Pimpri Chinchwad Times

Pimpri Chinchwad Times "पिंपरी चिंचवड टाइम्स" राजकारण व प्रशासनातील वास्तव सडेतोडपणे मांडणारी वेबसाईट

पुण्यातील अंमली पदार्थाविरोधात आवाज उठवणारे सय्यदनूर इराणी यांना अखेर जामीन मंजूरhttps://bitly.ws/XVpx
20/10/2023

पुण्यातील अंमली पदार्थाविरोधात आवाज उठवणारे सय्यदनूर इराणी यांना अखेर जामीन मंजूर

https://bitly.ws/XVpx

पुणे, दि. २० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पुण्यातील शिवाजीनगर भागातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात स....

रांजणगावातील लखोबा लोखंडे किरण खेडकरवर गुन्हा दाखल; लोणीकंद पोलिसांची पीडितेला वाईट वागणूकhttps://bitly.ws/WPXp
09/10/2023

रांजणगावातील लखोबा लोखंडे किरण खेडकरवर गुन्हा दाखल; लोणीकंद पोलिसांची पीडितेला वाईट वागणूक

https://bitly.ws/WPXp

पुणे, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) - प्रेमविवाहानंतर दुसरे लग्न करणाऱ्या आणि आधीच्या पत्नीला दोन मुली असूनही तिचा आ....

02/10/2023
रोहित पवारांची एंट्री.....अब आयेगा मजा!
25/09/2023

रोहित पवारांची एंट्री.....अब आयेगा मजा!

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात वरून आलबेल आणि आतून जोरदार संघर्ष.....
11/09/2023

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात वरून आलबेल आणि आतून जोरदार संघर्ष.....

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या जलतरण स्पर्धेत सँडविक एशिया विजेते, तर टाटा मोटर्स व बजाज ऑटो उपविजेतेhttps://rb.gy/4nu2o    ...
30/08/2023

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या जलतरण स्पर्धेत सँडविक एशिया विजेते, तर टाटा मोटर्स व बजाज ऑटो उपविजेते

https://rb.gy/4nu2o

पिंपरी, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) - औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६० व्या जलतरण स्पर्धेत सँडविक एशियाने विजेतेपद, ....

भोसरी मतदारसंघातील एकमेव बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस जंगी कार्यक्रमांचे आयोजनhttp://bit...
13/08/2023

भोसरी मतदारसंघातील एकमेव बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस जंगी कार्यक्रमांचे आयोजन

http://bitly.ws/RLkS

पिंपरी, दि. १३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) - भोसरी विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेले एकमेव माजी नगर...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडीतील मुलांच्या शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक करा; शिवसेनेचे विभागप्रमुख संदीप भालके...
04/08/2023

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडीतील मुलांच्या शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक करा; शिवसेनेचे विभागप्रमुख संदीप भालके यांची मागणी

पिंपरी, दि. ४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) - वाल्हेकरवाडी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिक्षकांची नेमणूक करण....

वाल्हेकरवाडीत प्राधिकरणाच्या जागेवर जिजाऊ दवाखान्याची उभारणी करा – शिवसेनेची मागणीhttps://pimprichinchwadtimes.in/?p=210...
30/07/2023

वाल्हेकरवाडीत प्राधिकरणाच्या जागेवर जिजाऊ दवाखान्याची उभारणी करा – शिवसेनेची मागणी

https://pimprichinchwadtimes.in/?p=2105

पिंपरी, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वाल्हेकरवाडी येथील दवाखान्याची इमारत नादुरुस्त ....

पिंपरी चिंचवडचा हाच का तो विकास आणि हीच का ती स्मार्ट सिटी; आम आदमी पार्टीचा सवालपिंपरी (पिंपरी चिंचवड टाइम्स) - पिंपरी-...
23/07/2023

पिंपरी चिंचवडचा हाच का तो विकास आणि हीच का ती स्मार्ट सिटी; आम आदमी पार्टीचा सवाल

पिंपरी (पिंपरी चिंचवड टाइम्स) - पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करूनही पिंपळेनिलखमधील रक्षक चौक, वाकडमधील कस्पटेवस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीने पिंपरी-चिंचवडचा हाच का तो विकास आणि हीच का ती स्मार्ट सिटी?, असा सवाल केला आहे.

यासंदर्भात आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "स्मार्ट सिटी कामाच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात. याबाबत अनेकदा तक्रार करूनही महापालिकेत प्रशासक राज असल्याने अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी करावी. या सर्व प्रकाराचा शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त करत आहोत. येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही तर खड्ड्यांमध्ये झाडे लावू अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांच्या नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे."

