Manovikas Prakashan

Manovikas Prakashan मनोविकास प्रकाशन
विचारांना दिशा देणारी प्रकाशन संस्था ! Publisher Arvind Patkar who carved a niche in the publishing world is basically a Mumbaikar.
(15)

मनोविकास प्रकाशन
पुस्तकं माणसाला घडवतात, जीवनाला नवा आकार देतात आणि आयुष्य समृद्ध करतात. म्हणून उत्तमातलं उत्तम, दर्जेदार साहित्य वाचकांच्या हाती पडावं यासाठी मनोविकास प्रकाशन गेल्या ३५ वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
प्रकाशन विश्वात मनोविकास प्रकाशनाचं वेगळं स्थान निर्माण करणारे प्रकाशक अरविंद पाटकर हे मूळचे मुंबईचे. गिरणी कामगार चळवळीत ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. डाव्या-पुरोगामी चळवळी

ने विचारांची बैठक दिली, तिला वाचनाची जोड मिळाली. हाच धागा पकडून पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वाचकांकडून मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाने उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. त्याच बळावर मग मुंबईत आकाशवाणी आमदार निवासाच्या आवारात आपलं पुस्तकाचं दुकान थाटलं आणि ते ‘मनोविकास बुक सेंटर’ म्हणून नावारुपाला आणलं. आज हे बुक सेंटर चोखंदळ वाचकांचं मुंबईतलं हक्काचं ठिकाण बनलं आहे.
पुस्तकं विक्रीतून प्रकाशनाकडे...
पाच वर्षांचा हा यशस्वी टप्पा पार करताना साहित्य तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, समाज, अर्थकारण, संस्कृती अशा अनेक विषयांवरील पुस्तकांची गरज लक्षात येत होती. ती विचारात घेऊन प्रकाशन व्यवसायात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आणि अण्णाभाऊ साठे यांच्या लावण्या, गीतं आणि पोवाडे यांचं संकलन असणारं ‘शाहीर’ हे पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्यातूनच १९८४ या वर्षी ‘मनोविकास प्रकाशन’ ही संस्था जन्माला आली.
लेखकांची पिढी घडवणारी संस्था
अर्थात ती जन्माला घालताना समाजाला दिशा देणारी, विकास साधणारी, वाचकाला अंतर्बाह्य घडवणारी आणि समृद्ध करणारी पुस्तकं आपण प्रकाशित केली पाहिजेत, ज्यातून मराठी भाषा समृद्ध व्हावी आणि तिचं संवर्धनही व्हावं अशी भूमिका अरविंद पाटकर यांनी घेतली. ती जपत त्यांनी ‘शाहीर’ नंतर अंधश्रद्धा निर्मूलन, जातीसंस्थेचं उच्चाटन, विज्ञान, मनोविज्ञान, विवेकवाद, मानवी इतिहास, व्यक्तिगत आणि सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, राजकारण, भारतीय संस्कृती, पर्यावरण, व्यक्तीमत्त्व विकास, नव्या पिढीची जडण-घडण असे अनेकविध विषय हताळले. अनेकांना लिहितं करत लेखकांची नवी पिढी घडवण्याचं एक वेगळं कामही त्यातून मनोविकास प्रकाशन करत आहे.
पुस्तकरूपाने मान्यवरांशी भेट
समाज परिवर्तनाच्या लढ्यात महत्त्वाचे ठरणारे डॉ. बाबसाहेब आंबेडकर याचं जाती संस्थेचं उच्चाटन यासारखे महत्त्वाचे ग्रंथ नव्या रूपात वाचकांसमोर आणण्याचं काम मनोविकासने केलं आहे. जगणं समृद्ध करणारं, विचारांना दिशा देणारं दर्जेदार साहित्य वाचकांच्या हाती दिलं पाहिजे या भूमिकेतून अनेक नामांकित लेखकांची दर्जेदार पुस्तकं मनोविकासने वाचकांच्या हाती सोपवली आहेत. त्यारूपाने अनेक मान्यवरांशी वाचकाच्या भेटी घडवण्याचं काम मनोविकास करत आहे.
ध्यास नवा विवेकी समाज घडवण्याचा
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आरोग्य साक्षर बनवलं, त्यांची वैज्ञानिक दृष्टी विकसित केली, तर भावी पिढी सुदृढ, सजग आणि विवेकनिष्ठ बनू शकते. हा विचार अंगीकारत आरोग्यविषयक, विज्ञानविषयक पुस्तकांच्या विविध मालिका तज्ज्ञांकडून लिहून घेत त्या प्रकाशित करणं हे मनोविकास प्रकाशनाचं वेगळेपण राहिलं आहे. शालेय अभ्यासक्रमाला पूरक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक असं दर्जेदार साहित्य मुलांच्या हाती पडलं, तर निश्चितपणे नव्या पिढीतून जबाबदार नागरिक घडू शकतील. याच दृष्टिकोनातून त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ, अभ्यासक अशा अनेक मान्यवर लेखकांकडून विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, संस्कृती, वैज्ञानिक प्रयोग-शोध, वैज्ञानिक खेळ अशा विषयांवरील पुस्तकं लिहून घेतली. त्यातून मुलांविषयीच्या पुस्तकांचं एक वेगळं दालन उघडलं गेलं. मनोविकास प्रकाशनाचं वैशिष्ट्य ठरावं इतकं वैविध्यपूर्ण असं हे दालन असून त्यालाही विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह सामान्य वाचकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला आहे.
दुसऱ्या पिढीचा कल्पक सहभाग
मनोविकासचा वाढता पसारा लक्षात घेऊन दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून मुलगा आशिष पाटकर आणि सून रीना पाटकर यांनी कल्पक सहभाग नोंदवत वाढत्या व्यवसायाचा काही भार आपल्या खांद्यावर घेतला. काळाशी सुसंगत असे काही बदल करत मनोविकासला नवी ओळख देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचाच भाग म्हणून सातत्याने नव्या दमाचे लेखक शोधून सामाजिक जाणिवा सखोल, प्रगल्भ करणारी पुस्तकं प्रकाशित करण्यावर भर दिला. पुस्तक मुखपृष्ठापासून वाचलं जातं, याचं भान ठेऊन सघन आशयाबरोबरच दर्जेदार देखण्या पुस्तक निर्मितीवर जोर दिला. तो देताना आत्मचरित्र, चरित्र, आशयघन अनुवाद, वेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा-कादंबऱ्या, विज्ञान-मनोविज्ञानाबरोबरच समाजातल्या विविध घडामोडींची गांभीर्यानं दखल घेणाऱ्या लेखन वाचकांसमोर यावं असा प्रयत्न केला जात आहे.
उत्कृष्ट निर्मितीला वाङ् मयीन दर्जाची जोड
दर्जा आणि उत्कृष्ट निर्मिती या गोष्टींबरोबरच सतत हटके, नवं काही देण्याचा प्रयत्न मनोविकासकडून आवर्जून केला जातो, हे मनोविकासचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान लाभलेल्या सर विश्वेश्वरय्या यांचं चरित्र कुठेच उपलब्ध नव्हतं. मनोविकासने ते अट्टहासाने लिहून घेतलं आणि “द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरय्या” या पुस्तकाची दर्जेदार निर्मिती करत एक मोलाचा ग्रंथ वाचकांच्या हाती दिला. त्याच पद्धतीने ‘कहाणी मानवप्राण्याची’, ‘वारूळ पुराण’, ‘ऐवजी’, ‘द्रष्टा अणुयात्रिक डॉ. अनिल काकोडकर’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – जीवन व कार्य’, ‘शिवपुत्र राजाराम महाराज’, ‘आदिवासींच्या बोधकथा’, ‘मुसाफिर’, ‘भंगार’, ‘हिंदुराष्ट्रवाद’, ‘रॉ – भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा’, ‘प्रोपगंडा’, ‘देशभक्त – अंधभक्त’, ‘उद्या’, ‘कॉर्पोरेट कल्लोळ’, ‘सिंफनी’, ‘ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना’ अशा अनेक पुस्तकाची निर्मिती केली गेली आहे.
वैशिष्ट्य
- वैविध्यपूर्ण विषयांची हताळणी आणि नव्या दमाच्या लेखकांचा शोध
- अचून आणि सखोल संपादनावर भर देणारी विषयानुसार तज्ज्ञ संपादकांची टीम.
- दर्जेदार निर्मिती आणि महाराष्ट्रभरात वितरणाचं जाळं असणारी प्रकाशन संस्था.
- छापील पुस्तकांबरोबरच ई-बुक्स, ऑडिओ बुक्स अशा नव्या माध्यमातही काम.
- गेल्या 35 वर्षात 1500 हून अधिक टायटल्स वाचकांच्या हाती सोपवली.
पुरस्कारांची मोहोर
मनोविकास प्रकाशनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण कामावर महत्त्वाच्या अनेकविध पुरस्कारांची मोहोर उमटली आहे.
- प्रकाशन व्यवसाय क्षेत्रात मानाचा समजला जाणार वि. पु. भागवत पुरस्कार.
- दिल्लीच्या ‘फेडरेशन ऑफ इंडीयन पब्लिशर्स’चा उत्तम ग्रंथ निर्मिती पुरस्कार.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्तम ग्रंथ निर्मितीसाठीचा पुष्पा पुसाळकर पुरस्कार 2018.
- उत्तम ग्रंथ निर्मितीसाठी दिलं जाणारं धनंजय बाळकृष्ण ठवले पारितोषिक 2003.
- अखिल भारतीय प्रकाशनक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी दिला जाणारा पुरस्कार 2003 आणि 2013.
- राज्य शासनाच्या उत्कृष्ठ वाङ् मय निर्मिती पुरस्काराने मनोविकासच्या अनेक पुस्तकांचा सन्मान.

