25/04/2024
*देव, घैसास, कीर महाविद्यालयाचे नरेंद्र डांगी व सुखी जांगीड गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय*
गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगाव यांच्यावतीने आयोजित 'गांधी विचार संस्कार' परीक्षा भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्याचे पारितोषिक वितरण बुधवारी महाविद्यालयात करण्यात आले.
देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या नरेंद्र मोहनलाल डांगी ( प्रथम वर्ष कला), सुखी ओमप्रकाश जांगीड ( द्वितीय वर्ष वाणिज्य) या दोन विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना रौप्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. आयोजनासाठी देव, घैसास, कीर महाविद्यालयाला स्मृतिचिन्ह देण्यात आले.
तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर क्रमांक मिळविले. प्रथम वर्ष विद्यार्थी: प्रथम- नरेंद्र मोहनलाल डांगे( प्रथम वर्ष कला), द्वितीय क्रमांक-धनश्री निलेश कांबळे ( प्रथम वर्ष वाणिज्य), तृतीय- मीरा किरण खातू ( प्रथम वर्ष कला), द्वितीय वर्ष: प्रथम - सुखी ओमप्रकाश डांगी,द्वितीय-सिद्धी गजानन पवार, तृतीय- मैथिली विनोद कुरटे ( सर्व द्वितीय वर्ष वाणिज्य), तृतीय वर्ष: प्रथम - मालविका सुभाष गोताड ( तृतीय वर्ष वाणिज्य), द्वितीय-तेजस अनंत बेर्डे( तृतीय वर्ष कला), तृतीय- अरशीन नासिर सय्यद यांना प्राप्त झाला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील,उपप्राचार्या वसुंधरा जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
रत्नागिरी येथील देव, घैसास,किर महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा आयोजनाचे चौथे वर्ष असून एकूण ८५ विद्यार्थ्यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेचे आयोजन, परीक्षण, निकालाचे काम महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख, सौ. अनन्या धुंदूर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी बापट या विद्यार्थिनीने केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*✍ कोकण 24 तास✍*
___________________________
*👉🏼 Whatsapp Channel*
https://whatsapp.com/channel/0029VaSeDqT1Hsq1aFmxxS1R
*👉🏼 Join Whatsapp Group*
https://chat.whatsapp.com/LbBBuzl792c7zXPSiJUVU2
*🤳 बातमी आणि जाहिराती साठी संपर्क*
📲 8605800722