Nashik pratibimb नाशिक प्रतिबिंब

  • Home
  • India
  • Nashik
  • Nashik pratibimb नाशिक प्रतिबिंब

Nashik pratibimb नाशिक प्रतिबिंब personal blog "Nashik Pratibimb" One Stop Platform for Prompt Updates, Interesting Places, Happening Events, Amazing Talents to Delicious Food in Nashik.
(2)

It’s definitely the most informative page.

अद्भुत, अविश्वसनीय विजय! 🏏🇮🇳विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मि...
29/06/2024

अद्भुत, अविश्वसनीय विजय! 🏏🇮🇳

विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. 'टीम इंडिया' मधील सर्व खेळाडूंचा तमाम भारतीयांना अभिमान आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात सामन्यात भारताने अवघ्या ७ धावांनी विजय मिळवत विश्वचषक-२०२४ आपल्या नावे केला आहे.

भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!!

जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती थी बसेरा ।वो भारत देश था मेरा ।।इ. स. १७२० च्या सुमारास पेशवेकालीन महाराष्ट्रातील बा...
29/06/2024

जहाँ डाल डाल पर
सोने की चिडीया
करती थी बसेरा ।
वो भारत देश था मेरा ।।

इ. स. १७२० च्या सुमारास पेशवेकालीन महाराष्ट्रातील बाजारभाव

27/06/2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे निमंत्रण पत्र

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!!!
26/06/2024

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!!!

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐🙏नवशा गणपती पुष्प महोत्सव
25/06/2024

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐🙏
नवशा गणपती पुष्प महोत्सव

सिंदखेड राजा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे मातुल आजोबा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात जीर्णोद्धार जतन ...
21/06/2024

सिंदखेड राजा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे मातुल आजोबा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात जीर्णोद्धार जतन आणि संवर्धनाचं काम सुरु आहे. या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून उत्खननाचं काम सुरु आहे. या उत्खननात मागील महिन्यात पुरातन शिवमंदिर आढळलं होतं. त्यानंतर आता याच ठिकाणी शेषशायी विष्णू भगवान आणि लक्ष्मीची मूर्ती सापडली आहे.

आज आंतरराष्ट्रीय योग दिन !योग हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.  शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ्याची गुरुकिल्ली म्हणून ओ...
21/06/2024

आज आंतरराष्ट्रीय योग दिन !

योग हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ्याची गुरुकिल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगशास्त्राची ओळख भारतानेच सर्व जगाला करून दिली. अशा या परिपूर्ण शास्त्राचा जगभर प्रसार होऊन त्याचा सन्मान वाढावा यासाठी आजच्या दिवशी संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो. व्यक्तिमत्त्वाचा शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक विकास घडवून आणणाऱ्या योगशास्त्राचा आपणही आपल्या नित्यजिवनात अंगीकार करण्याचा संकल्प करूया आणि निरामय जीवनाच्या दिशेने पाऊल टाकूया.

आपल्या निरामय जीवनासाठी दिनचर्येत योगाचा अंगिकार करुया.

आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवर प्रकटले इंद्रधनुष्य 🌈
16/06/2024

श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवर प्रकटले इंद्रधनुष्य 🌈

14/06/2024

नाशिकमध्ये धुव्वाधार...

खूब लडी मर्दानी... वह तो झाशीवाली राणी थी...१८५७ च्या संग्रामात आपल्या कर्तबगारीने व कणखर बाण्याने अतुलनीय शौर्य दाखवत ब...
13/06/2024

खूब लडी मर्दानी... वह तो झाशीवाली राणी थी...

१८५७ च्या संग्रामात आपल्या कर्तबगारीने व कणखर बाण्याने अतुलनीय शौर्य दाखवत ब्रिटिशांना धूळ चारणाऱ्या शूर आणि पराक्रमी, वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या "पुण्यतिथी" दिना निमित्ताने त्यांच्या पविञ पावन स्मृतीस ञिवार मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन..💐🙏

अशी शूर आमची राणी लक्ष्मी
गुण वर्णाया पडती शब्द कमी ।।
देह त्यागला राष्ट्रासाठी
परि नच स्वीकारली गुलामी ।।

झुंजार लढली रणरागिणी
राणी लक्ष्मीबाई मर्दानी ।।

#झाशीची_राणी_लक्ष्मीबाई #पुण्यतिथी #विनम्र_अभिवादन

आज विनायक चतुर्थीनिमित्त दर्शन घेऊया एका विशेष गणेश मूर्तीचे... बागलाण तालुक्यातील वनोली येथील पगडीवाले गणपती. विशेष म्ह...
10/06/2024

आज विनायक चतुर्थीनिमित्त दर्शन घेऊया एका विशेष गणेश मूर्तीचे...

