The Liberal

The Liberal The most trusted source of news, stories and information by the students of Namdar Gopalkrishna Gok
(1)

01/02/2023
05/01/2023

मराठी पत्रकार दिन
समाज माध्यमांच्या दुनियेत मराठी पत्रकारितेची वाटचाल
प्रमुख वक्ते निशिकांत भालेराव
(ज्येष्ठ पत्रकार)
संयोजक पत्रकारिता विभाग एचपीटी कॉलेज

28/10/2022

संगीत विशारद कृष्णा जाधव यांची मुलाखत.

एचपीटी-आरवायकेत रक्तदान शिबिरात १९४  रक्तपिशव्यांचे संकलनअश्विनी भालेराव, नाशिक (दि.१६): गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव ...
17/09/2022

एचपीटी-आरवायकेत रक्तदान शिबिरात १९४ रक्तपिशव्यांचे संकलन

अश्विनी भालेराव, नाशिक (दि.१६): गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी सर यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त आणि एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले.
रक्तदान हेच श्रेष्ठदान मानत गेल्या १२ वर्षांपासून सर डॉ. मो. स. गोसावी सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. आजवर AB-, Bombay यांसारख्या दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या रक्तदात्यांनी सुध्दा महाविद्यालयाच्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले आहे. यावर्षी महाविद्यालयात एकाच वेळी सेमिनार हॉल आणि प्रि. टी. ए. कुलकर्णी हॉल येथे शिबिर पार पडले. यावेळी तब्बल १९४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. भविष्यातील स्वतः ला आणि अपत्यांना होणाऱ्या थॅलेसेमिया आजाराला अटकाव करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांचे थॅलेसेमिया स्क्रीनिंगद्वारे परीक्षण करत आणि उपचार सांगितले जातात. यावेळी शिबिरात थॅलेसेमिया स्क्रीनिंग चाचणीही करण्यात आली.
यावेळी शिबिराचे उद्घाटन सर डॉ.मो. स. गोसावी यांनी फित कापून केले. वाढदिवसानिमित्त सर डॉ. मो. स गोसावी सरांचे औक्षण महाविद्यालयातील प्राध्यापिकांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन.सूर्यवंशी, एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. राकेश वळवी, एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती कोल्हे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंदा खलाणे, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

चौकट :
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. म्हणूनच मागील ३ दशकांपासून माझे काका कै.डॉ. ना. भ. देशपांडे यांच्या प्रेरणेने मी ५० हून अधिक वेळा रक्तदान केले आहे. अनेकदा गरजू व्यक्तींना रक्ताची आवश्यकता भासत असते, अशा वेळी रक्तपेढ्यांमार्फत संपर्क साधला जातो. त्या त्या वेळी मी ही रक्तदाता होत रक्तदान केले आहे. रक्तदान केल्यावर प्रत्येक वेळेस आत्मिक समाधानाचा अनुभव मी घेतला आहे. ह्या सर्वश्रेष्ठ रक्तदानाचा अनुभव इतरांनी ही घ्यावा असे वाटते.
- प्रा. डॉ. प्रशांत देशपांडे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख)

30/08/2022

नाशिकमध्ये गणपतीच्या आदल्या दिवशी जोरदार पाऊस

अधिक माहितीसाठी पोस्टरमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा 👇👇
27/08/2022

अधिक माहितीसाठी पोस्टरमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा 👇👇

सुवर्णा प्रकाश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला स्वर पालवी सन्मान दश कलांचा हा दिमाखदार कलाविष्कार परशुराम साय...
04/05/2022

सुवर्णा प्रकाश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला स्वर पालवी सन्मान दश कलांचा हा दिमाखदार कलाविष्कार परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाला.