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धेत टाटा मोटर्सला विजेतेपदपिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा...
23/07/2023

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धेत टाटा मोटर्सला विजेतेपद

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व स्पर्धांचा पारितोषक वितरण शास्त्रीनगर येथील पूना गोल्फ क्लबमध्ये शुक्रवारी (दि. २१) पार पडला. स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद टाटा मोटर्सला, तर उपविजेतेपद आकुर्डीतील बजाज ऑटोने पटकावला. टाटा मोटर्सकडून तुषार कोंडे यांनी तर बजाज ऑटोकडून अतुल काळोखे विजेते व उपविजेतेपदाचा करंकड स्वीकारला.

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ५९ व्या स्पर्धा ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत संपन्न झाल्या. योगा, वेटलिफ्टिंग, बेस्ट-फिजिक, टेबल-टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, सिंहगड क्लाइंबिंग, पोहणे, क्रिकेट अशा विविध १६ खेळांच्या स्पर्धेत ४८ कंपन्यांच्या जवळजवळ ७०० पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग उल्लेखनीय होता. या सर्व स्पर्धांना टाटा मोटर्स, बजाज ऑटो, प्राज, एसकेएफ, ॲटलास कॉपको, सँडविक, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, महिंद्रा अँड महिंद्रा व इशारे हे पुरस्कर्ते लाभले.

या स्पर्धांचे पारितोषिक वितरण शुक्रवारी पार पडले. महाराष्ट्र रणजी ट्रॉफी खेळाडू व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कमिटी सदस्य रणजित खिरीड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद टाटा मोटर्स (३६ गुण) व उपविजेतेपद बजाज ऑटो आकुर्डी (२१ गुण ) यांनी पटकावले. टाटा मोटर्सकडून तुषार कोंडे यांनी विजेतेपदाचा करंडक, तर बजाज ऑटो, आकुर्डीकडून अतुल काळोखे उपविजेतेपदाचा करंडक स्वीकारला. यावेळी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी व ज्येष्ठ खेळाडू किसनराव गायकवाड, अविनाश जोशी आदी उपस्थित होते.

रणजित खिरीड यांनी क्रिकेट खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळण्यासाठी नवीन उपक्रम चालू केल्याचे सांगितले. ज्याचा फायदा सर्वांना होणार असल्याचे ते म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष राजीव नागेशकर यांनी संस्थेच्या खेळाच्या व्यासपीठ सर्व कामगारांना उपयुक्त ठरत असून, खेळातून कामगार आपली प्रतिभा दाखवू शकतात, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र कदम यांनी केले. प्रदिप वाघ यांनी लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले. हरी देशपांडे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या आयोजनासाठी विजय हिंगे, कौस्तुभ नाडगोंडे, श्रीनिवास मोरे यांनी परिश्रम घेतले.

कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार; भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले पदग्रहण पिंपरी (पिंपरी चिंचवड टाइम्स) -...
23/07/2023

कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार; भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले पदग्रहण

पिंपरी (पिंपरी चिंचवड टाइम्स) - दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्याप्रमाणेच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी रविवारी केले.

भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड करण्यात आली आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये त्यांचा पदग्रहण सोहळा रविवार पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, पिंपरी-चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले, "पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा वटवृक्ष तयार झाला आहे. शहराध्यक्षपदाच्या काळात पक्षाचा हा वटवृक्ष जोपासण्याचे काम करणार. हा वटवृक्ष कायम फुलत ठेवण्याची मी कार्यकर्त्यांना ग्वाही देतो. पक्षाचा प्रमुख म्हणून काम करताना सर्वगुणसंपन्न वाटत नसेल, तर वरिष्ठ नेत्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. कुठे चुकलो तर माझी कानउघाडणी करावी. मनात द्वेष न ठेवता पक्ष वाढीचे काम करत राहणार आहे. पक्षात काही मतभेद असले तरी मनभेद होऊ देणार नाही. राज्यातील व शहरातील सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी दिली आहे. सचोटीने व प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले."

माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी, सचिन साठे, विकास डोळस, अमित गोरखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले. सूत्रसंचालन राजू दुर्गे यांनी केले. काळूराम बारणे यांनी आभार मानले.

19/07/2023

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची निवड

19/07/2023

अजित पवार सत्तेत सहभागी होताच त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार राजकारणात सक्रिय

19/07/2023

अजित पवारांचे बंड दिवाळीनंतर होणार होते. पण महाविकास आघाडीच्या भितीने वेळेपूर्वीच केला उठाव

19/07/2023

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड

18/07/2023

अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी

18/07/2023

२०२४ ला विरोधकांची इंडिया आणि सत्ताधारी भाजपची एनडीए अशी लढत

17/07/2023

सुनील गव्हाणे, इम्रान शेख, काशिनाथ जगताप, प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर, शिला भोंडवे

17/07/2023

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची पिंपरी-चिंचवड शहरासाठी कार्यसमिती जाहीर
त्यामध्ये ९ जणांचा समावेश

17/07/2023

राष्ट्रवादीत चाललेय काय?

