संगमेश्वर न्यूज नेटवर्क

संगमेश्वर न्यूज नेटवर्क देश विदेशा सह स्थानिक पातळीवरील ताज्?

*💐अभिनंदनीय**⭕⭕ताम्हाने हायस्कुलचा विद्यार्थी सिद्धेश प्रमोद तटकरेची प्रो कबड्डी मध्ये निवड!**▶️कबड्डीक्षेत्रातील प्रसिद...
26/11/2024

*💐अभिनंदनीय*

*⭕⭕ताम्हाने हायस्कुलचा विद्यार्थी सिद्धेश प्रमोद तटकरेची प्रो कबड्डी मध्ये निवड!*

*▶️कबड्डीक्षेत्रातील प्रसिद्ध प्रशिक्षक प्रशांत सुर्वे व क्रीडाशिक्षक अभिजित सप्रे यांचे मार्गदर्शन!!*

▪️देवरुख:- जाखमाता ताम्हाने या स्थानिक संघातून कबड्डी खेळणाऱ्या ताम्हाने येथील सिद्धेश तटकरे नें मोठी भरारी घेतली असून राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवण्याची तयारी केली आहे. त्याची "प्रो कबड्डी" साठी निवड झाली आहे.

▪️सुरुवातीला स्थानिक संघातून आपल्या उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून सिद्धेश नें रत्नागिरी जिल्हा किशोर गट, कुमार गट, खुला गट यातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

▪️कालांतराने तो कामानिमित्त मुंबईला गेला. तिथे त्याला मुंबईच्या सुप्रसिद्ध "अंकुर" संघातून खेळण्याची संधी मिळाली. याच काळात त्याला कबड्डी प्रशिक्षक श्री प्रशांत सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.

▪️मुंबई उपनगर च्या खुल्या गटात त्याची निवडही झाली होती. त्याच वेळेस त्याने आपल्या उत्तम खेळाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या उत्तम खेळमुळेच त्याला आता प्रो कबड्डीची दारे खुली झाली आहेत.

*👉🏻अनेकांची मदत झाल्यानेच यश मिळाले"*

*💫प्रशिक्षक श्री प्रशांत सुर्वे, श्री विलास शिंदे सर,माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेचे क्रीडा शिक्षक श्री अभिजित सप्रे, संतोष (बाबा) दामूष्टे, माझे वडील प्रमोद तटकरे तसेच माझे मित्रमंडळ यांच्यामुळेच हा प्रवास यशस्वी झाल्याचे सिद्धेश नें "संगमेश्वर न्यूज"शी बोलताना सांगितले*

*👉🏻शाळेकडून सिद्धेशचे अभिनंदन*

▪️ताम्हाने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक सप्रे, सर्व संचालक, माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेचे मुख्याध्यापक श्री मारुती चोरमाले यांनी सिद्देशचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

▪️सिद्धेशनें मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*

https://chat.whatsapp.com/LlQ9pF3kxZgJoIjvc7gWCG

संगमेश्वर न्यूज नेटवर्क मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा https://chat.whatsapp.com/Exsr1AkNTIk9w08Ku2k...
30/10/2024

संगमेश्वर न्यूज नेटवर्क मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा

https://chat.whatsapp.com/Exsr1AkNTIk9w08Ku2kLNe

05/09/2024

https://chat.whatsapp.com/Exsr1AkNTIk9w08Ku2kLNe

संगमेश्वर न्यूज नेटवर्कच्या Whats app ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया वरील लिंक क्लिक करणे

*⭕🚆नेत्रावती एक्सप्रेस च्या संगमेश्वर थांब्याला वर्षपूर्ती होत असल्याच्या निमित्ताने......!*✍🏻चिंतामणी (पप्पू) सप्रे 976...
22/08/2024

*⭕🚆नेत्रावती एक्सप्रेस च्या संगमेश्वर थांब्याला वर्षपूर्ती होत असल्याच्या निमित्ताने......!*

✍🏻चिंतामणी (पप्पू) सप्रे
9767051277

▪️कोकण रेल्वे.... भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार! हिरव्या गार निसर्गाच्या कुशीतून धावणारी कोकण रेल्वे हे प्रत्येक कोकणवासियांचे स्वप्न प्रत्यक्षात आले ते 1998 साली!! 1998 साली प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पहिली रेल्वे गाडी या मार्गांवरून धावली आणि त्यानंतर कोकण विकास झपाट्याने होईल अशी स्वप्न पडू लागली.