विशेष म्हणजे आजही हा सिलसिला सुरूच आहे. म्हणूनच मराठी प्रकाशन विश्वात मनोविकास प्रकाशन हे चोखंदळ वाचकांचं एक महत्वाचं, हक्काचं डेस्टिनेशन बनलं आहे. Manovikas – Rightful destination for choosy readers
Books shape the human and transform and enrich their life. Therefore Manovikas publication has been painstakingly taking efforts to get the finest, exclusive literature in the hands of readers since last 35 years. He was a full-time activist in the mill workers movement. His thoughts shaped by leftist – progressive movement further reinforced by reading. Which lead him to start a business of selling books. An overwhelming response from the readers boosted his enthusiasm and confidence. Based on this experience he started his own book shop in the campus of Akashwani Aamdar Nivas in Mumbai which soon became famous as ‘ Manovikas Book centre’. This book centre has become a rightful destination of choosy readers in Mumbai today. Bookselling to Publishing ...
While completing milestone of successful five years he observed the need for books on science, technology, education, economics, society and culture. With this thought, he decided to venture into the publishing business and published the first book ‘Shahir’- a compilation of Lavani, songs and Povadas of Annabhau Sathe. It marked the birth of ‘Manovikas Prakashan’as an organisation in 1984. An organisation that created a new generation of writers
Arvind Patkar’s idea was to bring out the books that will guide the society, help it to prosper, the complete transformation of the readers and enrich them and will enhance the Marathi language and conserve it as well. On this line after ‘Shahir’, he touched upon different subjects including the eradication of superstition, the annihilation of caste, science, psychology, rationalism, human history, personal and public health, education, politics, Indian culture, environment, personality development and mentoring new generation etc. Manovikas Prakashan is encouraging new promising writers and introducing a whole new generation of writers. Meeting stalwarts through books
Manovikas published a pathbreaking book in social reformation movement ‘Annihilation of caste’ of Dr Babasaheb Ambedkar in a new form. With an idea to give qualitative literature that will enrich the life and shape the thoughts of readers. Manovikas has published many excellent books by renowned writers. Manovikas is acting as a bridge between the stalwarts and readers through books. Passion to shape new rational society
If we make students health literate from school life, develop the scientific temperament it can make future generation healthy, aware and rationalist. The uniqueness of Manovikas Prakashan is that it adopts this idea and publishes several series of health and science books that are written by experts in the field. If children get the quality literature that complements the school curriculum and helps personality development, it will ensure children to become a responsible citizen. With this perspective eminent writers who are experts, researchers in the relative field asked to write the books on science, technology, education, health, culture, scientific experiments – discoveries, scientific games. It opened a new gallery of children's books. This gallery is so diverse that it has become a salient feature of Manovikas Prakashan. Children's books have received an overwhelming response from students, parents, teachers and readers in general. Innovative involvement of the second generation
Considering the growing business Manovikas representatives of the second generation son Ashish Patkar and daughter in law Reena Patkar has taken initiative to share the burden of a rapidly flourishing business. Next-generation by bringing some time-relevant changes gave a new identity to Manovikas through their innovative participation. They are constantly in search of new promising writers and focuses on publishing books that give social insight and wisdom of readers. Keeping in mind that books are read from cover to cover along with solid content they are emphasizing on quality book production. They are also attempting to bring out different forms like autobiographies, biographies, quality translations, stories- novels covering different topics and acknowledging different incidences in the field of science- psychology and in society in general. Quality literature enhanced by excellent production
Manovikas always strives to give something new, something different along with quality content and excellent production. This is a distinct feature of Manovikas. Biography of Bharatratn recipient Sir Vishweshwarayya was not available anywhere. Manovikas got it done. ‘ Drashta Abhiyanta Sir Vishweshwarayya’ valuable quality book is now available for readers. Similarly, Manovikas produced many books like ‘ Kahani Manavpranyachi’, ‘Varul Puran’, ‘Aivaji’, ‘ Drashtra Anuyatrik Dr Anil Kakodkar’ ‘Maharshi Vitthal Ramji Shinde – Jeevan v Kary’, ‘Shivputr Rajaram Maharaj’, ‘Aadivasinchya Bodh Katha’, ‘Musafir’, ‘Bhangaar’, ‘Hindu rashtrvad’ ‘ RAW – Bharteey guptachar sansthechi gudh gatha’, ‘Propaganda’, ‘ Deshbhakt – Andhbhakt’, ‘Udya’, ‘ Corporate Kallol’, ‘Symphony’, ‘Gretachi haak tumhala aiku yetey na’. Features
• Exploring a variety of topics and finding new promising writers.
• A team of Expert editors for every subject that focuses on accurate and thorough editing.
• A publishing house with quality production and statewide distribution network.
• Along with printed books exploring new media of e-books, audiobooks too.
• More than 1500 titles handed over to the readers in the last 35 years. Accolades
Unique work of Manovikas Prakashan has received many important awards.
• Vi Pu Bhagwat Award - Prestigious award in the publication business.
• Best book production Award of Federation of Indian Publishers, Delhi.
• Pushpa Pusalkar Purskar 2018 –Maharashtra Sahitya Parishad’s award for best book production
• Dhananjay Balkrishna Thavale Paritoshik 2002 award for best book production.
• Best book production Award 2003 and 2013 by Akhil Bharteey Prakashan Sangh.
• Many Manovikas books received the honour of ‘Best literature production award’ by the Maharashtra Government. This trend continues even today. Therefore in Marathi publishing world Manovikas Prakashan has become 'an important and rightful destination for choosy readers'.