बागलाण तालुक्यातील वनोली येथील पगडीवाले गणपती. विशेष म्हणजे ती पगडी दगडी असून काढता येते अशी आहे. हे गणराय एक पाषाणी असून मुर्ती भव्य आहे. बागलाण तालुक्यात गणरायांचे विविध मुर्ती प्रकार बघायला मिळतात.. मुल्हेर कडे जातांना वाटेत हे गाव लागते.

-रोहित जाधव ( गडसेवक)

06/06/2024

मान्सून आला रे... 😊

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा । अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला ॥आज शिवराय क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्व...
06/06/2024

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा ।
अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला ॥

आज शिवराय क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीराजा शिवछत्रपती जाहले.


या सुवर्णक्षणाची शतकांनंतरही अनेकांना भुरळ पडली. गीत, कविता, कथा, कादंबरी, चित्रे अशा विविध कला प्रकारातून हा प्रसंग नोंदविण्यात आला. आजच्या या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध थोर कलावंतांनी या सुवर्ण क्षणाचे आपापल्या कुंचल्याने चित्रण कसे केले आहे ते नक्कीच पाहण्यासारखे आहे. तेव्हा पाहूया अशी काही निवडक चित्रे.

Courtesy: WA
04/06/2024

Courtesy: WA

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आढळले तळघर. या तळघरात मिळालेल्या मूर्ती... #विठ्ठल_रुक्मिणी_मंदिरे_समिती       ...
31/05/2024

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आढळले तळघर. या तळघरात मिळालेल्या मूर्ती...

#विठ्ठल_रुक्मिणी_मंदिरे_समिती

"ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर राजा बनु शकतो"-लोकमाता अहिल्यादेवी होळकरन्यायदानासाठी प्रसिध...
31/05/2024

"ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर राजा बनु शकतो"-लोकमाता अहिल्यादेवी होळकर

न्यायदानासाठी प्रसिध्द अहिल्यादेवी होळकर भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षरांनी कोरलेले नाव ! कर्तृत्ववान, धर्मपरायण, देशभरातील देवस्थानांचा विकास करणाऱ्या कार्यक्षम राज्यकर्त्या, अतिशय दानशूर, कार्यक्षम राज्यकर्त्या, असामान्य कर्तृत्व, उत्तम शासक, शत्रुसाठी वज्राहुनही कठोर आणि प्रजेसाठी फुलाहुनही कोमल अशा आदर्श महिला राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती.

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन 💐🙏🏼

हे असं मूळ मंदिर किती सुंदर दिसतंय! ज्ञानोबा माऊलींना दिसलेला श्री विठ्ठल असा होता, कशाला पाहिजे भडक  पांढराफट्ट संगमरवर...
30/05/2024

हे असं मूळ मंदिर किती सुंदर दिसतंय! ज्ञानोबा माऊलींना दिसलेला श्री विठ्ठल असा होता, कशाला पाहिजे भडक पांढराफट्ट संगमरवर आणि रंगीबेरंगी टाइल्स?

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन लवकरच पूर्णत्वाकडे. मंदिराचे मूळ प्राचीन रुप दृष्टोपत्तीस.

मान्सून केरळमध्ये दाखल...
30/05/2024

मान्सून केरळमध्ये दाखल...

महान स्वातंत्र्यसेनानी, विज्ञाननिष्ठ समाज सुधारक, प्रखर राष्ट्रवादी, क्रांतिवीर, थोर विचारवंत, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावर...
28/05/2024

महान स्वातंत्र्यसेनानी, विज्ञाननिष्ठ समाज सुधारक, प्रखर राष्ट्रवादी, क्रांतिवीर, थोर विचारवंत, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची आज जयंती.

मातृभूमीच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे देशप्रेमाचे ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या जाज्वल्य विचारांना, कार्याला आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम !

#स्वातंत्र्यवीर_सावरकर

 ूर्म_जयंतीकूर्म जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार (कूर्मावतार) घेतला तो दिवस, वैशाख पौर्णिमादेवांनी...
23/05/2024

ूर्म_जयंती

कूर्म जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार (कूर्मावतार) घेतला तो दिवस, वैशाख पौर्णिमा

देवांनी आणि दैत्यांनी समुद्रमंथन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून उपयोग करायचे ठरवले.

देव-दैत्यांनी मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्‍न केला. परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला. शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप' कूर्मावतार' धारण केला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला. कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्र मंथन शक्य झाले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती साजरी होते.

