Times of 243

Times of 243 Digital Media And News Agency
(40)

कौल कोणाला?
09/05/2024

कौल कोणाला?

08/05/2024

धाराशिव चे माजी खासदार रवी गायकवाड यांचे मुस्लिम समाजाचे विषयी बेताल वक्तव्य,
भूम येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा

07/05/2024

भूम येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र क्रमांक 238 व 239 येथील मशीन मतदान करण्यासाठी जास्त वेळ घेत असल्यामुळे मतदान करतेवेळी मतदारांना जास्तीचा वेळ लागत आहे. त्यामुळे मतदान करण्याची वेळ संपल्यावर सुध्दा दोन्ही मतदान केंद्रावर सुमारे ५०० ते ६०० मतदार रांगेत उभे आहेत व अजूनही मतदान सुरू आहे. मतदान चोख पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. शाळेच्या गेटच्या आत मतदारांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा खुलासा...भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील घटनेचा लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही
07/05/2024

उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा खुलासा...
भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील घटनेचा लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही

04/05/2024

भूम शहरामध्ये आज गटशिक्षणाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती टू व्हीलर रॅली करण्यात आली यावेळी तहसीलदार जयवंत पाटील गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी व शिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व शिक्षक यावेळी उपस्थित होते शहरांमध्ये जनजागृती रॅली काढून नागरिकांना मतदान करण्यासाठी घोषणा देऊन प्रोत्साहित करण्यात आले. या टू व्हीलर रॅली च्या माध्यमातून संपूर्ण शहरात फिरून जनजागृती करण्यात आली .

भूम :तालुक्यातील एकमेव नोंदणीकृत पत्रकार संघभूम तालुका पत्रकार संघ अध्यक्ष पदी सर्वानुमते धनंजय शेटे यांची निवड तर सचिव ...
27/04/2024

भूम :
तालुक्यातील एकमेव नोंदणीकृत पत्रकार संघ
भूम तालुका पत्रकार संघ अध्यक्ष पदी सर्वानुमते धनंजय शेटे यांची निवड तर सचिव पदी गौस शेख यांची निवड...

धाराशिवमध्ये 31उमेदवार  #रिंगणात....!
23/04/2024

धाराशिवमध्ये 31उमेदवार #रिंगणात....!

ओमराजेंचे आरोप बिनबुडाचे, फौजदारी कारवाई करणारआमदार राणाजगजितसिंह पाटलांचा इशारा धाराशिव प्रतिनिधी :           तेरणा हॉस...
22/04/2024

ओमराजेंचे आरोप बिनबुडाचे, फौजदारी कारवाई करणार
आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा इशारा
धाराशिव प्रतिनिधी :
तेरणा हॉस्पीटलमधील रुग्णांच्या उपचाराबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ओमराजेंनी केलेले आरोप खोटे असून फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा राणा पाटील यांनी दिला आहे. गेल्या १२ वर्षात जवळपास १ लाख रुग्णांवर तेरणा हॉस्पीटलमध्ये मोफत उपचार करण्यात आले. त्यापैकी २७ हजार रुग्णांना सरकारी योजनेतून लाभ मिळाला तर इतर रुग्णांच्या उपचाराचा खर्च तेरणा हॉस्पिटलने केला, अशी माहिती पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना १६ रुग्णांवर १३८ शस्त्रक्रिया झाल्याच्या ओमराजेंच्या आरोपांना देखील आमदार पाटील यांनी खोडून काढलं. "किडनीच्या आजाराच्या रुग्णांना डायलिसीससाठी अनेकदा उपचार घ्यावे लागतात. कधीकधी एखाद्या रुग्णाला १०-२० वेळा डायलिसीससाठी जावे लागते, त्यामुळे तशी आकडेवारी दिसून येते. एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही तर अनेक उपचार झाले आहेत. एक तर याला काही समजत नसेल किंवा खोटं बोलत असेल", असं आमदार राणा पाटील म्हणाले.