मनोविकास प्रकाशन व विधीज्ञ वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुरुंगवास भोगलेल्या एका भूतपूर्व IPS अधिकाऱ्याची ...
03/10/2024

मनोविकास प्रकाशन व विधीज्ञ वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुरुंगवास भोगलेल्या एका भूतपूर्व IPS अधिकाऱ्याची डायरी
तुरुंग-रंग
ॲड.रवींद्रनाथ पाटील
या पुस्तकाचा.. प्रकाशन समारंभ....
हस्ते
न्या. अंबादास जोशी (माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय व लोकायुक्त, गोवा)....
प्रमुख पाहुणे
रवींद्र केदारी (माजी आयपीएस अधिकारी व कारागृह विभागाचे निवृत्त डीआयजी)....
विशेष मुलाखत
लेखक ॲड. रवींद्रनाथ पाटील
मुलाखतकार
डॉ. विजय पिंगळे (माजी आयएएस अधिकारी)....
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे......
आपले विनित अरविंद पाटकर, आशिश पाटकर, अॅड. रवींद्रनाथ पाटील

स्थळ - पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे वेळ - रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता.

#मनोविकासप्रकाशन #रवींद्रनाथपाटील #नवीनपुस्तक

03/10/2024

*शब्दांगण सत्र 265*
*पुस्तक प्रकाशन : भिंतीआडचा चीन*
*लेखक : श्रीराम कुंटे*
*हस्ते*: *चंद्रशेखर टिळक*

आज 2 महिन्यात स्वतःचे पुस्तक लिहा - लेखक बनणे अगदी सोपे अशा प्रकारच्या जाहिरातींचा सुकाळू असताना एखादा लेखक एक-दीड वर्ष सातत्याने अभ्यास करून एक पुस्तक लिहितो आणि एक प्रथितयश संपादक गृह त्याचं पुस्तक छापतं हीच मनोज्ञ घटना....

*भिंतीआड चा चीन* या *श्रीराम कुंटे* लिखित पुस्तकाचे प्रकाशन आपल्या शब्दांगण च्या platform वर व्हावं हे आपलं भाग्य आणि *चंद्रशेखर टिळक* याकरता आशीर्वाद देण्यासाठी उपलब्ध असावेत हा समसमा योग.

श्रीराम कुंटे यांची अभ्यासपूर्ण सत्रे आपण शब्दांगण वर ऐकली असतील. त्यांना त्यांच्या युट्युब चॅनेल वर ऐकले असेल. त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष मुलाखत ऐकण्यासाठी जरूर या...
*ऑनलाईन + ऑफलाईन*

*रविवार* *6 ऑक्टोबर*
*सायंकाळी 6.30 वाजता*

*स्थळ :* ध्रुव आय. ए एस अकॅडमी
C-301, झेन क्लिनिक च्या वर, वैभव बिल्डिंग, कस्तुरी प्लाझा समोर डोंबिवली पुर्व.