॥ ॐ विष्णवे नमः ॥

आज बुद्ध पौर्णिमा...  अत्त दीपो भव:शांती,समता,अहिंसा यांची अनमोल शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा. याच दि...
23/05/2024

आज बुद्ध पौर्णिमा...

अत्त दीपो भव:

शांती,समता,अहिंसा यांची अनमोल शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा. याच दिवशी त्यांना जन्म,ज्ञान व महानिर्वाण प्राप्त झाले.

"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसारले. यासाठी स्वतःचे घरदार सोडुन ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. बुद्धांनी जीवनात अतिरेक टाळून सम्यकतेचा आग्रह धरला. अष्टांगमार्ग व पंचशील अनुसरण्याचा उपदेश केला. अपूर्णत्वाकडून पुर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे बुद्ध होण्याचा प्रवास.

अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!

#बुद्धपौर्णिमा

https://nashikpratibimb2.blogspot.com/2023/05/blog-post_5.html

मार्मिक....
22/05/2024

मार्मिक....

श्री सद्गुरू योगीराज शंकर महाराज यांना पुण्यतिथी निमित्ताने शतशः नमन !!!🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
15/05/2024

श्री सद्गुरू योगीराज शंकर महाराज यांना पुण्यतिथी निमित्ताने शतशः नमन !!!
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि कटकारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीत दिवस अन रात्र निकराची झुंज देणारा राजा म्हणजे छत्...
14/05/2024

आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि कटकारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीत दिवस अन रात्र निकराची झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

पाच लाखांचे खड़े सैन्य घेऊन आलेल्या आलमगीर औरंगजेबाला नऊ वर्षे झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज. पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज, आयुष्याची अखेर होत असताना ही स्वाभिमान न सोडता स्वराज्यासाठी बलिदान देत येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा कर्तुत्ववान राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज,

आपली कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अलौकिक पराक्रम यांनी दाही दिशा तळपत ठेवणारे इतिहासातील महानायक रणधुरंधर, राजनीतीधुरंधर, भाषापंडित, राजाधिराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।नास्ति मातृसमं त्राणम्, नास्ति मातृसमा प्रिया।।आईसारखी कोणतीही छाया नाही, आईसार...
12/05/2024

नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राणम्, नास्ति मातृसमा प्रिया।।

आईसारखी कोणतीही छाया नाही, आईसारखा कोणताही आसरा नाही, आईसारखा कोणी रक्षक नाही, आईइतके कुणी प्रिय नाही...

आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच मातृदिन (Mother’s Day). मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृ दिन सर्व जगात साजरा केला जातो. आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, सर्वांसाठी सतत कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

औपचारिकरीत्या मातृदिन साजरा करण्याची पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकन नागरिक अ‍ॅना जार्विस (Anna Jarvis) हिचं आपल्या आईवर जीवापाड प्रेम होतं. तिने लग्न केलं नव्हतं. ती सदैव आपल्या आईसोबतच राहत असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अ‍ॅना जार्विस हिने आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्यास सुरुवात केली.

जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये मदर्स डे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्यात येत होता. हा दिवस साजरा करण्यासाठी कोणती विशिष्ट तारीख ठरलेली नसते. मात्र, अ‍ॅना जार्विसच्या पाठपुराव्यामुळे ९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिनाच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येईल असे जाहीर केले. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यात येऊ लागला. तेव्हापासून सर्वत्र मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जाऊ लागला.

भारतात मात्र मातेचा सन्मान करण्याची परंपरा खूपच प्राचीन आहे. अगदी अश्मयुगीन मानवापासून मातृपूजनाची पद्धत होती. भारतापुरता विचार करावयाचा झाला तर योनीपूजनाचे प्रत्यक्ष उपलब्ध पुरावे उत्तर पुराश्मयुगातील आहेत. त्यामुळे भारतात तब्बल २६ हजार वर्षांपूर्वी मातृपूजा अस्तित्त्वात होती हे सिद्ध झालेले आहे.

सर्वांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

11/05/2024

मुसळधार पाऊस

11/05/2024

I gained 993 followers, created 82 posts and received 54,221 reactions in the past 90 days! Thank you all for your continued support. I could not have done it without you. 🙏🤗🎉

सहजीवन मुंग्यांचे...झाडाच्या पानावर असलेला पाण्याचा एक मोठा थेंब. या थेंबातील पाणी  पिण्यासाठी १२ मुंग्या जमल्या आणि या ...
11/05/2024

सहजीवन मुंग्यांचे...

