LNN

LNN Your trusted source for news in Kalyan and beyond. 10 years of unwavering commitment to fast, reliable reporting, with citizens at the forefront.
(7)

*गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा अन्यथा केडीएमसी प्रशासनाला आमच्या पद्धतीने धडा शिकवू - आमदार विश्वनाथ भोईर**प्रभा...
01/09/2024

*गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा अन्यथा केडीएमसी प्रशासनाला आमच्या पद्धतीने धडा शिकवू - आमदार विश्वनाथ भोईर*

*प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमीपूजन*

कल्याण दि.1 सप्टेंबर :
रस्त्यांवरील खड्डे भरण्यात केडीएमसी प्रशासन सपशेल अपयशी ठरली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी इशारा दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये मंजूर निधीतून मुख्य रत्स्यांचे काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी खड्ड्यांबाबत केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरले.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असून आजपासून कल्याणातील मानाच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे. मात्र अद्यापही केडीएमसी प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये. काही दिवसांपूर्वी आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली असताना केडीएमसीने खड्डे भरण्याचे काम केले पाहिजे होते. परंतु शहरातील खड्डे भरण्यासाठी केडीएमसीचे कोणतेही नियोजन नाहीये की कुठलीही तयारी नसल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. तर या खड्ड्यांमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि शांत असणारे शहरातील वातावरण बिघडून विनाकारण गालबोट लागल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने केडीएमसी प्रशासनाला धडा शिकवू असा थेट इशाराही भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील रस्त्यांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याणातील रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही विकासकामे सुरू करता येत नव्हती. त्याच अनुषंगाने आज गांधारी आणि रौनक सिटी येथील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम आज सुरू झाले.

डोंबिवलीकरांच्य प्रेमामुळेच आपण आमदार,मंत्री झालो : रवींद्र चव्हाण यांची प्रांजळ कबुली"जे देखे रवी" पुस्तकाचे भाऊ तोरसेक...
31/08/2024

डोंबिवलीकरांच्य प्रेमामुळेच आपण आमदार,मंत्री झालो : रवींद्र चव्हाण यांची प्रांजळ कबुली

"जे देखे रवी" पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

डोंबिवली दि .31 ऑगस्ट:
डोंबिवली शहराने मला भरपूर प्रेम दिलं, या सांस्कृतिक, संस्कारमय शहरामुळे मी आमदार - मंत्री झालो असल्याची प्रांजळ कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. निमित्त होते ते मोरया प्रकाशनच्या वतीने आयोजित "जे देखे रवि" या गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे.

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मोरया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, श्रीकांत बोजेवार, श्रीराम शिधये, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर, मसापचे डोंबवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे, श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परमवैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार, आचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे विचारही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

दरम्यान या जे देखे रवि या द्वितीय आवृत्तीमध्ये सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांची कार्यशैली, स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे. त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले. तर कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमूळ ही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपध्दतीवर अवलंबून असतात. याठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट आहे. तसेच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते. त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यावेळी काढले. तसेच ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर, लीना ओक मॅथ्यू, वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींनीही यावेळी रविंद्र चव्हाण यांच्या कार्याबाबत प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली.

केडीएमसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस; खड्डे - ट्रॅफिक जॅमच्या समस्येबाबत नागरिकांमध्ये वाढता रोषपावसाने उघडीप देऊनही ...
31/08/2024

केडीएमसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस; खड्डे - ट्रॅफिक जॅमच्या समस्येबाबत नागरिकांमध्ये वाढता रोष

पावसाने उघडीप देऊनही केडीएमसीने खड्डे भरलेच नाहीत

कल्याण डोंबिवली दि.31 ऑगस्ट :
रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्यातून उडणाऱ्या धूळीसोबतच होणारी मोठी वाहतूक कोंडी. या सर्वांच्या त्रासामुळे इथल्या नागरिकांना दररोज प्रचंड असा शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावा लागत आहे. इथल्या नागरिकांची अवस्था ही अक्षरशः "भीक नको पण कुत्रे आवर" या म्हणीसारखी झाली आहे. केडीएमसी प्रशासनाने तर आपल्या निष्क्रियतेचा कळसच गाठला असून नागरिकांच्या सहनशीलतेचा जणू काही अंत पाहिला जात आहे.