अजित पवार आमदारांना घेऊन सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या भेटीला

चिंचवड मतदारसंघात भाजपची टिफिन बैठक; कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवण्याचा संकल्पपिंपरी (पिंपरी चिंचवड टाइम्स) - भाजपच्...
17/07/2023

चिंचवड मतदारसंघात भाजपची टिफिन बैठक; कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवण्याचा संकल्प

पिंपरी (पिंपरी चिंचवड टाइम्स) - भाजपच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोदी@९ महाजनसंपर्क अभियानांतर्गत टिफिन बैठक उत्साही वातावरणात पार पडली. भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या पुढाकाराने झालेल्या या टिफिन बैठकीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना व महत्त्वाकांक्षी निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी कामगिरीसाठी "मोदी@९महा-जनसंपर्क अभियान" राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघात रावेतमध्ये टिफिन बैठकआयोजित करण्यात आली.

यावेळी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजपा अजित कुलथे, शहराध्यक्ष सांस्कृतिक आघाडी भाजपा धनंजय शाळीग्राम, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मंडलअध्यक्ष योगेश चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेक बारणे, सुरेश भोईर, संतोष कांबळे, सागर आंघोळकर, विनायक गायकवाड, सिद्धेश्वर बारणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नीता पाडळे, मोनाताई कुलकर्णी, मनीषा पवार, आरतीताई चोंधे, उषा मुंढे, जिल्हा नियोजन समिती सदस्य भारती विनोदे, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, महेश जगताप, संदीप नखाते, गोपाळ माळेकर, संदीप गाडे, विठ्ठल भोईर, विभिषण चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, रवींद्र देशपांडे सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, कुंदा भिसे, कविता दळवी, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, तानाजी बारणे, गणेश कस्पटे, नवनाथ ढवळे, सखाराम रेडेकर, संतोष ढोरे, सखाराम नखाते, सनी बारणे, अजय दूधभाते, शिवाजी कदम, संजय भिसे, राहुल जवळकर प्रमोद पवार, प्रकाश लोहार, आप्पा ठाकर, कैलास सानप, दिलीप तनपुरे, प्रसाद कस्पटे, दिगंबर गुजर, रणजित कलाटे, दीपक भोंडवे, रमेश काशीद, जवाहर ढोरे, युवराज ढोरे, संकेत कुटे, सरचिटणीस चिंचवड किवळे मंडल रवींद्र प्रभुणे तसेच भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, पेज प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

टिफिन बैठकीबाबत भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य शंकर जगताप म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना व महत्त्वाकांक्षी निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यानिमित्ताने केला आहे. शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले."

17/07/2023

राजकारणाचा चिखल; चिंचवड, भोसरी, पिंपरीत होणार बहुरंगी लढती

पिंपरी (भीमराव पवार) - राज्याच्या राजकारणाचा चिखल झाल्यानंतर तयार झालेल्या नव्या राजकीय समीकरणातून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गुंतागुंत निर्माण झाली आहे. ती महापालिका निवडणुकीमध्ये कशी सोडवणार?, हा खरा प्रश्न आहे. भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या सत्ताधारी पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी सध्या तरी पुढचे पुढे पाहू, असे धोरण स्वीकारलेले आहे. पण स्थानिक नेत्यांनी आतापासूनच अनेक दावे-प्रतिदावे करण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण भविष्यात कसे राहील, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला तरी सत्ताधारी पक्षातीलच संभाव्य लढतींनी सामान्य मतदारांचे डोके गरगरायला लागले आहे. महापालिका निवडणुकीचा विचार केला तर मतदारांना गुंगीच येईल, अशी परिस्थिती राज्यातील राजकीय चिखलामुळे निर्माण झाली आहे. भाजप-शिंदे गट-अजित पवार गट महायुती विरूद्ध काँग्रेस-शरद पवार गट-उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी असा सरळ सामना गृहित धरला तरी याच पक्षांमधील बंडोबांना निवडणूक लढवण्याची उबळ येणार हे नक्की आहे. त्यातच राज ठाकरे यांची मनसे, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, एमआयएम आणि नव्याने आलेला बीआरएस या पक्षांमुळे लढती रंगतदार होणार आहेत.