▪️एकूण 757 किमी लांबीचा हा मार्ग महाराष्ट्रातील रोह्यापासून सुरु होतो आणि कर्नाटक मधील ठोकूर ला संपतो. जवळपास 70 स्थानके असणारा हा मार्ग म्हणजे कोकण विकासाचे उघडलेले नवे द्वारच जणू... पण प्रत्यक्षात कोकणी माणसाला या मार्गांवर अपेक्षित रोजगार मिळाला का? दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेचा उपयोग झाला का?? हे सर्व मुद्दे वादाचे आहेत. कोकण रेल्वे मार्गांवरून दक्षिणेकडे किंवा उत्तरेत धडधडत जाणाऱ्या रेल्वे गाड्या पाहणे या पेक्षा मोठे सुख त्यातून मिळाले असे वाटत नाही.

▪️कोकणी माणूस नेहमी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधत असतो. देशाचा दक्षिण भाग मुंबईशी जोडला गेला हे त्यातल्या त्यात कोकण रेल्वेचे फलित... पण मग काही वर्ष गेल्या नंतर कोकणी माणसाला आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली... गाड्यांच्या थांब्यासाठी ठिकठिकाणी संघर्ष सुरु झाला.

▪️आमच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकात मांडवी एक्सप्रेस च्या थांब्यासाठी तालुका पत्रकार संघाने आंदोलन केले. त्याला यश आले. मांडवी ला थांबा मिळाला. त्यानंतर मध्ये बराच काळ लोटला. नवीन गाड्यांच्या थांब्यांच्या मागण्या झाल्या नाहीत.... परंतु असच एक वेडा रेल्वे वर प्रेम करणारा तरुण 5 वर्षांपूर्वी आपल्या तालुक्यासाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आणि सर्व बाबींचा अभ्यास करून त्याने सर्वाना बरोबर घेऊन रेल्वे स्थानकातील सुधारणा, गाड्यांचे थांबे यासाठी प्रयत्न सुरु केले.
संदेश जिमन असे त्याचे नाव.... नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक परंतु गावाशी असणारी नाळ न तोडलेला हरहुन्नरी तरुण.... सुमारे 5 वर्षांपासून त्याने संघर्ष सुरु केला. स्थानकावरील स्वच्छतां किंवा इतर गैरसोयी दूर करण्याची मागणी आणि त्याचबरोबर नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस ला संगमेश्वरला थांबा देण्याची मागणी केली.

▪️जवळपास 4 वर्ष आंदोलन व संघर्ष केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली. आणि अखेर गतवर्षी 22 ऑगस्ट ला नेत्रावती एक्सप्रेस ला संगमेश्वर साठी हंगामी स्वरूपात थांबा देण्यात आला.

▪️तालुकावासियांसाठी ही अत्यंत मोठी गोष्ट होती. एका जिद्दी आणि मेहनती तरुणाने केलेल्या संघर्षाला यश आले होते. आज या थांब्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने एक श्री जिमन यांनी आपल्या निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर ग्रुप तर्फे एका आनंद सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 4 वा संगमेश्वर रेल्वे स्थानकात होणार आहे..

▪️संगमेश्वर रेल्वे स्थानाकातून रेल्वे प्रशासनाला मिळणारे उत्पन्न वाढत आहे. आगामी काळात अजून काही गाडयांना थांबा मिळण्यासाठी संदेश आणि मंडळींचा संघर्ष सुरूच आहे.

देशाच्या कानकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. अशा स्थितीत संदेश जिमन सारख्या तरुणाला तालुकाभरातून सक्रिय सहभाग मिळणे गरजेचे आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, त्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.... तरीही तो करत असलेले प्रयत्न हे निश्चितच कौतुकास्पद आहेत.

मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रेल्वेचा फायदा कोकण वासियांना किती झाला हा मुद्दा वादाचा असला तरीही एखादी हक्काची गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर सनदशीर मार्गाने संघर्ष करून ती मिळवण्याची आपण कोकण वासियांनी आता मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी संदेश करत असलेल्या आंदोलन किंवा प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येकाने ते आपले कर्तव्य आहे असे समजून सहभागी होण्याची गरज आहे. नाहीतर देशभरातून पर्यंटक गोव्याला जाताना रेल्वे गाडीतून आपल्या कोकणातील निसर्गाचा आनंद घेतील. त्याचा फायदा आपल्याला काही नाही.