एकीकडे तथाकथित स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या या केडीएमसी प्रशासनाकडून इथल्या नागरिकांच्या साध्या मूलभूत गरजाही पूर्ण करता येत नाहीयेत. की दिवसागणिक राक्षसीरूप धारण करणाऱ्या खड्डे, वाहतूक कोंडी, बकाल स्टेशन परिसर, अस्वच्छता यांसारख्या नागरी समस्याही सोडवता येत नाहीयेत. किंबहुना या समस्या सोडवण्याची कोणतीही इच्छाशक्तीच या केडीएमसी प्रशासनामध्ये दिसत नाहीये. आपल्या एसी केबिनमध्ये बसून कागदी घोडे नाचवणे, आपापल्या जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलणे आणि आम्ही या शहरासाठी भरपूर काही तरी करतोय याचा खोटा आव आणणे, या पलिकडे केडीएमसी प्रशासनाला कशातही रस दिसत नाहीये. LNN

काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सुरू झाला असला तरी त्यापूर्वी तब्बल दोन आठवडे पावसाने उघडीप दिली होती. मग त्यावेळी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे का भरण्यात आले नाहीत? पाऊस थांबूनही हे खड्डे भरायचे नव्हते तर अर्थसंकल्पात तब्बल 22 कोटींची तरतूद कशासाठी केली आहे? केवळ माती आणि दगडांद्वारे खड्डे भरण्यासाठी 22 कोटी रुपयांचा खर्च येतो का? नागरिकांनी भरलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कराची अशी उधळपट्टी करण्याचे कारण काय? केडीएमसी प्रशासन केवळ कर गोळा करण्यासाठी आहे का ? नागरीकांना मूलभूत सुविधा कोण देणार? यासारखे अनेक गंभीर प्रश्न केडीएमसी प्रशासनाच्या या बेजबाबदार वर्तनातून निर्माण झाले आहेत.LNN

आपल्या कामचुकारपणामुळे इथल्या लाखो लोकांना दररोज मोठा त्रास होत असून याच लोकांच्या करांच्या माध्यमातून आपल्याला पगार मिळतोय. किमान याची तरी लाज बाळगून या शहरांप्रती - इथल्या लोकांप्रती आपले काही तरी दायित्व आहे हे केडीएमसी प्रशासनाने ओळखायला हवे होते. परंतु दुर्दैवाने विद्यमान केडीएमसी प्रशासनाला त्याचा तर विसर पडलेलाच आहे, पण त्याचसोबत लोकांना जे पाहिजे ते नाही तर आम्हाला जसे हवे तसेच आम्ही करणार अशा अविर्भावाचा एक मस्तवालपणाही केडीएमसी प्रशासनामध्ये दिसून येत आहे. ज्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये केडीएमसी प्रशासनाविरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. केडीएमसी प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा आणखी अंत पाहू नये, नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाल्यास उद्रेक अटळ आहे. LNN कल्याण डोंबिवली महानगरपालिका fans CMOMaharashtra Suresh Gopinath Mhatre - बाळ्या मामा Vishwanath Atmaram Bhoir Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Raju Patil - Pramod Ratan Patil

31/08/2024
*कल्याणातील आधुनिक श्रावण बाळ; श्रावण मासात 55 आजी - आजोबांसह अनेकांना घडवतोय अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन**55 व्या...
30/08/2024

*कल्याणातील आधुनिक श्रावण बाळ; श्रावण मासात 55 आजी - आजोबांसह अनेकांना घडवतोय अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन*

*55 व्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अनोखा उपक्रम*

कल्याण दि.30 ऑगस्ट :
आपल्या संस्कृतीत श्रावण बाळाने स्वतःच्या वृद्ध आई वडिलांना घडवलेल्या तिर्थयात्रेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. याच धर्तीवर कल्याणातील एका आधुनिक श्रावण बाळाकडून श्रावण महिन्याचे औचित्य साधून 55 आजी - आजोबांसह अनेकांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी नेले जात आहे. निमित्त आहे ते माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नुकत्याच झालेल्या 55 व्या वाढदिवसाचे. नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून काल रात्री कल्याणहून आयोध्येसाठी एक विशेष ट्रेन रवाना झाली.

