काय केलं सांगा तुम्ही जनतेसाठी
जनतेला लुटणाऱ्या सगळ्या स्वघोषित साहेब लोकांना रिटायर करण्याची वेळ आता आलेली आहे. तारीख लक्षात आहे ना. २० नोव्हेंबर २०२४.
काय केलं सांगा तुम्ही जनतेसाठी?
सारा आटापीटा तुमचा ह्यो सत्तेसाठी
ह्या मातीशी केली तुम्ही गद्दारी सायेब
रिटायरमेंटची तुमची वेळ आता आली.
राहूल प्रधान यांची मुलाखत
रस्त्यावर आंदोलने करायला आणि लढायला माझ्या सारखा कार्यकर्ता पुढे असतो, पण आंबेडकरी मताच्या राजकारणात आमच्या सारखे कार्यकर्ते कुठेच नसतात. लढणा-या कार्यकर्त्यांना बळ का दिल्या जात नाही? सविस्तर मुलाखत या लिंकवर पहा. youtu.be/-PRldkRAnZo
संपूर्ण व्हिडीओ लवकरच अपलोड करण्यात येईल.
कमीना समुह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
फक्त थंबनेल पाहून गोंधळून जाऊ नका. थोडंसं थांबा. कमीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फार जुनं नातं आहे. पण, कमीने म्हटलं की आपल्याला नीच माणसाला दिली जाणारी शिवी यापलीकडे दुसरा कसलाच भाव मनात येत नाही. येईल तरी कसा? काही शब्द आपल्या डिक्शनरीत इतका चूकीचा अर्थ घेऊन बेमालूमपणे शिरतात की आपण त्या शब्दांमागचा खरा अर्थच कधी जाणून घेत नाही. कमीना किंवा कमीने हे शब्द सुद्धा त्यांपैकीच एक. आज जाणून घेऊयात कमीने आणि बाबासाहेबांचं नेमकं नातं काय होतं…
#कमीना #कम्मीकमीन #Kamina #Kammikamin #Ambedkar #Jaybheem #Pakistan #Caste #Atrocity #Dharmendra #SunilDutt
बाबासाहेबंच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील पाऊलखुणा | footprints of Dr. #AMBEDKAR in #LSE
रुपयाचे व्यवस्थापन सरकारच्या हातात असणे हाच धोक्याचा उगम, हे अभ्यासूपणे सांगणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथाची शताब्दी आपण २१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथील Yashwantrao Chavan Centre च्या सभागृहात साजरी केली. त्यानिमित्ताने जगभरातील विद्यापीठांनी बाबासाहेबांना आणि त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाला मानवंदना म्हणून अभिवादन केले. त्यापैकी The London School of Economics and Political Science - LSE नं त्यांच्या विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखूणा आजही जपून ठेवल्या आहेत. त्या सहजपणे पाहण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध नाहीत. त्याच पाऊलखुणा मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय. तर व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अनुभव घ्या बाबासाहेबांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधल्या प्रवासाला.
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो या नामदेव ढसाळ लिखित कवितेचे नागराज मंजुळे यांच्याद्वारे वाचन आणि अभिवादन.
#NamdeoDhasal
Hon. Balasaheb Ambedkar
Hon. Adv. Balasaheb Ambedkar delivered brilliant lecture at "The Centenary Celebration of The Problem of The Rupee".