भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

  • Home
  • India
  • Pune
  • भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन राष्ट्रीय विचारांचे सामाजिक व वैचारि
(11)

'राष्ट्रहित सर्वतोपरि' या विचाराने सन १९७९पासून कार्यरत 'भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे' हे साहित्य गृह जनामनांत रुजले आहे. तब्बल ३७ वर्षे राष्ट्रीय विचार आणि महापुरुषांचे कार्य पुस्तकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य अविश्रांतपणे करणा-या या संस्थेने bhavisa.bookbharati.com या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन माध्यमातून पुस्तक विक्री ही नवी सुविधा सुरू केली आहे. भाविसा प्रकाशित इ-बुकदेखील या

संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
संस्थेने प्रकाशित केलेली ५०० हून अधिक पुस्तके 'विचारयात्रा' या वाहनामार्फत महाराष्ट्राच्या खेडोपाडी प्रतिनिधींच्या साहाय्याने उपलब्ध होतात.

14/09/2024

*♦️भारतीय विचार साधना फाउंडेशन♦️*

(लेखक- *प्रसाद फाटक)*

_*श्री. कन्हैयालाल मुन्शी*_ म्हणजे विख्यात लेखक, तत्वचिंतक, इतिहासतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, स्वातंत्र्यसेनानी, संस्कृतप्रसारक.
अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे चरित्र मराठीत पहिल्यांदाच येत आहे.

मूळ किंमत- *₹200/-*
प्रकाशनपूर्व किंमत- *₹150/-*

(☎️ 8999192654)

*पुस्तक प्रकाशन समारंभ*श्री. कन्हैयालाल मुन्शी म्हणजे विख्यात लेखक, तत्वचिंतक, इतिहासतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, स्वातंत्र्यसेन...
11/09/2024

*पुस्तक प्रकाशन समारंभ*

श्री. कन्हैयालाल मुन्शी म्हणजे विख्यात लेखक, तत्वचिंतक, इतिहासतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, स्वातंत्र्यसेनानी, संस्कृतप्रसारक. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे चरित्र मराठीत पहिल्यांदाच येत आहे.
भारतीय विचार साधना प्रकाशित,
प्रसाद फाटक लिखित मुन्शी चरित्राचे प्रकाशन लवकरच होत आहे.

दिनांक : २१ सप्टेंबर, शनिवार
स्थान : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे
वेळ : संध्याकाळी ६ वाजता.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 🙏

अगत्याचे आमंत्रण..२०२४ हे कारगिल विजयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ह्या विजयाच्या आठवणी कायम प्रेरणा देत राहाव्यात ह्या उद...
18/07/2024

अगत्याचे आमंत्रण..

२०२४ हे कारगिल विजयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ह्या विजयाच्या आठवणी कायम प्रेरणा देत राहाव्यात ह्या उद्देशाने भारतीय विचार साधना दोन पुस्तकांचे प्रकाशन करत आहे. कारगिल युद्धात प्रमुख विजयी कामगिरी बजावणाऱ्या योगेंद्र सिंह यादव यांना वयाच्या १९व्या वर्षी सर्वोच्च परमवीरचक्राने भूषविण्यात आले. त्यांनी ह्या अनुभवावर लिहिलेले द हिरो ऑफ टायगर हिल आणि स्वप्निल पांडे ह्यांनी लिहिलेले द फोर्स बिहाईंड फोर्सेस ह्या दोन पुस्तकांचा ‘द हिरो ऑफ टायगर हिल’ आणि ‘भारतीय वीर पत्नींच्या कथा – सैन्यामागील शक्ती’ असा मराठी अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सुनेत्रा जोग ह्यांनी उत्कृष्टपणे केला आहे.