श्रावण महिन्यामध्ये देवदर्शन आणि तिर्थयात्रेला विशेष असे महत्व आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. विशेष म्हणजे दहीहंडीच्या दिवशी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने पवार यांच्याकडून कल्याणातील 55 आजी - आजोबांना या अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी नेण्यात येत आहे. या 55 वृद्ध दाम्पत्यासोबतच शहरातील धार्मिक संस्था, वारकरी सांप्रदाय, नरेंद्र महाराजांचे अनुयायी, कल्याणच्या स्वामी समर्थ मठातील भक्तगण, महिला मंडळे, भजनी मंडळे, नामांकित संस्थांचे पदाधिकारी, हास्य क्लब, जिम ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुप असे मिळून तब्बल 1 हजार 200 भाविकांचा अयोध्या दर्शन यात्रेत सहभाग असल्याची माहिती आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. तर श्रावण बाळाने ज्याप्रमाणे आपल्या आई वडिलांना तीर्थ यात्रा घडवली, नेमक्या त्या भावनेतूनच आपण कल्याणातील या 55 ज्येष्ठ नागरिक जोडप्यांना अयोध्येला दर्शनासाठी नेत असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

तत्पूर्वी नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून कल्याण स्टेशनवरून काल रात्री सोडण्यात आलेल्या या गाडीला कल्याणातील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे गुरुवर्य परमानंद महाराज, वनवासी संवाद ट्रस्टचे आत्माराम (बाबा) जोशी, भाजप कल्याण जिल्हा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष चंद्रभान महाराज सांगळे, यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. कल्याण स्टेशनवरून काल रात्री रवाना झालेली ही ट्रेन उद्या अयोध्येला पोहचणार आहे.

30/08/2024

माय सिटी... माय व्हिजनMy city...My Vision कल्याणातील युवा राजकारणी श्री. श्रेयस समेळ साधत आहेत संवाद...

* *
*
Shreyas Kiran Samel

उल्हास नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी; माजी नगरसेवकाचे 12 तास पाण्यामध्ये, पाण्याविना आंदोलनवाढदिवसानिमित्त आंदोलन करून शासन...
29/08/2024

उल्हास नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी; माजी नगरसेवकाचे 12 तास पाण्यामध्ये, पाण्याविना आंदोलन

वाढदिवसानिमित्त आंदोलन करून शासन - प्रशासनाचा निषेध
कल्याण दि.29 ऑगस्ट :
उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या कामामध्ये शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या हलगर्जीपणाविरोधात माजी नगरसेवकाकडून एक अनोखे आंदोलन छेडण्यात आले आहे. स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक नितीन निकम हे चक्क उल्हास नदीमध्ये 12 तास उभे राहून आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान ते पाण्याचा एकही घोट पिणार नाहीयेत.

उल्हास नदी...कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांची तहान या नदीतील पाण्यानेच भागवली जाते. केडीएमसीकडून या नदीतून पाणी उचलून मग शहरातील नागरिकांना त्याचा पुरवठा केला जातो. परंतु ठिकठिकाणी या नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झाले आहे. काही ठिकाणी नाल्याचे तर काही ठिकाणी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जात आहे. परिणामी उल्हास नदी प्रदूषित झाली असून त्यावर कायमस्वरुपी उपाय योजनेच्या मागणीसाठी नितीन निकम हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. परंतु त्यानंतरही शासन - प्रशासन याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने लाखो लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभुमीवर स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नितीन निकम यांनी आज सकाळपासून हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. उल्हास नदीमध्ये उभे राहिले असून त्यांनी आपल्या हातामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाक्याचा एक फलकही धरला आहे.

तर हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, किंवा ते कोणत्याही पक्षाविरोधातही नाही. उल्हास नदीतील या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे लहान मुले,महिला ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. आणखी किती दिवस एखाद्या जिवंत प्रेतासारखे आपण हे सर्व सहन करायचे अशा शब्दांत नितीन निकम यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

"आदर्श" गोविंदा पथकाने फोडली शशिकला पोटे चॅरिटेबल ट्रस्टची कल्याणातील सर्वात मोठी दहीहंडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोट...
28/08/2024

"आदर्श" गोविंदा पथकाने फोडली शशिकला पोटे चॅरिटेबल ट्रस्टची कल्याणातील सर्वात मोठी दहीहंडी

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्याकडून आयोजन
कल्याण दि.28 ऑगस्ट :
दहीहंडी उत्सवानिमित्त कल्याणातील शशिकला पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्याकडून कल्याणमधील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी तब्बल 24 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याने गोविंदा पथकांनी ही दहीहंडी फोडण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र ही दहीहंडी फोडण्याचा मान "आदर्श गोविंदा पथक" यांनी मिळवला. आदर्श गोविंद पथक या विजेता ठरलेल्या पथकाला सचिन पोटे यांच्याकडून नियोजित बक्षीस देण्यात आले.

या दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिला पथकाला देण्यात आल्याने महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता. दिवसभर अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाला शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेटी दिल्या. तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण असल्याने भर पावसातही प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात या दहीहंडी उत्सवाचे भव्य प्रमाणात यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. तर या दहीहंडी उत्सवाचा केवळ मनोरंजन हा उद्देश नसून महिला सुरक्षितता आणि जागृती हा मुख्य उद्देश होता अशी प्रतिक्रिया आयोजक सचिन पोटे यांनी यावेळी दिली.

दिवसभर चाललेला हा दहीहंडीचा थरार आणि गोविंदा पथकांचे प्रदर्शन वाखणयाजोगे होते. तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू लकी ड्रॉ च्या माध्यमातून देण्यात आल्या. उत्सवाबरोबरच सामाजिक भान जपणारी दहीहंडी सचिन पोटे यांनी आयोजित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शिवसेना कल्याण शहर शाखा आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव 2024 चे थेट प्रक्षेपण...https://www.youtube.com/live/bDzziSeV9q8?si=...
27/08/2024

शिवसेना कल्याण शहर शाखा आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव 2024 चे थेट प्रक्षेपण...

https://www.youtube.com/live/bDzziSeV9q8?si=ts96PLTgtx3N8H9a

The song & music played at this event is for entertainment purposes only. We do not claim any rights to the music, and it is not intended for commercial use. All rights belong to the respective copyright holders.

शिवसेना कल्याण शहर शाखा आयोजित - दहीहंडी भव्य उत्सव २०२4....कल्याणची हंडी मानाची हंडीश्री. रवी पाटील कल्याण शहर प्रम...

डोंबिवलीतील दिपेश म्हात्रे फाऊंडेशन आयोजित "स्वराज्य दहीकाला उत्सवा"चे हे लाईव्ह अपडेट...Dipesh Mhatre  The song & music...
27/08/2024

डोंबिवलीतील दिपेश म्हात्रे फाऊंडेशन आयोजित "स्वराज्य दहीकाला उत्सवा"चे हे लाईव्ह अपडेट...
Dipesh Mhatre

The song & music played at this event is for entertainment purposes only. We do not claim any rights to the music, and it is not intended for commercial use. All rights belong to the respective copyright holders.

,7977763649NOTE = Copyright disclaimer! I do NOT own this song/lyrics nor the image featured in the video. All rights belong to i...

27/08/2024

भारतीय जनता पार्टी, डोंबिवली शहर यांच्या वतीने बाजी प्रभू चौकात आयोजित दहीहंडी उत्सवाचे लाईव्ह अपडेट...
https://www.facebook.com/share/v/g5RzitS8fwWrUMtf/?mibextid=oFDknk



The song & music played at this event is for entertainment purposes only. We do not claim any rights to the music, and it is not intended for commercial use. All rights belong to the respective copyright holders.

"स्वरवेणू प्रतिष्ठान"च्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर  रसिक मंत्रमुग्ध कल्याण दि.25 ऑगस्ट :उद्याच्या श्रीकृष्ण जन्माष्...
25/08/2024

"स्वरवेणू प्रतिष्ठान"च्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर रसिक मंत्रमुग्ध

कल्याण दि.25 ऑगस्ट :
उद्याच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कल्याणात बासरी वादकांनी सादर केलेल्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडले. आणि सुप्रसिद्ध बासरी वादक पंडीत विवेक सोनार यांच्या बासरी वादनाने तर या सूरमयी कार्यक्रमाचा कळसाध्याय रचण्याचे काम केले. निमित्त होते ते कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "स्वरवेणू प्रतिष्ठान"च्या परंपरा - २०२४ या वार्षिक कार्यक्रमाचे.

बासरी...आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन पारंपरिक वाद्यांपैकी एक वाद्य. आणि त्यातही श्रीकृष्ण आणि बासरीचं तर अतूट नातं. एकमेकांशिवाय दोघेही जणू काही अपूर्णच. या श्रीकृष्णप्रिय बासरीचे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातही तितकेच अढळ असे स्थान. या पार्श्वभुमीवर हे बासरी वाद्य आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसार - प्रचार करण्यासाठी कार्यरत असणारे स्वरवेणू प्रतिष्ठान.

