Gyan Varta

Gyan Varta Hi friends i am here to fulfill curiosity about all things

01/04/2024
19/03/2024

https://whatsapp.com/channel/0029VaOydWz3wtbBFwkehd2V

#हस्तमैथुन_बायकाही_करतात, #हो_मग?
लेखन : अनघा पाठक

बरं... बाईनं हस्तमैथुन केलं, मग एवढं काय आकाश कोसळलं? स्वतःची लैंगिक इच्छा स्वतःच शमवायची उर्मी अतिशय नैसर्गिक आहे. माणसं, माकडं हस्तमैथुन करतात. कुत्रे आणि ब्लू व्हेलही स्वमैथुन करतात.

जर आपण पुरुषांच्या हस्तमैथुनबद्दल बोलत असतो, तर हा प्रश्न कदाचित पडलाच नसता. ती अगदीच सामान्य गोष्ट आहे इथपासून ते यामुळेच स्त्रियांवरचे लैंगिक अत्याचार कमी व्हायला मदत होते अशा काही निष्कर्षांची चर्चाही झाली असती. मग आजच एवढा गदारोळ का? ही चर्चा करण्याचं कारण म्हणचे 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात स्वरा भास्करचं पात्र व्हायब्रेटरच्या साहाय्याने हस्तमैथुन करताना दाखवलं आहे. याच सीनमुळे ट्विटरवर वादळ उठलं आहे. साहजिक आहे, स्वरा भास्करने जो रोल केला आहे, त्या बाईचं लग्न झालं आहे. ती नवऱ्याला गृहीत न धरता आणि न विचारता आपल्या लैंगिक इच्छा स्वत:च पूर्ण करत आहे. सेक्स म्हणजे बाईचं समर्पण, तिने द्यायचं आणि पुरुषांने घ्यायचं, अशा कल्पनांना ती बळी पडत नाही. ती तिच्या नवऱ्याकडून खूश नाही आणि तिने तिचा मार्ग शोधला आहे. पण यासाठी स्वरा भास्कर सोशल मीडियावर जाम ट्रोल होते आहे. फिरकी या अकाऊंटवरून एकाने ट्वीट केलं, "मी माझ्या आजीसोबत हा पिक्चर पाहायला गेलो. जेव्हा तो हस्तमैथुनाचा सीन आला तेव्हा आम्हाला खूपच लाज वाटली." आरती अग्रवाल लिहितात की, "स्वरा भास्करने तिच्या चित्रपटात जे काही केलं, ते सॉफ्ट पॉर्नपेक्षा काही वेगळं नाही. आणि याला भारतात बॅन केलं नाही." मी आजीला घेऊन या पिक्चर पाहायला गेलो होतो, अशा आशयाचं ट्वीट अनेकांनी केलं. अशा लोकांना टोमणा मारण्याचा मोह जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही आवरला नाही. त्यांनी लिहिलं, "एवढे सगळे जणं आपआपल्या आज्यांना घेऊन पिक्चरला चाललेत हे फारच गोड आहे. माझीही आजी आत्ता असती तर किती मजा आली असती."

अर्थात स्वरा भास्करला पाठिंबा देणारेही कमी नाहीयेत. महिला सक्षमीकरणाचा खरा संदेश देण्यात हा चित्रपट कमी पडला, अशी टीका या चित्रपटावर झाली होती. त्यावर सोनिया मरियम थॉमस यांनी ट्वीट केलं की, "ज्यांना कोणाला वाटतं असेल की 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा अजून वैचारिक, योग्य संदेश देणारा असावा, त्यांनी हे लक्षात ठेवावं की प्रत्येक स्त्री-केंद्री चित्रपटाने काही संदेश दिलाच पाहिजे असं नाही. बायका फक्त मजा करतात हे तुम्हाला का सहन होत नाही?" पण होतंय काय, की सगळं लक्ष तो सिनेमा, आणि त्या सिनेमातल्या अभिनेत्री, त्यांनी केलेल्या भूमिका यावर केंद्रित होत आहे. पण ज्या बायका आपल्या लैंगिक समाधानासाठी झगडतात, कदाचित संपूर्ण समाधानी नसतात, हस्तमैथुनाबद्दल बोलायला घाबरतात आणि केलंच कधी तर प्रचंड गिल्ट घेऊन जगतात त्यांचं काय?

मुळात बायका हस्तमैथुन करतात का? अर्थातच हो! पण त्यांचा हा प्रवास पुरुषांइतका सोपा नसतो. कोणत्याही पुरुषाला विचारा तू शेवटचं हस्तमैथुन कधी केलं होतं, त्याचं उत्तर असेल, आज सकाळी, काल, परवा, एका आठवडयापूर्वी, जास्तीत जास्त महिन्यापूर्वी.
बाईला हाच प्रश्न विचार तर? तुम्हाला उत्तर मिळणारच नाही. कारण आपल्या लैंगिक इच्छा आकांक्षांविषयी एखादी स्त्री आपल्या नवऱ्याशीही खुलेपणाने बोलू शकत नसेल तर या विषयावर चारचौघात काय बोलणार. पण आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की, हस्तमैथुन करणाऱ्या बायकांची संख्या कमी नाही.