सदर पुस्तकांचा प्रकाशन समारंभ शनिवार दि. 20 जुलै 2024 रोजी प्र. ल. गावडे सभागृह, पेरुगेट भावेस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर (निवृत्त) PVSM,UYSM,AVSM,SM**,VSMआणि मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (निवृत्त) यांची उपस्थिती लाभली आहे.
द हिरो ऑफ टायगर हिल ह्या प्रेरणादायी पुस्तकाचे अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेलमध्ये रुपांतर केले आहे आणि अंध शाळेला ही पुस्तके भेट दिली जाणार आहेत. ‘भारतीय वीर पत्नींच्या कथा’ ह्या पुस्तकातील एक वीर पत्नी श्रीमती तृप्ती नायर ह्या प्रसंगी उपस्थित असतील आणि त्यांचा सत्कार करण्याचे सौभाग्य भाविसास लाभत आहे.
१) *हिरो ऑफ टायगर हिल* ही एका शूर सैनिकाची खरी कहाणी आहे जो आपल्या देशाच्या सन्मानासाठी कोणतीही कसर न ठेवता शौर्याने लढला. कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव यांनी भारतीय सैन्यात सेवेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या परिवर्तनशील प्रवासातून कारगिल युद्धाचे प्रेरणादायी वर्णन त्यांच्या स्वतःच्या शब्दातून केले आहे. कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव हे भारतातील सर्वात तरुण परमवीर चक्र पुरस्कार विजेते आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांना देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्यात आला. टायगर हिलच्या कठीण भागात घातक प्लॅटूनसाठी वाट काढताना, शत्रूची ठाणी काबीज करण्यासाठी प्रखर गोळीबार चालू असतानाही सरपटत वर जात राहिले.
योगेंद्र सिंह यादव हे भारतातील एका लहानशा गावातील आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. त्याच्या नम्र स्वभावामुळे उच्च यश मिळवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. बरेली येथील ज्युनियर लीडर्स अकादमीमध्ये काम करताना, त्यांनी सैन्यातील भावी नेते घडवण्यात मदत केली आणि डिसेंबर २०२१ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. दैनंदिन जीवनात अध्यात्मिक ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानाचा समतोल साधणारा, एक उत्कृष्ट प्रेरक वक्ता आणि एक प्रेरणादायी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
२) *भारतीय वीरपत्नींच्या कथा* *सैन्यामागील शक्ती* सैनिक धारातीर्थी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना त्याचा विरह सहन करावा लागतो. त्याचा सर्वोच्च त्याग गौरावला जातो मात्र त्याची आई, बहिण, पत्नी आणि प्रसंगी मुलगी सुद्धा त्याच्या कायमच्या वियोगाचे दुःख सहन करतात. अशाच सैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या पत्नींनी केलेल्या संघर्षाच्या, अनुभवलेल्या विरहाच्या आणि तरीही देशप्रेमाखातर पुन्हा एकदा उभे राहत काहींनी आपल्या पतीनेच निवडलेल्या सैनिकाच्या मार्गाचा केलेल्या स्वीकाराच्या ह्या कथा. यातील कथांमधून येणारे भारतीय स्त्रियांचे धैर्य आणि ताकद यांसमोर आपण नतमस्तक होतो. या पुस्तकात असणाऱ्या स्त्रियांशिवाय आणखीही शेकडो स्त्रियांना आपल्या दुःखाचा सामना करण्यासाठी आणि त्या एकट्या नाहीत हे सांगण्यासाठी हे पुस्तक मदत करते. या पत्नी एकट्या नाहीत तर संपूर्ण समाज त्यांच्या या अलौकिक आयुष्यात कायमच त्यांच्या पाठीशी आहे.
नक्की या
#कारगिल

*प्रकाशन पूर्व नोंदणी सुरू*२६ जुलै रोजी कारगिल विजय दिनाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने खालील दोन पुस्तके करत...
18/07/2024

*प्रकाशन पूर्व नोंदणी सुरू*

२६ जुलै रोजी कारगिल विजय दिनाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने खालील दोन पुस्तके करत आहेत.
प्रकाशन कार्यक्रम *२० जुलै २४ शनिवार सायं. ६:०० वा.*
*प्र. ल. गावडे सभागृह, पेरूगेट भावेस्कूल, सदाशिव पेठ, पुणे* येथे ठरला आहे.

प्रमुख पाहुणे
*लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त)*
आणि
*मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (निवृत्त)*
हे येंत आहेत.
_________________________________

(१) *द हिरो ऑफ टायगर हिल* (एका परम वीराचे आत्मकथन) (मूळ इंग्रजी)
लेखक: कॅप्टन (ऑनररी) योगेन्द्र सिंह यादव
मराठी अनुवाद: सुनेत्रा जोग
पृष्ठसंख्या – १९० आणि ४ रंगीत फोटोंची पाने
मूल्य- ३०० रू.
नोंदणीसाठी संपर्क : *8999192654*

*"मला मृत्यूची भीती वाटत नव्हती".*
भारतासाठी टायगर हिल परत जिंकण्याआधी मला मरण येऊ नये यासाठी मी फक्त प्रार्थना केली.