अर्ज भरला...  #धाराशिवच्या दोन्ही उमेदवारांची  #संपत्ती किती?धाराशिव : लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदव...
21/04/2024

अर्ज भरला... #धाराशिवच्या दोन्ही उमेदवारांची #संपत्ती किती?

धाराशिव : लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमा प्रमाणे आपल्या संपत्तीची माहिती द्यावी लागते. धाराशिव लोकसभा निवडणुकीतील उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले असून त्यासोबत आपल्या संपत्तीचे विवरण देखील निवडणूक आयोगाला सादर केले आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्न,कुटुंबियातील सदस्यांची संपत्ती, रोख रक्कम, सोने, गाड्या याबाबत माहिती दिली आहे.

ओमराजे निंबाळकर (शिवसेना)

वार्षिक उत्पन्न

ओमराजे निंबाळकर - 19 लाख 84 हजार

पत्नी संयोजनी निंबाळकर - 7 लाख 83 हजार

रोख रक्कम

ओमराजे निंबाळकर - 8 लाख 57 हजार

संयोजनी निंबाळकर - 5 लाख 12 हजार

गुंतवणूक

ओमराजे निंबाळकर -बँक आणि इतर अशी 1 कोटी 70 लाख

संयोजनी निंबाळकर - 50 लाख रुपये

गाड्या

ओमराजे निंबाळकर - एक दुचाकी तर 2 चारचाकी गाडी ( एक इनोव्हा आणि एक एस क्रॉस गाडी)

पत्नी संयोजनी निंबाळकर - वाहन नाही

दागिने

ओमराजे निंबाळकर - 11 तोळे

संयोजनी निंबाळकर -30 तोळे

जमीन

ओमराजे निंबाळकर - 3 कोटी 88 लाख रुपयांची जमीन

संयोजनी निंबाळकर - 1 कोटी 41 लाखांची जमीन

कर्ज

22 लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज, तर 2 लाख 50 हजार बँकेचं कर्ज

अर्चना पाटील (राष्ट्रवादी)

वार्षिक उत्पन्न

अर्चना पाटील - 7 लाख 73 हजार

पती राणाजगजीत पाटील - 65 लाख 47 हजार

रोख रक्कम

अर्चना पाटील - 5 लाख 35 हजार रोख आणि बँकेत - 8 लाख 77 हजार रुपये

पती राणाजगजीत पाटील - 7 लाख 56 हजार रक्कम आणि बँकेत 22 लाख 97 हजार रुपये

गुंतवणूक

अर्चना पाटील - बॉण्ड आणि इतर मध्ये 22 लाखांची गुंतवणूक

पती राणाजगजीत पाटील - 2 कोटी 6 लाख

कर्ज

अर्चना पाटील - 8 लाख 91 हजार कर्ज

पती राणाजगजीत पाटील - 5 कोटी 87 लाख कर्ज

शासकीय देणी

अर्चना पाटील - 1 लाख 41 हजार

पती राणाजगजीत पाटील -48 लाख 45 हजार

गाड्या

अर्चना पाटील - एकही नाही

पती राणाजगजीत पाटील - एक दुचाकी, दोन चारचाकी गाडी

दागिने

अर्चना पाटील - 3 कोटी 54 लाखांचे सोने दागिने

पती राणाजगजीत पाटील - 8 लाख 94 हजार

जमीन

अर्चना पाटील - 1 कोटी 47 लाखांची जमीन

पती राणाजगजीत पाटील - 3 कोटी 86 लाखांची जमीन आणि 15 कोटींची नॉन ऍग्री / बिल्डिंग

देणी

अर्चना पाटील -66 लाख 95 हजार रुपये

पती राणाजगजीत पाटील - 5 कोटी 78 लाख

भूम येथील आर्यनराजे किसनराव शिंदे यांनी 40 उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
19/04/2024

भूम येथील आर्यनराजे किसनराव शिंदे यांनी 40 उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

वंचित बहुजन  #आघाडीचा अर्ज ...!उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी दाखल केल...
18/04/2024

वंचित बहुजन #आघाडीचा अर्ज ...!

