Megacitylive.com

Megacitylive.com तुमच्या शहरातील प्रत्येक घटना आता सत?

कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरला डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेना ...
03/04/2024

कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरला

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेना ( शिंदे गट ) कडून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता ही उत्सुकता संपली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर केले आहे.2009 साली मनसेकडून वैशाली दरेकर यांना 1 लाख 9 हजार मते मिळाली होती.त्यांच्यासमोर शिवसेनेकडून आनंद परांजपे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वसंत डावखरे उभे होतें.

बारावे  घनकचरा  प्रकल्पातील कचऱ्यास लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना      पालिका आयुक्त  डॉ. इंदुराणी जाखड़ ...
31/03/2024

बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्यास लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना
पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे निर्देश

डोंबिवली ( शंकर जाधव )
बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे साठलेल्या सुक्या कचऱ्यास अचानकपणे आग लागल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी रात्रपाळीवर कार्यरत असलेल्या कामगारांनी लगतच असलेल्या बारावे मलनि:सारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचे काम सुरू केले आणि आधारवाडी अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
आधारवाडी अग्निशमन केंद्रावरून तातडीने ६ फायर टेंडर गाड्या व८ पाण्याचे टँकर प्रत्यक्ष जागेवर पोहोचले व लगेच आग विझवण्याचे कार्यवाही सुरू करण्यात आली. या प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रिक टन प्रतिदिन सुका कचरा येत होता व त्याचे वर्गीकरण करून तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविण्यात येत होता. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल हे सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविण्यात येते. असा सुमारे १५०० मॅट्रिक टन कचरा येथे साठला होता. हा कचरा अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीवर त्वरित नियंत्रण करणे आवश्यक होते, त्यामुळे ६ फायर टेंडर व ८ पाण्याचे टँकर्स वापरून आगीवर नियंत्रण करण्यात येत आहे .आगीचे वृत्त कळताच महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी घटनास्थळास भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले तसेच महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ ,घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील व मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या निर्देशानुसार वेगवेगळी पथके तयार करून सुरू असलेल्या आगीवर नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे. या आगीमध्ये प्रीसॉट युनिट ,श्रेडर युनिट व शेडच्या छताचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

https://youtu.be/sZU5SlH4pU8?si=I-zZgpp18s-TA0xD
21/03/2024

https://youtu.be/sZU5SlH4pU8?si=I-zZgpp18s-TA0xD

२७ गावातील नागरिक नवीन कर आकरणीच्या प्रतीक्षेत शासन दरबारी घोषणा मात्र अधिसूचना नाही डोंबिवली ( शंकर जाधव ) २०१५ प...

https://youtu.be/Owu5d0QqBYg?si=Dahdx80cdcWe9v3e
19/03/2024

https://youtu.be/Owu5d0QqBYg?si=Dahdx80cdcWe9v3e

देशी दारू बनविण्याच्या स्टँडवर मानपाडा पोलिसांचा छापा डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात ...

https://youtu.be/tDJ3-aTqQ5U?si=xwe4ohDYGr11nfP0
11/03/2024

https://youtu.be/tDJ3-aTqQ5U?si=xwe4ohDYGr11nfP0

डोंबिवलीत आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून अल्पश्या दरात ( एक रुपयात ) आरोग्य सेवा मिळणार डोंबिवली ( शंकर जा.....

https://youtu.be/Gn3rmkEq4KQ?si=WVCBDSbfCHZvbbiV
11/03/2024

https://youtu.be/Gn3rmkEq4KQ?si=WVCBDSbfCHZvbbiV

कल्याणमध्ये घराच्या छताला पत्र्याला आणि पंख्याला छेदून झाडलेली गोळीडोंबिवली ( शंकर जाधव ) घराच्या छताच्या पत्र्....