३ जुलै १९९९ च्या रात्री, १९ वर्षांचे ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांना 18 ग्रेनेडियर्सच्या घातक प्लॅटूनसोबत अभेद्य टायगर हिल काबीज करण्याचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम देण्यात आले. तोलोलिंग हिल काबीज केल्यानंतर ताजेतवाने झालेले युनिट जोशमध्ये होते, पण दुखापती आणि जखमा होत्याच.

दुर्गम प्रदेश, गोठवणारे थंड हवामान आणि शत्रूच्या भयंकर गोळीबाराचा सामना करत, घातक पलटणीतील शिखरावर पोहोचणारे ते पहिले होते. त्यांच्या शरीरावर अनेक गोळ्या आणि ग्रेनेडचे छर्रे लागल्यानंतरही, त्यांनी शत्रूच्या बंकरवर हल्ला केला आणि टायगर हिलची बलाढ्य शिखरे काबीज करण्यासाठी रेजिमेंटचा मार्ग मोकळा केला.

कारगिल युद्धादरम्यान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी विलक्षण धैर्य, अदम्य शौर्य, हिंमत आणि दृढनिश्चय दाखवला ज्यामुळे ते सर्वोच्च भारतीय लष्करी पुरस्कार मिळवणारे सर्वात तरूण परमवीर चक्र विजेते ठरले.
कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव हे भारतातील सर्वात तरुण परमवीर चक्र पुरस्कार विजेते आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांना देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्यात आला. टायगर हिलच्या कठीण भागात घातक प्लॅटूनसाठी वाट काढताना, शत्रूची ठाणी काबीज करण्यासाठी प्रखर गोळीबार चालू असतानाही सरपटत वर जात राहिले.

ते भारतातील एका लहानशा गावातील आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. त्याच्या नम्र स्वभावामुळे उच्च यश मिळवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला.

बरेली येथील ज्युनियर लीडर्स अकादमीमध्ये काम करताना, त्यांनी सैन्यातील भावी नेते घडवण्यात मदत केली आणि डिसेंबर २०२१ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. दैनंदिन जीवनात अध्यात्मिक ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानाचा समतोल साधणारा, एक उत्कृष्ट प्रेरक वक्ता आणि एक प्रेरणादायी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

हिरो ऑफ टायगर हिल ही एका शूर सैनिकाची खरी कहाणी आहे जो आपल्या देशाच्या सन्मानासाठी कोणतीही कसर न ठेवता शौर्याने लढला. कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव यांनी भारतीय सैन्यात सेवेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या परिवर्तनशील प्रवासातून कारगिल युद्धाचे प्रेरणादायी वर्णन त्यांच्या स्वतःच्या शब्दातून केले आहे.

(२) *भारतीय वीर पत्नींच्या कथा* (सैन्यामागील शक्ती)
लेखिका: स्वप्नील पांडे
मराठी अनुवाद – सुनेत्रा जोग
पृष्ठसंख्या – २२०
मूल्य - ३०० रु.
नोंदणीसाठी संपर्क : *8999192654*

*आपले सैनिक धारातीर्थी पडल्यानंतरही प्रदीर्घ काळापर्यंत कुणाला युद्धाचे परिणाम भोगत रहावे लागतात ?*

सीमेवर लढणाऱ्या शूरवीरांच्या अनेक कथा आपण वाचल्या-ऐकल्या आहेत, पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या महिलांबद्दल आपल्याला किती माहिती आहे?

शक्तींमागील शक्ती’ हे पुस्तक म्हणजे चिरंतन प्रेम, धैर्य आणि त्यागाने भरलेल्या सात सत्यकथांचा संग्रह आहे. सैनिक पत्नी स्वप्नील पांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक भंगलेली स्वप्ने, हरवलेल्या आशा आणि विस्कटलेल्या कुटुंबांच्या अकल्पनीय शौर्याच्या कथा आपल्यासमोर आणते. शत्रूच्या गोळ्यांनी आणि बॉम्बच्या वर्षावांनी आपल्या सैनिकांच्या शरीराला छिन्नविछिन्न केलं असेलही पण लष्करी म्हणावा असा कुठला गणवेश नसूनही आपले जीवन देशासाठी समर्पित करणाऱ्या या शूर महिलांच्या हृदयात हे सैनिक अमर आहेत.

