📣 आर्थिक | उद्योजकता | स्टार्टअप | शेती | तंत्रज्ञान | करिअर | प्रेरणा
🎯 मिशन : १ लाख उद्योजक
(576)
Address
A2-201, Omkar Nandan, Vadgaon Bk
Pune
411041
Opening Hours
Monday | 10am - 6:30pm |
Tuesday | 10am - 6:30pm |
Wednesday | 10am - 6:30pm |
Thursday | 10am - 6pm |
Friday | 10am - 6pm |
Saturday | 10am - 6pm |
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती:
Shortcuts
Category
नवी अर्थक्रांती...
नमस्कार,
नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी स्वामी विवेकानंद, बाबा आमटे आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन १५ ऑगस्ट २०१५ रोजी नवी अर्थक्रांतीची सुरुवात झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, स्टार्टअप, शेती, तंत्रज्ञान, करिअर या विषयांवरील उपयुक्त माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे चालू आहे. युवकांना प्रेरणा देणारे विचार नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून अखंडितपणे जगभरातील लाखो (१० लाखांपेक्षा अधिक) लोकांपर्यंत पोहोचत आहेत. या विचारांनी प्रेरित होऊन आणि उपयोग करून आजवर शेकडो लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, वाढवला आहे.
कोणतीही गोष्ट, काम, जबाबदारी सरकारवर किंवा राज्यकर्त्यांवर न ढकलता परस्पर सहकार्याने ‘आलात तर तुमच्यासोबत नाहीतर, तुमच्याशिवाय’ या तत्त्वावर नवी अर्थक्रांतीचे काम सुरू आहे. नवी अर्थक्रांतीने सर्वसामान्य मराठी तरुणाला चाकोरीतून बाहेर पडण्याची हिंमत दिली. आपल्या पाठीमागे कोणीतरी भक्कमपणे उभं आहे, कितीही अडचण आली तरी मार्ग काढत पुढे जायचं, पण मागे हटायचं नाही ही जिद्द त्यांच्यात निर्माण केली. जगात कोणीही आपली समस्या सोडवली नाही, तरी नवी अर्थक्रांती सोडवेल हा विश्वास लोकांच्या मनात जागवला. ९-१० वर्ष व्यवसाय करायचा फक्त विचार करणारे लोक नोकरी सोडून बिझनेसमध्ये उतरू लागले आहेत. सोशल मिडीयाचा सकारात्मक गोष्टींसाठी कसा वापर केला जाऊ शकतो आणि त्यातून किती मोठा बदल घडवला जाऊ शकतो हे नवी अर्थक्रांतीने सिद्ध करून दाखवले आहे.
पुढील १० वर्षांत १० लाख तरुणांना रोजगार मिळवून देणे, १ लाख उद्योजक घडवणे ह्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आम्ही कार्यरत आहोत. यासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागात व्याख्याने, मार्गदर्शनपर सेमिनार राबवले गेले आहेत. तसेच भाषांतरीत पुस्तके, स्टार्टअप महाराष्ट्र, थेट परदेशी गुंतवणूक यासारखे नवीन उपक्रम घेऊन लोकांच्या सेवेत उपयुक्त ठरण्याची भूमिका चालू आहे. अनेक प्रकल्पावर नवी अर्थक्रांतीचे काम चालू आहे.