डोंबिवलीकर समाजसेवक अरविंद सुर्वे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०१४  डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील समाजसेवक ...
11/03/2024

डोंबिवलीकर समाजसेवक अरविंद सुर्वे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०१४

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील समाजसेवक अरविंद सुर्वे यांना जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०१४ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बदलापूर येथील अजय राजा सभागृहात पार पडलेल्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट व समाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थापक- अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व सचिव संचिता भंडारी, पद्मश्री गजानन माने, गटनेते राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे, भिवंडी निजापूर शहर महानगरपालिका शिक्षण विभाग सहायक आयुक्त सुनीलभाऊ झळके, महाराष्ट्र अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ अध्यक्ष प्रदीप जोशी, टिटवाळा महागणपती हॉस्पिटल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर( सी.ओ.ओ.) विक्रांत बापट,मुंबई आकाशवाणी केंद्र मुलाखातदार आणि निर्मिती सहाय्यक हर्षदा प्रभू, समाजसेविका आणि अभिनेत्री गीता कुडाळकर, उद्योजक व समाजसेवक खलील शिरगावकर, लेखक महेश्वर तेटांबे, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश पाटकर आणि शिर्के जनकल्याणप्रतिष्ठान ( मुंबई ) सुनील सुर्वे आदि मान्यवर उपस्थित होते. सुर्वे यांच्या समाजिक, कायदेविषयक, वैद्यकीय, सांकृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा ,आरोग्य ,पत्रकारिता, सहकार, महिला सक्षमीकरण, वृक्ष संवर्धन, संरक्षण, पर्यावरण, राजकीय, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रातील कार्य गौरवास्पद व भूषण आहे. आपला आदर्श आम्हाला नक्कीच स्फूर्तीदायी आहे. आपल्या या कार्याची दाखल घेऊन संस्थेने हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले असून आपले अभिनंदन आणि आपल्या सेवा कार्यासाठी शतशः आभार मानतो असे यावेळी संस्थापक- अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सांगितले. सुर्वे यांना याधीही अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

लाईनमन  दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान'तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरणडोंबिवली ( शंकर जाधव ) वीज वितरण व्य...
05/03/2024

लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान

'तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण

डोंबिवली ( शंकर जाधव )

वीज वितरण व्यवस्थेतील महत्वपूर्ण घटक असलेल्या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने कल्याण परिमंडलात सलग दुसऱ्या वर्षी कल्याण एक आणि दोन तर पालघर व वसई मंडल कार्यालयात सोमवारी 4 तारखेला लाईनमन दिन जनमित्रांचा सन्मान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती तसेच इतरही अनेक प्रसंगात अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अखंडित सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण परिमंडलात आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या हस्ते कल्याण परिमंडल कार्यालयाच्या 'तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कर्तव्य बजावतांना प्राणांची आहुती देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. तर जनमित्रांनी त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव कथन करुन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने यांच्यासह अधिकारी, अभियंते, जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसई मंडल कार्यालयातही अधीक्षक अभियंता संजय खंडारे आणि पालघर मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जनमित्रांचा सन्मान करण्यात आला. विविध मंडल आणि विभागीय कार्यालयांकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी सदस्यपदी सारिका शिंदे यांची नियुक्तीडोंबिवली ( शंकर जाधव )  रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदाम...
03/03/2024

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी सदस्यपदी सारिका शिंदे यांची नियुक्ती
डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी सदस्यपदी संपादिका सारिका अमर शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. डोंबिवलीतील शुभम सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्ष माला नाईक यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.
संपादिका शिंदे या गेल्या 15 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला यांनी अनेक वृत्तपत्रात लिखाण केले होते. सारिका शिंदे या साप्ताहिक 'आपला भगवा या वृत्तपत्राच्या मुख्य संपादिकापदी आहेत. शिंदे या महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृीधारक पत्रकार आहेत. आज पत्रकारिता क्षेत्रासोबताच समाजसेवेची देखील आवड असल्यामुळे त्या नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असतात. म्हणूनच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनीमध्ये त्यांना समाजसेवा करण्याची संधी मिळाली आहे.

