भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या कार्यालयाला चपलांचा हार
संजीव भोर पाटील ( संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य ) यांच्या कडून भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या कार्यालयाला चपलांचा हार.... महाराजांविषयी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य ..#जय_जिजाऊ_जय_शिवराय
लेह लडाख चा थरार आपल्या महाराष्ट्रामध्ये
जर आपण लेह लडाखला बुलेट घेऊन फिरायला जाण्यासाठी शौकीन असाल तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे .. लेह लडाखच्या बुलेट रायडींगचा थरार अनुभवा आपल्या महाराष्ट्रामध्ये .. अहमदनगरच्या बायपास रोडवर नगर पुणे रोडवर ही सुविधा केलेली असून ट्रिपल तलाक, पाकिस्तान यातून वेळ काढून सरकारने थोडे लक्ष घातले तर पर्यटनाला सुगीचे दिवस येतील.असेच रस्ते इतर शहरात व खेड्यांमध्ये देखील विकसित करावेत जेणेकरून पर्यटन तर होईलच शिवाय हेल्मेटसक्ती लादल्यानंतर पाठीचे मणके, मान या संदर्भात देखील दुखणी वाढून डॉक्टर लोकांना देखील अच्छे दिन आल्याचे आपल्याला भांडवल करून सांगता येईल.. #आता_बस्स_झालं
रंधा धबधबा -भंडारदरा
भंडारदरा येथील रंधा धबधब्याचे पावसाळ्यातील एक रौन्द्र रूप .. व्हिडीओ आवडला तर तर नक्की लाईक करा शेअर करा
फरिया बाग अहमदनगर- ऐतिहासिक वास्तू
सर्वप्रथम चंगेजखानाने ह्या ऐतिहासिक महालाचे काम सुरु केले होते . पुढे बुऱ्हाण निजामशहा ( १) च्या सांगण्यानुसार नियामत खानाने हे पूर्ण केले मात्र निजामशहा ( १) ला हे काम आवडले नाही त्याने ते पाडून परत बांधण्याचा आदेश दिला. पुढे सलाबत खान १ ने ही इमारत बांधण्याचा प्रयत्न केला, मात्र हे काम चालू असतानाच त्याचा अंत झाला . त्याचे हे काम त्याचा पुतण्या असलेला सलाबत खान २ याने पूर्ण केले. अहमदनगर पासून ३ किमी अंतरावर ही इमारत 'फरिया बाग ' म्हणून प्रसिद्ध आहे. जवळच पायी अंतरावर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले रणगाडा संग्रहालय देखील आहे. नगरला आलात तर भेट द्यायला विसरू नका. आपल्याकडे असे काही आपल्या शहराचे स्वतः शूट केलेले व्हिडिओ असतील तर नक्की पाठवा आम्ही आमच्या पेजवर त्याला प्रसिद्धी देऊ.
ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर नक्की पहा.
शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तयार होत असलेल्या ठाकरे ह्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नक्की पहा. #शिवसेना #मराठी #महाराष्ट्र
आणि म्हणे यांना काश्मीर पाहिजे
काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर दगडफेक करायला चालला होता.. व्हिडीओ बघा आवडला तर नक्की शेअर करा
तुमच्याकडे काय आहे परिस्थिती ? -कमेंट करून सांगा
१५ डिसेंबर यानंतर का होईना खड्डे बुजवायला सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही .. व्हिडिओ नगरमधील आहे..तुमच्याकडील परिस्थिती कमेंट करून सांगा
छकुलीला अखेर न्याय कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा : न्याय...
कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा: अहमदनगर सत्र न्यायालयाबाहेर उज्ज्वल निकम साहेबांचा विजय असो आणि एक मराठा लाख मराठा
कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची उज्ज्वल निकम यांची मागणी
कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ?
इतकी भन्नाट मराठी ऑडिशन तुम्ही कधी पाहिली नसेल. #MarathiAudition #Marathi #MarathiPeople #MarathiMovies
मायबोली चित्रनिर्मिती द्वारे बनवण्यात आलेल्या 'झेंडा' या मराठी शॉर्ट फिल्म ची 'साम ' टी. व्ही वरच्या शोकेस ह्या कार्यक्रमामध्ये प्रदर्शित होण्यासाठी निवड झालेली आहे. मायबोली चित्रनिर्मितीची ही शॉर्ट फिल्म १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी च्या दुसऱ्या दिवशी नकळत पणे झेंड्यांची विटंबना होते ह्या विषयावर बनवलेली आहे .शॉर्ट फिल्म एकूण १४ मिनिटांची असून दि. २९ जानेवारी २०१७ ला (रविवारी ) सकाळी ११ व रात्री परत एकदा ११:३० ला साम टी. व्ही. वर प्रदर्शित होईल Santosh Dhumal