*Join Zoom Meeting*
https://us06web.zoom.us/j/83871511167?pwd=2ugCcAI4NFdNdKDx21lnHqG5beQ4K7.1

Meeting ID: 838 7151 1167
Passcode: 368000

किंवा *youtube चॅनेल*

https://youtube.com/?feature=shared

*संपर्क :* 9819773970

Best wishes to all on Mahatma Gandhi Jayanti!Buy the following book on the occasi… See more
02/10/2024

Best wishes to all on Mahatma Gandhi Jayanti!
Buy the following book on the occasi… See more

महात्मा गांधी जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! महात्मा गांधी जयंती निमित्त खालील पुस्तक खरेदी करा 30% भरघोस सवलती....
02/10/2024

महात्मा गांधी जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
महात्मा गांधी जयंती निमित्त खालील पुस्तक खरेदी करा 30% भरघोस सवलती.

पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला.
www.manoviaksprakashan.com
किंवा 088885 50837 या क्रमांकावर व्हाट्सअप करा.

#मनोविकासप्रकाशन

मा. भालभा विभुते   लिखित "आपली संसद" आणि "आपल्या निवडणुका" ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. कुमारवयीन वाचकांसाठी ही पुस्तक...
01/10/2024

मा. भालभा विभुते लिखित "आपली संसद" आणि "आपल्या निवडणुका" ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. कुमारवयीन वाचकांसाठी ही पुस्तकं अत्यंत उपयुक्त ठरतील. "आपली संसद" या पुस्तकात संसदेचे कामकाज कसे चालते याची माहिती दिली आहे, तर "आपल्या निवडणुका" या पुस्तकात भारतातील निवडणूक प्रक्रियेबद्दल सखोल माहिती सादर करण्यात आली आहे. किशोरवयीन आणि कुमारवयीन मुलांसाठी या विषयांवर आजपर्यंत असे कोणतेही पुस्तक लिहिले गेले नव्हते, आणि ही दरी या दोन पुस्तकांनी भरून काढली आहे.

हे पुस्तक केवळ किशोरवयीन मुलांनाच नव्हे, तर सर्व जाणत्या वाचकांनाही आवडतील, याची आम्हाला खात्री आहे. मा. भालबा विभुते यांच्या एकूणच लेखन कारकिर्दीसाठी आणि या दोन पुस्तकांच्या प्रकाशनासाठी #मनोविकासप्रकाशन च्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी ही पुस्तकं नक्की वाचावीत.

पुस्तक ऑनलाईन मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/Aapli_Sansad
https://manovikasprakashan.com/Aapalya_Nivadnuka
किंवा 088885 50837 या व्हाट्सअप नंबर वर ऑर्डर नोंदवू शकता.
#मनोविकासप्रकाशन

ज्योती ग्रंथादालन नाशिक आयोजित लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त मनोविकास प्रकाशित आणि ...
01/10/2024

ज्योती ग्रंथादालन नाशिक आयोजित लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त मनोविकास प्रकाशित आणि रवी आमले लिखित परकीय हात या पुस्तकाच्या अनुषंगाने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमातील काही क्षण.
#मनोविकासप्रकाशन

उद्या नक्की या! #मनोविकासप्रकाशन
28/09/2024

उद्या नक्की या!
#मनोविकासप्रकाशन

ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी बांधावरची झाडे | डॉ. व्ही. एन. शिंदेबोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिं...
27/09/2024

ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी
बांधावरची झाडे | डॉ. व्ही. एन. शिंदे

बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ, साग या झाडांविषयीच्या ज्ञानललित माहितीचा लेखसंग्रह म्हणजे ‘बांधावरची झाडे' हे पुस्तक.डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञानललित
बंध आहे. झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबर त्यांचा व्याप्ती-पसारा, भूगोल, भाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे. त्यामुळे त्यास वस्तुनिष्ठ वैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यासाठी त्यांनी विविध ज्ञानशाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतला आहे. झाडांचा अधिवास व परिसर विज्ञानाविषयीचे हे कथन आहे. त्यात शेतीज्ञानाबरोबर वनस्पतिविज्ञान आहे. त्या त्या झाडांची व्यावहारिक उपयोगिता सांगितली आहे. शिंदे यांच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण विशेष म्हणजे झाडसृष्टीच्या मानवनिर्मित बांधकामाचे कथन. माणूस आपल्या कल्पनानिरीक्षणाने सृष्टिवाचन करत त्यास मानवी रंगरूप देत आला आहे. डॉ. शिंदे यांच्या लेखनात मानवाने आदिकाळापासून झाडांविषयीचे रचलेले विहंगदर्शन आहे.
लोककथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाडदर्शने आहेत. लोक व लिखित परंपरेच्या झाडवाचनाचा त्यात धांडोळा आहे. एका अर्थाने मराठी
संस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंगछायादर्शन आहे. डॉ. शिंदे यांच्या या झाडवाचनाला लेखकाच्या आत्मपरतेचे गहिरे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बांधावरील हे झाडमायादर्शन मनोहारी ठरेल.
- डॉ. रणधीर शिंदे

पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/Bandhavarachi_Zade
किंवा 088885 50837 या क्रमांकावर क्लिक करा.
बांधावरची झाडे | डॉ. व्ही. एन. शिंदे

#मनोविकासप्रकाशन #मराठी #नवीनपुस्तक

डॉ. रुपेश पाटकर लिखित अंदमानातील क्रांतिकारक पुस्तकाचे सुप्रसिध्द इतिहास अभ्यासक सदानंद कदम यांनी केलेले परीक्षण.
17/09/2024

डॉ. रुपेश पाटकर लिखित अंदमानातील क्रांतिकारक पुस्तकाचे सुप्रसिध्द इतिहास अभ्यासक सदानंद कदम यांनी केलेले परीक्षण.