नंदनवन सुंदर बाग स्पर्धा...श्रीकृष्ण मराठे यांच्या बागेला बेस्ट गार्डन २०२४  बक्षीस डोंबिवली ( शंकर जाधव)  कल्याण-डोंबिव...
01/03/2024

नंदनवन सुंदर बाग स्पर्धा...

श्रीकृष्ण मराठे यांच्या बागेला बेस्ट गार्डन २०२४ बक्षीस

डोंबिवली ( शंकर जाधव)
कल्याण-डोंबिवली, पलावा आणि ठाकुर्ली येथील बागप्रेमींसाठी पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'नंदनवन सुंदर बाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे परीक्षण दिनांक ८ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. श्री गणेश मंदिर संस्थान येथे या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला.
घराभोवतीची बाग, निवडुंग, किचन गार्डन, टेरेस गार्डन, औषधी वनस्पती, हँगिंग वनस्पती, घराच्या आतील वनस्पती, बॉक्स ग्रील, सोसायटीची बाग, वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती बाग, नाविन्यपूर्ण गोष्टीयुक्त बाग तसेच खूप वैविध्यपूर्ण प्रजाती असलेली बाग आणि सर्वोत्तम बाग अशा विविध प्रकारच्या बागांचा समावेश होता. बक्षीस समारंभातप्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे उद्यान अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कुंडीमध्ये रोप लावून करण्यात आले. पुढील वर्षी ही नंदनवन- सुंदर स्पर्धा महानगर पालिका स्तरावर घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आपल्या परिसरातील हरित क्षेत्र वाढवणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा ह्या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता . ह्या स्पर्धेचे परीक्षण वनस्पतीतज्ञ डॉ. अंजली रत्नाकर आणि मीनल मांजरेकर यांनी केले.ह्या स्पर्धेत सर्वोदय पार्क या सोसायटीला बेस्ट सोसायटी गार्डन, अष्टगणेश गार्डनला बेस्ट पब्लिक गार्डन, चिऊ पार्कला बेस्ट सस्टनेबल गार्डन आणि श्रीकृष्ण मराठे यांच्या बागेला बेस्ट गार्डन २०२४ म्हणून बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला वरील संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. रूपाली शाईवाले, आदित्य कदम आणि समीक्षा चव्हाण हे ह्या स्पर्धेचे प्रकल्प समन्वयक होते.

जे एम एफ शिक्षण संस्थेत मराठी राजभाषा दिनी लेखकांच्या पुस्तकांची ग्रंथ दिंडीडोंबिवली ( शंकर जाधव )            ज्येष्ठ कव...
28/02/2024

जे एम एफ शिक्षण संस्थेत मराठी राजभाषा दिनी लेखकांच्या पुस्तकांची ग्रंथ दिंडी

डोंबिवली ( शंकर जाधव )

ज्येष्ठ कवी, साहित्यिक वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी म्हणजे जन्म दिवस. अवघ्या महाराष्ट्रामधे हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.डोंबिवलीतील जे एम एफ प्रांगणात मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर ने मराठी राजभाषा दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे त्याच बरोबर मुख्याध्यापिका श्यामला राव, उप मुख्याध्यापिका ज्योती व्यंकटरमण, सर्व शिक्षक , विद्यार्थी यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी लेखकांच्या पुस्तकांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली

पालखी मधे ग्रंथ ठेऊन ढोल ,ताशे लेझिम वाजवत जे एम एफ च्या प्रवेश द्वारातून दिंडीला सुरुवात झाली व मधुबन वातानुकुलीत दालनात दिंडीचे आगमन झाले.अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी दिंडीला ओवाळून फुले वाहिली. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला.त्यानंतर इयत्ता चौथी मधल्या विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले.
काही मुले मुली साहित्यिकांच्या वेशभूषेमधे तयार होऊन आले होते. व. पू. काळे, कुसुमाग्रज, वि .स. खांडेकर,बहिणाबाई चौधरी अशा अनेक रुपात सजून आले होते. साहित्यिक बनून आलेल्या छोट्या बाल कलाकारांनी पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा सत्कार केला. त्याच बरोबरच मराठी शिक्षिका सौ.सुप्रिया कांबळे, सौ.मानसी शिंगटे, सौ.प्रियांका म्हस्के यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा ही वळवेल तशी वळते आणि हीच भाषा प्रत्येक वेस बदलता ५२ पद्धतीने ,वेगवेगळ्या लयी मधे बोलली जाते असे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून.बाराखडी मधील ' अ ते ज्ञ ' म्हणजेच अज्ञाना कडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग म्हणजेच शिक्षण आणि आपली मराठी भाषा आहे असे समर्पक उदाहरण दिले.माणुसकी जपा, मराठी अस्मिता जागृत असू द्या ,साहित्याचे वाचन करा आणि ते आत्मसात करा असे विद्यार्थ्यांना सांगून मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कविवर्य, लेखक ग. दि.माडगूळकर यांनी ' काय वाढले पानंवरती, काय वाढले पानावरती अशी दुअर्थी कविता लिहिली होती.अशाच स्वरचित कविता सादर करण्यात आल्या. मराठी भाषेवर प्रभुत्व ,आणि मराठी विषयात पारंगत असलेल्या जे एम एफ संस्थेच्या सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी देखील स्वरचित कविता व स्वलिखित कथा वाचन करून उपस्थितांची मने जिंकली.' वाचाल तर वाचाल ' ह्या उक्ती प्रमाणे वाचनाचा ध्यास असावा असे सांगून मुलांचे मनोधैर्य वाढवले.शाळेच्या मुख्याध्यापिका श्यामला राव तसेच मराठी शिक्षिका सुप्रिया कांबळे व सौ.मानसी शिंगटे यांनी सुद्धा स्वरचित कवितांचे वाचन केले व कथा सांगितली.इयत्ता पाचवी च्या मुलामुलींनी ' लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...हे मराठी अभिमान गीत गाऊन मराठी गौरव दिनाचे अभिवादन केले.
महाराष्ट्राची संस्कृती जपणारे मराठी नृत्य, नाटक सादर केले गेले.इयत्ता दुसरी मधील छोटे बालक कु.रुही मोरे,मनस्वी भारंबे, आयांश देगावे यांनी अस्सलिखित मराठी भाषेचे महत्व हा विषय घेऊन भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घानिका व देवयानी नाईक ह्या विद्यार्थी भगिनींनी केले.तर आभाप्रदर्शन गार्गी भोसले हीने केले.कार्यक्रमाची सांगता श्रेया कुलकर्णी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज रचीत पसायदानाने करण्यात आली.

https://youtu.be/PRZ6Qc1tk9A?si=QkidZOYXkePPiQri
23/02/2024

https://youtu.be/PRZ6Qc1tk9A?si=QkidZOYXkePPiQri

रील बनवून मोठा गाव माणखोली पुलावरून खाडीत उडी मारली..डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव खाडीतील घटना....शुक्रवारी दुपा....

ठाकुर्ली कारशेडमधील लोकलला आग डोंबिवली ( शंकर जाधव )     डोंबिवलीजवळील ठाकुर्लीतील कार शेडमधे उभी असलेल्या लोकलला आग लाग...
12/02/2024

ठाकुर्ली कारशेडमधील लोकलला आग

डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीजवळील ठाकुर्लीतील कार शेडमधे उभी असलेल्या लोकलला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.अग्निशामक दलाच्या जवांनीनी शर्तीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

