MH Marathi

MH Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MH Marathi, Social Media Agency, Nagpur.

काल नागपूर येथील अधिवेशनाला उपस्थित राहून, आज सकाळी सकाळी मुंबई गाठून, तिथे "डीप क्लीन ड्राईव्ह" ला नुसती उपस्थिती दाखवू...
10/12/2023

काल नागपूर येथील अधिवेशनाला उपस्थित राहून, आज सकाळी सकाळी मुंबई गाठून, तिथे "डीप क्लीन ड्राईव्ह" ला नुसती उपस्थिती दाखवून नाही तर त्यात स्वतः झाडू घेऊन साफ सफाई करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नागपूर दिशेने निघाले सुद्धा!

यावेळी मुख्यमंत्र्यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा "रांगडा" अवतार बघायला मिळाला👌

असा हा ''धर्मवीर''.... तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा ‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहे...
09/12/2023

असा हा ''धर्मवीर''.... तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा

‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि '' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ''धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला...!!

ओ जिल्हाधिकारी साहेब जरा हात लावता का !!हे आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी. फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की ज...
18/10/2023

ओ जिल्हाधिकारी साहेब जरा हात लावता का !!

हे आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी. फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की जाणीवपूर्वक हा फोटो काढलेला आहे परंतु तसे नाही. खरंतर तीन वेळा कांद्याचे पोते उचलून देण्यासाठी मदत करत असताना मलाच वाटले की राजा साहेबांचा एखादा फोटो काढावा व त्याच वेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले. कामाला तत्पर परंतु समाजात वावरताना पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्वसामान्यांसारखा वागणारा वागणारा हा आमचा मित्र राजा दयानिधी,जिल्हाधिकारी सांगली

- राहुल पाटील IFS

आपचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा अडकले विवाहबंधनात👏🏻
29/09/2023

आपचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा अडकले विवाहबंधनात👏🏻

आशिया चषकाच्या ट्रॉफीसोबत भारतीय क्रिकेटर👌
19/09/2023

आशिया चषकाच्या ट्रॉफीसोबत भारतीय क्रिकेटर👌

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्तीसमवेत आज सकाळी दिल्ली येथील अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले...
10/09/2023

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्तीसमवेत आज सकाळी दिल्ली येथील अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले...

मुंबईचा महाराजा 👌👌मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्ती 🙏🙏🙏🙏
05/09/2023

मुंबईचा महाराजा 👌👌
मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्ती 🙏🙏🙏🙏

उद्या सूर्याच्या दिशेने झेपावणार आदित्य-L1. प्रक्षेपणाची तयारी पूर्ण👌
01/09/2023

उद्या सूर्याच्या दिशेने झेपावणार आदित्य-L1. प्रक्षेपणाची तयारी पूर्ण👌

23/08/2023
अभिनंदन अक्षय कुमार...यावर आपले मत काय?
16/08/2023

अभिनंदन अक्षय कुमार...
यावर आपले मत काय?

10/08/2023
लवासामध्ये पंतप्रधान मोदींचा सरदार पटेलांपेक्षाही उंच पुतळा उभारणार
04/08/2023

लवासामध्ये पंतप्रधान मोदींचा सरदार पटेलांपेक्षाही उंच पुतळा उभारणार

डोळ्यांची सध्या विशेष काळजी घ्या...
03/08/2023

डोळ्यांची सध्या विशेष काळजी घ्या...

 #विनंती सामान्य माणसाच्या फाॅलोईंगने कथित स्टार बनलेले असे काही लोकही त्याच फाॅलोअर्सना आॅनलाईन जुगार खेळायला सांगताहेत...
02/08/2023

#विनंती
सामान्य माणसाच्या फाॅलोईंगने कथित स्टार बनलेले असे काही लोकही त्याच फाॅलोअर्सना आॅनलाईन जुगार खेळायला सांगताहेत. सोशल मीडिया हे अतिशय जबाबदारीचं साधन आहे.
पण यांना जबाबदारीचं भान नाही.
भलेभले स्टार चार पैशांसाठी विकले गेले.
त्यात सामान्य घरातून आलेले हे लोकही चार पैशांसाठी प्रेम करणाऱ्यांनाच देशोधडीला लावण्याचं पाप करताहेत.
टीव्हीवरचे असोत की हे सोशल मीडियावरचे लोक असोत यांना फाॅलोअर्सनेच भानावर आणणं गरजेचं आहे.
हात जोडून विनंती अशा भूलथापांना बळी
पडू नका! 🙏🏻

- विलास बडे (न्यूज रिपोर्टर)

बार्बी वर्ल्ड मध्ये भारतीय राजकारणी 🥰
29/07/2023

बार्बी वर्ल्ड मध्ये भारतीय राजकारणी 🥰

🙏
26/07/2023

🙏

ह्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे ...
26/07/2023

ह्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे ...

कोकणकरांसाठी खुशखबर...
26/07/2023

कोकणकरांसाठी खुशखबर...

