Bhoom Live

Bhoom Live कला साहित्य क्रीडा प्रशासन राजकीय सामाजिक बातम्यांचे व्यासपीठ

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
26/01/2024

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित सप्ताहाची शोभायात्रेने सांगताभूम प्रतिनिधी :       शाकंभरी पौर्णिमा निमित्त येथे आयोजित च...
26/01/2024

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित सप्ताहाची शोभायात्रेने सांगता

भूम प्रतिनिधी :
शाकंभरी पौर्णिमा निमित्त येथे आयोजित चौंडेश्वरी देवी महोत्सवात गुरूवार दि २५ रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी १८ जानेवारी ते २५ जानेवारी या सात दिवसाच्या कालावधीत झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. तुकाराम मेहुणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सदरील शोभायात्रेत सर्व कोष्टी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी शोभायात्रेचा प्रारंभ चौंडेश्वरी देवीची पालखीसह सकाळी वरद विनायक मंदिरातून झाला. शोभायात्रेत कलशधारी महिला यांनी सहभाग घेतला. हिरवा मारुती मंदिर, शेंडगे गल्ली, गांधी चौक, चौंडेश्वरी मंदिर, नगरपरिषद चौक, लक्ष्मी रोड, गोलाई चौक, परंडा रोड मार्गे ही शोभायात्रा परत वरदविनायक मंदिर परिसरात विसावली. यावेळी भूम शहराचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते संजय नाना गाढवे यांच्या हस्ते गांधी चौक येथे देवीच्या पालखीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर वरद विनायक मंदिर सप्ताह ठिकाणी श्री.चौंडेश्वरी मातेची महाआरती झाली. यानंतर चौंडेश्वरी तरुण व एकता मंडळाच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा व १ मिनिट स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसांचे वाटप डॉ.राहुल घुले यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
सप्ताहदरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार यांचे कार्यक्रम पार पडले. यावेळी भूम शहरात कोष्टी बांधवांची विविध प्रकारची दुकाने बंद असल्याने गुरुवार आठवडी बाजाराचा दिवस असून देखील शहरातील व्यापारपेठेत अघोषित शांतता होती. सदरील कार्यक्रमास कोष्टी समाजातील ज्येष्ठ यांनी मार्गदर्शन केले तर तरुणांनी अथक परिश्रम घेतले.

भूम प्रतिनिधी :मुख्याधिकारी गैरहजर, खुर्चीला हार घालून खुर्चीत ठेवले निवेदन...भूम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श...
31/03/2022

भूम प्रतिनिधी :
मुख्याधिकारी गैरहजर, खुर्चीला हार घालून खुर्चीत ठेवले निवेदन...
भूम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री तानाजी चव्हाण हे त्यांच्या कार्यालयात सतत गैरहजर असल्याचा आरोप करत भूम येथील सर्वपक्षीय नेत्यांनी भूम येथील बाजारपेठच्या जागेच्या ऑनलाइन कर आकारणी ई टेंडर प्रक्रियमध्ये पारदर्शकता यावी हे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून निवेदन खुर्चीत ठेवले. या निवेदनाद्वारे भूम शहरात 6 एप्रिल 2022 पर्यंत या प्रक्रियेबद्दल डिजिटल बॅनर लावले नाहीत तर 7 एप्रिल 2022 रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. निवेदन देते वेळी युवक काँग्रेसचे नेते रुपेश अप्पा शेंडगे, विलास शाळू, मोईज सय्यद, ऍड.अमृता गाढवे व ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमनी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजाभाऊ माने, युवानेते राजे यशवंत थोरात व कार्यकर्ते उपस्थित होते.

11/03/2022
11/03/2022
11/03/2022

Address

Bhoom
413504

Telephone

+919175509755

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhoom Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhoom Live:

Share

Nearby media companies


Other Media/News Companies in Bhoom

Show All

You may also like