Roopwani Magazine

Roopwani Magazine Vaastaw Roopwani is a magazine published by Prabhat Chitra Mandal, a leading Film Society in Maharas

15/03/2023
08/04/2022
प्रभात चित्र मंडळाच्या *वास्तव रुपवाणी* नियतकालिकातील नुकताच प्रसिद्ध झालेला अक्षय शेलार यांचा सुमित्रा भावे यांचे लघुपट...
19/08/2021

प्रभात चित्र मंडळाच्या *वास्तव रुपवाणी* नियतकालिकातील नुकताच प्रसिद्ध झालेला अक्षय शेलार यांचा सुमित्रा भावे यांचे लघुपट हा लेख अवश्य वाचा आणि तुमचा अभिप्राय नोंदवा.
प्रभात चित्र मंडळ गेली २७ वर्षे *वास्तव रूपवाणी* हे नियतकालिक नियमितपणे प्रकाशित करत आहे. चित्रपट अभ्यास विषयक मराठीतील हे एकमेव नियतकालिक आहे. हे नियतकालिक bahuvidh.com या वेबसाईटवर आणि app वर ऑनलाईन उपलब्ध आहे. बहुविध चे सभासदत्व घेऊन तुम्ही रूपवाणी नियतकालिक आणि इतरही भरपूर साहित्य वाचू/ऐकू शकता. *आजच बहुविध चे सभासद व्हा... RUPVANI50 हा प्रोमोकोड वापरा आणि शुल्कात ५० रु सूट मिळवा.* तांत्रिक अडचण आल्यास संपर्क- 9152255235 https://bahuvidh.com/cinemagic/23146

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्य.....

19/08/2021
*अंक -:वास्तव रूपवाणी (प्रभात चित्र मंडळ)*लॉकडाऊनच्या काळात बदललेले मानवी व्यवहार, नातेसंबंध यांच्या कथा हा कोरोनाच्या क...
20/07/2021

*अंक -:वास्तव रूपवाणी (प्रभात चित्र मंडळ)*
लॉकडाऊनच्या काळात बदललेले मानवी व्यवहार, नातेसंबंध यांच्या कथा हा कोरोनाच्या काळात उदयाला आलेला एक नवीन जॉनर होऊ पाहतोय की काय, अशी परिस्थिती आहे. मात्र त्यातही या विषयावर लघुपट, चित्रपट बनवताना कलाकारांचा, लेखकांचा कस लागतोय. सामाजिक अंतराचे नियम पाळून शूट करणं, मर्यादित पात्रं असलेल्या कथा लिहिणं आणि त्यातूनही आपल्याला जे सांगायचं आहे, ते मनोरंजनाचे अनेक पर्याय हाताशी असलेल्या प्रेक्षकांपर्यंत नेमकं पोहोचवणं, ही खचितच सोपी गोष्ट नाही. तरीही हे प्रयोग होत आहेत आणि त्यातून नवीन, आशयघन कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, ही आनंदाची बाब आहे. अलीकडेच याच पठडीतला 'अनपॉझ्ड' नावाचा एक चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे एकाच सूत्राने बांधलेले पाच लघुपट या चित्रपटात आहेत.
https://bahuvidh.com/cinemagic/23099

अनपाॅझ्ड: कठीण काळातल्या बदललेल्या जगण्याचं कोलाज - टीम सिनेमॅजिक - लॉकडाऊनच्या काळात बदललेले मानवी व्यवहार, नात.....

प्रभात चित्र मंडळाच्या *वास्तव रुपवाणी* नियतकालिकातील नुकताच प्रसिद्ध झालेला हा लेख अवश्य वाचा आणि तुमचा अभिप्राय नोंदवा...
20/07/2021

प्रभात चित्र मंडळाच्या *वास्तव रुपवाणी* नियतकालिकातील नुकताच प्रसिद्ध झालेला हा लेख अवश्य वाचा आणि तुमचा अभिप्राय नोंदवा.
प्रभात चित्र मंडळ गेली २७ वर्षे *वास्तव रूपवाणी* हे नियतकालिक नियमितपणे प्रकाशित करत आहे. चित्रपट अभ्यास विषयक मराठीतील हे एकमेव नियतकालिक आहे. हे नियतकालिक bahuvidh.com या वेबसाईटवर आणि app वर ऑनलाईन उपलब्ध आहे. बहुविध चे सभासदत्व घेऊन तुम्ही रूपवाणी नियतकालिक आणि इतरही भरपूर साहित्य वाचू/ऐकू शकता. *आजच बहुविध चे सभासद व्हा... RUPVANI50 हा प्रोमोकोड वापरा आणि शुल्कात ५० रु सूट मिळवा.* तांत्रिक अडचण आल्यास संपर्क- ९१५२२५५२३५ https://bahuvidh.com/cinemagic/23099

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्य.....