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

"ज्यांना  #खासदाराचं काय काम असतं हे माहीत नाही, ते आम्हाला विचारतात ४० वर्षात काय  #काम केलं?" -  #राणाजगजितसिंह पाटीलध...
17/04/2024

"ज्यांना #खासदाराचं काय काम असतं हे माहीत नाही, ते आम्हाला विचारतात ४० वर्षात काय #काम केलं?" - #राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराणे जोर धरला आहे. धाराशिव लोकसभेच्या निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना बघायला मिळत आहेत. "ज्यांना खासदाराचं काय काम असतं हे माहीत नाही, ते आम्हाला विचारतात ४० वर्षात काय काम केलं?" अशी घाणाघाती टीका राणाजगजितसिंह पाटील यांनी विद्यमान खसदारांवर केली आहे.

पुढे बोलताना राणाजगजितसिंह पाटीलम्हणाले, खासदारांचे काम असते आपल्या भागात मोठे केंद्रीय प्रकल्प आणणे. आपल्या जिल्हयासाठी केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आणणे, आपल्या भागात जी अडचण असेल ति सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे. मात्र आपल्या विद्यमान खासदारांनी आपल्या भागात किती निधी आणला, कोणती समस्या सोडवली याचा अभ्यास केला असतं जे कटुवास्तव आहे जनतेच्या आणि समोर येईल.

विरोधक आज विचारत आहेत मागील 40 वर्षात काय केले आहे? तर लक्षात घ्या 40 वर्षांपूर्वी लातूर - धाराशिव हा मोठा जिल्हा होता, त्यात फक्त एक सारखर कारखाना होता तो म्हणजे तेरणा. त्यांची क्षमता जेवढी होती त्यासाठी ऊस कर्नाटकातून आणावा लागत होता, आज देशात सर्वाधिक साखर कारखाने आपल्या धाराशिव मध्ये आहेत. कुठून आले कारखाने? तर ऊस उपलब्ध झाला म्हणून कारखाने आले, ऊस क्षेत्र वाढले कारण पाणी उपलब्ध झाले म्हणून आणि पाणी कुठून उपलब्ध झाले तर डॉ. पद्मसिंह पाटील साहेब पाटबंधारे मंत्री असताना जे काम केले त्यामुळे हा कायापालट झाला आहे. हजारो कोटी रुपये जे आजा शेतकऱ्यांच्या घरात येतात ते आजपर्यंत आमच्याकडून झालेल्या कामामुळे येतात. असे पाटील म्हणाले.

 #ओमराजेंनी AB फॉर्म घेतला, उद्या  #उमेदवारी अर्ज भरणार..!धाराशिव - शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून उस्...
15/04/2024

#ओमराजेंनी AB फॉर्म घेतला, उद्या #उमेदवारी अर्ज भरणार..!

धाराशिव - शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून उस्मानाबाद ( धाराशिव ) लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी AB फॉर्म घेतला. उद्या 16 मार्च रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी, मनात एकच होते की अनेक गद्दार गेले तरी आपण खुद्दारी जोपासली व हा AB फॉर्म म्हणजे त्याच निष्ठेचे फळ होय, असे ओमराजे यांनी म्हटले.

लोक रात्रीतून पक्ष प्रवेश करून सकाळी उमेदवारी मिळवतात. पण आम्ही ना पक्ष बदलला ना निष्ठा त्यामुळे जनतेशी इमान राखून निवडणूक लढत आहे, असेही त्यांनी म्हटले.

😯लोकमत प्रतिनिधी अरुण देशमुख
13/04/2024

😯
लोकमत प्रतिनिधी अरुण देशमुख

धाराशिवसाठी  #वंचितची उमेदवारी जाहीर..!वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवा...
11/04/2024

धाराशिवसाठी #वंचितची उमेदवारी जाहीर..!

वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

खास उन्हाळ्यानिमित्त जम्बो कुलर व फॅन योग्य दरात भाड्याने मिळेल...बागडे मंगल सेवा केंद्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर, क...
09/04/2024

खास उन्हाळ्यानिमित्त जम्बो कुलर व फॅन योग्य दरात भाड्याने मिळेल...
बागडे मंगल सेवा केंद्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर, कसबा बाय पास रोड, भूम
प्रो.प्रा. श्याम बागडे 8485081830

ताई माई अक्का, कोण आला रे कोण आला... येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणांनी निवडणुक काळात मतदारसंघ दणाणून जायचा. सायकल, रिक...
05/04/2024

ताई माई अक्का, कोण आला रे कोण आला... येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणांनी निवडणुक काळात मतदारसंघ दणाणून जायचा. सायकल, रिक्षा, जीपगाड्या आणि आता महागड्या गाड्यांमधूनही प्रचार होऊ लागला. त्यासाठी, गळ्यात धनुष्यबाण चिन्हाचा गमछा, खिशाला कागदी बिल्ला, मोठमोठे कटाऊट, स्टीकर आणि धनुष्यबाण चिन्ह सर्वत्र झळकलं जायचं. दिसला बाण की मार शिक्का... अशीही घोषणा व्हायची. मात्र, यंदाच्या निवडणुकीत #धाराशिवमधून_धनुष्यबाणच_गायब_झालाय

ताई माई अक्का, कोण आला रे कोण आला... येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणांनी निवडणुक काळात मतदारसंघ दणाणून जायचा.

05/04/2024

Adv शायनी नवनाथ जाधव लोकसभेसाठी ईच्छुक, ८० हजार विधवा, निराधार महिलांचा पाठिंबा

कोण होईल धाराशिव चा खासदार?ओमराजे निंबाळकर वि. अर्चनाताई पाटील
04/04/2024

कोण होईल धाराशिव चा खासदार?
ओमराजे निंबाळकर वि. अर्चनाताई पाटील

अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश, महायुती कडून लोकसभेची उमेदवारी जाहीर...
04/04/2024

अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश, महायुती कडून लोकसभेची उमेदवारी जाहीर...

दै. संचार
04/04/2024

दै. संचार

03/04/2024

कुसुमनगर भागातील बँक ऑफ इंडिया भूम शाखेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकल्याने वाहनधारकांची कसरत
पार्डी ते खर्डा नवीन रस्ता कामामुळे नागरिकांची गैरसोय स्वराज्य संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिंदेंच्या  #शिवसेनेची पहिली यादी जाहीर...! धाराशिव
28/03/2024

शिंदेंच्या #शिवसेनेची पहिली यादी जाहीर...! धाराशिव

प्राईड इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजराभूम प्रतिनिधी :- येथील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये स्वयंशासन दिन ...
27/03/2024

प्राईड इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा

भूम प्रतिनिधी :-
येथील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. वरद उपरे याने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज आणि एक दिवसीय प्रशासन चालवले. प्राईड इंग्लिश स्कूल च्या युकेजी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन केले होते. प्रारंभी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेतानाच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे
एक प्रतीक असते. प्राचार्य, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपतो. यावेळी स्वरा गपाट ही उपप्राचार्य बनली होती. तर इतर विद्याथ्यांनी शिक्षक म्हणून कार्य पार पाडले.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघा सुपेकर, दिपीका टकले, सरस्वती कुलकर्णी यांच्यासह आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.

 #शिवसेना उबाठाकडून  #ओमराजेचं अधिकृतपणे नाव जाहीर... #धाराशिव
27/03/2024

#शिवसेना उबाठाकडून #ओमराजेचं अधिकृतपणे नाव जाहीर...

#धाराशिव

26/03/2024

भूम सकल मराठा समाजाची लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका

26/03/2024

धाराशिव लोकसभेच्या जागेची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून मागणी - सूत्र

संचार...
23/03/2024

संचार...

22/03/2024

भूम : गोलेगाव येथील पारधी वस्तीचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून बंद भूम येथे पंचायत समिती समोर आमरण उपोषण, गटविकास अधिकारी यांची नागरिकांसोबत चर्चा

22/03/2024

गोलेगाव येथील पारधी वस्तीचा पाणीपुरवठा बंद भूम येथे पंचायत समिती समोर उपोषण

Address

Bhum
413504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Times of 243 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Times of 243:

Videos

Share

Nearby media companies


Other Media/News Companies in Bhum

Show All