"जगभरात जवळपास 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात," हैद्राबाद येथील सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शर्मिला मुजूमदार सांगतात. अर्थात भारतात अशी आकडेवारी उपलब्ध होणं कठीण आहे कारण भारतीय स्त्रियांना आपण हस्तमैथुन करतो हे सांगण्यात संकोच किंवा अपराधी वाटतं. महिलांनी हस्तमैथुन करण्याचे फायदेही त्या विषद करतात. "हस्तमैथुनामुळे वाईट काही होत नाही. उलट शरीरात मुड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला लैंगिक आजार होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे यात गरोदरपणाचा धोका नसतो."

आणखीही फायदे आहेत. स्लीप मेडिसीन या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार हस्तमैथुनामुळे restless leg syndrome (मज्जासंस्थेचा एक आजार ज्यामुळे सतत पाय हलवण्याची इच्छा होते आणि बैचेन व्हायला होतं) बरा होण्यासही मदत होते. "सतत तणावाखाली वावरणाऱ्या भारतीय महिलांना हस्तमैथुनामुळे हलकं वाटू शकतं," त्या पुढे सांगतात.

◆स्त्रिया हस्तमैथुन का करतात?
शर्मिलांच्या मते हस्तमैथुन हा आनंददायी अनुभव आहे. "माझ्या शरीरावर आणि लैंगिक आनंदावर माझं नियंत्रण आहे आणि दुसरं कोणी माझ्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही ही भावना हस्तमैथुनामुळे मिळते. ही भावना हवीहवीशी वाटते," असं त्या सांगतात. "आपल्याला काय हवंय, कशात आनंद मिळतो, सुखाचा उच्चतम बिंदू काय केलं की गाठता येतो, अशा सगळ्या गोष्टी बाईला हळूहळू कळू लागतात. हा तिच्यासाठी मुक्त करणारा अनुभव असतो," त्या सांगतात.

◆स्त्रियांच्या हस्तमैथुनावरून एवढा गहजब का?
"स्त्रियांनाही लैंगिक इच्छा-आकांक्षा असतात हे आपल्या समाजात मान्यच नाही," लेखिका आणि एका पब्लिकेशन हाऊसमध्ये संपादक असलेल्या योजना यादव सांगतात.
"याच्या इतकं दुर्दैव नाही दुसरं काही. आपण 21व्या शतकात आहोत आणि याबद्दलचा अवेअरनेस आपल्याकडे नाही आहे. बाई आपल्या इच्छा स्वतःच पूर्ण करू शकते हे पचनी पडत नाही," असं त्या सांगतात. "बाईला सेक्सविषयी काही माहीत असावं, त्याविषयी तिने स्वतः काही प्रयोग करावे, नवऱ्याकडे किंवा प्रियकराकडे आपल्याला हव्या तशा सुखाची मागणी करावी हे चालतच नाही आपल्या लोकांना. आणि त्यातूनही एखादीने असा प्रयत्न केला तर ते तिच्या नैतिकतेशी जोडलं जातं," असं त्यांचं मत आहे.
"हिला हे सगळं माहीत आहे म्हणजे ही काहीतरी भयंकर आहे असाच शिक्का मारतात लोक. तिने ते सगळं येता-जाता अनुभवलय, आणि she is a bad girl असं सर्रास ठरवून मोकळे होतात लोक," असं त्या सांगतात. "मला विचाराल तर स्त्रियांमध्ये हस्तमैथुन अगदी कॉमन आहे. माझ्या मैत्रिणी असतील किंवा माझ्या नात्यातला बायका, सगळ्यांनी मला सांगितलं आहे की त्यांनी हस्तमैथुन कधी ना कधी ट्राय केलं आहे. पण त्याकडे बघायची समाजाची दृष्टी स्वच्छ नसल्याने त्यांना प्रचंड अपराधी वाटतं. मला समजत नाही यात अपराधी वाटण्यासारखं काय आहे? तुमचं डोकं दुखायला लागलं की तुम्ही डोकं चेपता ना? तितकंच हे नैसर्गिक आहे हे. तुम्हाला होणाऱ्या सेन्सेशन्स त्या त्या वेळी पूर्ण करणं या गैर काहीच नाही," असं त्या म्हणाल्या. पण समाजाने मात्र या नैसर्गिक गोष्टीचा अधिकार स्त्रियांना नाकारला आहे. आपल्या भाषेत हस्तमैथुनाच्या क्रियेला स्त्रियांच्या अनुषगांने शब्दच नाहीत. जे आहेत ते पुरुषांनी क्रिया करण्यावर आहेत. "म्हणजे आपल्या एक कन्सेप्ट म्हणूनही स्त्रियांचं हस्तमैथुन मान्य नाही," असं त्या सांगतात.