*bahuvidh.com वर उपलब्ध असलेल्या रूपवाणी नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झालेला हा लेख अवश्य वाचा, शेअर करा आणि अभिप्राय नों...
11/06/2021

*bahuvidh.com वर उपलब्ध असलेल्या रूपवाणी नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झालेला हा लेख अवश्य वाचा, शेअर करा आणि अभिप्राय नोंदवा.*
https://bahuvidh.com/cinemagic/22957
प्रभात चित्र मंडळ गेली २७ वर्षे *वास्तव रूपवाणी* हे नियतकालिक नियमितपणे प्रकाशित करत आहे. चित्रपट अभ्यास विषयक मराठीतील हे एकमेव नियतकालिक आहे. हे नियतकालिक bahuvidh.com या वेबसाईटवर आणि app वर ऑनलाईन उपलब्ध आहे. बहुविध चे सभासदत्व घेऊन तुम्ही रूपवाणी नियतकालिक आणि इतरही भरपूर साहित्य वाचू/ऐकू शकता. *आजच बहुविध चे सभासद व्हा... RUPVANI50 हा प्रोमोकोड वापरा आणि शुल्कात ५० रु सूट मिळवा.* तांत्रिक अडचण आल्यास संपर्क- ९१५२२५५२३५

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्य.....

*रूपवाणी नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झालेला हा लेख अवश्य वाचा, शेअर करा आणि अभिप्राय नोंदवा.*https://bahuvidh.com/cinema...
30/05/2021

*रूपवाणी नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झालेला हा लेख अवश्य वाचा, शेअर करा आणि अभिप्राय नोंदवा.*
https://bahuvidh.com/cinemagic/22888
प्रभात चित्र मंडळ गेली २७ वर्षे *वास्तव रूपवाणी* हे नियतकालिक नियमितपणे प्रकाशित करत आहे. चित्रपट अभ्यास विषयक मराठीतील हे एकमेव नियतकालिक आहे. हे नियतकालिक bahuvidh.com या वेबसाईटवर आणि app वर ऑनलाईन उपलब्ध आहे. बहुविध चे सभासदत्व घेऊन तुम्ही रूपवाणी नियतकालिक आणि इतरही भरपूर साहित्य वाचू/ऐकू शकता. *आजच बहुविध चे सभासद व्हा... RUPVANI50 हा प्रोमोकोड वापरा आणि शुल्कात ५० रु सूट मिळवा.* तांत्रिक अडचण आल्यास संपर्क- ९१५२२५५२३५

‘द ट्रायल ऑफ द शिकागो ७ - टीम सिनेमॅजिक - अॅरन सोर्किन लिखित आणि दिग्दर्शित ‘द ट्रायल ऑफ द शिकागो ७’ शिकागोत सुरू अस.....

सर्वोत्कृष्ट फिल्म सोसायटी चा पहिला सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रभात चित्र मंडळाला !!
02/05/2021

सर्वोत्कृष्ट फिल्म सोसायटी चा पहिला सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रभात चित्र मंडळाला !!

नमस्कार वाचकहो!प्रभात चित्र मंडळ गेली २७ वर्षे  *वास्तव रूपवाणी* हे नियतकालिक नियमितपणे प्रकाशित करत आहे. चित्रपट अभ्यास...
22/04/2021

नमस्कार वाचकहो!

प्रभात चित्र मंडळ गेली २७ वर्षे *वास्तव रूपवाणी* हे नियतकालिक नियमितपणे प्रकाशित करत आहे. चित्रपट अभ्यास विषयक मराठीतील हे एकमेव नियतकालिक आहे. हे नियतकालिक bahuvidh.com या वेबसाईटवर आणि app वर ऑनलाईन उपलब्ध आहे. मागील दोन वर्षे या रूपवाणी चे Online सभासदत्व घेऊन तुम्ही आमच्या वाटचालीमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. आता पुढील प्रमाणे आपले सभासदत्व नूतनीकरण करून आम्हाला चित्रपट विषयक अधिकाधीक दर्जेदार लेख तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी द्यावी.