झाडाच्या पानावर असलेला पाण्याचा एक मोठा थेंब. या थेंबातील पाणी पिण्यासाठी १२ मुंग्या जमल्या आणि या मुंग्या चार गटात विभागल्या गेल्या हे किती आश्चर्यकारक आहे.

त्यामुळे या पानाचा समतोल राखला गेला आणि पाण्याचा थेंबही सांडला नाही.

सर्वांना समान वाटा मिळावा आणि समतोल राखला जावा यासाठी हे मुंग्यांचं शास्त्र आहे.

सहजीवन आणि समजूतदारपणाचे किती सुंदर उदाहरण छोट्या प्राण्यातही दिसते

सर्वात ज्ञानी मानला जाणारा माणूस मात्र एकमेकांचे पाय खेचतो आणि समाजाचे, स्वतःचे व इतरांचे मानसिक संतुलन बिघडवण्यात मस्त राहतो.

सगळं फक्त मलाच मिळू दे ह्या भावनेमुळे राग आणि द्वेष निर्माण होतो. आणि स्वतःचा तोल गमावून जातो...

हे आहे सहजीवनाच्या भावनेचे एक अनोखे उदाहरण.
🌞

अक्षय्य तृतीया परशुराम जयंती बसवेश्वर जयंती अक्षय्य तृतीयाचे महत्व हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या तिथीला ...
10/05/2024

अक्षय्य तृतीया परशुराम जयंती बसवेश्वर जयंती

अक्षय्य तृतीयाचे महत्व
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या तिथीला अक्षय्य तृतीया साजरी करतात. अक्षय्य शब्दाचा अर्थ आहे ‘कधीही नाश होत नाही असा’. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.

जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.

भविष्यपुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कंदपुराणात याचा विषेश उल्लेख केलेला आढळतो. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णु साठी आवडता आहे. म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

स्कंदपुराणातील अक्षय्य तृतीया :
जी माणसे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करतात व कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान करतात त्यांच्या या पुण्यकार्याला देव अक्षय फळ देतो.

भविष्यपुराणातील अक्षय्य तृतीया :
वैशाख शुक्ल पक्षातील तृतुयेच्या दिवशी गंगेत आंघोळ करणारा माणूस सगळ्या पापांतून मुक्त होतो असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे. जे काही दान केले जाते ते अक्षय होते. विशेषतः मोदक दिल्याने व गुळ आणि कापुराच्या सहाय्याने जलदान केल्याने विशेष पुण्या प्राप्त होते. अशा माणसांची ब्रम्हलोकात गणना होते.

अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया।
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै:।
तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव।

महाभारतात एका प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, ‘हे राजा या दिवशी केलेल्या दान व हवनाचा नाश होत नाही म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याला ‘अक्षय्य तृतीया’ असे संबोधले आहे. या दिवशी पितरांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम अक्षय अविनाशी असते.

विष्णुपुराणातील अक्षय्य तृतीया :
वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होतो. या दिवशी केलेला उपवास, जप, ध्यान अक्षय्य फलदायी असतो. एक वेळी आहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता. या दिवशी केलेले दान देखील अक्षय्य होते असे भविष्यपुराणात आलेले आहे. या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, पादत्राणे(चप्पल-बूट), छत्री, जवस, गहु, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी असते. परंतु दान हे सत्पात्री असावे.

नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते.
परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
अक्षय्य तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख, समृद्धी नांदते.
असं म्हणतात की, अक्षय्य तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती.
अक्षय्य तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.
अक्षय्य तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्रय संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं.
महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रोपदीला ‘अक्षय्य पात्र’ भेट दिले होते. ज्याला ‘द्रौपदीची थाळी’ या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे. ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही.
या दिवशी भगवान गणेशाने आणि वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय्य तृतीयेला महत्त्व आहे.
जैन धर्माचे पहिले तीर्थांकर भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणा साठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.
लिंगायत पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचाही जन्म अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच झाला होता. त्यामुळे या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते.
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.

ज्योतिषशास्त्र :
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. असे दुर्(योग) यापूर्वी अनेक अक्षय्य तृतीयांना आले होते, त्यांपैकी हे काही प्रसंग :-
शुक्रास्त असलेले दिवस : १ मे १९४९, ३ मे १९६५, ५ मे १९७३, ७ मे २००८, ९ मे २०१६.
अस्त झाल्याने आकाशात गुरू दिसत नसलेले दिवस : १६ मे १९५६, १ मे १९७६, २३ एप्रिल २०२३.