शर्मिला असो वा योजना, दोघींनाही यावर एकच उपाय दिसतो. "स्त्रियांच्या मनातला अपराधीभाव आणि संकोच घालवण्यासाठी यावर खुलेपणाने चर्चा करणे. जेव्हा स्त्रिया यावर खुलेपणाने बोलून आपले अनुभव मांडायला लागतील, तेव्हाच समाजातून या गोष्टीला होणारा विरोध कमी कमी होत जाईल.
साभार......( अनघा पाठक, बीबीसी मराठी)
------------------------------------------

19/03/2024

डोकेदुखी
डोके दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. बहुतेक वेळा मर्यादित काळापुरतीची डोकेदुखी गंभीर नसते. अशा गंभीर नसणाऱ्या प्रकारापैकी स्नायूत तणाव निर्माण झाल्याने जाणवणारी डोकेदुखी हा प्रकार प्रत्येक माणसाने केव्हा ना केव्हातरी अनुभवलेला असतो. याला ‘टेंशन हेडएक’ म्हणतात. कपाळ, कानावरचा कवटीचा भाग, मानेच्या वर या भागात एखादा पट्टा आवळला जावा अशा प्रकारचे दुखणे असते.

*सामान्य डोकेदुखी ची कारणे.-*

* पोटसाफ नाही ,अपचन,पित्ताचा त्रास.
* पोटात भुक असणे.
* झोप पूर्ण न झाल्यामुळे ही डोकेदुखी होऊ शकते.
* ग्लुकोजचे प्रमाण कमी होणे
* दातांच्या दुखण्याने देखील डोकेदुखी होऊ शकते. दातांचे किडणे, अक्कलदाढ या समस्या ही असू शकतात.
* तणाव, थकवा येणे ही सुध्दा तणावाची कारणे असू शकतात.
* चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे डोकेदुखी होते.
ज्यांना डोळ्यांचा चष्मा लागलेला नसेल व डोकेदुखीचा त्रास होत असेल त्यांनी अवश्य नेत्ररोगतज्ज्ञाकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
* कधी कधी काही औषधे देखिल डोकेदुखीला कारण ठरू शकतात. उदा. हृदयरोगावरील व उच्च रक्तदाबासाठी घेतली जाणारी औषधे.
* मायग्रेन नावाची डोकेदुखी अनुवंशिक असते. यात डोक्याचा अर्धाच भाग दुखतो. याचे कारण कोणत्याही खाण्याच्या पदार्थाची एलर्जी हे असू शकते.
* सर्दीचा कायमस्वरूपी त्रास असणे, ऋतूत झालेला बदल, अधिक धुम्रपान इ. कारणांनीही डोकेदुखीची तक्रार असू शकते.
* पूर्ण दिवस एका बंद रूममध्ये राहिल्याने शरीराला शुध्द हवा मिळू शकत नाही. यामुळेदेखिल डोकेदुखी होऊ शकते.
* आज संगणक युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण तासंतास संगणकासमोर बसून असतात. यामुळेही डोकेदुखी होते. जास्त वेळ टिव्ही पाहणे डोकेदुखीस कारण ठरू शकते.

*गंभीर आजारातील डोकेदुखी-*

* रक्तवाहिन्यांचे दोष – गुठळया, रक्तस्राव, इ.
* मेंदूचे जंतुदोष – उदा मेंदूज्वर, मेंदूआवरण दाह, मेंदू-हिवताप, *कर्करोग – मेंदूतल्या गाठी
* इजा – मार
* डोळा-कान, दात, मान, इ. अवयवांशी संबंधित डोकेदुखी
* इतर संस्थांचे आजार उदा. फ्लू, डेंगू, अतिरक्तदाब, काचबिंदू, सायनसदुखी.
* मेंदूच्या चेतांशी निगडित डोकेदुखी, मानदुखी
मात्र या आजारामुळे डोकेदुखी असल्यास डाँक्टर ना भेटा आजार अंगावर काढू नका.

*इंस्टंट रिलिफ साठी उपाययोजना.-*

* सुंठ व दालचिनी ,जायफळ पेस्ट करा ती भुवया सोडून लावा.
* पित्ताने डोके दुखत असल्यास गार दूध प्यावे.
* आलेयुक्त चहा घ्या.
* लवंगा भाजून वास घेत जा.
* लिंबू पाणी घ्या
* बर्फाचा शेक घ्या.
* पुदिन्याचे रसात आँलीव्ह आँईल एकत्रीत करुन लावा .
* चमचाभर आलेरस प्या,आल्याची पेस्ट लावा.
* पाण्यात तुळशीची 10-15 पानं घालून ते उकळून घ्या. जास्त उकळल्यानंतर उरलेल्या निम्मं पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि प्या.
* ओवा खा तो गरम करा पुरचुंडी मध्ये बाधून व शेका.
* चमचा भर तेल,चिमूटभर लवंग पावडर,सैधव यांची पेस्ट लावा.
* लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.
* सफरचंदावर मीठ लावून खा.
* जेष्ठमध, बडीशेप: दहा- दहा ग्रॅम पिंपळ, सुंठ जेष्ठमध आणि बडीशेप बारीक करा. यामध्ये एक चमचा पाणी मिसळून डोक्यावर लावल्याने आराम मिळतो.
* काकडी कापून वास घेतल्याने आणि त्याच्या रसाने मालिश केल्यास तात्काळ आराम पडतो.
* दूधी भोपळ्याची पेस्ट करून लावा.

