08/01/2025
⭕महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे जिल्हा कार्यकारिणी घोषित
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण विभाग व ठाणे शहर यांच्यावतीने आज ठाण्यात सहा जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या अवचित निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे नवनिर्वाचित अध्यक्ष ठाणे शहर म्हणजे सिंग अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला
महाराष्ट्राचा लाडका आद्य दैवत राजा शिवछत्रपती, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या ठाणे शहर अध्यक्ष मंजित सिंग अरोरा यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित अध्यक्षांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली यावेळी सल्लागार राजन पाटील, भीमराव शिरसाट, युवक अध्यक्ष ( डिजिटल मीडिया ) सुबोध कांबळे, उपाध्यक्ष सतीश कुमार भावे, अतुल तिवारी, सचिव संतोष पडवळ, कार्याध्यक्ष अश्विन कांबळे, सहसचिव गफूर धारवार, संघटक नितीन गायकवाड, ख्वाजा शेख, वृत्तवाहिनी प्रमुख अमित जाधव, समाज माध्यम प्रमुख राजेंद्र गोसावी, प्रसिद्धीप्रमुख राहुल लोखंडे, किरण शेठ, सतीश कुदळे, संपर्कप्रमुख अमित गुजर, वृत्तपत्र प्रमुख देवेंद्र शिंदे,
सहसचिव संदीप पालवी, छायाचित्र प्रमुख विनोद धांडे, सुभाष जैन, कार्यालयीन व्यवस्थापक मनस्वी चौधरी, कार्यकारी सदस्य देवेंद्र वायरकर, सचिन बनकर, अशोक मेहता, तुषार डबरे, रोहिदास पाटील, विनो मॅथ्यूव्ह, सदस्य शुभम पाटील, राहुल लाड, सुरेखा पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, भावींनी मेहता, मीनाक्षी देशमुख, संजोग अधिकारी, गणेश गव्हाणे, संजय भोईर, मनोज कदम, मिलिंद दाभोळकर, दीपक किरत इतर सदस्य उपस्थित होते.
तसेच कोकण व ठाणे शहर सल्लागार प्रमोद इंगळे, कोकण विभागीय संपर्कप्रमुख विलास शंभरकर,सदस्य राकेश सूर्यराव, कोकण विभागीय आरोग्य सेल अध्यक्ष उमा माळी व व्ही एम ट्रॅव्हल्सच्या संचालिका राणी ठाकूर देखील उपस्थित होत्या.