नाशिक : प्रशांत जुन्नरे यांच्या बाबाज थिएटर्स आणि सुवर्णा प्रकाश क्षीरसागर यांच्या स्वरांजली संगीत संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ' स्वर पालवी सन्मान दश कलांचा ' हा कलाविष्कार आयोजित करण्यात आला होता. या अभिनव संकल्पनेद्वारे एकाच मंचावर दहा कला आणि 47 महिला कलाकारांच्या संचाने बहारदार कलाकृती सादर करत कलाविष्कार उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विश्वास ठाकूर, कवी प्रकाश होळकर, डॉ. अविराज तायडे, केशव अण्णा पाटील, जे. पी जाधव, शामराव केदार, नितीन सुगंधी, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या डॉ. रंजना कुलकर्णी, गायिका हेमा नातू तसेच संगीत क्षेत्रातील दसककर भगिनींचा विशेष गौरव करण्यात आला.
मीना निकम यांच्या भाव मधुर स्वरातून कार्यक्रमाचा प्रारंभ होत, सत्यम शिवम सुंदरम या गीतावर सुमुखी अथणी यांच्या शिष्यांनी आपला कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. रसिका नातू -देसाई यांच्या तरुण आहे रात्र अजुनी... या गीताने रसिकांची दाद मिळवली. भार्गवी कुलकर्णीच्या आर्त स्वरातून ' पिया तोसे नैना लागे ' ने आणि त्याच बरोबर सोनाली करंदीकरांच्या भरतनाट्यम करणाऱ्या शिष्यांनी रसिकांच्या मनावर भुरळ पडली. चिन्मयी जोशी वैद्य यांच्या व्हायोलिन वादनातून ' गोरी गोरी पान ' या बाल गीताने बच्चे कंपनीची वाह वा मिळवली, सुवर्णा क्षीरसागर यांच्या एक प्यार का नगमा.. या गीतावरील व्हायोलिन वादनाने प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला, तसेच सुनिता देशपांडे आणि ज्योती डोखळे यांच्या सतारी वरील 'रस्मे उल्फत..' ने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सानिका जोशी हिच्या सुमधुर बासरीच्या स्वरातून ' का रे दुरावा, का रे अबोला..' ने कार्यक्रमात बहार आणली. दीप्ती जोशी लिखित कॅटवॉक कथा, पल्लवी कुलकर्णी यांच्या वाचिक अभिनयाचे दर्शन घडवणाऱ्या अभिवाचनाने रसिकांना भावुक करून गेले. भाग्यश्री गुजर यांच्या काव्यवाचनाने रसिकांची दाद मिळवली, दैवी देणगी लाभलेल्या कृपा परदेशीच्या सिंथेसायझर वादनाने रसिकांची मने जिंकली. प्राजक्ता प्रभाकर आणि ईश्वरी कोरान्ने यांच्या संपन्न अभिनयाने सभागृह भारावून गेले. रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारी मोहिनी भुसेच्या संबळ वादनाने रसिकांचा वन्स मोअर मिळवला. ' बहु असोत सुंदर..' या महाराष्ट्र गीतावरील दिपाली सुरळकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या भरतनाट्यममधून प्रेक्षागृह दुमदुमून गेला. यावेळी रसिका नातू - देसाई आणि समूहाने ॲकॅपेला सारख्या आगळ्यावेगळ्या संगीत प्रकाराचा वापर करत हार्मनीद्वारे सादर केलेल्या ' प्यार हुवा, इकरार हूवा है..' ने प्रेक्षकांची मने जिंकली.
या सर्व कला सादर होत असताना रंगमंचावरील एका बाजूला म्युरल कलाकार शुभांगी बैरागी आणि दुसऱ्या बाजूला चित्रकार समृद्धी चिखलीकर यांच्या कलाविष्काराने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. प्रेक्षागृहा बाहेरील पूजा बेलकर यांनी रेखाटल्यालेल्या रांगोळीने प्रेक्षकांच्या मनात मोहिनी घातली.
संपूर्ण सादरीकरणाला तितकीच समर्थ साथ रागेश्री धुमाळ (सिंथेसायझर), पूजा शुक्ल- पाठक (गिटार), प्रिया वझे (ऑक्टोपॅड), राधिका रत्नपारखी गायधनी ( तबला), वैष्णवी भडकमकर (तबला), गौरी सारंग (साईड रिदम) यांनी केली.

-- अश्विनी भालेराव (MA JMC Part 1)

    --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022




--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

        --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022




--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

          --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022



--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

     #भाजपा         --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022

#भाजपा


--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

       #भोंगे   ---Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022

#भोंगे
---Latika Lohgaonkar (MA JMC 1)

   #मनसे       #भोंगे --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022

#मनसे
#भोंगे

--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

         --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022




--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

   #मनसे      --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022

#मनसे


--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

   #मनसे        --- Latika Lohgaonkar (MA JMC 1)
03/05/2022

#मनसे


--- Latika Lohgaonkar (MA JMC 1)

Address

HPT Arts & RYK Science College
Nashik
422005

Telephone

+919595893479

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Liberal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Liberal:

Videos

Share