12/03/2024

या रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा सर्वाधिक धोका असतो, वेळीच व्हा सावध.....
एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पक्षाघाताचा झटका आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. स्ट्रोकसाठी जीवनशैली जबाबदार धरली जाते. पण इथे आम्ही तुम्हाला काही वेगळी माहिती देणार आहोत जी तुमच्या रक्तगटाशी संबंधित आहे.
साधारणपणे ए, बी, एबी आणि ओ असे चार प्रकारचे रक्तगट असतात. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ६० वर्ष वय होण्यापूर्वी कोणत्या रक्तगटाच्या लोकांना पक्षाघाताचा धोका जास्त असतो. एका संशोधनानुसार, रक्तगट ए असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो.
ब्लड ग्रुपची रासायनिक रचना स्ट्रोकशी संबंधित आहे. यामध्ये विविध प्रकारची रसायने असतात जे तुमच्या RBC वर म्हणजे लाल रक्तपेशी वर तरंगतात. ए गटानंतर, बी आणि एबी रक्तगट असलेले लोक पक्षाघाताचे बळी ठरतात. जरी O गटातील लोकांसाठी धोका कमी आहे. स्ट्रोक आणि रक्तगट यांचा थेट संबंध आहे.
*’ए’ रक्तगटाला धोका जास्त असतो...*
2022 मध्ये जीनोमिक्सवर काम करणाऱ्या संशोधकांनी एक अहवाल दिला. त्या अहवालात ए रक्तगट आणि स्ट्रोक यांच्यातील संबंध सूचित करण्यात आला. सुमारे 48 अनुवांशिक अभ्यासांमध्ये 17 हजारांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला.
18 ते 59 वयोगटातील लोकांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. इतर रक्तगटांच्या तुलनेत ए रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका 16 टक्के जास्त असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. O रक्तगट असलेल्या लोकांना पक्षाघाताचा धोका 12 टक्के कमी होता.
*हिवाळा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध आहे? जाणून घ्या, ‘O’ गटाला कमीत कमी धोका असतो...*
मेरीलँड विद्यापीठातील संवहनी न्यूरोलॉजिस्ट स्टीव्हन किटनर म्हणतात की ए गटातील लोक स्ट्रोकचे सर्वाधिक बळी का आहेत याविषयी अधिक ठोस अभ्यासाची गरज आहे. असे म्हणता येईल की A रक्तगट असलेल्या लोकांमध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता जास्त असते. जर आपण अमेरिकेबद्दल बोललो तर दरवर्षी सुमारे आठ लाख लोक पक्षाघाताचे बळी ठरतात.
त्यापैकी बहुतेकांचे वय ५५ ते ६५ वयोगटातील होते. अभ्यासाचा आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष ६० वर्ष वय होण्यापूर्वी स्ट्रोक झालेल्या लोकांची आणि वयाच्या ६० नंतर स्ट्रोक झालेल्या लोकांची तुलना करताना आढळून आला. यासाठी संशोधकांनी ६० वर्षांवरील सुमारे ९ हजार लोकांचा अभ्यास केला ज्यांना पक्षाघाताचा झटका आला होता.

07/03/2024

हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |*

*कान साफ करण्यासाठी इअर बड वापरावा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.....*

सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याच कानात धूळ, हवा, पाणी आणि मातीमुळे कानात घाण जमा होत असते. ती घाण नैसर्गिकरीत्या साफ होत असते. जर ती घाण साफ झाली नाही किंवा त्यामुळे कान दुखू लागला; तसेच ऐकण्यास कमी येऊ लागले, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. काही जण कानातील मळ काढण्यासाठी माचीसची काडी, कान कोरणे आणि इअर बडचा वापर करीत असतात. यामुळे कानातील मळ आत ढकलला जातो. काहींना कानात इजा होऊन त्या ठिकाणी जखम होते. त्यामुळे कान, नाक आणि घशाचे डॉक्टर कधी अशा पद्धतीने इअर बड वापरू नये, असे रुग्णांना सांगत असतात.

इअर बड किंवा तत्सम गोष्टी कान साफ करण्यासाठी वापरल्यामुळे इजा झाल्याच्या अनेक घटना घडतात. असे अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे इअर बड किंवा त्यासारख्या कोणत्याच गोष्टी कान साफ करण्यासाठी वापर करू नये, असा सल्ला देतो. – डॉ. शशिकांत म्हशाळ, प्राध्यापक, कान-नाक-घसा विभाग, कूपर रुग्णालय

*कान साफ कसा करावा...?*
नैसर्गिकरीत्या कान साफ होत असतात. तसेच जर काही घाण कानाबाहेर येत असेल तर बोटाने सहज ती अंघोळीच्या वेळी काढावी. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा वापर करू नये. काही अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवावे. ते शास्त्रीय पद्धतीने कान साफ करून देऊन शकतील.