सर्व रसिक वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! www.manovikasprakashan.com   #मनोविकासप्रकाशन  #मराठी
06/09/2024

सर्व रसिक वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
www.manovikasprakashan.com

#मनोविकासप्रकाशन #मराठी

सुप्रसिध्द अभिनेते गिरीश परदेशी यांनी मनोविकास प्रकाशन प्रकाशित आणि दीपा देशमुख लिखित डायरेक्टर्स या पुस्तकची 'मला आवडले...
05/09/2024

सुप्रसिध्द अभिनेते गिरीश परदेशी यांनी मनोविकास प्रकाशन प्रकाशित आणि दीपा देशमुख लिखित डायरेक्टर्स या पुस्तकची 'मला आवडलेली पुस्तक' या त्यांच्या यूट्यूब मालिकेमध्ये पुस्तकाची माहिती देत शिफारस केली आहे. आपण नक्की ऐका! यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

मनोविकास नवकोर
डायरेक्टर्स - निवडक भारतीय दिग्दर्शकांच्या कलाप्रवासाचा ओघवता आस्वाद । दीपा देशमुख
लाखो/करोडो प्रेक्षकांच्या मनाला दशकानुदशकं भुरळ पाडणारं माध्यम म्हणजे चित्रपट. मनोरंजनातून लोकांना सजग आणि जागरूक करणारं सशक्त माध्यम म्हणजेही चित्रपटच. अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गज बुद्धिवंतांपर्यंत आपली स्वप्नं रंगवण्याची, घटकाभर वास्तवाचा विसर पाडण्याची ताकद या माध्यमात आहे. चित्रपट बघताना कधी आपण आपलंच प्रतिबिंब बघतो आहोत असं वाटतं. चित्रपटातल्या पात्रांच्या सुखदु:खांशी, वेदनांशी, परिस्थितीशी आपण एकरूप होतो. कधी आपण भारावून जातो, तर कधी अंतर्मुख होऊन विचार करू लागतो.
चित्रपट निर्मिती ही एक सांघिक कृती आहे, तिच्यामागे अनेकांचे परिश्रम असतात असं आपण म्हणत असलो, तरी ‘कॅप्टन ऑफ द शीप' हा त्या चित्रपटाचा दिग्दर्शक असतो हेच खरं. हा दिग्दर्शक किती तरल आहे, किती सर्जनशील आहे यावर त्या चित्रपटाची परिणामकारकता अवलंबून असते.
दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशन प्रकाशित ‘डायरेक्टर्स' या पुस्तकामध्ये सत्यजीत रे, व्ही. शांताराम, राज कपूर, बिमल रॉय, गुरू दत्त, हृषिकेश मुखर्जी आणि श्याम बेनेगल अशा काही निवडक दिग्दर्शक मंडळींचा अंतर्भाव केला आहे.
‘डायरेक्टर्स' हे पुस्तक चित्रपटांबद्दल बोलतं, तेव्हा वाचकाला त्यात रमवून टाकतं. दिग्दर्शकांबद्दल बोलतं, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी कसा सामना करावा ते सांगतं. यातल्या कलंदरांबद्दल बोलतं, तेव्हा आपलं जगणं अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण कसं करायचं हे सांगतं.
ज्याप्रमाणे दृश्यानुभवातून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद चित्रपटांमध्ये असते, त्याचप्रमाणे अक्षरानुभवातून ते कथानक, ते प्रसंग, तो काळ आणि त्या व्यक्तींना जिवंत करण्याची लेेखिकेची ताकद या पुस्तकामधून प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे काळाच्या पुढे बघायला लावणारे, मानवता हाच खरा धर्म असं सांगणारे, सत्य, अहिंसा आणि प्रेम यांचा विचार रुजवणारे चित्रपट आणि त्यांचे दिग्दर्शक यांची ओळख रसाळ, ओघवत्या आणि सोप्या भाषेत एक रसिक आणि आस्वादक म्हणून लेखिकेने करून दिली आहे.

पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://manovikasprakashan.com/directors किंवा
088885 50837 या क्रमांकावर व्हाट्सअप करा.

#मनोविकासप्रकाशन #मराठीपुस्तक #मराठी #नवीनपुस्तक #पुस्तक Deepa Deshmukh Manovikas Prakashan

You tube link
https://youtube.com/shorts/MxaDvoCepVo?si=GljrogpSMUkxy-C1

पद्मश्री अरविंद गुप्ता यांना कमला मुकुंद लिखीत 'आज शाळेत काय विचारले' हे पुस्तक मी भेट दिले.दोन वर्षा पूर्वी गुप्ता सरां...
02/09/2024

पद्मश्री अरविंद गुप्ता यांना कमला मुकुंद लिखीत 'आज शाळेत काय विचारले' हे पुस्तक मी भेट दिले.
दोन वर्षा पूर्वी गुप्ता सरांनीच मला हे पुस्तक प्रकाशनासाठी सुचवलं होत. हे पुस्तक मराठीत यायलाच पाहिजे हा त्यांचाच आग्रह होता.
मराठी उत्तमोत्तम वैज्ञानिक साहित्य, शिक्षण विषयक नवा दृष्टिकोन देणारी पुस्तकं मराठीत आली पाहिजे यासाठी ते नेहमीच झटत असतात. तोत्तोचान हे पुस्तक मराठीला त्यांचीच देणगी आहे. कमला मुकुंद यांचा हेही पुस्तक सर्व वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल याची प्रकाशक म्हणून मला खात्री आहे.