गाड्यांचा थांबा हा फक्त आपल्या स्थानिकांसाठी नाही तर पर्यटनातून आपल्या तालुक्याचा विकास साधायचा असेल आणि त्यातून रोजगार निर्मिती करायची असेल तर बाहेर गावाच्या रेल्वे गाडयांना थांबे मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या आंदोलनात तालुक्यातील प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे....

➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*
https://chat.whatsapp.com/KyWkL82aPR03Aj9utKMdXU

*⭕🚩स्वातंत्र्यवीर बॅ. सावरकरांनी अवघे जीवन आपल्या मातृभूमीसाठीच वाहिले!**👉🏻डाॅ.सौ.धनश्री लेले.*▪️अफाट बुद्धिमत्ता, प्रचं...
16/08/2024

*⭕🚩स्वातंत्र्यवीर बॅ. सावरकरांनी अवघे जीवन आपल्या मातृभूमीसाठीच वाहिले!*

*👉🏻डाॅ.सौ.धनश्री लेले.*

▪️अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड वाचन,जागतिक इतिहासाचे अभ्यासक,महाकवी, काव्याचे प्रकार ज्यानी हाताळले असे महाकवी, थोर क्रांतिकारक, साहित्यिक,अफाट राष्ट्रप्रेम, अद्वितीय देशासाठी त्याग, पराकोटीच्या यातना सहन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण जीवन त्यांनी भारत देशासाठी अर्पण केले होते ,तर त्यांचे मनही मातृभूमीसाठी समर्पित होते! लोकोत्तर जीवनाचे पहिले चरित्र शंभर वर्षांनी पुनर्प्रकाशित होत आहे . याचा मनस्वी आनंद होत आहे. असे उदगार ख्यातनाम वक्त्या, डॉ.सौ. धनश्री लेले यांनी काढले.

▪️“स्वातंत्र्यवीर बॅ. राव सावरकर यांचे संक्षिप्त चरित्र" द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा माखजन हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात संपन्न झाला त्यावेळी त्या " स्वातंत्र्यवीर बॅ. सावरकर " या विषयावर प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या.

▪️द्वितीय आवृत्तीच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या लेखिका , अभिनेत्री, संवादिका, निवेदिका, संपदा जोगळेकर कुलकर्णी आपल्या मनोगतात बोलताना म्हणाल्या, की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा काही एका वंशापुरता नाही, तो वारसा विचारांचा आहे. उत्तम वक्ता ,उत्तम लेखक ,उत्कृष्ट कवी ,इतिहासकार , इतिहास घडविणारे , स्वातंत्र्य सेनानी , समाजसेवक, समाज सुधारक, विज्ञाननिष्ठ, असे सावरकर पुन्हा होणे नाही परंतु अक्षर साहित्य नेहमीचेच मनावर खोल परिणाम साधते, असा अनुभव आहे .अशा स्वतःच्या कार्यातून व शब्द संपदेतून त्यांनी पुन्हा 'राष्ट्रप्रेमी 'जन्माला घालण्याची तरतूद करून ठेवली आहे हे मात्र निश्चित खरे आहे.

▪️त्यानंतर प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेल्या मनोरमा प्रकाशनच्या विद्या फडके मनोगतात म्हणाल्या की, १५ ऑगस्ट १९२४ म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी २५वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत हे पुस्तक प्रकाशित करणे हे तर त्यांचे फार मोठे धाडसच होते असंच म्हणावे लागेल, कारण माखजन सारख्या कोकणातल्या अशा गावातील व्यक्तीने हे लिहिणे व प्रकाशित करणे खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे .

▪️लेखकाने सावरकरांच्या आयुष्यातील घटनांचा, त्यांचा राष्ट्रकार्याचा फारच मार्मिक अभ्यास करून , ते चरित्र मोजक्या प्रसंगात, या शब्दात बसविले आहे सावरकरांचे समग्र साहित्य, देशासाठी दिलेली आयुष्याची आहुती या विषयी त्रोटक बोलायचं म्हणजे वक्त्याची कसोटीच आहे.