*मळ जातो आत...*
वैद्यकीय तज्ज्ञ इअर बडचा वापर करू नये, असे कायम सांगत असतात. कारण यामुळे फायदे होण्याचे तोटे अधिक आहेत. कारण ज्यावेळी इअर बड कानातील मळ साफ करण्यासाठी कानात टाकता त्यावेळी तो मळ बाहेर येण्याऐवजी आतमध्ये ढकलला जातो. तसेच त्यावेळी कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

*विविध आवाज येणे...*
*१) सातत्याने कानावर जोरदार आवाज सातत्याने पडल्यामुळे कमी ऐकू येण्याच्या तक्रारी जाणवतात.

*२) तसेच त्यामुळे काहीवेळ कानात सतत कुणीतरी गुणगुणत असल्याचा आवाज येतो. यावेळी डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार करणे गरजेचे असते.

*डॉक्टरांना कधी भेटावे...?*
*१) कानाला खाज येणे...* काही कारणांमुळे कानाला खाज येते, त्यावेळी अनेकजण बोट टाकून खाजवायचा प्रयत्न करतात; मात्र अशावेळी बोटाच्या नखांमुळेसुद्धा इजा होण्याची शक्यता असते. खाज थांबत नसेल तर डॉक्टरांना दाखवावे.

*२) कान दुखण

स्वामी जगाची माऊलीस्वामी कृपेची सावलीअशी निरंतर मायाआम्ही कुठे न पहिलीआनंदाचे दान देईसंकटात धाव घेईसारी सुमने श्वासांचीस...
10/02/2024

स्वामी जगाची माऊलीस्वामी कृपेची सावली
अशी निरंतर मायाआम्ही कुठे न पहिली
आनंदाचे दान देईसंकटात धाव घेई
सारी सुमने श्वासांचीस्वामी चरणी वाहिली

05/02/2024

कावीळ झाल्यावर सपोर्टीव ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत*
कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत.
हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न वरचेवर खाल्ल्यामुळे होतो. या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवी पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव मिक्स होऊन अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात.
यामध्ये लिवर सुजणे आणि भूक कमी लागणे या समस्या होतात.
कावीळ म्हणजे ज्याला हिंदी मध्ये पिलिया म्हणतात हा आजार लीवर (यकृत) च्या संबंधातील आजार आहे. कावीळ एक साधारण आजार वाटतो पण जर याचे वेळीस उपचार केले गेले नाही तर हे भयंकर रूप धारण करू शकते यामध्ये रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या जीवघेण्या आजारासाठी घरगुती उपाय सांगत आहोत. जे तुमच्या काविळीला बरी करण्यास उत्तमा ठरेल. हा उपचार कावीळ मग तो हेपेटाइटिस A, B, किंवा C किंवा मंग बिलरुबिन, ESR वाढलेले असेल तरीही फायदेशीर राहील.
काविळी पासून सुटका मिळवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय
*शहाळे (हिरवे नारळ) :*
रोज दिवसातून कमीतकमी 2 शहाळेचे पाणी प्यावे, या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिवर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.
*कांदे :*
कावीळच्या इलाजामध्ये कांद्याला विशेष महत्व आहे. सर्वात पहिले एक कांदा सोलून त्याचे पातळ-पातळ तुकडे करून यामध्ये लिंबू पिळणे त्यानंतर यामध्ये थोडी काळीमिरी पावडर आणि काळे मीठ मिक्स करून दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे कावीळ लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते.
चण्याची डाळ :
रात्री झोपण्या अगोदर चण्याच्या डाळीला भिजत ठेवा. पहाटे उठून भिजलेल्या डाळीचे पाणी काढून त्यामध्ये थोडेसे गुळ मिक्स करा. हा उपाय दररोज एक ते दोन आठवडे केल्यामुळे कावीळ बरी होण्यास मदत होते.
*सुंठ :*
सुंठ चा वापर करून देखील कावीळचा उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यासाठी सुंठ 10 ग्राम, गुळ 10 ग्राम घ्यावा. ही सामग्री एकत्र करून सकाळी थंड पाण्यासोबत खाण्यामुळे कावीळी पासून सुटका होण्यास मदत होते.
*लसून :*
कावीळी मध्ये लसून देखील फायदेशीर आहे. यासाठी कमीतकमी 4 लसून कुड्या घ्याव्यात आणि त्यांना सोलून त्यांना बारीक वाटावे त्यामध्ये 200 ग्राम दुध टाकावे. आणि रुग्णाने रोज हे खाण्यामुळे कावीळ मुळा सकट संपून जाण्यास मदत होते.
चिंच :
चिंच रात्री झोपण्या अगोदर पाण्यात भिजत ठेवावी सकाळी चिंच व्यवस्थित पाण्यात पिळून काढावी आणि या पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि थोडे काळेमीठ मिक्स करून प्यावे. दोन आठवडे हे पिण्यामुळे कावीळ ठीक होण्यास मदत होते.
मध आणि आवळा रस :
एक चमचा मध घ्यावे त्यामध्ये 50 ग्राम ताज्या हिरव्या आवळ्याचा रस मिक्स करून दररोज सकाळी कमीतकमी तीन आठवडे खाण्यामुळे कावीळ पासून सुटका मिळण्यास मदत होते.
साभार....