या श्रीकृष्णप्रिय बासरीचे जादूगार अशी ज्यांची ओळख असणारे जागतिक कीर्तीचे बासरी वादक पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचे, पंडीत विवेक सोनार हे शिष्य. आणि या पंडीत विवेक सोनार यांचे शिष्य असलेल्या प्रशांत बानिया यांची ही स्वरवेणू प्रतिष्ठान संस्था. या स्वरवेणू प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशांत बानीया यांच्याकडून उद्याच्या श्रीकृष्ण जयंतीचे औचित्य साधून अतिशय सुंदर आणि सुमधुर अशा या बासरी वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रशांत बानिया हे दृष्टीहीन असूनही ते या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेकांना बासरी वादनाचे धडे देत आहेत.

आचार्य अत्रे रंगमंदिरात आज झालेल्या कार्यक्रमात 7 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 50 शिष्यांनी अतिशय सुमधुर असे बासरी वादन सादर केले. ज्यामध्ये शास्त्रीय संगीतासह चित्रपटातील लोकप्रिय गाणीही बासरीच्या माध्यमातून सादर करण्यात आली. ज्याला उपस्थित कल्याणकर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर मध्यांतरानंतर स्वरवेणू प्रतिष्ठानच्या प्रशांत बानिया यांनी एकल बासरी वादन सादर केले. ज्यांना स्वप्निल भाटे यांनी तबल्यावर साथ दिली. आणि त्यापाठोपाठ सुरमणी पंडीत विवेक सोनार यांनीही सुमधुर असे एकल बासरी वादन सादर केले. ज्याला उस्ताद अल्लारखा यांचे शिष्य तालमणी पंडीत आदित्य कल्याणपूर यांनी तबल्यावर साथ दिली. या सुमधुर कार्यक्रमाचे प्राजक्ता आपटे यांनी तितक्याच रसाळ भाषेत सूत्रसंचालन केले.

कल्याण शहर शिवसेनेची सामाजिक संवेदना जपणारी दहीहंडीसामाजिक उपक्रमांसोबत यंदा अनोख्या रील स्पर्धेचे आयोजनकल्याण दि.25 ऑगस...
25/08/2024

कल्याण शहर शिवसेनेची सामाजिक संवेदना जपणारी दहीहंडी

सामाजिक उपक्रमांसोबत यंदा अनोख्या रील स्पर्धेचे आयोजन

कल्याण दि.25 ऑगस्ट :
सामाजिक भान जपून आपली संस्कृती परंपरा कायम राखणारा दहीहंडी उत्सव अशी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या दहीहंडी उत्सवाची ओळख आहे. यंदाच्या दहीहंडीचे हे 16 वे वर्ष असून यंदाही त्याचे भव्य स्तरावर आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर प्रमूख रवी पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली. तसेच सामाजिक उपक्रमासोबतच यावर्षी युवा वर्गासाठी अनोखी रिल स्पर्धा हे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण असणार आहे.

दहीहंडी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख उत्सव असून गेल्या दोन दशकांपासून त्याला अतिशय भव्य स्वरुपात त्याचे साजरीकरण केले जात आहे. उद्या सोमवारी 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती असून मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी गोपाळकाला उत्सव होणार आहे. शिवसेना शहर शाखेची दहीहंडी ही कल्याणातील प्रमूख दहीहंडी उत्सवापैकी एक समजला जातो. याठिकाणी आपली सांस्कृतिक परंपरासोबतच सामाजिक भानही जपण्यात येते. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या दहीहंडी उत्सवातून अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू व्यक्तींना, देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबाला, नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावर्षी अपघातात निधन झालेल्या साईभक्तांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना शहर शाखेतर्फे उचलण्यात आल्याची माहिती यावेळी शहरप्रमूख रवी पाटील यांनी दिली.

तर दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांचा विचार करता यंदा प्रथमच अनोख्या मोबाईल रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शिवसेना शहर शाखेच्या दहीहंडी उत्सवाचे मोबाईल चित्रीकरण करून ज्या स्पर्धकाच्या रिलला सोशल मीडियावर लाइक्स, कमेंट आणि व्ह्यू सारखी अधिक पसंती मिळेल त्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नियुक्त जजेसकडून सहभागी स्पर्धकांच्या रिल्सचे कॅमेरा अँगल, क्रिएटीव्हीटी आदी प्रमुख घटकांचा विचारही केला जाणार आहे. या रिल स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 25 हजार, द्वितीय विजेत्याला 15 हजार आणि तृतीय विजेत्याला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमूख पाटील यांनी दिली आहे.