09/02/2024

अमली पदार्थ विक्री ; एक अटकेत
ठाणे : मेगा सिटी लाईव्ह वृत्तसेवा
इंस्टाग्रामव ऑनलाईन चरस विक्रीचा पर्दाफाश ठाणे क्राईम ब्रांचच्या युनिट पाचच्या पथकाने केला आहे. पोलिसांनी रिषभ संजय भालेराव (28, शहापूर, जिल्हा ठाणे) या आरोपीस अटक केली असून त्याच्या ताब्यातून 64 किलो गांजा, चरस व चरस ऑइल असा 31 लाखाचा अमली पदार्थ साठा जप्त केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
ठाण्यातील इंदिरानगर भाजी मार्केट येथे एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी इंदिराजगर भाजी मार्केट परिसरात सापळा लावला. यावेळी एका संशयित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 किलो 200 ग्रॅम गांजा मिळून आला. या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत गुन्हे शाखेच्या पथकाने रिषभ भालेराव या अमली पदार्थ तस्करास अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या बदलापूर येथील घरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठा लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर तेथील आरोपीच्या घरातून 60 किलो 500 ग्रॅम गांजा, 290 ग्रॅम चरस आणि 19 बाटल्या चरस ऑइल (हॅश) असा अमली पदार्थ साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत 31 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

https://youtu.be/BkcGIYcA6bk?si=s1To-fYJFSln2qvy
07/02/2024

https://youtu.be/BkcGIYcA6bk?si=s1To-fYJFSln2qvy

अंबिकानगर गोग्रासवाडीत `शासन आपल्या दारी` उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद डोंबिवली ( शंकर जाधव ) सर्व शासकीय योजना ....

https://youtu.be/5wszWEZWh3I?si=lKXV9D_a6awSeMbf
01/02/2024

https://youtu.be/5wszWEZWh3I?si=lKXV9D_a6awSeMbf

शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी तरुणपिढीची व्यवसायाकडे पाऊले वळली डडोंबिवली ( शंकर ....

https://youtu.be/RDnYWhhi9Nk?si=TE9Yf9e4OaIKNrzP
01/02/2024

https://youtu.be/RDnYWhhi9Nk?si=TE9Yf9e4OaIKNrzP

१३ वर्षीय आयुषने एलिफन्टा ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर न थांबता केले पार डोंबिवली ( शंकर जाधव ) अथक परिश्रमाच्य....

https://youtu.be/4CYFKSqxwkk?si=z0jHZytkMFcHkq3X
30/01/2024

https://youtu.be/4CYFKSqxwkk?si=z0jHZytkMFcHkq3X

प्रियकराला सोबत घेऊन पत्नीने केली पतीची हत्या २४ तासात मानपाडा पोलिसांनी केले गजाआड डोंबिवली ( शंकर जाधव ) पत्नीन....

डोंबिवलीत युवा सेनेची बाईकरॅली ..डोंबिवली ( शंकर जाधव ) अयोध्येत २२ तारखेला प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा पंत...
21/01/2024

डोंबिवलीत युवा सेनेची बाईकरॅली ..

डोंबिवली ( शंकर जाधव ) अयोध्येत २२ तारखेला प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.देशभर ह सोहळा साजरा होत असून युवा सेनेच्या वतीने सचिव दीपेश म्हात्रे यासह अनेक युवसैनिकांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते.डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव ठाकुर्ली येथून रॅलीची सुरुवात होऊन पुढे सम्राट चौक, गुप्ते रोड, ठाकुर्ली उड्डाणपूल, बाजीप्रभू चौक येथून शिवसेना मध्यवर्ती शाखेपर्यत रॅलीची समाप्त झाली. यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, प्रभुश्रीरामचंद्र मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने देशभरात उत्सव साजरा होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे दीपोत्सव साजरा होत आहे.

https://youtu.be/E0---aPvT4w?si=Q5PhjrW5Umnna4oQ
20/01/2024

https://youtu.be/E0---aPvT4w?si=Q5PhjrW5Umnna4oQ

डोंबिवली स्टेशन परिसरात 'जय श्री राम' कंदील ...मंदिर दिव्याने लखलखणारडोंबिवली ( शंकर जाधव ) अयोध्येला २२ तारखेला प्र...