28/01/2024

15/01/2024

*प्रेम की परिभाषा.
*एक बार एक पहुंचे हुये महात्मा एक धार्मिक पुस्तक पढ़ रहे थे । पुस्तक में एक जगह लिखा था, शैतान से घृणा करो, प्रेम नहीं। संत ने वह लाइन काट दी। कुछ दिन बाद उससे मिलने एक संत आए। वह उस पुस्तक को पढ़ने लगे। उन्होंने कटा हुआ वाक्य देख कर सोचा कि किसी नासमझ ने उसे काटा होगा। उसे धर्म का ज्ञान नहीं होगा। उन्होंने पहुंचे हुये महात्मा को वह पंक्ति दिखा कर कहा, जिसने यह पंक्ति काटी है वह जरूर नास्तिक होगा।*
*महात्मा ने कहा- इसे तो मैंने ही काटा है।*
*संत ने अधीरता से कहा - आप इतने महान महात्मा होकर यह कैसे कह सकते हो कि शैतान से घृणा मत करो। शैतान तो इंसान का दुश्मन होता है।*
*इस पर महात्मा ने कहा- पहले मैं भी यही सोचता था कि शैतान से घृणा करो, लेकिन उस समय मैं प्रेम को समझ नहीं पाया था,लेकिन जब से मैं प्रेम को समझने लगा , तब से बड़ी मुश्किल में पड़ गया हूं कि घृणा किससे करूं। मेरी नजर में घृणा लायक कोई नहीं है।*
*संत ने पूछा- “क्या आप यह कहना चाहते हो कि जो हमसे घृणा करते हैं, हम उनसे प्रेम करें।“*
*महात्मा बोले - प्रेम किया नहीं जाता। प्रेम तो मन के भीतर अपने आप अंकुरित होने वाली भावना है। प्रेम के अंकुरित होने पर मन के अंदर घृणा के लिए कोई जगह नहीं होगी। हम सबकी एक ही तकलीफ है। हम सोचते हैं कि हमसे कोई प्रेम नहीं करता। यह कोई नहीं सोचता कि प्रेम दूसरों से लेने की चीज नहीं,, देने की चीज है। हम प्रेम देते हैं। यदि शैतान से प्रेम करोगे तो वह भी प्रेम का हाथ बढ़ाएगा..*
*संत ने कहा- “अब समझा, महात्मा जी !*
*आपने उस पंक्ति को काट कर ठीक ही किया है। दरअसल हमारे ही मन के अंदर प्रेम करने का अहंकार भरा है।इसलिए हम प्रेम नहीं करते, प्रेम करने का नाटक करते हैं। यही कारण है कि संसार में नफरत और द्वेष फैलता नजर आता।“वास्तव में प्रेम की परिभाषा ईश्वर की परिभाषा से अलग नहीं है। दोनो ही देते हैं बदले में बिना कुछ लिये।*
*ईश्वर, माता-पिता, प्रकृति सभी बिना हमसे कुछ पाने की आशा किये हमें देते हैं और यह इंतजार करते रहते हैं कि हम कब उनसे और अधिक पाने के योग्य स्वयं को साबित करेंगे और वे हमें और अधिक दे सकेंगे।*
*प्रेम को जानना है तो पेडों और फूलों को देखिये तोडे और काटे जाने की शिकायत तक नहीं करते बस देने में लगे हैं..! आपका हर पल मंगलमय हो!*
*🚩🙏जय सियाराम,🙏🚩*

Hot and best deal
06/01/2024

Hot and best deal

Buy Clothing & Accessories online at lowest price in India on Amazon.in.

31/12/2023

Happy New Year

26/12/2023

मधुमेही लोकांनी कोणती योगासने करायला हवी आणि काय दक्षता घ्यायला हवी ते वाचा.....!*

साखर, रक्तदाब किंवा वजनवाढीचा प्रश्न सोडवायचा असेल तर निरोगी जीवनशैलीसाठी योगसाधनेला पर्याय नाही. व्यायामाने तन-मन हलके होते, तजेला मिळतो, उत्साह वाढतो आणि राग-रोग दूर होतात. मात्र आपण नेमका त्याचाच आळस करतो. परंतु डॉक्टर भोपकर सांगतात, व्यायाम प्रत्येकाने केलाच पाहिजे, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी ठराविक योगासने केली असता त्याचा त्यांना निश्चितच लाभ होतो.

*यासंदर्भात लोकांना सर्वसामान्यपणे पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत...*

*१ . मधुमेहासाठी मी दररोज योगासने करावीत का...?*
मधुमेह नियंत्रणात ठेवण्याच्या प्रवासात दररोज योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. मात्र त्यासाठी सगळी योगासने उपयोगाची नाही, काही ठराविक आसनेही योग्य परिणाम साधू शकतील. त्याबद्दल पुढे माहिती दिली आहे.

