Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी

  • Home
  • India
  • Pune
  • Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी

Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी ‘ती’, ‘ते’ आणि ‘तो’
यांचा स्वतःशी आणि परस्परांशी
नव्यानं संवाद होण्यासाठी...
मासिक नव्हे चळवळ!

समाजाच्या मुख्य प्रवाहात स्त्री उद्गाराला पुरेसे स्थान नाही, तिच्यावर कुटुंबात आणि समाजात होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी या हेतूने महाराष्ट्रातील स्त्री चळवळीत अग्रेसर असणार्‍या पत्रकार आणि कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक १९८९ साली सुरू केले.

नावातून सहकार, बांधिलकी आणि मैत्रभाव ध्वनित होणारे ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक सामाजिक आहे, तसेच साहित्यिकही. विविध सामाजिक प्

रश्नांचे विश्लेषण करणार्‍या लेखनाबरोबरच कथा, कविता, ललित लेख आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जीवनाचा अर्थ शोधताना आलेल्या आणि घेतलेल्या अनुभवांची आत्मकथने – हे सगळं वाचकांपर्यंत पोचवणारा एक जिवंत झरा म्हणजेच ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक होय!

मागील बत्तीस वर्षांच्या वाटचालीत 'मिळून सार्‍याजणी'ने मराठी वैचारिक-सांस्कृतिक विश्वात आणि सामाजिक चळवळींच्या अवकाशात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अनेक जणांना लिहिते आणि बोलते केले आहे. 'मिळून सार्‍याजणी' म्हणजे मासिकाच्या रूपाने सुरु असलेली एक वैचारिक-सामाजिक चळवळच आहे. आजच्या तंत्रज्ञानयुगात तरुण आणि नवनवीन समाजमाध्यमे या दोघांशी जोडून घेत, बहुविध उपक्रमांच्या माध्यमातून मासिकाची कालसुसंगत वाटचाल करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे.

‘ती’, ‘ते’ आणि ‘तो’
यांचा स्वतःशी आणि परस्परांशी
नव्यानं संवाद होण्यासाठी...
मासिक नव्हे चळवळ!
.अशी टॅगलाईन असलेले ‘मिळून सार्‍याजणी’ फक्त छापिल मासिक एवढेच मर्यादित नाही तर आता ‘मिळून सार्‍याजणी’ समाज-माध्यमांवर देखील बहुविध प्रकारे संवाद साधत आहे.. मिसा ऑनलाईन, मिसा फेसबुक पेज, मिसा इंस्टाग्राम, मिसा यूट्यूब चॅनेल, मिसा ट्विटर!


| मिळून सार्‍याजणी | मराठी मासिक | आरंभ - ऑगस्ट १९८९ |
| संस्थापक संपादक - स्मृतिशेष विद्या बाळ |
| संपादक - गीताली वि. मं. |


अधिक माहितीसाठी विद्याताई व गीतालीताई यांच्या ब्लॉगलाही नक्की भेट द्या

https://vidyabal.wordpress.com/

https://geetalivm.wordpress.com/

Address

101, Nachiket, 33/25, Fourth Lane, Prabhat Road
Pune
411004

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 12am - 5pm
Wednesday 12am - 5pm
Thursday 12am - 5pm
Friday 12am - 5pm

Telephone

+917447449664

Alerts

Be the first to know and let us send you an email when Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी:

Share

Category

Our Story

मिळून सार्‍याजणी हे मासिक वयाचा एक महत्वाचा टप्पा गाठत आहे. १९८९ मधे सुरु झालेलं हे मासिक 30 वर्षंं पूर्ण करत आहे. म्हणूनच तारुण्याचा बहर आणि जबाबदारीचं भान पेलत नव्या जोमानं पावलं टाकण्याचं बळ समर्थपणे पेलण्यासाठी 'सार्‍याजणी' तयारीत आहे. स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करून देणारं हे मासिक स्त्रियांपासून सुरुवात करून, पुरुषांसह सार्‍यांच्याच मिटलेल्या ओठांआड दडलेलं मन खोलू बघत आहे.

या महत्वाच्या टप्प्यावर 'मिळून सार्‍याजणी' चं फेसबुक पेजही 5 वर्षांचं होतंय. त्यासोबतच नव्याने ब्लॉग, Whats App groups जन्माला आले आहेत. नव्या तंत्रज्ञानानं सार्‍यांनाच बोलकं करण्याचं काम करता यावं यासाठी आपण हे वापरत आहोत. तेंव्हा, खूप बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचं स्वागत आहे! अधिक माहितीसाठी विद्या ताई व गीताली ताई यांच्या ब्लॉग ला नक्की भेट द्या https://vidyabal.wordpress.com/ https://geetalivm.wordpress.com/

https://miloonsaryajani.wordpress.com

Nearby media companies


Other Magazines in Pune

Show All