आज शाळेत काय विचारले?
शिकण्या शिकवण्याची उदबोधक गोष्ट
कमला व्ही. मुकुंद अनुवाद : अरुंधती चितळे.....
1. आपला मेंदू अनुभवातून लवकर शिकतो, तर शाळा पुस्तकी शिक्षणावर भर देते. शाळेत जाण्याआधीपासूनच लहान मूल जीवशास्त्र, पदार्थविज्ञान, मानसशास्त्र हे शिकतच असतं. पण शाळा त्यांच्या त्या आकलनाकड पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना शास्त्रीयदृष्ट्या बरोबर ज्ञान' देण्याचा प्रयत्न करते.
2. स्मृती ही विधायक व स्पष्टीकरणात्मक असते. शाळा मात्र शिकलेल्या अभ्यासक्रमाचे पुनर्उत्पादन करण्यावर भर देते.
3. स्मरणशक्ती व मिळणारे शिक्षण यापासून भावना वेगळ्या करता येत नाहीत. पण शाळा मात्र शिक्षणातील भावनिक बाजूकडे पार दुर्लक्ष करते.
ही आहेत आपल्या शैक्षणिक अपयशाची काही कारणं. या आणि अशाच काही कारणांचा मानसशास्त्रीय अंगाने उहापोह करणारं हे पुस्तक आहे. स्मरणशक्ती, शिकण्याची प्रक्रिया, प्रज्ञा, मुलांची वाढ व मानसशास्त्रातीलइतर बाबी आपल्याला बरेच काही सांगू शकतात. किंबहुना एक उत्तम पालक, एक उत्तम शिक्षक होण्यास त्यांची आपल्याला फार मोठी मदत होऊ शकते, असं सांगत हे पुस्तक बालशिक्षणाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला बहाल करतं. शिक्षणाबद्दल आस्था बाळगणाऱ्या आणि शिकण्या-शिकवण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे.

Aaj Shalet Kay Vicharle? | Kamala V. Mukunda Translated By : Arundhati Chitale

पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/Aaj-Shalet-Kay-Vicharle किंवा 088885 50837 या क्रमांकावर व्हाट्सअप करा.

#मनोविकासप्रकाशन #मराठीपुस्तक

29/08/2024

द इंडियन्स
अनेक सहस्त्रकांचा आपला समग्र इतिहास .......
संपादन : गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर
अनुवाद : शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर, ज्ञानदा असोलकर.........
मनुष्यप्राण्याच्या एकूण इतिहासामध्ये होमो सेपियनची जडणघडण, भटका- अन्नसंकलन व पशुपालन करणारा समुदाय ते सार्वभौम राष्ट्रीयत्वाची मांडणी करणारा समाज असा एक विशाल आणि विस्मयकारक घटनाक्रम दडलेला आहे. या दूरस्थ गतकाळाच्या आरंभबिंदूपासूनच भारतीय उपखंड हा मानवी स्थलांतरासाठी एक महत्त्वपूर्ण हमरस्ता ठरलेला आहे. काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर विविध समुदायांनी भारताच्या सुजलाम सुफलाम भूमीला आपले घर बनवण्यास प्राधान्य दिलेले आहे. परिणामी युगानुयुगे 'बहुसांस्कृतिकता' हा इथला स्थायीभाव बनून राहिलेला आहे. तथापि, अलीकडील काही वर्षांत दक्षिण आशिया खंडाचा इतिहास मोडून-तोडून टाकण्याची वृत्ती बळावत चालल्याचे दिसून येत आहे आणि या वृत्तीतूनच मग वांशिक शुद्धतेचा मागोवा घेणाऱ्या विवेकशून्य, धोकादायक योजना मूळ धरत असल्याचेही चित्र दिसून येते आहे. 'फेक नरेटीव्हज' रचण्याच्या आजच्या कालखंडात इतिहास जाणून घेण्याचे प्रस्थापित वैज्ञानिक मापदंड आहेत, हेच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे काळाच्या या अशा टप्प्यावर जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, हवामानशास्त्र, भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या साधनांच्या सहाय्याने भारताच्या तब्बल बारा हजार वर्षांच्या गतकाळाचे अतिशय चिकित्सकपणे अवलोकन करणारा 'द इंडियन्स' हा ग्रंथ अतिशय प्रस्तुत ठरणारा आहे. 'द इंडियन्स' हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामध्ये जगभरातील सुमारे शंभर एक अभ्यासकांनी आपले योगदान दिलेले आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण व राजकारण याप्रति सजग असणाऱ्या सर्वांना आवाहन करणारा अलीकडच्या काळातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे......
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/The-Indians
किंवा 8888550837 व्हाट्सअप करा......
The Indians
| Edited By: Ganesh Devy, Tony Joseph, Ravi Korisettar
| Translated By: Shekhar Sathe, Pramod Mujumdar, Nitin Jarandikar, Dnyanada Asolkar

#मनोविकासप्रकाशन

द इंडियन्सअनेक सहस्त्रकांचा आपला समग्र इतिहास .......संपादन : गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टरअनुवाद : शेखर साठे, प...
29/08/2024

द इंडियन्स
अनेक सहस्त्रकांचा आपला समग्र इतिहास .......
संपादन : गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर
अनुवाद : शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर, ज्ञानदा असोलकर.........
मनुष्यप्राण्याच्या एकूण इतिहासामध्ये होमो सेपियनची जडणघडण, भटका- अन्नसंकलन व पशुपालन करणारा समुदाय ते सार्वभौम राष्ट्रीयत्वाची मांडणी करणारा समाज असा एक विशाल आणि विस्मयकारक घटनाक्रम दडलेला आहे. या दूरस्थ गतकाळाच्या आरंभबिंदूपासूनच भारतीय उपखंड हा मानवी स्थलांतरासाठी एक महत्त्वपूर्ण हमरस्ता ठरलेला आहे. काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर विविध समुदायांनी भारताच्या सुजलाम सुफलाम भूमीला आपले घर बनवण्यास प्राधान्य दिलेले आहे. परिणामी युगानुयुगे 'बहुसांस्कृतिकता' हा इथला स्थायीभाव बनून राहिलेला आहे. तथापि, अलीकडील काही वर्षांत दक्षिण आशिया खंडाचा इतिहास मोडून-तोडून टाकण्याची वृत्ती बळावत चालल्याचे दिसून येत आहे आणि या वृत्तीतूनच मग वांशिक शुद्धतेचा मागोवा घेणाऱ्या विवेकशून्य, धोकादायक योजना मूळ धरत असल्याचेही चित्र दिसून येते आहे. 'फेक नरेटीव्हज' रचण्याच्या आजच्या कालखंडात इतिहास जाणून घेण्याचे प्रस्थापित वैज्ञानिक मापदंड आहेत, हेच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे काळाच्या या अशा टप्प्यावर जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, हवामानशास्त्र, भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या साधनांच्या सहाय्याने भारताच्या तब्बल बारा हजार वर्षांच्या गतकाळाचे अतिशय चिकित्सकपणे अवलोकन करणारा 'द इंडियन्स' हा ग्रंथ अतिशय प्रस्तुत ठरणारा आहे. 'द इंडियन्स' हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामध्ये जगभरातील सुमारे शंभर एक अभ्यासकांनी आपले योगदान दिलेले आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण व राजकारण याप्रति सजग असणाऱ्या सर्वांना आवाहन करणारा अलीकडच्या काळातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे......
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/The-Indians
किंवा 8888550837 व्हाट्सअप करा......
The Indians
| Edited By: Ganesh Devy, Tony Joseph, Ravi Korisettar
| Translated By: Shekhar Sathe, Pramod Mujumdar, Nitin Jarandikar, Dnyanada Asolkar

