15/04/2022
जय जय महाराष्ट्र माझा!!!
जातपात, हेवेदावे, राजकारण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सकारात्मक वातावरण निर्माण करायचा एक प्रयत्न -
जय जय महाराष्ट्र माझा!!!
महाराष्ट्राची संस्कृती, रचना, दैनंदिन जीवनपद्धत, आपले खाद्यपदार्थ अशा वेगवेगळ्या गोष्टी काव्यरुपात सकारात्मक पद्धतीने मांडून आमच्याकडे पाठवा.
आम्ही १ मे '२२ रोजी हा आगळावेगळा काव्यसंग्रह ईबुक स्वरूपात प्रसिद्ध करणार आहोत.
जय जय महाराष्ट्र माझा!!!
महाराष्ट्राचं दर्शन घडवणाऱ्या पंचवीस कवींच्या पन्नास कविता.
महाराष्ट्र वेगळा आहे, सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, सध्या वृत्तमाध्यमांत रंगलेल्या विविध आरोपांमुळे जो महाराष्ट्र दिसतोय तसा तो नाहीये.
आपल्याला खराखुऱ्या संपन्न महाराष्ट्राचं काव्यमय दर्शन घडवायचंय -
जय जय महाराष्ट्र माझा!!!
तुम्ही फक्त एवढंच करायचं - जातपात, हेवेदावे, राजकारण, टीका हे सर्व वादाचे विषय टाळून महाराष्ट्राचं सकारात्मक चित्र दाखवणाऱ्या दोन कविता आमच्याकडे टाईप करून पाठवा. प्रत्येक कवितेची शब्दमर्यादा - २०० शब्द.
सोबत तुमचा फोटो आणि ५० शब्दात स्वतःची माहितीही पाठवा. यासोबतच रु. ३००/- प्रवेश फी गुगल पे/ पेटीएमने ट्रान्स्फर करा.
कविता, फोटो व माहिती पाठवायची तसंच प्रवेश फी भरायची शेवटची तारीख - २५ एप्रिल '२२.
लक्षात ठेवा टीकात्मक, तक्रारवजा सूर नको, आपल्याला आपल्या सादरीकरणातून प्रसन्न वातावरण निर्माण करायचं आहे.
हीच संधी आहे जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत पोचण्याची. तुमची काव्यप्रतिभा जगभर सादर करण्याची. तेही अल्पखर्चात.
जय जय महाराष्ट्र माझा!!!
ईबुक स्वरूपातला आगळावेगळा काव्यसंग्रह - प्रकाशन दिनांक - १ मे '२२
आत्ताच तयारीला लागा. फक्त पंचवीस कवींच्या प्रत्येकी दोन कविता क्षणभरात जगभर पोचणाऱ्या ह्या काव्यसंग्रहात प्रसिद्ध होणार.
जगभरातील अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी हा काव्यसंग्रह विनामूल्य उपलब्ध होईल.
अधिक माहितीकरता संपर्क -
एप्लस ईबुक्स,
निगडी, पुणे - ४४.
फोन - 9423025951
#मराठी #काव्यसंग्रह #कविता #ईबुक