नवीन मॉडल बाजारात आलं की ते साईचरणी दान करण्याची महिंद्रा कंपनीची परंपरा आहे.
25/07/2023

नवीन मॉडल बाजारात आलं की ते
साईचरणी दान करण्याची महिंद्रा कंपनीची परंपरा आहे.

2023 या वर्षामध्ये 9500 पेक्षा अधिक शासकीय नोकर भरती प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवारांना मदतीचा हाथ मिळावा यासाठी भाज...
24/07/2023

2023 या वर्षामध्ये 9500 पेक्षा अधिक शासकीय नोकर भरती प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवारांना मदतीचा हाथ मिळावा यासाठी भाजयुमोने मोफत ऑनलाईन लाईव्ह बॅच व टेस्ट सिरीज आयोजित केली आहे.

हा मोफत अभ्यासक्रम 22 जुलै 2023 पासून पुढील दोन महिने दररोज सायंकाळी 8 ते 10 या वेळेत BJYM Exam Cell या प्ले स्टोरवरील ऍपवर आणि युट्युब चॅनेलवर लाईव्ह शिकवला जाणार असल्याची माहिती उपक्रमाचे संकल्पक समन्वयक रमाकांत कापसे यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये दररोज एक मॉक टेस्ट होणार आहे.
(Live क्लास सुरु आहे)

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यासाठी खालील पदासाठी दररोज ऑलाईन LIVE बॅच व टेस्ट सिरीज मोफत उपलब्ध

▪️ तलाठी भरती
▪️ वनरक्षक भरती
▪️ पशुसंवर्धन भरती
▪️ नगरपरिद भरती
▪️सहकार
▪️पनवेल मनपा

तसेच TCS/IBPS परीक्षांकरिता उपयुक्त

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे प्रदेशाध्यक्ष..फोटोला योग्य कॅप्शन द्या.
24/07/2023

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे प्रदेशाध्यक्ष..

फोटोला योग्य कॅप्शन द्या.

कोणत्याही घटनेला अनैतिक संबंधांचं कारण जोडण्यापूर्वी सत्यता जाणून घेत चला आणि निष्पाप जीवाची बदनामी थांबवा..मित्रांनो का...
24/07/2023

कोणत्याही घटनेला अनैतिक संबंधांचं कारण जोडण्यापूर्वी सत्यता जाणून घेत चला आणि निष्पाप जीवाची बदनामी थांबवा..

मित्रांनो काय बोलावं या हत्याकांडावर!

जेव्हा या घटनेबद्दल समजलं तेव्हा हादरूनच गेले. खर काय खोट काय याबद्दल कुणाला वेळ आहे सरळ सरळ अनैतिक संबंधातून हत्या झाली असेल हेच बहुतांश लोकांनी त्यांच्या बुद्धी जोरावर तर्क काढला असणार.

सध्या घडीला घडलेल्या गोष्टीवरून लोक हाच तर्क काढतील यात वाद नाही. पण खरी परिस्थिती काही वेगळी असते असू शकते हे खूप कमी लोक समजत . या घटनेत जो पुतण्या मरण पावला तो समस्त वकील वर्गाचा मित्र होता. तो एक हुशार ऍडव्होकेट होता .समाजाचे नियमित कामे तो करीत होता. चळवळीत त्याचे खूप योगदान होते. कधीही मदत करायला तयार असणारा हा मित्र जेव्हा कळलं कि दीपक मरण पावला थोड्या वेळ तर माझ्याच कानावर विश्वास बसला नाही .कारण मागच्याच तीन चार दिवसात त्याने त्याची होणारी पत्नी सोबत भेट करून दिली होती खूप खुश होता.

मी थोड्या वेळा पूर्वीच मॉर्च्युरी मधून आले मिळालेल्या माहिती वरून त्याचे काका तणावग्रस्त होते समजलं .सकाळी पत्नीसोबत च्या शाब्दिक वादानंतर स्वतः वरचा ताबा त्यांनी गमावला होता .अगोदर पत्नीला गोळी घातली ,त्या गोळीच्या आवाजाने दीपक उठला आणि दरवाजा खटकवून आत गेला त्याच संतापाच्या अवस्थेत दीपक वर सुद्धा गोळी झाडली .संताप इतका अनावर झाला असावा काय करून बसलो हि भावना मनात आल्यावर acp ने स्वतः गोळी घालून आत्महत्या केली .तोपर्यंत सगळं संपलं होत बाहेरून त्यांची दोन्ही मुले धावत आली आणि झाला प्रकार कळला आणि कळवला .या घटनेतून हे स्पस्ट होते कि पोलिसांचा तणावाचा मुद्दा कधी ग्राह्य धरल्या जात नाही.त्यांच्या ड्युटी बद्दल कुणालाच काही सगाभाव नाही . उठ सुठ हा उत्सव हि यात्रा अमुक मंत्री संत्री यांची देखभाल बंदोबस्त करता करता स्वतःची लाईफ हरवून जातात.

बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत पण सरकार या समस्येकडे पूर्ण पणे दुर्लक्ष्य करीत आहेत .आज या सहाय्यक पोलीस अधीक्षकाला रिटायर व्हायला फक्त पाच सहा महिने बाकी होते फक्त एकच मागणी होती कि बदली फक्त पुणे शहरात पाहिजे होती कारण ते या वयात घरापासून खूप लांब होते अमरावतीला सध्या त्यांची पोस्टिंग होती .आता तथ्य काहीही असू शकत पण आता दीपक कधीच कोर्टात दिसणार नाही भेटणार नाही हेही दुःखदायक सत्य आहे.

-Adv .Manisha Dhobe

एक सलाम कर्तव्यदक्ष पत्रकारितेला....Abp माझा वृत्तसमुहाचे प्रतिनिधी  श्री विनायक पाटील यांनी पत्रकार म्हणून आपले कर्तव्य...
24/07/2023

एक सलाम कर्तव्यदक्ष पत्रकारितेला....

Abp माझा वृत्तसमुहाचे प्रतिनिधी श्री विनायक पाटील यांनी पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना कित्येकदा अभिनंदनीय काम केले आहे. संपूर्ण कोकण पट्ट्याला पावसाने झोडपले असताना विनायक पाटील रायगड मधील आपटा गावामध्ये वार्तांकन करत होते तेव्हा 19 जुलै रोजीचे दुपारचे 2.30 वाजले होते.19 तारखेला संपूर्ण दिवस मुसळधार पावसाचे अपडेट्स घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळाहून वस्तुस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना छातीभर पाण्यामध्ये उभे राहून बातमी दिलेली संपूर्ण देशभराने पहिली.त्याच रात्री साधारण 11.30 च्या आसपास खालापूर जवळ असणाऱ्या इरसाळ गडवाडी वर दरड पडून जवळपास सर्वच गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याची दुर्घटना घडली.पहाटे ५ च्या दरम्यान प्रत्यक्ष दुर्घटनास्थळावरून विनायक पाटील ह्यांनी पहिली बातमी केली. मंत्री महोदय गिरीशजी महाजन ह्यांची मुलाखत घेतली आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. NDRF आणि इतर यंत्रणांनी बचावकार्य सुरु केले तेव्हा पासून संपूर्ण दिवसभर प्रत्येक अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम विनायक पाटील ह्यांनी केले. हे सर्व तपशीलासह लिहिण्यास कारण की पहाटे ५ च्या दरम्यान घटनास्थळी पोहोचण्यासाठी रात्री 2-2.30 च्या दरम्यान अंधारात मुसळधार पावसात डोंगर चढून वर जाणे आणि आपले कर्तव्य बजावणे सोपं नव्हे.ह्यासाठी आपल्या कामाप्रती समर्पित वृत्ती आणि जबाबदारीने काम करण्याची प्रवृत्ती शरीरात भिनल्या असणं गरजेचं असतं.
जे कोणी इरशाळगडावर आणि इरसाळवाडीवर गेले आहेत त्यांना गडावर जाण्याची वाट माहित आहे.डोंगरावर रात्री चढताना मुसळधार पाऊस होता, जोरदार वारे असल्याने चिंचोळ्या भागातून पुढे जाणे अवघड होते. जोराचा वारा डाव्या बाजूने उजव्या बाजूला दाबत असल्याने तोल जावून दरीत तर पडणार नाही ना अशी स्थिती होती… सोबत कोण नव्हते.मात्र बातमीचा जजबा असल्याने जिगरबाज विनायकने घटनास्थळ गाठलंच.
आदल्या दिवशी संपूर्ण दिवसभर मुसळधार पावसाचा आढावा घेत आपले कर्तव्य बजावल्यावर पुन्हा मध्यरात्री उठून जाणे आणि संपूर्ण दिवस भर पावसात कार्यरत रहाणे यासाठी Abp माझाचे विनायक पाटील यांना सलाम निश्चितच बनतो.
(ह्या दोन दिवसातील निवडक छायाचित्रे फेसबुक वरील मित्रांसाठी)

साभार:- समीर बागवान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांना शे...
23/07/2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांना शेजारी बसवून पंतप्रधानांनी केली चर्चा

या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात. जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली. इर्शाळवाडीतल्या या रागी प...
22/07/2023

या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात. जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली. इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी. कोसळलेल्या दरडीखाली त्यांची गाय गेली. त्या गाईच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचं हे दृश्य हिंदुस्तान टाईम्सचे फोटोग्राफर सतीश बाटेंनी कैद केलंय. 💔

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.
22/07/2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.

जिवघेणा अनुभव..
21/07/2023

जिवघेणा अनुभव..

इर्शाळवाडीतील मृतदेहांचा सामूहिक दफनविधी करण्यात आला..
21/07/2023

इर्शाळवाडीतील मृतदेहांचा सामूहिक दफनविधी करण्यात आला..

Address

Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH Marathi:

Videos

Share


Other Social Media Agencies in Nagpur

Show All

You may also like