Vihang Publications

Vihang Publications Publishers of classic literature

27/05/2023
माझे आतेबंधू आणि सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रवींद्र गुर्जर यांनी SKY Studio मार्फत घेतलेली ही मुलाखत.
07/11/2022

माझे आतेबंधू आणि सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रवींद्र गुर्जर यांनी SKY Studio मार्फत घेतलेली ही मुलाखत.

सुरुवातीला क्रिकेटची कारकीर्द. नंतर चित्रपट आणि दूरदर्शनसाठी लेखन- दिग्दर्शन. आपले वडील, ख्यातनाम लेखक भा. द. खेर .....

Pre-order will start from 15th of Sept. at Amazon, Flipkart, Book Stores and other online platforms in India.*15 सप्टेंब...
13/09/2022

Pre-order will start from 15th of Sept. at Amazon, Flipkart, Book Stores and other online platforms in India.
*
15 सप्टेंबर पासून Amazon, Flipkart सह भारतातल्या प्रमुख Book Storesमध्ये Pre-order (सवलत नोंदणी) सुरू होत आहे!

ऋषिपंचमी निमित्त -
01/09/2022

ऋषिपंचमी निमित्त -

P U B L I S H E D ! !
11/08/2022

P U B L I S H E D ! !

लवकरच प्रकाशित होत आहे.  . .
11/08/2022

लवकरच प्रकाशित होत आहे. . .

'Manachya Rajyaat' by Anjali Pendse / release date: 15 August 2022
08/08/2022

'Manachya Rajyaat' by Anjali Pendse / release date: 15 August 2022

'मनाच्या राज्यात' - अंजली पेंडसे / 15 ऑगस्टला प्रकाशित होत आहे.मूळ किंमत रु.225 / प्रकाशनपूर्व सवलतीत रु.180 (भारतात पोस...
01/08/2022

'मनाच्या राज्यात'
- अंजली पेंडसे / 15 ऑगस्टला प्रकाशित होत आहे.

मूळ किंमत रु.225 / प्रकाशनपूर्व सवलतीत रु.180 (भारतात पोस्टेजसह)
Contact: 9764846292 (WaP)
* * *
आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, त्याचं लालनपालन, पोषण करतो, संरक्षण करतो, आरोग्य सांभाळतो. त्याचा निकोप विकास व्हावा म्हणून प्रयत्न करतो. हे सगळं आपण मनासाठी करतो का? मनाचा विकास व्हावा, मन प्रगल्भ व्हावं म्हणून आपण प्रयत्न करतो का? मनाची वाढ निकोप व्हावी यासाठी आपण काय करतो? त्यासाठी किती वेळ देतो?
*
प्रख्यात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अंजली पेंडसे लिखित-
दैनंदिन जीवनातल्या अडचणी-ताणतणावांना
दूर सारून मनाची मशागत कशी करावी
याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक:-
15 ऑगस्टला प्रकाशित होत आहे.

‘देह झाला चंदनाचा’चा हिंदी अनुवाद ‘देह बन गई चंदन’ eBook (kindle edition) स्वरूपात प्रकाशित! visit: www.vihangpublicatio...
27/07/2022

‘देह झाला चंदनाचा’चा हिंदी अनुवाद ‘देह बन गई चंदन’ eBook (kindle edition) स्वरूपात प्रकाशित! visit: www.vihangpublications.com / www.rajendrakher.net

https://www.amazon.in/dp/B0B7NWB4GS/

Hindi translation of best-selling Marathi biographical novel on the life of Revered Pandurang Shastri Athavale, founder of Swadhyay Parivar, who introduced universal way of life, way of worship and way of thinking to achieve spiritual height.

‘शक्तिपीठ’ - राजीव पुरुषोत्तम पटेल - इ-बुक प्रकाशित! मार्कंडेय ऋषीकृत शक्तिपीठांच्या स्थापनेवरील भावपूर्ण कादंबरीwww.vih...
26/07/2022

‘शक्तिपीठ’ - राजीव पुरुषोत्तम पटेल - इ-बुक प्रकाशित!
मार्कंडेय ऋषीकृत शक्तिपीठांच्या स्थापनेवरील भावपूर्ण कादंबरी
www.vihangpublications.com

https://www.amazon.in/dp/B0B7KD1KR3

Novel on the life of Rishi Markandeya / मार्कंडेय ऋषीकृत साडेतीन शक्तिपिठांच्या &...