▪️यावेळी कलांगणचे श्रीनिवास पेंडसे बोलताना म्हणाले की प्रकाशन सोहळ्याचा साक्षीदार होण्याची आणि सहभागी होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

"सफर संगमेश्वर देवरुखची"

▪️या पुस्तकाचे लेखक आशुतोष बापट यांच्यामुळे तिसरे पुस्तक लिहिण्याची संधी कलांगणला मिळाली याचा कलांगणला निश्चित आनंद आहे. स्वातंत्र्यवीर बॅ. सावरकरांनी स्वतःचा गौरव कधीही केला नाही, तर त्यांनी देशाचा गौरव करण्यातच मनस्वी धन्यता मानली. अशाच प्रकारची देशसेवा प्रत्येकाने अंगिकारली तर खऱ्या अर्थाने आपण सावरकर प्रेमी आहोत असे म्हणता येईल.

▪️या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय रानडे यांनी करून या सोहळ्याचे आयोजक , व त्यासाठी दाखवलेली तत्परता , आजचा घडवून आणलेला सोहळा या बाबी आम्हा रानडे कुटुंबासाठी अभिमानास्पद वाटतात असे म्हणाले.

▪️सावरकरांच्या जयोस्तुते.... या गीताचे गायन माखजन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात करून सोहळ्याला सुरुवात झाली . व सागरा प्राण तळमळला.... हे गीत सागर गुरव यांच्या गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

▪️या संपूर्ण कार्यक्रमाचं ऊत्कृष्ट व लक्षवेधी सूत्रसंचालन निवेदक, व संवादक निबंध कानिटकर यांनी केले. तर शरद रानडे यांनी आभार मानले.

▪️या कार्यक्रमाला डॉ सौ धनश्री लेले, सौ. संपदा जोगळेकर कुळकर्णी मनोरमा प्रकाशनच्या विद्याताई फडके, माखजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
डॉ दत्तात्रय बापट प्रा. विजय कुमार रानडे कलांगण संगमेश्वरचे श्रीनिवास पेंडसे ,
लेखक सदाशिव राजाराम रानडे यांच्या कन्या श्यामला श्रीधर पोंक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*
https://chat.whatsapp.com/KyWkL82aPR03Aj9utKMdXU

08/08/2024

*💥🔥ब्रेकिंग*

*⭕🔥कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग*

▪️कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. या भीषण आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं आहे.

▪️कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच कलाप्रेमीसाठी ही दुःखद घटना आहे.

▪️संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या दुर्घटनेत खासबाग मैदानाचा स्टेज आणि त्याला लागूनच असलेलं थिएटर जळून खाक झालं आहे. या घटनेचा कॉल मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पण थिएटरला लाकडी बांधकाम मोठ्या प्रमाणावर असल्यानं आगीनं रौद्ररुप धारण केलं होतं. युद्धपातळीवर इथं आग विझवण्याचं काम सुरु आहे.

*👉🏻दोन दिवस होते कार्यक्रम*

▪️संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऐतिहासिक मान आहे. अनेक अजरामर नाटकांचे इथं प्रयोग झाले आहेत. उद्या आणि परवा याच नाट्यगृहात केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

▪️केशवराव भोसले यांचा जीवनप्रवास आणि गानशैली तसेच त्यांच्याशी संबंधित छायाचित्रांचं प्रदर्शन असे कार्यक्रम इथं पार पडणार होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. पण तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्यानं कोल्हापूरकरांनी खंत व्यक्त केली आहे.

*👉🏻राजर्षी शाहूंनी उभारलं थिएटर*

▪️कला आणि खेळप्रेमी असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकारानं या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती. १९१३ ते १९१५ या काळात ते बांधलं गेलं. याचा रंगमंच २० फूट बाय ३४ फूट इतका प्रशस्त आहे. या नाट्यगृहाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रेक्षकांना रंगमंच पाहताना अडथळा ठरेल असा एकही खांब इथं नाही. या नाट्यगृहाची रचना देखील एखाद्या पॅलेस प्रमाणेच आहे. त्यावेळी या थिएटरचं नाव पॅलेस थिएटर असं होतं. सध्या त्याचं नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं.

➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*
https://chat.whatsapp.com/KyWkL82aPR03Aj9utKMdXU

25/07/2024

*⭕💡संगमेश्वर तालुका कालपासून अंधारात, महावितरण कडे जनतेला एक अपडेट देण्याचे सौजन्य नाही*

✍🏻समीर सप्रे

▪️देवरुख:- सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे कालपासून संगमेश्वर तालुका अंधारात आहे. हि बातमी प्रसिद्ध होई पर्यंत काही भागातील विज पुरवठा सुरळीत झालाही असेल परंतु वीज पुरवठा नेमका कधीपर्यंत सुरळीत होऊ शकतो याबद्दल जनतेला साधी माहिती देण्याचे सौजन्य महावितरण ने दाखवले नाही याबद्दल सखेद आश्चर्य वाटते.

▪️आत्ताचा जमाना समाज माध्यमाचा आहे. कोणतीही बातमी क्षणार्धात जगाच्या काना कोपऱ्यात पोचते. अनेक कठीण प्रसंगात हे माध्यम खूप उपयोगी पडते. वेळोवेळी यावरून अपडेट देणे सोपे असतें. परंतु महावितरण कंपनी च्या हे सगळे गावात देखील नसावे. कारण कालपासून सुमारे 30 तासाहून अधिक काळ तालुका अंधारात असताना जनतेला नेमके काय चाललंय यांचा पत्ता लागू नये याचे आश्चर्य वाटते


▪️किमान प्रत्येक दोन तासानंतर एखादे प्रसिद्धी पत्रक जारी करुन विजपुरवठा सुरळीत करण्याचे काम कुठपर्यंत आले आहे याची अपडेट देणे सोपे आहे परंतु कायमच जनतेचा रोष ओढवून घेण्याची सवय लागलेल्या महावितरण ला याची समज देण्याची गरज आहे.

*💫तालुक्यातील तहसीलदार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते यांनी महावितरण ला याबद्दल समज द्यावी अन्यथा एखाद्या प्रसंगी जनता रस्त्यावर उतरली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची नोंद घ्यावी*
➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*

https://chat.whatsapp.com/EBnuZOh3WHw2tejILxo9pS

देश विदेशा सह स्थानिक पातळीवरील ताज्�

22/07/2024
22/07/2024

आपल्या गावातील, परिसरातील सर्व घडामोडी एका क्लिक वर पाहण्यासाठी संगमेश्वर न्यूज च्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

खालील लिंक क्लिक करा

21/07/2024
*||जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर||**||जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर||**⭕💐अमोल शेट्ये: समाज माध्यमांचा स...
19/06/2024

*||जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर||*
*||जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर||*
*⭕💐अमोल शेट्ये: समाज माध्यमांचा सुयोग्य वापर करुन गरजवंताना मदत करणारा खरा खुरा सेवक!*

✍🏻चिंतामणी (पप्पु)सप्रे

▪️समाज माध्यमे हा आत्ताच्या पिढीला लागलेला शाप आहे असे म्हणतात. पण याच माध्यमांचा योग्य वापर केला तर त्याचा उपयोग समाजपयोगी कामासाठी केला जाऊ शकतो अशी उदाहरणे हल्ली ब-याच प्रमाणात पहायला मिळतात.

▪️आमच्या संगमेश्वरातील एक तरुण अमोल शेट्ये हा अत्यंत धडपड्या आणि सतत कुणाच्या तरी मदतीला धाऊन जाणारा खरा खुरा समाज सेवक म्हणुन ओळखला जातो. हा अवलीया कधी समाज माध्यमातुन कुणाच्या तरी घरासाठी मदत मागतो; तर कधी तरी बाजारातील समस्या मांडून त्याचा पाठपुरावा करतो.

▪️रस्त्यावर सोडलेल्या मोकाट गुराना अपघात होवु नये म्हणुन त्याना रात्रीच्या प्रकाशात चकाकणारे रेडियम लाऊन जीवदान देतो. कुणाला कुत्रा/मांजर पाळायची आवड असेल तर इकडे तिकडे ज्या पाळीव प्राण्याना घर नाही त्याना घर मिळवुन देतो.

▪️काल त्याच्या मित्राला आणि आमच्या बाजारपेठेतील व्यापारी सचिन नारकर ना रस्त्यात एक पाकीट सापडते आणि त्या मालाकाचा शोध सुरु असतो. या सर्व प्रकारात तो आम्हालाही त्याच्या पुण्यकर्मात सहभागी करुन घेतो.