*२. गुडघेदुखीसह मी योगा करू शकतो का...?*
जर तुम्हाला गुडघेदुखी होत असेल तर गुडघ्यांवर दबाव आणणारी योगासने टाळा. त्यामुळे योगासने नीट जमणार नाही आणि ती चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे तसेच गुडघ्यावर दाब आल्याने गुडघेदुखीत भर पडेल.

*३. योगा करण्यासाठी प्रशिक्षकाची गरज आहे का...?*
योगासनांचा सराव असल्यास तुम्ही आपणहून योगप्रकार करू शकता, मात्र तुम्ही नवशिके असाल तर योगप्रशिक्षकांशिवाय योगसाधना करू नका. कारण योग हा केवळ हातापायांचा व इतर अवयवांचा ताळमेळ नाही तर श्वसनाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. ते योग्य प्रकारे झाले तरच योगसाधनेचा लाभ होतो.

मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणाऱ्या सोप्प्या योगासनांची यादी आणि त्यांचे महत्त्व. ही योगासने नियमितपणे केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना फार मदत होते. जास्त मेहनत न घेता करता येणारी ही आसने आहेत.

*१.कपालभाती प्राणायाम...*
कपालभाती प्राणायाम आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या मज्जातंतूंना ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे प्राणायाम महत्त्वाचे आहे कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. पचन संस्था सक्रिय होते. साखर नियंत्रणात राहते. या प्राणायामने मनाला शांती मिळते.

*२. सुप्त मत्स्येन्द्रसन...*
सुप्त मत्सेंद्रयासन अन्न पचन करण्यास मदत करते. हे आसन मधुमेह रूग्णांसाठी खूप चांगले आहे.

*३. धनुरासन...*
या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होण्

22/12/2023

थंडीत अंगदुखी, सांधे आखडल्याने हैराण? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, हाडांचं दुखणं वाढण्यापूर्वी जागे व्हा.....*
थंडीच्या दिवसांत आपल्याला सर्दी-खोकला, त्वचेचा कोरडेपणा या तक्रारी उद्भवतात. त्याचप्रमाणे अंगदुखी किंवा सांधेदुखीच्या तक्रारीही डोकं वर काढतात. गारठ्यामुळे सांधेदुखीमध्ये शरीरातील हाडे, स्नायू, सांधे सगळेच दिर्घकाळ ठणकत राहते. वात दोष किंवा हाडांशी संबंधित तक्रारी असणाऱ्यांना सांधेदुखीची समस्या जास्त त्रास देते. एकदा सांधेदुखी सुरु झाली की आपल्याला काहीच सुधरत नाही. पुरेशी झोप झाली, योग्य आहार घेतला, व्यायामही करत असू तरीही ही अंगदुखी हैराण करते. सकाळी उठल्यापासून अंगदुखी जाणवत असेल तर अस्वस्थता येते

रोजचे काम आणि दगदग यानेही अनेकदा हा थकवा किंवा अंगदुखी जाणवते.मग आपण एखादं तेल लावून हे दुखणं घालवण्याचा प्रयत्न करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधं आणतो, पण त्याचा तात्पुरताच उपयोग होतो. हा त्रास कायमचा बंद व्हावा यासाठी १ सोपा उपाय प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री सांगतात. घरात असलेल्या गोष्टींपासून एक काढा तयार करुन तो नियमित घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पाहूयात हा काढा कसा तयार करायचा आणि कसा घ्यायचा.
*उपाय काय...?*
धणे आणि सुंठ या २ गोष्टींपासून हा काढा तयार होतो. धणे कुटून त्याची बारीक पूड करायची, तसेच सुंठेचीही पूड करायची. बाजारात दोन्हीची रेडीमेड पूडही मिळते. एकदम बारीक पावडर न करता थोडी ओबडधोबड पावडर करायची. या दोन्ही पूड समान मात्रेत एकत्र करुन एका डब्यात भरुन ठेवायच्या. रात्री २ चमचे किंवा १० ग्रॅम मिश्रण घ्यायचे आणि पाण्यात भिजवायचे. सकाळी उठल्यावर हे मिश्रण उकळायचे आणि गाळून त्यात एक चमचा एरंडेल तेल घालून हा काढा प्यायचा. शरीरातील न पचलेले अन्न बाहेर टाकण्यासाठी आणि आमवात कमी करण्यासाठी एरंडेल अतिशय फायदेशीर ठरते. २ ते ४ आठवडे हा उपाय केल्यास अंगदुखी नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