यावेळी शहरप्रमूख रवी पाटील यांच्यासह उपशहरप्रमुख सुनील खारूक,नितिन माने,नरेंद्र कामत, दुर्योधन पाटील, विनोद गायकवाड, विभागप्रमुख भाऊ व्यवहारे,मधू सातवे,उपविभागप्रमुख कुणाल कुलकर्णी, शाखाप्रमुख संतोष घोलप,सागर जाधव,उपशाखा प्रमुख गणेश वेदापठक,युवासेना सहसचिव प्रतिक पेणकर, भिवंडी लोकसभा विस्तारक सूचेत डामरे उपस्थित होते.

कल्याणातील भाजपच्या दोघा पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये "घरवापसी"; राकेश मुथांपाठोपाठ राजाभाऊ पाटकरही स्वगृही कल्याण दि.25...
25/08/2024

कल्याणातील भाजपच्या दोघा पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये "घरवापसी"; राकेश मुथांपाठोपाठ राजाभाऊ पाटकरही स्वगृही

कल्याण दि.25 ऑगस्ट :
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात प्रमूख राजकीय पक्षांमधून इनकमिंग - आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता कल्याणातील दोघा भाजप नेत्यांचीही भर पडली असून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसचा हात आपल्या हाती धरला आहे. काही दिवसांपूर्वीच राकेश मुथा यांच्या काँग्रेस प्रवेशापाठोपाठ आता राजाभाऊ पाटकर यांनीही स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले. मतदारांच्या या भूमिकेच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने इनकमिंग - आऊटगोइंगला सुरुवात झाली आहे. 2014 किंवा त्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग झाले. मात्र नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुक निकालानंतर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत.
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसमध्येही सध्या हेच चित्र दिसत असून अवघ्या काही दिवसांच्या फरकाने दोघा नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये राकेश मुथा आणि आता राजाभाऊ पाटकर यांचा समावेश आहे. भाजप हा केवळ लेना बँक असून ज्यावेळी कार्यकर्त्यांना द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना कोणतीही जबाबदारी द्यायची नाही. केवळ आपल्या दिखव्यासाठी वापर करायचा अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी भाजपवर टीका केली आहे. शेतकरी असो, युवक असो, बेरोजगारीचा प्रश्न असो अशा सर्वच क्षेत्रात भाजप सरकार अपयशी ठरले असून त्यांच्या या लोकशाहीविरोधी धोरणांना कंटाळून आमचे जुने सहकारी काँग्रेसमध्ये परतत असल्याची प्रतिक्रियाही पोटे यांनी यावेळी दिली.

तर आपण एक बहुजन समाजातील कार्यकर्ता असून भाजपची सध्याची ध्येयधोरणे आपल्याला अजिबात पटत नाहीयेत. भाजपमध्ये सध्या ज्या प्रकारचे राजकरण सुरू आहे ते आपल्याला न पटणारे आणि आपल्या तत्वात न बसणारे आहे. त्यामुळे आपण पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राजाभाऊ पाटकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

डोंबिवली स्टेशनच्या फलाट पाचवरील छताच्या कामाला लवकरच सुरूवात - मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांच्या पाठपुराव्याला यश डो...
24/08/2024

डोंबिवली स्टेशनच्या फलाट पाचवरील छताच्या कामाला लवकरच सुरूवात - मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली दि.24 ऑगस्ट :
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर गेल्या वर्षापासून छत नाही. त्यामुळे उन्हाचा त्रास सहन केलेल्या डोंबिवलीकरांना पावसाळ्यात लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा सहन करावा आहे. यासंदर्भात मनसेचे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे शेडच्या काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून तातडीने शेडचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानक हे रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यासह सर्वाधिक गर्दीचे स्थानक समजले जाते. या स्टेशनवरून दररोज लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र इतकं असूनही या रेल्वे स्थानकावरील समस्यांकडे रेल्वे प्रशासनाच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या स्टेशनवरील फलाट क्रमांक 5 वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाजूकडील विस्तारित फलाटावर सुमारे दीड वर्षापासून छत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमध्ये चढताना पावसाचा माराही सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षापासून प्रवाशांंकडून, रेल्वे प्रवासी संघटनांकडून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत बांधण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांंकडे केली जात होती. या कामासाठी निधीही मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्र व्यवहार करत लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली होती.

मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील 5व्या फलाटावर शेड नसल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाच्या कालखंडात मनसे आमदार प्रमोद(राजू )पाटील यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.यानंतर आता आमदार पाटील यांना रेल्वेने लेखी आश्वासन देऊन लवकरच शेडचं काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.