▪️आमच्या संगमेश्वर न्युज च्या माध्यमातुन एखादी बातमी एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोचते. अमोल अशा समाजपयोगी पोस्ट आम्हाला पोस्ट करायला लावतो. बर प्रत्येक वेळी त्याला या कामात यश मिळतेच. कारण आज जगात चांगल्या माणसांची कमी नाही... आपण फक्त चांगले कर्म करत रहायचे... चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगले मिळतेच.

▪️अमोल ला धन्यवाद द्यावेत; त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याला या कामात भरभरुन यश मिळो; त्याला त्याच्या आवडीच्या समाज कार्यात मोलाची साथ देणारी सहचारीणी मिळो अशी श्री जाखमाता आणि श्री कर्णेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.
➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*

https://chat.whatsapp.com/EP5MqDfZpN0Fncf1lERa1U

14/06/2024

*नमस्कार*

*आज संगमेश्वर न्युज नेटवर्क चा ८ वा वर्धापन दिन! ज्यानी या नेटवर्कची मुहुर्तमेढ रोवली ते संदेश सप्रे आज आपल्यात नाहीत. परंतु आम्ही त्यांचे कार्य ; आणि तालुका वासीयांचे हक्काचे व्यासपीठ पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आपल्या सर्वांचे नेहमी सहकार्य आशिर्वाद आणि शुभेच्छा लाभल्या आहेत. यापुढेही त्या मिळाव्या अशी प्रार्थना आहे.*

*💐वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व वाचक; जाहिरातदार; हितचिंतक याना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा🙏🏻*

➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*

https://chat.whatsapp.com/EP5MqDfZpN0Fncf1lERa1U

देश विदेशा सह स्थानिक पातळीवरील ताज्�

*⭕💐कोंकण रेल्वेतील सुविधा आणि गाड्यांच्या थांब्यासाठी संघर्ष करणा-या संदेश जिमन यांचा मुंबईत होणार विशेष सन्मान*▪️कोंकण ...
05/05/2024

*⭕💐कोंकण रेल्वेतील सुविधा आणि गाड्यांच्या थांब्यासाठी संघर्ष करणा-या संदेश जिमन यांचा मुंबईत होणार विशेष सन्मान*

▪️कोंकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकांवरील समस्या सोडवुन प्रवाशांना सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करणा-या मुळच्या संगमेश्वरच्या आणि ठाण्यात वास्तव्यास असणा-या संदेश जिमन यांच्या कार्याची "शिवभक्त कोंकण आणि निलक्रियेटर" या संस्थानी दखल घेतली असून या संस्था येत्या २६ मे रोजी श्री जिमन यांचा विशेष सन्मान करणार आहेत.

▪️मुंबईतील गिरगांवच्या साहित्य संघ मंदिरात सकाळी ९-३० वाजता होणा-या या कार्यक्रमास कोंकण वासीयानी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*

https://chat.whatsapp.com/EP5MqDfZpN0Fncf1lERa1U

*⭕💥"संगमेश्वर न्युज" मधून माभळ्यातील यद्रे कुटुंबाची करुण कहाणी प्रसिद्ध झाल्यानंतर शेकडो हात मदतीसाठी पुढे आले*▪️"कुणी ...
14/04/2024

*⭕💥"संगमेश्वर न्युज" मधून माभळ्यातील यद्रे कुटुंबाची करुण कहाणी प्रसिद्ध झाल्यानंतर शेकडो हात मदतीसाठी पुढे आले*

▪️"कुणी मदत देइल का मदत" या शिर्षकाखाली काल "संगमेश्वर न्युज" वरुन माभळे संगमेश्वर येथील यद्रे नावाच्या वृद्ध जोडप्याची करुण कहाणी प्रसिद्ध झाली.. आणि बातमीत आवाहन केल्याप्रमाणे अनेक मदतीचे हात पुढे आले..

▪️संगमेश्वर येथील दै सकाळ नगर मध्ये एका छोट्याशा खोलीत आपले जीवन जगणा-या एका वृद्ध कुटुंबाला त्यांच्या घराच्या छप्पराची चिंता लागून राहिली आहे. त्यांचे छोटेसे घर कोणत्याही स्थितीत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने त्या वृद्ध कुटुंबाची झोपच उडाली आहे. काल या संदर्भात संगमेश्वर न्युज वरुन प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या या समस्येतुन मार्ग काढण्यासाठी शेकडो मदतीचे हात पुढे आले.

