10/12/2024
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. या निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला असून या विजयात लाडक्या बहिणींची भूमिका महत्त्वाची मानली जाते आहे. अशातच आता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष आहे. दरम्यान, यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.