महाविकास आघाडीकडून कल्याणातही तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शनेगुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची केली मागणीकल्याण दि.2...
24/08/2024

महाविकास आघाडीकडून कल्याणातही तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने

गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची केली मागणी

कल्याण दि.24 ऑगस्ट :
बदलापूर येथे दोन चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज कल्याणातही निषेध आंदोलन केले तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे झेंडे घेऊन यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला त्यासोबत हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी ही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीने आपला आजचा प्रस्तावित महाराष्ट्र बंद मागे घेत त्याऐवजी ठिकठिकाणी निदर्शने करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानुसार आज कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी मधील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. या आंदोलनकर्त्यांनी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्या ठिकाणी आपले निषेध आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झाला पाहिजे, बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कोठारात कठोर शासन झालं पाहिजे आधी अशाच्या मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या.
दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद मागे; काळे झेंडा आणि तोंडाला पट्टी बांधून होणार आंदोलनकल्याण दि.23 ऑगस्ट : बदलापूरमध्य...
23/08/2024

महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद मागे; काळे झेंडा आणि तोंडाला पट्टी बांधून होणार आंदोलन

कल्याण दि.23 ऑगस्ट :
बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्यांवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेला उद्याचा "महाराष्ट्र बंद" मागे घेण्यात आला आहे. त्याऐवजी आता केवळ काळे झेंडे आणि तोंडाला पट्टी बांधून निदर्शने करण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

बदलापूरमधील घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. आणि मग त्यांच्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मग पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. या बंदऐवजी राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचंही महाविकास आघाडीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

"व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच कल्याणातील स्मार्ट सिटीची विकासकामे करा" - व्यापारी फेडरेशनची आग्रही मागणी कल्याणात झालेल...
23/08/2024

"व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच कल्याणातील स्मार्ट सिटीची विकासकामे करा" - व्यापारी फेडरेशनची आग्रही मागणी

कल्याणात झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

कल्याण दि.23 ऑगस्ट :
कल्याणातील व्यापाऱ्यांनी शासकीय प्रकल्पांमध्ये यापूर्वीच भरपूर काही भोगले असल्याचे सांगत विविध विकासकामांबाबत इथल्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या यापुढील सर्व विकासकामांमध्ये व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची आग्रही भूमिका व्यापारी फेडरेशनतर्फे मांडण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण हॉलमध्ये व्यापाऱ्यांची बैठक झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली.

केडीएमसी मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहम्मद अली चौक ते महात्मा फुले चौक या मार्गावर गेल्या 20 वर्षांत दोन वेळा रस्ता रुंदीकरण झाले आहे. त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बाधित झाली असून व्यापारी वर्गाला केडीएमसी प्रशासनाकडून त्याबाबत अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. हे ही कमी होते म्हणून की काय आता आम्हा सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता या भागातून कल्याण मेट्रो नेण्याची तयारी केली जात असल्याची आम्हाला शंका आहे. या शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही शासनाच्या संबंधित विभगांसह केडीएमसी प्रशासनाशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडून यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती आम्हाला मिळत नाहीये. आमचा स्मार्ट सिटीला किंवा त्याअंतर्गत होणाऱ्या सॅटीस प्रकल्प, कल्याण मेट्रो आदीना अजिबात विरोध नाहीये, परंतू या सर्व प्रकल्पांसाठी शासनाने आम्हाला पुन्हा विस्थापित करू नये अशी आमची भूमिका असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरीश खंडेलवाल यांनी सांगितले.

तर या शहराचे मूळ रहिवासी असणाऱ्या जुन्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करून नव्याने आलेल्या - येणाऱ्या लोकांसाठी विकास प्रकल्प आणण्यामध्ये शासनाचा नेमका कोणता विचार आहे? त्यामुळे कल्याणात येणारी ही मेट्रो दुर्गाडी - गोविंदवाडी बायपासमार्गे एपीएमसीला ही मेट्रो नेण्यात यावी असे किरण चौधरी यांनी यावेळी सांगितले.

तर जागरूक नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले की या मेट्रोचा डी पी आर कल्याणातील व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच बनवला गेला पाहिजे. तसे झाले नाही तर आम्ही या प्रकल्पाविरोधात कोर्टामध्ये लढाई सुरू करू अशी प्रतिक्रिया घाणेकर यांनी यावेळी दिली आहे.

उद्याच्या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - महाविकास आघाडीचे आवाहनशांततेच्या मार्गाने बंद करण...
23/08/2024

उद्याच्या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - महाविकास आघाडीचे आवाहन

शांततेच्या मार्गाने बंद करणार

कल्याण दि.23 ऑगस्ट :
बदलापूरमधील "त्या " घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्याच्या या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या कल्याण डोंबिवलीतील नेत्यांकडून करण्यात आले आहे.