दत्ता देसाई लिखित सत्ता बदल राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://manovikasprak...
28/08/2024

दत्ता देसाई लिखित
सत्ता बदल
राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद

घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=1180
किंवा 088885 50837 या क्रमांकावर व्हाट्सअप करा

‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवं...

दिनांक 24 शनिवार रोजी गणेश देवी लिखित द इंडियन्स या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला त्यानिमित्ताने विविध माध्यमाने प...
25/08/2024

दिनांक 24 शनिवार रोजी गणेश देवी लिखित द इंडियन्स या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला त्यानिमित्ताने विविध माध्यमाने पुस्तकाची घेतलेली दखल!

पुस्तक खरेदीसाठी खालील वर क्लिक करू शकता.
https://manovikasprakashan.com/The-Indians

#मनोविकासप्रकाशन

मनोविकास प्रकाशनची पुस्तक आजच खरेदी करा. सर्व पुस्तकांवर 30 टक्के इतकी भरघोस सवलत. वेबसाईटला लगेच भेट द्या! www.manovika...
20/08/2024

मनोविकास प्रकाशनची पुस्तक आजच खरेदी करा.
सर्व पुस्तकांवर 30 टक्के इतकी भरघोस सवलत.
वेबसाईटला लगेच भेट द्या! www.manovikasprakashan.com
किंवा 088885 50837 या व्हाट्सअप नंबर वर आपली मागणी नोंदवा.
#मनोविकासप्रकाशन

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!पुस्तक खरेदी करण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.manovikasprakashan.comकिंवा 888855...
19/08/2024

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
पुस्तक खरेदी करण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
www.manovikasprakashan.com
किंवा 8888550837 या क्रमांकावर कॉल करा.

❤️

18/08/2024

यंदाचे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर प्रकाशक संघटनेने बहिष्काराचा पवित्रा दाख.....

दिग्दर्शकांची गौरवशाली परंपरा18/08/2024लोकसत्ता लोकरंग  डॉ. नितीन हांडेपन्नाशी आणि साठीचे दशक हा भारतीय चित्रपटसृष्टीचा ...
18/08/2024

दिग्दर्शकांची गौरवशाली परंपरा
18/08/2024
लोकसत्ता लोकरंग

डॉ. नितीन हांडे

पन्नाशी आणि साठीचे दशक हा भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ समजला जातो. याकाळात सत्यजीत रे, विमल रॉय, गुरुदत्त, व्ही. शांताराम, राज कपूर या दिग्गज दिग्दर्शकांच्या एकापेक्षा एक सरस कलाकृती भारतीय सिनेमासृष्टीला समृद्ध करत होत्या. या दिग्गजांचे सिनेमे हे केवळ रसिकांचे मनोरंजन करत नव्हते तर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाची अभिव्यक्ती तयार करू पाहत होते. सर्जनशीलता आणि कलात्मक उंची असलेले हे चित्रपट प्रेक्षकांना जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत असतानाच देशातील तत्कालीन प्रश्नांनादेखील हात घालत होते. त्यांनी रचलेल्या पायावर पुढच्या पिढीतील श्याम बेनेगल, हृषीकेश मुखर्जी या संवेदनशील दिग्दर्शकांनी अर्थपूर्ण सिनेमांची इमारत रचली आणि भारतीय सिनेमाला जागतिक दर्जा मिळवून दिला. या सात दिग्गज दिग्दर्शकांच्या निवडक कलाकृतींचा रसास्वाद नव्याने करून देण्यासाठी दीपा देशमुख यांचे ‘डायरेक्टर्स’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनामार्फत नुकतेच प्रकाशित झाले आहे.

समीक्षकाच्या अंगाने नाही तर एक सर्वसामान्य रसिक या चित्रपटांचा आनंद कसा घेतो या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिले आहे. या सिनेमातील तांत्रिक बाबींवर अधिक भर न देता त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद यातील शक्ती उलगडून सांगितल्या आहेत. चित्रपट म्हणजे मनोरंजनातून लोकांना सजग आणि जागरूक करणारं सशक्त माध्यम. ‘मास ते क्लास’ म्हणजे सर्वसामान्यांपासून ते बुद्धिवंतांपर्यंत प्रत्येकाला घटकाभर वास्तवाचा विसर पाडण्याची आणि एका स्वप्नाच्या जगात घेऊन जाण्याची ताकद या माध्यमात आहे. चित्रपटातल्या पात्रांच्या सुखदु:खांशी, वेदनांशी, परिस्थितीशी आपण एकरूप होतो.

