरुवार) रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोपालकृष्ण सरना ठाणगी यांनी रोपांवर पाणी शिंपडून कार्यक्रमाचा शुभारंभ करून जलचर, पार्थिव, प्राणी व पक्षी जीवनात सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने पर्यावरणपूरक असले पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायला हवे. भूतकाळात झालेला पर्यावरणाचा ऱ्हास आज पाहावयास मिळत आहे. पर्यावरणाचे संवर्धन ही आजच्या काळाची गरज असल्याचे ही ते म्हणाले.

ज्योती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पूर्णिमा पाटील म्हणाल्या, परदेशी लोक आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा अंगीकारून आपल्याला मार्गदर्शन करतात. पण आपण विसरत चाललो आहोत. विश्वशांतीसाठी नेहमी प्रार्थना करा. अंधश्रद्धेपासून मुक्त व्हा. निसर्गाशी माणसाचे नाते मोठे आहे. ते म्हणाले की, मानवाचे निसर्गाशी गोड नाते असले पाहिजे.

अध्यक्षस्थानी असलेल्या ब्रह्मा कुमारी साधना म्हणाल्या की, पर्यावरण रक्षणाबरोबरच याबाबत अधिक जनजागृतीही झाली पाहिजे. आपण आपल्या मनातील भावना स्वच्छ केल्या पाहिजेत. ते म्हणाले की, विश्व परिवर्तनासाठी सर्वशक्तिमान देवाच्या नावाने राजयोगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

बसवराज सदलगी, मनोहर कुलकर्णी आदी उपस्थित होते. ७ दिवसांचे प्रशिक्षण घेण्यास सांगितले. ब्रह्मा कुमारी मोहिनी यांनी प्रार्थना केली. ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची माहिती श्रीकांत यांनी दिली. सुधीर इंगळे यांनी आभार व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्यअवधूत हे स्मरण गाम...
06/06/2024

श्री स्वामी समर्थ

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य
अवधूत हे स्मरण गामी अशक्यही शक्य
करतील स्वामी......!!

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविणा
काळही ना नेई त्याला परलोकी
ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील
स्वामी.......!!

उगाची भीतोसी भय हे पळू दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ति
कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा अशक्यही शक्य
करतील स्वामी......!!

खरा होई जागा श्रद्धेस हित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्यही
शक्य करतील स्वामी.......!!

विभूती नमननाम ध्यानादी तिर्थ
स्वामीच या पंचप्राणामृतात हे तिर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तयाजया स्वामी घेई हाती
अशक्यही शक्य करतील
स्वामी.......!!

श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर जतन दुरुस्ती नंतर,  आज रविवारी पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे.आज मंदिराला फुलांची आकर्ष...
02/06/2024

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर जतन दुरुस्ती नंतर,
आज रविवारी पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे.आज मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.


नशा मुक्त , चरित्रवान युवा देश और समाज की नीव-भगवान भाई सिबसागर - जीवन में नैतिक मूल्यों कि कमी से जीवन में आनेवाली समस्...
31/05/2024