Why Vihang? Contact: +91 020-24358258  /  9764846292
22/07/2022

Why Vihang?
Contact: +91 020-24358258 / 9764846292

वाचलाच पाहिजे, संग्रहात ठेवला पाहिजे; आणि भेटही दिला पाहिजे असा अनोखा ग्रंथ - 'दैनंदिन भगवद्गीता'
21/07/2022

वाचलाच पाहिजे, संग्रहात ठेवला पाहिजे; आणि भेटही दिला पाहिजे
असा अनोखा ग्रंथ -
'दैनंदिन भगवद्गीता'

सर्वश्री सन्माननीय राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, डॉ. वि. मा. बाचल, मा. शिवाजी सावंत, अनिल बळेल, एस्. व्ही. स्वामी, जेरेमी ...
17/05/2022

सर्वश्री सन्माननीय राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, डॉ. वि. मा. बाचल, मा. शिवाजी सावंत, अनिल बळेल, एस्. व्ही. स्वामी, जेरेमी हूवर,
एलिझाबेथ बर्टन यांच्यासह असंख्य देशी-विदेशी वाचक-समीक्षकांनी आणि वृत्तपत्रांनी गौरवलेली भगवद्गीतेवरील वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी.
***
English Translation: THE SONG OF SALVATION
is available on Amazon.com
***
For more info, and to purchase our books online, Visit: www.vihangpublications.com

केवळ अभ्यासकांसाठीच ही पुस्तकं उपयुक्त आहेत असं नाही तर जे स्वतःला भारतीय समजतात आणि सामान्य ज्ञान म्हणूनही शाळा कॉलेजात...
14/05/2022

केवळ अभ्यासकांसाठीच ही पुस्तकं उपयुक्त आहेत असं नाही तर जे स्वतःला भारतीय समजतात आणि सामान्य ज्ञान म्हणूनही शाळा कॉलेजात शिकलेल्या इतिहासापेक्षा वास्तविक इतिहास ज्यांना जाणून घ्यायचा आहे त्यांनी ही पुस्तकं अवश्य वाचली पाहिजेत.
For copy/copies contact:- 9764846292

Or, visit: www.vihangpublications.com for online purchase details

सृष्टीच्या संवर्धनासाठी झिजणार्‍या मार्कंडेयांना वनातील गोगलगाईचंही रुदन ऐकायला यायचं. राणी तर मनुष्य होती. तिच्या वेदने...
13/05/2022

सृष्टीच्या संवर्धनासाठी झिजणार्‍या मार्कंडेयांना वनातील गोगलगाईचंही रुदन ऐकायला यायचं. राणी तर मनुष्य होती. तिच्या वेदनेपेक्षा अधिक वेदना कुणाचीही असणार नव्हती. निद्रिस्त मार्कंडेयांना राणीच्या आर्त किंचाळण्यानं जागृत केलं. ते झट्दिशी उठले. त्यांनी कमंडलूतल्या जलाचं आचमन घेतलं. शुद्धिमंत्र म्हणत ते यज्ञकुंडानजीक आले. यज्ञकुंडातून घृतमिश्रित गंधाचा धूम्र बाहेर पडत होता. मार्कंडेयांनी अग्नीचं स्मरण करीत घृताची आहुती घातली. सप्तज्वाला क्षणात भडकल्या. नित्याप्रमाणे त्यांची एकाग्रता साधली गेली. त्यांच्या अंतर्चक्षूंसमोर कालभैरव उभे होते. मार्कंडेयांनी रुद्राचा आणि कालभैरवाचा हवि अर्पण केला.
एव्हाना शिष्यगण जागला होता. मार्कंडेयांच्या हालचालींवरून त्यांना परिस्थितीचं भान आलं. सहा शिष्यांनीही रुद्राचं ध्यान करीत यज्ञकुंडात आहुती घातली. ज्वाला कडाडल्या. त्या पीत, हिरव्या, तांबूस ज्वालेतून रुद्र प्रकटले. त्यांबरोबर त्यांचे गणही निघाले. . .
Call for the copy/copies: 9764846292
*
www.vihangpublications.com

राजेन्द्र खेर यांचे गीतेच्या तत्त्वज्ञानावरील ग्रंथ:-1) ‘गीतांबरी’ (कादंबरी) / English Translation: 'The Song of Salvati...
09/05/2022