या पुस्तकासाठी प्रत्येक दिग्दर्शकाच्या कलाकृती निवडताना ही काळजी घेतली आहे की या कलाकृतींमध्ये दिग्दर्शकाच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब दिसून येते. या दिग्दर्शकांनी चित्रपट म्हणजे समाज जागृतीचं उत्तम साधन आहे याची जाणीव ठेवून त्याचा प्रभावी वापर केला आहे. या पुस्तकात सहभागी असलेल्या दिग्दर्शकांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीचा काळही अनुभवलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळही पाहिलेला आहे, त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी असलेलं वातावरण, जमीनदार पद्धती, शेतकऱ्यांची परिस्थिती, सरंजामशाही व्यवस्था, स्त्रीला दुय्यम स्थान असणं तसेच समाजातील जातीभेदाचे वास्तव या सगळ्याचा परिणाम समाजावर कसा होत होता याचं चित्रण या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून दिसतं. स्वातंत्र्याची पंचविशी ओलांडल्यानंतर सुरू झालेल्या समांतर चित्रपटाच्या नजरेतून श्याम बेनेगल यांनी तत्कालीन समाजाचं केलेलं वास्तव चित्रण दाहकपणे समोर येतं. त्याच वेळी आपल्या चित्रपटातून हलकेफुलके, जीवनातील लहानसहान सुखदु:ख तरलपणे मांडणारे ऋषीकेश मुखर्जीदेखील सत्यकाम चित्रपटात वास्तव, कल्पना, स्वप्न यांचा अद्भुत मेळ घालून त्यात तरुणांची होणारी घुसमटसुद्धा यथार्थपणे रंगवतात. भारतात त्याकाळात प्राथमिक अवस्थेत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून एवढ्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती हे खूप मोठं आव्हान होतं. मात्र प्रचंड कलासक्ती, कामाविषयी अपार निष्ठा आणि विषय पोचविण्याची प्रचंड तळमळ यामुळेच या कलाकृती घडू शकल्या. चित्रपट निर्मिती ही एक सांघिक कृती आहे, तिच्यामागे अनेकांचे परिश्रम असतात असं आपण म्हणत असलो तरी ‘कॅप्टन ऑफ द शीप’ हा त्या चित्रपटाचा दिग्दर्शक असतो हेच खरं. हा दिग्दर्शक किती तरल आहे, किती सर्जनशील आहे यावर त्या चित्रपटाची परिणामकारकता अवलंबून असते.

प्रत्येक चित्रपटाची थोडक्यात ओळख करून देताना चित्रपटनिर्मितीच्या वेळी घडलेल्या गमतीजमती, आलेले अडथळे आणि या कलाकृतींचा प्रवास लेखिका त्यांच्या ओघवत्या शैलीत आपल्यापर्यंत पोचवतात.

या पुस्तकात आपल्याला व्ही. शांताराम, बिमल रॉय, सत्यजीत रे, हृषीकेश मुखर्जी, राज कपूर, गुरुदत्त आणि श्याम बेनेगल या सातही दिग्दर्शकांची कारकीर्द यांची इत्थंभूत माहिती मिळते. ज्या व्यक्तीला सिनेमांची फारशी माहिती नाही, त्यांच्यासाठी कलंदर कलाकार आणि कलाकृती हा दुसरा विभाग मेजवानी ठरू शकतो. सिनेमाची आवड असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकास भारतीय सिनेमाची गौरवशाली परंपरा समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक चांगला पर्याय आहे.

‘डायरेक्टर्स’, - दीपा देशमुख, मनोविकास प्रकाशन, पाने- ४५६, किंमत- ५८० रुपये.

पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/directors
किंवा 088885 50837 या क्रमांकावर व्हाट्सअप करा.

#मनोविकासप्रकाशन #मराठीपुस्तक Deepa Deshmukh

दत्ता देसाई लिखित सत्ता बदल राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://manovikasprak...
17/08/2024

दत्ता देसाई लिखित
सत्ता बदल
राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद

घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=1180
किंवा 088885 50837 या क्रमांकावर व्हाट्सअप करा

‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवं...

Address

3/A, Shakti Tower, 672, Narayan Peth, Narayan Peth 4th Floor
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+918888550837

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manovikas Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manovikas Prakashan:

Videos

Share

Category

Our Story

वा. वि. भटांच्या सल्ल्यानुसारच 1986 साली अरविंद पाटकरांनी पुस्तकं प्रकाशनाला सुरुवात केली. मनोविकास प्रकाशनाचं पहिलं पुस्तक होतं अण्णाभाऊ साठे यांचं लावणी, गाणी, पोवाडे. याचं हस्तलिखित वा. वि. भटांनीच अरविंद पाटकरांकडे सुपूर्द केलं आणि पहिल्या पुस्तकाला सर्वतोपरी मदत करत नावही दिलं ‘शाहीर.’ या पुस्तकाची वेधक प्रस्तावना लिहिली होती, कॉम्रेड एस. ए. डांगे यांनी. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या दालनातच या पुस्तकाचं प्रकाशन झालं. प्रकाशन सुरू केलं तेव्हाच सामाजिक भान ठेवणारी, समाजाचा विकास साधणारी, साहित्यातून सामाजिक विषयांना स्पर्श करणारी पुस्तकं छापावीत ही भूमिका प्रकाशक अरविंद पाटकर यांनी घेतली. त्यामुळे पहिल्या पुस्तकानंतर श्याम मानवांची अंधश्रद्धा निर्मूलनावरची पुस्तकं, राजेंद्र बर्वे याची मनोविज्ञावरची पुस्तकं, डॉ. आंबेडकरांचं जाती संस्थेचं उच्चाटन, आरोग्यविषयक, विज्ञानविषयक पुस्तकं प्रकाशित केली. प्रकाशनाचा विस्तार वाढत गेला तसा हा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी श्री आशिष पाटकर यांनीही घेतली. दरम्यान मनोविकास प्रकाशनानं प्रकाशन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. नव्या दमाचे लेखक शोधत सामाजिक जाणिवा सखोल करणारी पुस्तकं प्रकाशित केली. ‘पुस्तक मुखपृष्ठापासूनच वाचलं जातं’ याचं भान ठेवून उत्तम आशयाबरोबरच दर्जेदार, देखण्या पुस्तक निर्मितीवर भर दिला. गेल्या 25 वर्षांत 800 पेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती मनोविकासने केली आहे. यापुढच्या वाटचालीतही अधिक सजग वाचकांसाठी उत्तम दर्जेदार आत्मचरित्र, आशयघन अनुवाद, वेगळ्या विषयांना स्पर्शणार्याि कथा-कादंबर्याा, विज्ञान-मनोविज्ञानाबरोबरच समाजातल्या विविध घडामोडींची दखल घेणारं लेखन मनोविकास प्रकाशनाला प्रकाशित करत आहे.