सांस्कृतिक महत्त्व :
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

शेतीसंबंधी प्रथा :
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.
मातीत आळी घालणे व पेरणी : अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे.
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते.
वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

धार्मिक आचार :
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

भारताच्या विविध प्रांतांत वा प्रदेशांत अक्षय्य तृतीया विविध प्रकारे साजरी केली जाते.
उत्तर भारत - या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे,यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.

ओरिसा - या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.

दक्षिण भारत - महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.

पश्चिम बंगाल - या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.

राजस्थान - राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.

महाराष्ट्र - महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखजी” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.

अक्षय्य तृतीयेला विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात.
या दिवशी सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक धार्मिक विधी केले जातात. अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चा आणि कडक उपवास केला जातो. गोर गरिबांना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू दान केल्या जातात.

घरात भगवान विष्णूला प्रिय असलेल्या तुळशी पत्राने पाणी या दिवशी घरात शिंपडल्याने सुख शांती नांदते अशी मान्यता आहे. धनधान्य मुबलक मिळावे यासाठी भारतात अक्षय्य तृतीयेपासून शेतीच्या कामांना सुरूवात केली जाते. व्यापारी त्याच्या आर्थिक वर्षाच्या हिशोबाची पुस्तके अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवून पूजा करतात. या धार्मिक विधीला हलखता असं म्हटलं जातं.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. सोने हे ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते यासाठी या दिवशी आपल्या ऐपतीनुसार थोडे तरी सोने खरेदी केले जाते. असं केल्याने घरातील ऐश्वर्यात वाढ होते असं मानलं जातं. यासाठीच अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिवशी अशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी
अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त असल्यामुळे आणि या दिवशी केलेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात.या दिवशी लग्नाचा पवित्र विधी केला जातो. कारण त्यामुळे असे विवाह आयुष्यभर काळ टिकतात अशी मान्यता आहे.

अक्षय्य तृतीयेला नवीन व्यवसाय, बांधकामे आणि नवीन गोष्टींना सुरुवात केली जाते.

अक्षय्य तृतीयेला गंगेत स्नान करणे, यज्ञयाग करणे, दान धर्म करणे शुभ मानले जाते.

जैन बांधव या दिवशी त्यांच्या वर्षभराच्या तपस्येची सांगता उसाचा रस पिऊन करतात आणि शिवाय या दिवशी दिवसभर पूजा आराधना करतात.
आध्यात्मिक प्रवासासाठी हा दिवस शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून योगसाधना करणे, ग्रंथाचे वाचन करणे, मंत्र जपास सुरूवात करणे शुभ मानले जाते.

भक्तगण या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चंदनाचा लेप लावतात ज्यामुळे त्या भक्ताला मरणानंतर स्वर्गप्राप्ती होते अशी मान्यता आहे.
पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे कृपार्शिवाद घेण्यासाठी अक्षय्य तृतीया शुभ मानली जाते. यासाठी पूर्वजांना या दिवशी त्यांच्या आवडीचे भोजन अर्पण केले जाते.
काही ठिकाणी हा दिवस आखा तीज म्हणूनही साजरा केला जातो. तीज च्या दिवशी सुहासिनींना सिंदूर दान केल्याने विवाहित जोडप्यामध्ये प्रेम, विश्वास वाढतो असं मानलं जातं.

अक्षयतृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्व सांगीतले आहे.
फळं, वस्त्राचे दान, पंखा, तांदुळ, मीठ, साखर, तुप, चिंच, याचे दान ब्राम्हणाला देऊन दक्षिणा द्यावी.
ब्राम्हण भोजनाचे देखील या दिवशी महत्व आहे.
या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने, नवे वस्त्र खरेदी करावे.
वाहन घ्यावयाचे झाल्यास त्याची खरेदी अक्षयतृतीयेला करावी.
या दिवशी सातुचे महत्व असुन त्याचे दान दयावे आणि सेवन देखील करावे.
पाण्याने भरलेली घागर वाळा घालुन तृषार्तास दान द्यावी.
पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीवर खीर, कैरीचे पन्हं, चिंचोणी, कुरडया, कैरीची डाळ इ.चे अन्नदान करावे.

अक्षय सुखाचे दान देणारा हा दिवस सर्वत्र अतिशय भक्तिभावाने, पारंपारिक पध्दतीने साजरा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही पहावयास मिळते. माहेरवाशिणी या दिवसांमधे माहेरी येत असल्याने त्यांचे कोडकौतुक देखील या सणाच्या निमीत्ताने केल्या जाते.

https://nashikpratibimb2.blogspot.com/.../blog-post_2.html

Address

Nashik
422011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik pratibimb नाशिक प्रतिबिंब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik pratibimb नाशिक प्रतिबिंब:

Videos

Share