राजेन्द्र खेर यांचे गीतेच्या तत्त्वज्ञानावरील ग्रंथ:-
1) ‘गीतांबरी’ (कादंबरी) / English Translation: 'The Song of Salvation'
2) ‘दैनंदिन भगवद्गीता’ (365 दिवस वाचण्यासाठीचा वैचारिक ग्रंथ/ पृष्ठे: 372)
3) ‘गीताशास्त्र’ (पृष्ठे: 640)
4) ‘बृहत् गीताशास्त्र’ (पृष्ठे: किमान 1600/ 4 खंड /प्रकाशित झाले तर!)
5) 365-Day Lectures on Bhagavad-Gita on Storytel

गीता-प्रसारकार्याबद्दल राजेन्द्र खेर यांना नुकताच गीताधर्ममंडळ, पुणे यांचा ‘गीतागौरव पुरस्कार’ मिळाला. माझ्या या कार्याची आपणहून दखल घेतल्याबद्दल गीता धर्ममंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांचा मी अत्यंत आभारी आहे.

ही कादंबरी लिहिण्यासाठी राजेन्द्र खेरांनी मूळ महाभारताच्या दोन आवृत्त्यांसह (Bhandarkar/Neelkanthi) जवळपास 25,000 पृष्ठा...
08/05/2022

ही कादंबरी लिहिण्यासाठी राजेन्द्र खेरांनी मूळ महाभारताच्या दोन आवृत्त्यांसह (Bhandarkar/Neelkanthi) जवळपास 25,000 पृष्ठांचं वाचन केलं! त्यामुळे मूळ महाभारत समजून घ्यायचं असेल तर ही कादंबरी वाचलीच पाहिजे!
For copy/copies, Contact: 9764846292

हे नैराश्य नसून नव्या क्षितिजाकडे जाण्याची ओढ आहे!!******प्रकाशन व्यवसाय करणं आणि तोही व्रतस्थपणे करणं ही गोष्ट किती अवघ...
07/05/2022

हे नैराश्य नसून नव्या क्षितिजाकडे जाण्याची ओढ आहे!!
******
प्रकाशन व्यवसाय करणं आणि तोही व्रतस्थपणे करणं ही गोष्ट किती अवघड आहे हे एक प्रकाशकच जाणू शकतो. पुस्तकांच्या विक्रीतून लेखकाला मिळणारी रॉयल्टी म्हणजे एक न सांगण्यासारखाच अनुभव! तीन-तीन, चार-चार वर्षं केलेले लेखन-परिश्रम आणि त्यातून प्राप्त होणारा नफा/रॉयल्टी हे प्रमाण प्रचंड व्यस्त आहे हे सांगणं नकोच!

गेली जवळपास पंचवीस वर्षं आम्ही हा व्यवसाय अनेक पथ्य पाळून आणि स्वत:वरच अनेक नियम लादून कसाबसा करत आलो आहोत. सर्वप्रकारच्या निष्ठा हा व्यवसाय करताना सांभाळल्या. कुठेही तडजोड केली नाही. किंमती कमी ठेवल्या. अनेक प्राचीन अस्पर्शित विषय आम्ही लिहिले आणि प्रकाशित केले. पण एकंदर विक्रीचा व्यावसायिक अनुभव यथातथाच!

याउलट इंग्रजीमधे अशाच तर्‍हेच्या प्रकाशित झालेल्या कादंबर्‍यांना आर्थिकदृष्ट्या अल्पावधीत अमाप यश मिळालेलं दिसतं. याचं कारण म्हणजे इंग्रजी प्रकाशन संस्थांमधे केलं जाणारं टीमवर्क आणि सोशल मीडिया बांधणी. मराठीमधील आमचा अनुभव म्हणजे दुसरं टोक! बरं, पुतकांचा दर्जा त्यांच्यापेक्षा कमी म्हणावा का? ‘धनंजय’, ‘याज्ञवल्क्य’, ‘वैदिक’ ‘मांदार्य’ ‘देह झाला चंदनाचा’ ‘बिंदूसरोवर’ ‘गीतांबरी’ ‘पितामह’ ‘आर्य भारत खंड’ ‘गीताशास्त्र’ ‘दैनंदिन भगवद्गीता’ ‘देवांच्या राज्यात’ आदी आम्ही प्रकाशित केलेल्या जवळपास पन्नास कादंबर्‍या आणि पुस्तकं आज मान्यताप्राप्त आहेत. या सर्व पुस्तकांच्या आवृत्त्या निघतात, परंतु; त्यातून फार मोठा नफा होत नाही. कारण किंमती+कमिशन!