नशा मुक्त , चरित्रवान युवा देश और समाज की नीव-भगवान भाई
सिबसागर - जीवन में नैतिक मूल्यों कि कमी से जीवन में आनेवाली समस्याओं का सामना न करने से युवा तनाव में आता और तनाव को भूलने हेतु नशा करता |जवानी में व्यक्ति को स्वयं, समाज और देश के भविष्य के बारे में चिंतन करते हुए नए सपनों को बुनना और उसके अनुसार आगे बढ़ना चाहिए, लेकिन उस समय यदि वो नशे का आदी हो जाएगा तो जैसै दीमक अंदर ही अंदर व्यक्ति को खोखला बना देता है, ऐसे ही नशा व्यक्ति को अंदर ही अंदर खोखला बना देता है। इसके बाद वह व्यक्ति किसी काम का नहीं रहता। वह परिश्रम नहीं कर सकता, उसके चिंतन की व्यवस्था समाप्त हो जाती है | नशा से छुटकारा पाना चाहते हो तो वर्तमान के युवाओं को नैतिक शिक्षा देने कि आवश्यकता है |उक्त उदगार माउंट आबू राजस्थान से पधारे हुए बी के भगवान भाई ने कहे | वे सरेकापाल हायस्कूल में 31 मई तम्बाखू निषेद दिवस के निमित सकारात्मक चिंतन और नैतिक शिक्षा से नशा मुक्ति सशक्त युवा विषय पर बोल रहे थे |
भगवान भाई ने कहा की,उन्होंने बताया कि नैतिक मूल्यों से व्यक्तित्व में निखार, व्यवहार में सुधार आता है।नैतिक मूल्यों का ह्रास व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय समस्या का मूल कारण है। समाज सुधार के लिए नैतिक मूल्य जरूरी है।उन्होंने कहा कि नैतिक शिक्षा की धारणा से, आंतरिक सशक्तीकरण से इच्छाओं को कम कर भौतिकवाद की आंधी से बचा जा सकता है। व्यक्ति का आचरण उसकी जुबान से ज्यादा तेज बोलता है। नशा मुक्त चरित्रवान , गुणवान युवा समाज और देश की नीव है
उन्होंने कहा कि हमारे जीवन में श्रेष्ठ मू्ल्य है तो दूसरे उससे प्रमाणित होते हैं।जीवन में नैतिक मूल्य होंगे तो आदमी लालच, हिंसा, झूठ, कपट का विरोध करेगा और समाज में परिवर्तन आएगा। उन्होंने कहा नैतिकता से मनोबल कम होता है।उनहोंने कहा कि मूल्यों की शिक्षा से ही हम जीवन में विपरीत परिस्थिति का सामना कर सकते हैं। जब तक हम अपने जीवन में मूल्यों और प्राथमिकता का निर्धारण नहीं करेंगे, अपने लिए आचार संहिता नहीं बनाएंगे तब तक हम चुनौतियों का मुकाबला नहीं कर सकते।
भौतिक शिक्षा से हम रोजगार प्राप्त कर सकते हैं, लेकिन परिवार, समाज, कार्यस्थल में परेशानी या चुनौती का मुकाबला नहीं कर सकते है | युवा उच्च शिक्षा प्राप्त करके डॉक्टर, इंजीनियर बनकर धनोपार्जन कर सुख-सुविधा युक्त जीवन निर्वाह करना चाहते हैं, परंतु जब उनका उद्देश्य पूर्ण नहीं हो पाता | नैतिक शिक्षा से युवाओं को दिशा मिल सकती है | भौतिक शिक्षा से भौतिकता का विकास होगा और नैतिक शिक्षा से सर्वागिंण विकास होगा |
स्थानीय ब्रह्माकुमारीज की संचालिका बी के रजनी बहन जी ने कहा युवाओं को नशे की गर्त में जाने से बचाने के लिए जरूरी है कि वह विभिन्न खेल गतिविधियों में बढ़-चढ़कर हिस्सा लें व अपने को सुबह जल्दी उठने व जल्दी सोने की आदत डालें। इससे न केवल स्वास्थ्य बेहतर रहता है बल्कि शरीर में ऊर्जा का स्तर बढ़ता है। उन्होंने कहा कि नशा समाज में फैलती एक ऐसी कुरीति है जो देश के भविष्य को अंधकारमय बनाने का काम कर रही है। नैतिक शिक्षा से ही में सशक्तिकरण आ सकता है। उन्होंने आगे बताया कि नैतिकता के बिना जीवन अंधकार में हैं। उन्होंने कहा कि सकारात्मक कर्म कि अर्थात रचनात्मक कार्य कि नशा जरुर करे |
चाम्पा ब्रह्माकुमारी कि प्रभारी बी के रचना बहन ने कहा कि नैतिक गुणों के बल पर ही मनुष्य वंदनीय बनता है। सारी दुनिया में नैतिकता अर्थात सच्चरित्रता के बल पर ही धन-दौलत, सुख और वैभव की नींव खड़ी है। उन्होंने कहा की जब तक जीवन में आध्यात्मिकता नही है तब तक जीवन में नैतिकता नही आती है |
डॉ अरुण सकापती रिटायर डायरेक्टर एग्रीकल्चर विभाग जी ने कहा कि नशामुक्त समाज बनाने के लिए और युवाओं को नशे के दुस्प्रभावों के प्रति जागरूक करने कि आवश्यकता है |
बी के अनिल भाई सहायक शिक्षक जी ने कहा कि युवाओं को चरित्रवान बनना हो तो नैतिक शिक्षा आवश्यक है जिससे नशा मुक्त सशक्त युवा बन सकता है |
प्रिंसिपल कीर्ति बरठाकुर जी ने ब्रह्माकुमारी संस्था को धन्यवाद ज्ञापित किया और कहा जो बाते सुनी उसका अनुकरण जरुर करे |
स्थानीय ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र की ओर से प्रदीप बरठाकुर जी ने ब्रह्माकुमारी सस्था का परिचय भी दिया |
कार्यक्रम में मंजू सेठिया , रेखा गोगाई के साथ सभी शिक्षक स्टाफ भी उपस्थित थे |
कार्यक्रम के अंत में बी के भगवान भाई जी ने नशा मुक्त बनाने हेतु राजयोग मेडीटेशन भी कराया |
सभी युवाओं से नशा मुक्त और मूल्यों कि धारणा कर तनाव मुक्त रहने कि प्रतिज्ञा भी कराइ
बच्चो ने भे नशा के होनेवाले प्रभाव के बारे बताया |

Address

Shahapur
Belgaum
590003

Telephone

+919036799516

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when National Today posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to National Today:

Videos

Share


Other Belgaum media companies

Show All