तीनही विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास भाजपकडे चिंचवड आणि भोसरी हे दोन आणि राष्ट्रवादीकडे पिंपरी हा एक मतदारसंघ अशी विभागणी आहे. जागा वाटपात विद्यमान आमदारांच्या पक्षालाच त्या जागा जातील, असे गृहित धरले तरी आमदारकीचे स्वप्न रंगवणाऱ्या आणि उमेदवारीचे देव पाण्यात बुडवून ठेवलेल्यांना कसे आवरणार, हाही प्रश्न आहे. धक्कादायक बाब म्हणजे चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात अजित पवार गटातील इच्छुकांना भाजपच्या उमेदवारासाठी सतरंज्या उचलाव्या लागतील. या इच्छुकांचे ऐनवेळी इरादे बुलंद झाले तर बहुरंगी लढत अटळ आहे. पिंपरी मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांना किमान पक्षात तरी सध्या स्पर्धक दिसत नाही.

भोसरी मतदारसंघातील माजी आमदार विलास लांडे आणि चिंचवड मतदारसंघातील शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे काय करणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे. हे दोघे सध्या कोणत्याच राजकीय पक्षात नसल्यासारखे वागत आहेत. दोघांनी अधिकृतपणे कोणत्याही गटाचा त्यागही केलेला नाही. लांडे अजित पवार गटांसोबत आणि कलाटे शिंदे गटासोबत गेल्यास दोघांनाही भाजपची तळी उचलावी लागणार आहे. हे त्या दोघांनाही कदापि मान्य होणार नाही. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणामुळे चिंचवड आणि भोसरी या दोन्ही मतदारसंघात चांगलीच राजकीय मजा येणार आहे.

पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत आणि भोसरी मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक रवि लांडगे यांच्याकडे शहराच्या राजकारणातील "डार्क हॉर्स" म्हणून पाहिले जाते. दोघेही तरूण व तडफदार आहेत. त्यांची राजकीय पावले कशी पडतात, ऐनवेळी उठाव घेतात का ते बघायचे? भोसरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आमदार झाल्यापासून अनेकांचे पत्ते कापलेले आहेत. चर्चेत राहण्यासाठी त्यांनी थेट अजित पवार यांच्यासोबतच अनेकदा पंगा घेतला आहे. आता अजित पवारच भाजबसोबत आले असून, उद्या ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यास महेश लांडगे यांची अडचण होऊ शकेल.

चिंचवड मतदारसंघात भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही. पण त्याचा फायदा राष्ट्रवादीला आजपर्यंत उठवता आला नाही. या मतदारसंघातील राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट. आता हा गटच भाजपसोबत आला आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या सध्या आमदार असल्या तरी पक्षाचा प्रमुख चेहरा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप हेच आहेत. सत्ताकारणात त्यांना वारंवार डावलणे पक्षाला परवडणारे नाही. अनेकदा मिळालेल्या "ब्रेक के बाद" शंकर जगताप यांना संधी मिळाली तरी ते किती उभारी धरतात यावरही बरेच काही अवलंबून राहील. या मतदारसंघात राहुल कलाटे हे कोणताही झेंडा घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. समस्या फक्त राष्ट्रवादीच्या नाना काटे यांची होऊ शकेल.

16/07/2023

आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक

पिंपरी : आयटी कंपन्यांमधील कर्मचारी रात्रीच्या वेळी घरी जात असताना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी येथे दबा धरून बसलेल्या एका अल्पवयीन मुलासह चौघांना पोलिसांनी पकडले आहे. शनिवारी (दि. १५) पहाटे दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

वेंकटेश सुरेश नाईक (वय २४), चेतन काकासाहेब वाघमारे (वय २३), शेखर काळूराम जांबूरे (वय १९, तिघे रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनायक घारगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीतून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काहीजण संशयितपणे थांबले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले. या टोळीतील एकजण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक तलवार, दोन कोयते, मिरची पूड, दोन मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी रात्रीच्या वेळी या मार्गाने जातात. त्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा कट केल्याची कबुली आरोपींनी दिली. वाकड पोलिस तपास करत आहेत.

16/07/2023

मला भाजपसोबत जायचं नसून, आपल्याला संघर्ष करायचा आहे
अजित पवार गट भेटून गेल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

तुमचेही डोके सुन्न झाले असणार आहे. पण या फोटोला तुम्हाला कॅप्शन द्यावेच लागेल...
16/07/2023

तुमचेही डोके सुन्न झाले असणार आहे. पण या फोटोला तुम्हाला कॅप्शन द्यावेच लागेल...

16/07/2023

अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली????

16/07/2023

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला, प्रफुल्ल पटेल म्हणाले..

16/07/2023

आमदार रोहित पवार यांचे पुण्याच्या हडपसर येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

Address

Pimpri, Pune
Pimpri
411018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri Chinchwad Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pimpri Chinchwad Times:

Videos

Share