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही ठाणे (17) : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या व मे. स्टेम प्राधिकरणाकडू...
17/01/2024

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही


ठाणे (17) : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार दिनांक 19/01/2024 सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार दि. 20/1/2024 असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत निगा देखभाल व दुरूस्तीमधील अत्यावश्यक कामे, टेमघर जलशुद्धीकरण केंद्र नवीन मोटर कंट्रोल पॅनल बसविणे व कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन करणे इत्यादी तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ठाणे शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहील.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Thane Police Commissionerate
03/01/2024

Thane Police Commissionerate

कल्याण झोन तीन पोलिसांनी चोरीस गेलेला ३ कोटी १६ लाख ७९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डु.....

https://youtu.be/L629CdYz__k?si=smDRMjrN_mgQlNNg
03/01/2024

https://youtu.be/L629CdYz__k?si=smDRMjrN_mgQlNNg

कल्याण झोन तीन पोलिसांनी चोरीस गेलेला ३ कोटी १६ लाख ७९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डु.....

महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते भूमिपुजन संपन्न        आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले...
03/01/2024

महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे
आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते भूमिपुजन संपन्न

आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कट्टयामुळे अठरा पगड जातीसमुहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. यावेळी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावखरे यांची संकल्पना सत्यात उतरणार असल्याची भावनाही व्यक्त केली. यावेळी प्रफुल वाघोले यांनी आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केली.
आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधु-भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणीत केला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावे, अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वास जावी, यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावे, यासाठी पत्रव्यवहार केला होता. मागील वर्षी गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठान अध्यक्ष अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपला शब्द खरा करुन निधी उपलब्ध करुन दिला. त्यांच्या विशेष निधीमधून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचे भूमिपुजन कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठान अध्यक्ष अ‍ॅड. निरंजन डावखरे आणि महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्यासह शिवसेना पक्ष प्रवक्ते नरेश म्हस्के, मा. नगरसेवक मनोहर डुंबरे, मा. नगरसेवक भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, विकास दाभाडे, ज्येष्ठ संपादक मधुकर मुळूक, ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले मराठा सेवा संघ ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे, मा. नगरसेविका पुजा गणेश वाघ, यादव समर्थ अध्यक्ष जितेंद्र यादव, रामानंद यादव, नयना भोईर, रेखाताई कंटे, सचिन केदारी, सचिन शिंदे, किसन बोंदे्र, समीर भोईर, अक्षय कोळी, संतोष राणे, विशाल वाघ, रवि कोळी, अमित हिलाल, दिपाली कराळे, मेघनाथ घरत, अखिल भारतीय विश्वकर्मा समाजाचे बळीराम खरे, समता विचार प्रसारक मंडळाचे अजय भोसले, चंद्रकांत देसले, अनिल नलावडे, निलेश हातणकर, अमित गुजर, अमित पाटील, अजय जाधव यांच्यासह माळी, धनगर मराठा, कुणबी, कोळी आगरी अशा सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.

02/01/2024

कापूरबावडी येथील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा

ठाकुर्ली रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य पदी भाजपाचे राजू हसन शेख यांची नियुक्ती डोंबिवली  (शंकर जाधव ) मध्य रेल्वेच्...
02/01/2024

ठाकुर्ली रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य पदी भाजपाचे राजू हसन शेख यांची नियुक्ती

डोंबिवली (शंकर जाधव ) मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्टेशन सल्लागार समितीची व्याप्ती आणि कार्यासाठी रेल्वेच्या मंडल कार्यालय, वाणिज्य शाखा, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचे व्यवस्थापक जितेंद्र चंद्रदेव यादव यांनी मुंबई विभागाची स्टेशन सल्लागार समिती ठाकुर्ली स्टेशन सदस्यपदी भाजपाचे पूर्व मंडल उपाध्यक्ष राजू हसन शेख यांची नियुक्ती केली आहे.रेल्वे कार्यालय माध्यमातून राजू हसन शेख यांना नुकतेच नियुक्तीपत्र मिळाले आहे. तसेच सामान्य सार्वजनिक हिताचा किंवा सार्वजनिक सोयीचा किंवा तसा कोणताही विषय प्रवासी सेवा आणि सुविधांवर परिणाम करणाऱ्या बाबी
स्टेशन आपल्याकडून माहीत होतील असेही पत्रात नमूद केले आहे. भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष असुन महाराष्ट्र शासनाने या पुर्वी दोन वेळा विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणुक केली होती.