● *यातील प्रत्येक कथा तुम्हाला आणखी शेकडो अलिखित कहाण्यांची आठवण करून देतील*. - लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, माजी जीओसी 15 कॉर्प्स

● *हे पुस्तक हृदयद्रावक आणि प्रेरणादायी असा प्रवास ज्वलंतपणे आपल्यासमोर आणते.*- विंग कमांडर अफराज (निवृत्त), संस्थापक ऑनरपॉइंट
_________________________________

दोन्हीही पुस्तकाची किंमत प्रत्येकी ३०० रुपये आहे. एकत्रित खरेदी केल्यास

सवलत मुल्य: ५०० रू.
टपाल खर्च: ५० रू.
एकुण मुल्य: ५५० रू. घरपोच

आजच पैसे भरून आपली प्रत राखीव करून ठेवा

*नोंदणीसाठी संपर्क :8999192654*
*भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे*

14/07/2024

"भारतीय वीर पत्नींच्या कथा सैन्यामागील शक्ती" आणि "द हिरो ऑफ टायगर हिल एका परमवीराचे आत्मकथन"
या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी नक्की उपस्थित रहा.
दि. २० जुलै २०२४ शनिवार, संध्याकाळी ६.०० वाजता.

🚩🚩 *साहित्यप्रेमी पुणेकरांसाठी भव्य लेखनस्पर्धा* 🚩🚩*"राष्ट्रीय पुस्तक मेळा"* या कोथरुड येथे होणाऱ्या भव्य ग्रंथप्रदर्शना...
26/05/2024

🚩🚩 *साहित्यप्रेमी पुणेकरांसाठी भव्य लेखनस्पर्धा* 🚩🚩

*"राष्ट्रीय पुस्तक मेळा"* या कोथरुड येथे होणाऱ्या भव्य ग्रंथप्रदर्शना निमित्ताने, साहित्यप्रेमी पुणेकरांसाठी लेखनस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

🔸——— 🔸——— 🔸——— 🔸

- विषय: माझे वाचनप्रेम, मला आवडलेले पुस्तक
- वयोगट: १६ ते ३० आणि ३१ ते ४५
* शब्दमर्यादा: ४०० ते १०००
- भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
- लेख पोस्ट करण्याची मुदत: ३० मे ते ४ जून २०२४

🔸——— 🔸——— 🔸——— 🔸

- प्रत्येक सहभागी स्पर्धकास डिजिटल प्रमाणपत्र
- विजेत्यांना भावीसा फौंडेशन तर्फे १००० रुपयांचे voucher.

🔸——— 🔸——— 🔸——— 🔸

सहभागासाठी सूचना:
- आपला लेख "राष्ट्रीय पुस्तक मेळा" च्या पोस्टर सहित आपल्या फेसबुक अकाउंट वर पोस्ट करावा
- ⁠पोस्टर मिळवण्यासाठी युवामर्श च्या +91 9209442255 या नंबर वर WhatsApp द्वारे संपर्क करावा.
- ⁠पोस्ट ३० मे ते ४ जून दरम्यान करावी
- ⁠पोस्ट ची लिंक युवामर्श च्या +91 9209442255 या नंबर वर WhatsApp करावी.
- फेसबुकला @युवामर्श - Yuvamarsh, पुणेआणि इंस्टाग्रामला या पेजला टॅग व कोलॅब करा.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
युवामर्श 9209442255

सर्वांना अगत्याचे आमंत्रण..
12/05/2024

सर्वांना अगत्याचे आमंत्रण..

आपण मतदान केलेले शाई लावलेले बोट दाखवा आणि भाविसा ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवर 20 % सवलत मिळवा. 13 ते 15 मे पर्यंत......
12/05/2024

आपण मतदान केलेले शाई लावलेले बोट दाखवा आणि भाविसा ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवर 20 % सवलत मिळवा. 13 ते 15 मे पर्यंत...

सर्वांना अगत्याचे निमंत्रण...   #अखंडभारत
19/04/2024

सर्वांना अगत्याचे निमंत्रण...
#अखंडभारत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवनावर आधारित सहा पुस्तकांचा संच सवलतीत उपलब्ध. संपर्क - bhavisa.com  ...
19/02/2024

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवनावर आधारित सहा पुस्तकांचा संच सवलतीत उपलब्ध. संपर्क - bhavisa.com [email protected]
#शिवजयंती

*🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी) 🚩 निमित्त शिवरायांच्या खालील पुस्तकांवर २०% सवलत....*१. जर छत्रपती शिवाजी...
19/02/2024

*🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी) 🚩 निमित्त शिवरायांच्या खालील पुस्तकांवर २०% सवलत....*

१. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर ५० रू.
२. शिवरायांचे दुर्गविज्ञान ८०रू.
३. शिवराज्याभिषेक १०० रू.
४. छत्रपती शिवाजी महाराज १२०रू.
५. प्रतिपश्चंद्रलेखेव १५० रू.
६. शिवछत्रपतींचे आरमार २५० रू.
७. थोरले राजे सांगून गेले २६० रू.
८. शिवभूषण ४०० रू.
९. शिवराज भूषण ४५० रू.
१०. राजा शिवछत्रपती १५०० रू.
११. शककर्ते शिवराय १८०० रू.
१२. Shivaji and His Time २५०० रू.
(📮 टपाल खर्च लागू)

📱 संपर्क =
भा.वि.सा. फाउंडेशन
8999192654

#शिवजयंती

*भारतीय विचार साधना प्रकाशित*,  *क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर* ,  *लेखिका - डॉ श्यामाताई घोणसे* ह्या पुस्तकाचे प्रकाशन द...
16/02/2024

*भारतीय विचार साधना प्रकाशित*,
*क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर* ,
*लेखिका - डॉ श्यामाताई घोणसे*
ह्या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर श्री विनोदजी तावडे, एन बी टी चे अध्यक्ष श्री मिलिंद मराठे, श्री राजेश पांडे , डॉ श्यामाताई आणि अन्य मान्यवर. पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध. संपर्क-
*भाविसा फाउंडेशन*
*8999192654*
Vinod Tawde
Rajesh Pande
*भारतीय विचार साधना* *[email protected]*

नक्की भेट द्या *स्टॉल क्र. 132, 133*भारतीय विचार साधना फाऊंडेशन @ *अंमळनेर साहित्य संमेलन* (2-4 फेब्रुवारी 2024)
02/02/2024

नक्की भेट द्या
*स्टॉल क्र. 132, 133*

भारतीय विचार साधना फाऊंडेशन @ *अंमळनेर साहित्य संमेलन* (2-4 फेब्रुवारी 2024)

🚩*जय श्री राम*🚩  आज श्रीरामांच्या आगमनानिमित्त *भारतीय विचार साधना फाऊंडेशन, पुणे* कडील श्रीरामांच्या जीवनावरील तसेच राम...
23/01/2024

🚩*जय श्री राम*🚩 आज श्रीरामांच्या आगमनानिमित्त *भारतीय विचार साधना फाऊंडेशन, पुणे* कडील श्रीरामांच्या जीवनावरील तसेच रामजन्मभूमी संघर्षावरील पुस्तके आज विशेष सवलतीच्या दरात घरपोच मिळवा. १.ऐतिहासिक राम ४५०/- [पुराव्यासह लिहिलेले रामायण] २.रामाच्या पद चिन्हावरुण पुष्पक विमानाने पंख पसरले ३५०/- [प्रभू रामचंद्रांनी सीतेसह लंका ते अयोध्या केलेल्या प्रवासाचे वर्णन] ३. भावार्थ रामरक्षा २६५/- [रामरक्षा चा संपूर्ण भावार्थ] ४.रामजन्मभूमी ३००/- [रामजन्मभूमी संघर्ष] ५.श्रीराम मंदिर ते राष्ट्रमंदिर ५०/- [थोडक्यात रामजन्मभूमी इतिहास] ६.अयोध्या ६५०/- [रामजन्मभूमी इतिहास] एकूण संच किंमत २०६५ रुपये *एकत्रित खरेदी केल्यास १६५० रुपयांमध्ये घरपोच* *संपर्क: 8999192654*

21/01/2024

मैं आज नतमस्तक हूॅं ,
उन बलिदानियों के
चरण कमल पर |

मैं आज लिन होता हूॅं,
साधु, संत और संन्यासियोंके
वैराग्य पर |

मैं आज पुनित पावन हूॅं,
सनातनी चेतना जगाने वाले
रामकाज पर |

मैं आज अर्पित हूॅं,
भारतीय स्व आधारित
मानसिक चेतना पर |

मैं आज शरण हूॅं,
नियती के
विधी विधान पर |

हम सबके राम आये है |
दिलमें उमंग लाये है |

भारत माता की जय 🚩

श्री. विवेक (आप्पा) जोशी
८००७६०११२४

केवल २२जनवरी नहीं, ये ५०० वर्षोकी प्रतीक्षा है। #अयोध्या_धाम  #श्रीराम
21/01/2024

केवल २२जनवरी नहीं, ये ५०० वर्षोकी प्रतीक्षा है।

#अयोध्या_धाम
#श्रीराम


Address

Perugate Bhave High School, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

02024487225

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन:

Videos

Share

Category

Nearby media companies