बदलापूर मध्ये झालेल्या त्या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. लोकांमधील या रोषाला या 'महाराष्ट्र बंद'च्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जाणार आहे. हा बंद आम्ही संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने करणार असून त्यामध्ये शहरांतील व्यापारी संघटना, ज्वेलर्स असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक संघटना आदींनी आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी दिली.
तर या बंद दरम्यान औषधे, रुग्णालये, दूध सेवा आदी आपत्कालीन सेवांना वगळण्यात आले आहे. तर शहरातील शाळा - कॉलेजेसनेही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले.
बदलापूर येथील आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून तब्बल 9 तास रेल्वे वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे उद्या लोकल सेवाही बंद करणार का? याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी लोकल सेवा सुरळीत सुरू राहील, आम्ही बंद करणार नाही असे स्पष्ट केले.

आम्हाला हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचे असून आम्ही पोलिसांना तशी विनंतीही करणार आहोत. मात्र या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील अशी प्रतिक्रियाही सचिन पोटे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अल्ताफ शेख, कल्याण उप जिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, शहरप्रमुख सचिन बासरे, ज्येष्ठ शिवसैनिक रवी कपोते, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यासह महविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

23/08/2024

उद्याच्या महाराष्ट्र बंदबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची कल्याणात संयुक्त पत्रकार परिषद... लाईव्ह टेलिकास्ट
fans

* *
* *

डोंबिवलीत १० हजार प्रवाशांनी काळ्या फिती बांधून केला रेल्वे प्रवासडोंबिवली दि.23 ऑगस्ट :लोकल गाड्या वेळेवर चालवा, जादा फ...
23/08/2024

डोंबिवलीत १० हजार प्रवाशांनी काळ्या फिती बांधून केला रेल्वे प्रवास

डोंबिवली दि.23 ऑगस्ट :
लोकल गाड्या वेळेवर चालवा, जादा फेऱ्या सोडा, ठाणे कर्जत- कसारा शटल सेवा द्या, महिला विशेष लोकल सोडा या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत विविध प्रवासी संघटनांनी गुरुवारी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून प्रवास अभियान राबवले. ज्याला दहा हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला. विशेषतः युवा वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य केले. रेल्वेचा निषेध नव्हे तर "आता तरी जागे व्हा" या टॅग लाईनखाली संघटनांनी काळी फित बांधून रेल्वेप्रवास केला. सर्वाधिक गर्दीचे बळी हे डोंबिवलीचे आहेत. त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. आबालवृद्ध नागरिक त्यात काळी फित बांधण्यासाठी पुढे आले होते.

मुंबई महानगर प्रदेशातील लोकल प्रवासी आपला मृत्यू पाठीशी घेऊनच लोकल प्रवास करीत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसांकडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी हे ज्वलंत वास्तव लक्षात येते. दीर्घकाळ रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रवाशांच्या तुलनेत न वाढणार्‍या लोकल फेर्‍या, मेल एक्स्प्रेस माल गाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे, मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही न करणे, साध्या लोकल एवजी वातानुकूलित लोकल चालविणे,सातत्याने लोकल सेवा विस्कळीत होणे या घटनांमुळे लोकल प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. या सर्व मुद्द्यांचा पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष बैठका रेल्वे प्रशासनासोबत सुरू आहेतच. मात्र रेल्वे प्रशासन या सर्वच मागण्यांबाबत हतबलता व्यक्त करीत असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सांगण्यात आले. Ac लोकल चालविण्याचा आग्रह धरणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने मागील दहा वर्षात सीएसएमटी तर दूर साधी ठाणे स्थानकातून कर्जत -कसारा मार्गावर एकही लोकल फेरी वाढविलेली नाही. सुखद सुरक्षित आणि संरक्षित रेल्वे प्रवास हा लोकल प्रवाशांचा अधिकार नाही का? असा संतप्त सवालही प्रवासी संघटनेकडून करण्यात आला.

मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या रेल्वेच्या या प्रशासकीय अनास्थेविरुद्ध मुंबई रेल प्रवासी संघाच्या आवाहनानुसार एमएमआरमधील लोकल प्रवशांनी 22 ऑगस्ट रोजी पांढरे कपडे आणि काळी फित लावून प्रवास केला.

Address

Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when LNN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LNN:

Videos

Share


Other News & Media Websites in Kalyan

Show All