आज दोनशे पानांच्या पुस्तकाची किंमत रु.250 किंवा रु.300 सुद्धा ठेवली जाते. तेवढ्या पानांसाठी आमच्या किंमती रु. 150च्या आसपास असतात! त्यात काही वितरकांनी आम्हाला बुडवलंही!

पुस्तक खपवण्यासाठी वर्तमानपत्रांमधून एखाद्या पुस्तकाची जाहिरात(बाजी) करणं हे आमच्यासारख्या छोट्या प्रकाशन-कुटिरोद्योगासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून सोशल मीडियाचा थोडाफार वापर करावा लागातो. पण या प्लॅटफॉर्म्सवर आमच्या स्वतंत्र संस्थेची जाहिरात केली तरी काही लोकांना ते आवडत नाही!!

या लेखनातून निराशा व्यक्त करायची नसून किंवा कुणाकडून सांत्वनपर शब्दाची अपेक्षा नसून अथवा कोणत्याही प्रकारच्या सहाय्याची अपेक्षा नसून काही काळ आम्ही अशा प्लॅटफॉमर्सवरून जाहिरात करणार आहोत, एवढंच सांगायचं आहे.

प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा स्टॉक संपल्यानंतर एकूण रागरंग बघून पुढे ही ‘विहंग प्रकाशन’ संस्था चालू ठेवायची का नाही याचाही आम्ही गंभीरपणे विचार करणार आहोत.

आमची बरीचशी पुस्तकं आता प्रकाशनासाठी ‘मेहता पब्लिशिंग हाउस’ला आधीच दिली आहेत.

पण, प्रकाशनाचा व्याप कमी करून नवं क्षितिज - संगीत आणि इतर काही विषयांसाठी व्यावसायिक दृष्ट्या यू-ट्यूब चॅनेल, पॉडकास्टिंग, वैचारिक शिबिरं वगैरे माध्यमं हाताळायचं मात्र यापुढे ठरवलं आहे.

‘देवांच्या राज्यात’ (6वी आवृत्ती) थोड्याच प्रती शिल्लक असल्यामुळे सवलत योजना आखली आहे. या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाच्य...
07/05/2022

‘देवांच्या राज्यात’ (6वी आवृत्ती) थोड्याच प्रती शिल्लक असल्यामुळे सवलत योजना आखली आहे. या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाच्याही प्रतीही संपत आल्या आहेत. अर्थातच नवीन आवृत्त्या जेव्ह-केव्हा प्रकाशित होतील तेव्हा किंमत पुष्कळच अधिक असेल! या योजनेचा आपण त्वरित लाभ घ्यावा ही विनंती. Contact: 9764846292 / 020-24358258

योगायेग! आज परशुराम जयंतीलाच राजीव पुरुषेत्तम पटेल यांच्या ‘वैदिक’ या भगवान परशुरामांच्या जीवनावरील बेस्ट-सेलर कादंबरीचं...
03/05/2022

योगायेग!
आज परशुराम जयंतीलाच राजीव पुरुषेत्तम पटेल यांच्या ‘वैदिक’ या भगवान परशुरामांच्या जीवनावरील बेस्ट-सेलर कादंबरीचं (e-pub) eBook प्रकाशित झालं!

https://www.amazon.in/dp/B09ZF69GYS

वैदिक / Vaidik: भगवान परशुरामांच्या जीवन-कार्यावर आधारित चित्तवेधक कादंबरी (Marathi Edition) eBook : पटेल / Patel, राजीव पुरुषोत्तम / Rajeev: Amazon...

याज्ञवल्क्य - राजीव पु. पटेल - eBook PUBLISHED on Amazon****अनेक उपकथानकं, योगक्रिया, तंत्रविद्या, अघोरी उपासना, प्राचीन...
22/04/2022

याज्ञवल्क्य - राजीव पु. पटेल - eBook PUBLISHED on Amazon
****
अनेक उपकथानकं, योगक्रिया, तंत्रविद्या, अघोरी उपासना, प्राचीन सभ्यतेची वर्णनं, अनेक आव्हानं, राग-द्वेष, स्पर्धा, अद्भुतता अशा विविधांगांनी नटलेली
‘वैदिक’कार राजीव पु. पटेल लिखित महर्षी याज्ञवल्क्यांच्या जीवनावरील विचारसमृद्ध कादंबरी.