*👉🏻मदत कशी करायची?*

▪️आम्हाला मदत करायची आहे परंतु ती नेमकी कशी करावी कळत नाहीये. हा सर्वसाधारण सर्वांचा प्रश्न. यासाठी संगमेश्वर न्युज दानशूर व्यक्ती किंवा स्वयंसेवी संस्थाना आवाहन करत आहे की खाली दिलेल्या खाते क्रमांकावर आपण अगदी शंभर रुपयांपासून कितीही मदत करु शकता. या मदतीतुनच त्यांचे घर दुरुस्त करण्यासाठी "संगमेश्वर न्युज" पुढाकार घेइल.

▪️कमावता आधारच कुणी नसल्याने त्याना आपण जिन्नस रुपाने मदत करु शकता. हा जिन्नस द्यायचा असेल तर आपल्याला एक संपर्क क्रमांक देत आहोत. त्यांच्याशी चर्चा करुन तो जिन्नस आपण पोहचवु शकता.

▪️आपली छोटीशी मदत एका कुटुंबासाच्या जगण्याला आधार देवु शकतो.

*👉🏻सकाळ नगर मध्ये बैठक*

▪️काल बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर श्री व सौ यद्रे यांच्या जवळपास रहाणा-या रहिवाशांची एक तातडीची बैठक झाली. या बैठकीत सर्वानी एकत्रित मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

*📱अधिक माहिती साठी संपर्क*

*💫श्री अमोल शेट्ये:- 7038722424*

*👉🏻बॅंक खाते तपशील...*

*▪️A/C Name Yadre Jayashree Dattaram*

*▪️Bank:-Janta Sahakari Bank ltd- Pune*

*▪️Branch Sangameshwar*

*▪️Ac No 027220100006969*

*▪️IFSC CODE:- JSBP0000027*

*▪️Ac Type Saving*

*💥मदत पाठवल्याचा स्क्रिन शॉट किंवा फोटो पाठवल्यास उत्तम होइल*
➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*

https://chat.whatsapp.com/EP5MqDfZpN0Fncf1lERa1U

*⭕🛕🚩‘गंगा’ राजापूरची... पूर्ण करी मनोकामना भाविकांची!**✍🏻राजश्री (उल्का) विश्वासराव.*▪️नैसर्गिक चमत्कार की दैवी शक्ती हे...
29/03/2024

*⭕🛕🚩‘गंगा’ राजापूरची... पूर्ण करी मनोकामना भाविकांची!*

*✍🏻राजश्री (उल्का) विश्वासराव.*

▪️नैसर्गिक चमत्कार की दैवी शक्ती हे कोडे अजूनही सुटले नसले तरी श्रद्धाळू मनाला मात्र या गंगेच्या सहवासात अनामिक सकारात्मकता प्राप्त होते. ‘पापे धुवून निघतात’ म्हणजे तरी दुसरे काय हो? तर अनाहूत ताणतणाव एका शक्तीच्या प्रभावाने दूर सारून पुन्हा एकदा मन निरभ्र होणे होय. आम्ही कोकणातले लोक देवभोळे आहोत हे खरे. पण तेच तर आमचे प्रेरणास्थान आहे. निसर्गराजाने कोकणाला भरभरून दिले आहे.त्यानेच आम्हाला कणखर बनविले आहे.

▪️राजापूर हा तळकोकणाचा भाग. पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत संपन्न मात्र येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांची राजकीय दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती या दोन्हींच्या अभावामुळे विकास काही प्रसन्न झाला नाही. तरीही ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ असे म्हणत आला दिवस रेटण्यात जनता यशस्वी होत आहे. पण आम्ही आता यात लक्ष घातले आहे. हा भागभौगोलिक दृष्टया कसा विकसित कसा होईल यासाठी मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांसोबत लक्ष घालायचे ठरविले आहे.. गंगामाईच्या आशिर्वादाने ते शक्य होईल.दर तीन वर्षाने येणारी गंगामाई, महाराष्ट्रातील लक्षावधी धार्मिक पर्यटकांसाठी श्रद्धेचे तर अभ्यासकांसाठी संशोधनाचे केंद्र बनली आहे. यावर्षीही गंगामाई आली; अगदी न चुकता. आम्ही या तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेलो असताना सकारात्मक कल्पना आणि त्यादृष्टीने करावयाची कार्यवाही यांच्यात द्वंद्व सुरु झाले. अर्थातच राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या मेंदूला फार कष्ट पडत नाहीत. माईच्या सान्निध्यात हे द्वंद्व शमले आणि ध्यानमुद्रा घेतली.

