देहू टाइम्स

देहू टाइम्स " देहू टाइम्स " हे युवकांना स्थानिक व्य?
(1)

" देहू टाइम्स " हे युवकांना स्थानिक व्यासपीठ निर्माण करून व्यक्त होण्याची संधी देत आहे. आज जागतिक पातळीवरती देशाचं राजकारणाची दिशा आणि त्यासाठी स्थानिक पातळीवर घडत जाणाऱ्या बदलासाठी आपण कसे तयार होऊ शकतो या साठी हा एक प्रयत्न आहे.डिजिटल इंडिया कडे मार्गस्थ होत असताना अनेक प्रश्न आहेत.
त्या पडलेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकाकडे उत्तर तयार आहेत ,आणि ते उत्तर मांडण्यासाठी आम्ही देतो तुम्हाला तु

मच्या हक्काचा व्यासपीठ .

पेज like करा share करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा invite करा पेज like करण्यासाठी तुम्हालाही या प्रकल्पाचा भाग होण्याची इच्छा असेल तर नक्की संपर्क करा. अधिक माहिती साठी संपर्क करा 9892326538

*सिलंबम खेळाच्या राज्य स्तरीय स्पर्धा यशस्वी रीत्या संपन्न.* महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने दिनांक 8...
13/09/2023

*सिलंबम खेळाच्या राज्य स्तरीय स्पर्धा यशस्वी रीत्या संपन्न.*

महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने दिनांक 8/9 2023 ते 10 सप्टेंबर 2023 रोजी कामशेत कान्हे फाटा साई धाम मावल येथे राज्य स्तरीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील खेळाडू सहभागी झाले होते.

प्रमुख्याने लाठी-काठी, तलवारबाजी या खेळ प्रकारात खेळाडूंनी सहभाग घेऊन आपले कौशल्य सादर केले.
या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री संजय बनसोडे आणि सचिव श्री किरण अडागळे यांनी केले होते.
अनुक्रमे पिंपरी चिंचवड, मुंबई, पुणे ग्रामीण या संघाने प्रथम, द्वितीय आणि तृतीय, क्रमांक पटकावला.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना कर्नल शिंदे वडगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष मयूर ढोरे द जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास ताटे मुंबई सिलंबम असोसिएशन चे अध्यक्ष प्रदिप ओव्हाल यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले यावेळी स्पर्धेचे पंच म्हणून स्मिता धिवार अजय नवले रविराज चखाले सुदर्शन सूर्यवंशी केतन नवले साक्षी सैनी, शिवम बाबर, श्रेयश चव्हान, गणेश चखाले, प्रिया सैनी, अभय नवले, भार्गव देडे, अर्चना अडागले, शिवदत्त सिंघ, उज्वल भोसले आदिंनी कार्य केले.

28/08/2023

देहूमध्ये राहणाऱ्या १८-२६ वयोगटातील कोणीही स्टार्टअपमध्ये इच्छुक आहेत का?
Kindly dm or comment..!!

आपल्या वाचन संस्कृतीचे मूल्यमापन करण्याची हीच वेळ आहे.
23/01/2023

आपल्या वाचन संस्कृतीचे मूल्यमापन करण्याची हीच वेळ आहे.

#वाचन_संस्कृती

माझा मित्र , गणेश कुलकर्णी याने वसई स्टेशनवर काल काढलेला फोटो आहे. वसई हून राजधानीने गोव्याला जाणारे हे परदेशी कुटुंब आहे. त्याने हा फोटो पाठविला व खाली लिहिले "ही वाचन संस्कृती रुजवण्यात आपण कमी पडलो. वाचनात गुंग असलेल्या दोन्ही मुलींच्या वडिलांच्या हातात मोबाईल आहे,असे वाटेल पण नीट पाहिले तर ते किंडल आहे हे दिसेल.🖤

©️रविंद्र कुलकर्णी सरांच्या वॉलवरून साभार....✍️

*प्रजावार्ता : देहूगाव येथील तरुणीने सायकलवरून ८ हजार किलोमीटरचा प्रवास करत पूर्ण केली बारा ज्योतिर्लिंग यात्रा* ➡️ *'यो...
16/01/2023

*प्रजावार्ता : देहूगाव येथील तरुणीने सायकलवरून ८ हजार किलोमीटरचा प्रवास करत पूर्ण केली बारा ज्योतिर्लिंग यात्रा*

➡️ *'योग मेरा कर्म है, एकता मेरा धर्म है' या संकल्पनेद्वारे देशातील आठ राज्यात केली योगाविषयी जनजागृती*

*सविस्तर बातमीसाठी :* https://prajavarta.com/A-girl-from-Dehugaon-has-completed-twelve-Jyotirlinga-Yatra-by-traveling-8-thousand-kilometers-on-a-bicycle?id=10492

*ॲप डाउनलोड करण्यासाठी :-* https://bit.ly/3mEyE1V

08/10/2022

आता प्रत्यक्ष कविता ऐकायला या.. या काव्य उत्सवात सहभागी व्हा...🙏

इंद्रायणी आहे साक्षीला हा उपक्रम गेली तीन वर्षे अव्याहतपणे राबवून मराठी कवितेचे व्यासपीठ नवोदितांना उपलब्ध करून देणारे आ...
18/09/2022

इंद्रायणी आहे साक्षीला हा उपक्रम गेली तीन वर्षे अव्याहतपणे राबवून मराठी कवितेचे व्यासपीठ नवोदितांना उपलब्ध करून देणारे आमचे मित्र डाॅ.अहेफाज मुलाणी यांचा "काही काटे काही फुले "
हा काव्यसंग्रह आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते अतिशय सुंदर सोहळ्यात प्रकाशित झाला...

या याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून व वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अखंडपणे सुरू असणाऱ्या विशेष कार्याबद्दल व सेवाभावी सामाजिक कार्याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

अभंग प्रतिष्ठानच्या वतीने हा सन्मान अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, उपाध्यक्ष, सुजित मोरे,सचिव अमित गायकवाड, अभंग प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष रवींद्र काळोखे यांनी स्वीकारला. तर वाचनवेड संस्थेच्या वतीने किरिटी मोरे व मयूर सेठ यांनी हा सन्मान स्वीकारला.

03/08/2022

देहू येथील अत्यंत उच्च प्रोफाइल असलेल्या सामाजिक व्यक्तींना जुगार खेळताना अटक..!!

Address

Gatha Mandir Road
Pimpri
412109

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919892326538

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when देहू टाइम्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to देहू टाइम्स:

Videos

Share