याज्ञवल्क्य Yadnyavalkya: महर्षी याज्ञवल्क्यांच्या तेजस्वितेनं भारलेल्या जीवनावरील आशयसमृद्ध, विचारसमृद्ध कादंबरी / Nove...

राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित ऋषीय संस्कृतीवरील ही एक अद्भुतरम्य कादंबरी - eBook PUBLISHED!शक्ती ऋषीनं कल्माषपाद राजाला शा...
14/04/2022

राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित ऋषीय संस्कृतीवरील ही एक अद्भुतरम्य कादंबरी - eBook PUBLISHED!
शक्ती ऋषीनं कल्माषपाद राजाला शाप देऊन एक क्रूरकर्मा राक्षस जन्माला घातला तर विश्वामित्रांनी तोच राक्षस वसिष्ठकुलाचा उच्छेद करण्यासाठी पोसला... आणि मग सुरू झालं एक भीषण नाट्य!
‘स्वर्ग अशी कुठली देवलोकांची वसाहत नाही, की ती विस्थापित करून भूलोकी वसवावी! स्वर्ग हे एक वैचारिक, तसंच आचरणाचं आणि उन्नतवृत्तीचं प्रतीक आहे! स्वर्ग ही एक संस्कृती आहे! स्वर्ग निर्माण करण्यासाठी जो विवेक लागतो तो वेदवाङ्मयानं परिपुष्ट होत असतो. पृथ्वीतलावरच्या सर्व सुखांचं आणि यशस्वितेचं रसपान करण्यासाठी पराकोटीचा पुरुषार्थ आणि तपस्विता लागते. अनेक जन्म सतत ती टिकवल्यास उन्नत जीवाला जेव्हा पृथ्वीलोकावर भोगण्यासारखं काही उरत नाही तेव्हा तशा मनुष्यांसाठी स्वर्गभोग सुरू होतात! स्वर्गीय भोग हे केवळ बघायचे असतात! देवता त्या भोगांचा आनंद घेतात आणि आपण ते बघून त्यात तृप्ती घ्यायची असते! ज्या क्षणी मनुष्यजीवाला ते भोग स्वत: घ्यावेसे वाटतात त्याच क्षणी त्याची पाठवणी भूलोकावर होते.’

ऋषीय संस्कृतीवरील ही एक अद्भुतरम्य कादंबरी - शक्त

कै. भा. द. खेर लिखित संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भावपूर्ण कादंबरी - 'तुका झाला पांडुरंग' - आता e-book (e-pub) मधे...
13/04/2022

कै. भा. द. खेर लिखित संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भावपूर्ण कादंबरी - 'तुका झाला पांडुरंग' - आता e-book (e-pub) मधे उपलब्ध

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भावपूर्ण का’...

झाशीच्या राणीसाहेब लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी - ‘समरसौदामिनी’ लेखक -  भा. द. खेर - (e-pub) e-book प्रक...
11/04/2022

झाशीच्या राणीसाहेब लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी - ‘समरसौदामिनी’ लेखक - भा. द. खेर - (e-pub) e-book प्रकाशित!

This is the glorious story of a SamarSaudamini - the Queen of Jhansi Laxmibai. The heroism that even the heroic men could not have achieved, this heroic woman achieved in a short period of time at a young age. Even the eyes of English historians were dazzled by her heroic brilliance. Future gener...

'Bindu Sarovar' is in 'kdp select program'. One can get it with different offers.
07/04/2022

'Bindu Sarovar' is in 'kdp select program'. One can get it with different offers.

The Bindu Sarovar: Supernatural Thriller eBook : Kher, Rajendra: Amazon.in: Kindle Store

भा. द. खेर लिखित भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील 'सारथी सर्वांचा' या बेस्ट-सेलर कादंबरीचं e-book प्रकाशित!
07/04/2022

भा. द. खेर लिखित भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील 'सारथी सर्वांचा' या बेस्ट-सेलर कादंबरीचं e-book प्रकाशित!

कै. भा. द. खेर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली...

Address

6/Anandi Niwas, Mitranand Soc, Off B. D. Kher Square, Anand Nagar, Sinhagad Road, Pune/51
Pune
<<NOT-APPLICABLE>>

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vihang Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vihang Publications:

Videos

Share

Category


Other Publishers in Pune

Show All