ठाणे वृत्तमत - Thane Vruttamat

  • Home
  • India
  • Thane
  • ठाणे वृत्तमत - Thane Vruttamat

ठाणे वृत्तमत - Thane Vruttamat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ठाणे वृत्तमत - Thane Vruttamat, Social Media Agency, Thane.

ठाणे- (दि 13 ) *ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री Adv "विक्रांत चव्हाण" साहेब यांच्या शुभहस्ते व ठाणे शह...
13/08/2022

ठाणे- (दि 13 ) *ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री Adv "विक्रांत चव्हाण" साहेब यांच्या शुभहस्ते व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष श्री. "स्वप्निल भालचंद्र कोळी" यांच्या माध्यमातून कु. "साहिल प्रदीप सुर्यवंशी" यांची ठाणे शहर (जिल्हा) सांस्कृतिक विभाग- सरचिटणीस / प्रसिद्धि प्रमुख पदी तसेच कु. "कल्पेश खवणेकर" यांची कलासंघटक-सांस्कृतिक विभाग पदी नियुक्ति करण्यात आली..*

*सदर प्रसंगी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. भालचंद्र महाडिक, सुभाष ठोबरे,निशिकांत कोळी,सचिन शिंदे,महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे,निलेश अहिरे,विनय विचारे, अरुण राजगुरु,सुशिल सुर्वे उपस्तिथ होते..

#ठाणे_वृत्तमत

*ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर**५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पूर्ण...
01/06/2022

*ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर*

*५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पूर्ण*

ठाणे (३१): ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये ५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी असून, त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमाती ४२,६९८ इतकी आहे. या निवडणुकीकरीता तीन सदस्यीय प्रभाग असे एकूण ४६ प्रभाग व चार सदस्यांचा १ असे एकूण ४७ प्रभाग अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत.

या निवडणूकीकरीता एकूण सदस्य संख्या १४२ असून, त्यापैकी अनुसूचित जातीकरीता १० जागा व अनुसूचित जमातीकरीता ३ जागा आणि सर्वसाधारण १२९ जागा अशी वर्गवारी निश्चित करण्यात आलेली आहे. या १४२ जागांपैकी महिलांकरीता ५० % आरक्षणानुसार ७१ जागा महिलांकरीता राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून १० पैकी ५ जागा महिलांसाठी तसेच अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ३ जागांमधून २ जागा महिलांसाठी सोडत चिठ्ठीने आरक्षित करणार आल्या. अशा एकूण ७ जागा राखीव गटातील महिलांसाठी सोडत चिठ्ठीने आरक्षित करण्यात आल्या. उर्वरित ६४ महिलांसाठी राखीव जागेकरीता मा. राज्य निवडणूक आयोगाने १ ते ४७ प्रभागातील अ व ब जागेमधील ४७ जागा नेमून दिलेल्या आहेत. सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करावयाच्या उर्वरित ३४ प्रभागाच्या ब जागेमधून सोडतीद्वारे १७ जागा सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करण्यात आल्या आहेत.

यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १२ अ, २३ अ, १५ अ, २९ अ आणि ३ अ आरक्षित करण्यात आले आहेत. तर अनुसूचित जमाती ५ अ व २९ ब या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तसेच १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी प्रभाग १ ब, २ ब, १३ ब, १६ ब, १८ ब, २० ब, २१ ब, २५ ब, २६ ब, ३२ ब, ३६ ब, ३९ ब, ४१ ब, ४३ ब, ४५ ब, ४६ ब आणि ४७ ब प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.

#ठाणेवृत्तमत

हुक्का पार्लरमुक्त ठाण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक..आमदार संजय केळकर यांच्या चळवळीला पाठबळ..ठाण्याच्या ऐतिहासिक-सांस्कृति...
01/06/2022

हुक्का पार्लरमुक्त ठाण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक..

आमदार संजय केळकर यांच्या चळवळीला पाठबळ..

ठाण्याच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक ओळखीला तडा लावू पाहणाऱ्या हुक्का पार्लर-डान्स बार संस्कृती विरोधात आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश आले आहे. पोलीस प्रशासनाने या कामी स्वतंत्र पथक नेमले असून काल रात्रीपासूनच शहरात या अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू झाल्याची माहिती मिळते.

आमदार संजय केळकर यांनी फेब्रुवारीपासून हुक्का पार्लरमुक्त ठाणे ही चळवळ सुरू केली होती. स्थानिक पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त, गृहमंत्री , विधिमंडळ आदी ठिकाणी पत्र, निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटी घेऊन ही समस्या मांडली. त्यावेळी थातूर-मातूर कारवाई होत होती, पण हुक्का पार्लर पब्ज, अवेळी चालणारे डान्सबार यांना संगनमताने पाठीशी घातले जात होते.
अखेर आमदार केळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशयारी आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. भेटी दरम्यान आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून कडक कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले आणि स्वतंत्र पथक स्थापन केले. काल रात्री शोध मोहीम घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

अनधिकृत हुक्का पार्लर आणि रेस्टॉरंटची यादी श्री.केळकर यांनी आयुक्तांना सादर केली आहे. २०१८च्या अध्यादेशानुसार हुक्का पार्लरला बंदी आहे. ठाण्यात ड्रग्जमुळे नुकतेच एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. ठाणे हे हुक्का पार्लरचे शहर नसून ऐतिहासिक, सांस्कृतिक शहर आहे. हे शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी पुढील काळात रस्त्यावर उतरणार असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.

#ठाणेवृत्तमत

Address

Thane
400602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ठाणे वृत्तमत - Thane Vruttamat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share