03/02/2025
कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तींची नाहक बदनामी करणाऱ्यास तात्काळ शासन व्हावे : चारुदत्त आफळे
ब्राह्मण संमेलनात झाला ठराव
मुख्यमंत्र्यांना पाठवणार निवेदन
डोंबिवली: कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तींबद्दल कोणतेही पुरावे नसताना मानहानी करणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात राज्य शासनाने त्वरित कठोर शासन करण्याची भूमिका घ्यावी वेळप्रसंगी अशा व्यक्तींना तुरुंगात धाडावे, जेणेकरून कोणाचाही अपमान होणार नाही. राष्ट्रपुरुष, सन्माननिय व्यक्ती तसेच सामान्यांचा मान राखला जाईल अशी जनहितावह सर्वसामावेशक भूमिका घेणे ही काळाची गरज आहे. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली या संस्थेने ती जबाबदारी घेऊन तशी सूचना राज्य शासनाला करावी असे मत प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, व्याख्याते ह.भ.प. चारुदत्त।आफळे यांनी रविवारी डोंबिवलीत केले. ब्राह्मण महासंघाने शहरातील सर्व संलग्न ब्राह्मण ज्ञाती संस्थांच्या सहकार्याने ब्राह्मण संमेलन- २०२५ भरवले होते. डोंबिवली येथील टिळकनगर शाळेच्या मैदानात ब्राह्मण संमेलन संपन्न झाले, त्यावेळी ह. भ प. चारुदत्त आफळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानिमित्ताने संस्थेने स्वरोत्सव हा गायक, कवी किरण फाटक यांनी त्यांच्यासह ५ कलाकारांच्या साथीने गाण्याचा कार्यक्रम सादर केला. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष मानस पिंगळे, कार्यवाह अनघा बोंद्रे, उपाध्यक्ष आणि संमेलन कार्यक्रम प्रमुख अनिकेत घमंडी, उपाध्यक्ष निलेश वीरकर, कोषाध्यक्ष जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष उल्हास दाते आदींसह इतर कार्यकारिणी सदस्यांनी त्याच्या आयोजनाची जबाबदारी घेतली होती. ब्राह्मण ज्ञाती संस्थाध्यक्ष आणि शेकडो ब्राह्मण नागरिक त्यावेळी उपस्थित होते. दोन सत्रात कार्यक्रम संपन्न झाला. आफळे यांच्या सुचनेनूसार महासंघाने तसा ठराव संमत करून सर्व।उपस्थितांसमक्ष तसे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्याचे जाहीर केले. त्यानिमित्ताने ज्ञातीतील अप्पा जोशी- सामाजिक , डॉ शुभदा जोशी -तत्वज्ञान, स्वरूप पुराणिक आणि अभिराज वीरकर - क्रीडा, वृशांक कवठेकर - कला, वृषाली राजवाडे- शैक्षणिक आणि अनुपमा कुलकर्णी- शास्त्रज्ञ आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ब्राह्मण महासंघ संस्थापक सदस्य आदींचा गौरव करण्यात आले. राष्ट्रगीताने शुभारंभ आणि वंदे मातरमने संमेलनाची सांगता झाली. -----