03/12/2023

डाळींचा आहारात समावेश असावाच*
आज आपण पालेभाज्या तर कमीच खात आहोत आणि त्यात डाळी तर आहारात नाहीतच आणि आहारात घेत असेल तर फक्त पाणी-पाणी (डाळीवर दिलेले फोडणीच पाणी) खात आहोत, मात्र सॉस- जॅम तसेच बाजारात मिळणारे डबाबंद पदार्थ हे आपण चवीने खात आहोत आणि हे अत्यंत घातक आहे.
डाळी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या शरीराला जे घटक, प्रथिने पाहिजे असतात, ते आपल्याला डाळीतून मिळतात. मात्र, अनेक लोक डाळी खाणे टाळतात हे अतिशय चुकीचे आहे. आपण आहारात जास्तीत-जास्त डाळींचा समावेश केला पाहिजे. डाळी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासाठी प्रत्येकवेळी जेवनामध्ये दाळींचा समावेश केला पाहिजे.
-डाळ पचवणे खूप सोपे आहे. दररोज डाळ खाण्याने शरीर सक्रिय राहते. डाळींमुळे केवळ प्रथिनेंची कमतरताच नाही, तर ते लोहाची कमतरता देखील पूर्ण होते. अशा कित्येक घटक डाळींमध्येही आढळतात जे कर्करोग रोखण्यास उपयुक्त आहेत.
-डाळीमध्ये कमी प्रमाणात चरबी आहे. यासह, खनिजे, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर समृद्ध डाळी असतात, जे पचन करण्यास उपयुक्त आहेत. डाळ खाल्ल्यानंतर पोट बर्‍याच वेळासाठी भरलेले राहते, त्यामुळे भूक जाणवत नाही. यामुळे वजन देखील वाढत नाही.
-शाकाहारी आहारात डाळींना प्रोटीनचा राजा म्हणतात. एक कप डाळ खाल्ल्यास 18 ग्रॅम प्रथिने मिळतात. हे प्रोटीनचे एक उत्तम माध्यम आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात कोलेस्ट्रॉल आढळत नाही.
-डाळ पचवणे खूप सोपे आहे. दररोज डाळ खाण्याने शरीर सक्रिय राहते. डाळींमुळे केवळ प्रथिनेंची कमतरताच नाही, तर ते लोहाची कमतरता देखील पूर्ण होते. अशा कित्येक घटक डाळींमध्येही आढळतात जे कर्करोग रोखण्यास उपयुक्त आहेत.
-या डाळी सहज पचण्याजोग्या असतात. यामध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे आपले पचन सुधारते. हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करत नाही आणि कर्करोग रोखण्यासाठी देखील प्रभावी आहे.

03/12/2023

🧐 *ऑनलाईन फ्रॉड करून खाती रिकामी केल्यास काय करावे? तक्रार कुठे आणि कशी दाखल करावी जाणून घ्या..*
🥷🏻 भारतात दररोज सायबर गुन्हे घडत आहेत. काहींचे पैसे लुटले जात आहेत तर काहींना सोशल मीडियावर स्वतःचे एडिट केलेले फोटो पाठवून ब्लॅकमेल केले जात आहे. कुणाचा फोन रिमोट कंट्रोल्ड ॲपद्वारे हॅक करून खाती रिकामी केली जात आहेत, तर कुणाची कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे.
✅लोकांना योग्य माहिती असल्यास त्यांचे फसवणूक झालेले पैसे परत मिळतात. याशिवाय काही लोक सोशल मीडियावर बदनामी होण्याचेही टाळतात. सरकारने सायबर गुन्ह्यांची किंवा फसवणुकीची तक्रार करण्यासाठी एक पोर्टल तयार केले आहे, जिथे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची तक्रार करू शकता.
📝 *नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार कशी करावी?*
● तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास तुम्ही 1930 वर कॉल करून तक्रार करू शकता. याशिवाय तुम्ही https://cybercrime.gov.in/ वर जाऊन लेखी तक्रार करू शकता.
● 👆🏻 साइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या तक्रार बटणावर क्लिक करा. पुढील पृष्ठावरील अटी व शर्ती वाचा आणि स्वीकारा.
● ‘अन्य सायबर गुन्हा नोंदवा’ बटणावर क्लिक करा.
● ‘Citizen Login’ पर्याय निवडा आणि नाव, ईमेल आणि फोन नंबर यासारखी माहिती द्या.
● तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर पाठवलेला ओटीपी एंटर करा, कॅप्चा भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
● पुढील पृष्ठावर, तुम्हाला ज्या सायबर गुन्ह्याची तक्रार करायची आहे त्याबद्दल माहिती द्या.
● हा फॉर्म चार भागांमध्ये विभागलेला आहे – सामान्य माहिती, पीडित माहिती, सायबर गुन्ह्यांची माहिती आणि पूर्वावलोकन.
● प्रत्येक भागात विचारलेली आवश्यक माहिती द्या.
● माहिती व्यवस्थित पाहिल्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
● आता नवीन पेजवर, स्क्रीनशॉट, मोबाईल नंबर किंवा इतर फाईल्स यांसारखे गुन्ह्याचे संपूर्ण तपशील अपलोड करा आणि ‘सेव्ह आणि नेक्स्ट’ वर क्लिक करा.
● माहिती सत्यापित करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
● तुमची तक्रार नोंदवली गेल्याचा पुष्टीकरण संदेश तुम्हाला प्राप्त होईल.
🙏🏻 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..*

Special offers
27/11/2023

Special offers

Online shopping for Clothing & Accessories from a great selection of Women, Men, Girls, Boys, Baby, Novelty & Special Use & more at everyday low prices.

04/10/2023

Address

Ponda

Telephone

+917709197462

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gyan Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gyan Varta:

Videos

Share


Other Digital creator in Ponda

Show All

You may also like