▪️या स्थानाचा इतिहास, भौगोलिक रचना आणि महत्त्व यांचा सारासार विचार मनात चमकून गेला. राजापूरहून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर उन्हाळे नावाचे एक छोटेसे खेडे आहे. राजापूर शहरापासून अवघ्या तीन-साडेतीन किमी अंतरावर मुंबई-गोवा महामार्गाला लागून असणाऱ्या या टुमदार खेड्यात बारमाही वाहणारे तीर्थक्षेत्र आहे. ज्वालानाथ नामक एका योग्याला झालेला शीतज्वर घालवण्यासाठी या तीर्थाची निर्मिती केल्याची वदंता आहे.

▪️साधारणतः मीन राशीत सूर्य असताना, एप्रिल-मे महिन्याच्या मध्यात उन्हाळे गावी एका डोंगरावर ती प्रगट होते. गंगास्थानावर गोमुखातून पडणारा जलौघ एवढा मोठा असतो की तो सहजपणे अंगावर घेणे कठीण आहे. मूळ गंगा एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी उगम स्थानी उत्पन्न होते. आणि तिथून तिचे पवित्र जल २० ते २५ पावलांवर असलेल्या काशी कुंडात येते. त्याला संलग्न गोमुखाखाली भक्तगण सचैल स्नान करतात. मूळ गंगा उगमाच्या समोर विविध आकारांची अन्य बारा कुंडे आहेत. वरुण कुंड, हिम कुंड, वेदिका कुंड, नर्मदा कुंड, सरस्वती कुंड, गोदा कुंड, यमुना कुंड, कृष्णा कुंड, अग्निकुंड, बाण कुंड, सूर्य कुंड व चंद्र कुंड. एकूण चौदाही कुंडांतील पाण्याचे तापमान त्या त्या देवतेच्या प्रकृतीनुसार विविध आहे. सूर्य कुंडातला उबदारपणा व चंद्र कुंडातील आल्हाददायक जलस्पर्श जाणवण्यासारखा असतो.

▪️सह्याद्री खंडामध्ये शिव-पार्वती संवादातून धूतपापेश्वर हे राजापुरमधील पवित्र शिवस्थान व समस्त तीर्थांचे यथास्थित वर्णन आहे. सन १६६१ला छत्रपती शिवराय येथे आले होते. त्यांनी राजापूरच्या वखारीला खणती लावली तेव्हा गंगामाता वाहतच होत्या. “गंगामातेने हिंदवी स्वराज्य संस्थापकांस तीर्थाभिषेकाने तोषविले!” शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत. १६६१ साली इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते. तसेच १६६४ मध्ये गागाभट्टांनी येथे घेतलेल्या ब्राह्मणसभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते.

▪️एकूणच दैवी सकारात्मकता आणि गौरवशाली ऐतिहासिक घटना यांमुळे या स्थानाचे महात्म्य कित्येक पटींनी वाढले असून माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत गंगामाईचे दर्शन घेऊन मन प्रफुल्लित झाले आहे. अधिकाधिक पर्यटकांनी या स्थानाचे महात्म्य लक्षात घेऊन उन्हाळे गावास आवर्जून भेट द्यावी. याचे आध्यात्मिक लाभ तर आहेतच शिवाय परिसर विकास, पर्यटन आणि ग्रामीण रोजगाराला चालना मिळणार आहे.

▪️एक गाव तीन वर्षांनी येणाऱ्या या सोहळ्यासाठी देशातील तमाम नागरिकांना पुकारत आहे. त्या ग्रामस्थांच्या वतीने गंगामाईचे उन्हाळे येथे येऊन दर्शन घ्यावे असे आवाहन मी करत आहेत.
➖➖➖➖➖➖➖
*_📡संगमेश्वर न्यूज नेटवर्क🖋️_*

_ #बातमी विश्वासाची_ ....................................
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL....................................
*🪀 ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇🏻*

https://chat.whatsapp.com/EP5MqDfZpN0Fncf1lERa1U

Address

देवरुख ता संगमेश्वर जि रत्नागिरी
Ratnagiri
415804

Telephone

+919420008778

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संगमेश्वर न्यूज नेटवर्क posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share