https://youtu.be/cf2IqHJcOAc?si=FAtT3n3oboRhdUTT
02/01/2024

https://youtu.be/cf2IqHJcOAc?si=FAtT3n3oboRhdUTT

कल्याणात सहाशे ट्रकचालकांचा संप पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी कल्याण ( शंकर जाधव ) केंद्र सरकारने आणलेल्या .....

https://youtu.be/ZMk6XQol2BU?feature=shared
30/12/2023

https://youtu.be/ZMk6XQol2BU?feature=shared

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( दत्तनगर )प्राथमिक शाळेत संगणक प्रकल्पांचे प्रदर्शन डोंबिवली ( शंकर जाधव ) स्वामी व....

वाशी ब्रीज ते कुलाबा रीफ 30 किलोमीटर अरबी समुद्रात पोहून कृष्णाने दिला सरत्या वर्षाला निरोप.....कल्याण ( शंकर जाधव) कल्य...
30/12/2023

वाशी ब्रीज ते कुलाबा रीफ 30 किलोमीटर अरबी समुद्रात पोहून कृष्णाने दिला सरत्या वर्षाला निरोप.....

कल्याण ( शंकर जाधव) कल्याण येथील सर्वोदय गार्डन येथे राहणारा कृष्णा अमित वायकर हा ऑल सेंट्स हायस्कूल मध्ये इयत्ता ६ वीत शिकतो. कृष्णा चार ते पाच महिन्यांपासून यश जिमखाना मध्ये पोहणे शिकण्यासाठी आला.त्याने शाळेतील स्विमिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.त्याला समुद्रातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो यश जिमखाना मध्ये दररोज सराव करत आहे.कृष्णाने एक निश्चय केला होता की या वर्षाला अरबी समद्रात 30 डिसेंबर ला 30 किलोमीटर न थांबता सलग जुना वाशी ब्रीज ते कुलाबा रिफ पोहून पार करणार. त्याने तो निश्चय पूर्ण केला आहे..30 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजून 45 मिनिटांनी अंगाला ग्रीस लावून समुद्र देवतेची पूजा करून महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक नील लब्दे यांच्या देखरेखीखाली जुना वाशी ब्रीज पासून पोहन्यास सुरुवात केली.सगळीकडे अंधाराचे साम्राज्य होते, पहाटेची वेळ असल्यामुळे थंडी जाणवत होती. पोहताना जेली फिश ची भीती वाटत होती. सकाळच्या सुमारास वातरणातील बदलामुळे समुद्रातील पाण्याच्या दिशा बदलतात.त्यामुळे थोडा त्रास होत होता.कृष्णाची जिद्द चिकाटी आणि मेहनत आत्मविश्वास याच्या जोरावर सकाळी कुलाबा रीफला 6 तास 40 मिनिटात पोहचला. कृष्णाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात जंगी स्वागत केले. स्विमिंग प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली यश जिमखाना मध्ये दररोज सराव चालू होता.महिन्यातून 2 वेळेस उरणला संतोष पाटील यांच्याकडे समुद्रात सराव करून घेतला.यश जिमखाना मालक वडनेरकर साहेबांनी कृष्णाला रात्रीचा स्विमिंग पूल अधिक सरावासाठी उपलब्ध करून दिला. राजू वडनेरकर यांनी कृष्णाचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच यश जिमखाना स्टाफ व प्रशिक्षक यांनी कृष्णाला हे 30 किलोमीटर सागरी जलतरण अंतर पोहून पार केल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. फ्रान्स ची इंग्लिश खाडी पोहायचे असे कृष्णाचे स्वप्न आहे.

Address

Pokhran Road No 1
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Megacitylive.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Megacitylive.com:

Videos

Share


Other News & Media Websites in Thane

Show All

You may also like