पुढील बॅंक डिटेल्स द्वारे सभासदत्व शुल्क रु 300/ भरून तुम्ही याचे सभासदत्व घेऊ शकता.

Prabhat Chitra Mandal
Bank Name : IDBI Bank, Dadar (E)
Current Account Number:45412010990249
IFSC Code : IBKL0000454
Contact Number - Dr. Santosh Pathare : 9820374093

वरील प्रमाणे सभासद शुल्क भरलेत की, आम्हाला त्याची Receipt,तुमचा email id,पत्ता आणि जन्मतारीख कळवा. आम्ही तुमचे सभासद लॉगीन Active करून पाठवू.

Bahuvidh.com वरील Pyment Gateway वापरूनही तुम्ही सभासद रूपवाणी चे सभासद शुल्क भरू शकता. यासाठी पुढील लिंक वापरा.
https://bahuvidh.com/category/cinemagic/

Bahuvidh.com ही website आता नव्या रुपात अधिक वाचक स्नेही स्वरूपात आपल्या समोर दाखल झाली आहे.
कृपया वर शेअर केलेल्या लिंक वरून आपल्या वेबसाईट वर लॉगीन करा आणि लेख वाचा
https://bahuvidh.com/login/

* जुन्या सभासदांसाठी विशेष सूचना - website वर लॉगिन साठी username व password अशा दोन्ही साठी तुमचा ईमेल आयडी टाका आणि मग लॉगिन करा.

बहुविध चे जुने अँप आता बंद झाले आहे. कृपया जुने ॲप uninstall करून पुढील प्रमाणे नवीन ॲप इंस्टॉल करा.
नवीन अँप बाबत -
१. बहुविध चे नवीन App,play store वर उपलब्ध नाहीये.
२. नवीन अँप ची लिंक आपल्या वेबसाईट वर च उपलब्ध आहे.
३. मोबाईल वरून website वर लॉगिन केलेत की homepage वर उजव्या बाजूस वरील कोपऱ्यात install Bahuvidh app हे बटन दिसेल त्यावरून तुम्ही बहुविध चे नवीन अँप इंस्टॉल करू शकता.
(सध्या आपले हे App Android System साठी आहे. iOS साठीचे App लवकरच उपलब्ध करून देत आहोत. )

* विशेष सुचना : Website/app वर एकदा Login केल्यावर कृपया logout करू नका. प्रत्येक वेळी लेख वाचताना Login करावं लागणार नाही.*

धन्यवाद !
Dr. Santosh Pathare : 9820374093
टिम रूपवाणी

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्य.....

करोना काळाने प्रभात चित्र मंडळाचे नियमित खेळ खंडित झाले परंतु वास्तव रुपवाणीचे लेख बहुविध. कॉम या ऑनलाईन संकेत स्थळा वरू...
06/01/2021

करोना काळाने प्रभात चित्र मंडळाचे नियमित खेळ खंडित झाले परंतु वास्तव रुपवाणीचे लेख बहुविध. कॉम या ऑनलाईन संकेत स्थळा वरून वाचकांपर्यंत पोहचत होतेच!आता अंक छापून तयार झालाय! सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तरुण पिढीतील लेखकांनी लिहिलेले लेख आणि गेल्या वर्षांत आपल्याला सोडून गेलेल्या कलावंत मंडळींवर लिहिलेले श्रद्धांजली पर लेख या अंकात समाविष्ट केले आहेत. मंगेश सावंत या मित्राने रेखाटलेले सत्यजित राय यांचं देखणं चित्र मुखपृष्ठावर आहे.तुम्ही या अंकाचं स्वागत कराल ही अपेक्षा आहे.

वास्तव रुपवाणीच्या सत्यजित राय जन्मशताब्दी  विशेषांका मधील लेख वाचण्यासाठी बहुविध. कॉम चे सदस्य व्हा.वार्षिक वर्गणी फक्त...
09/12/2020

वास्तव रुपवाणीच्या सत्यजित राय जन्मशताब्दी विशेषांका मधील लेख वाचण्यासाठी बहुविध. कॉम चे सदस्य व्हा.वार्षिक वर्गणी फक्त रु.300/.
https://bahuvidh.com/login/

, माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्य...

|| चित्रस्मृती ||मोठा चित्रपट....भला मोठ्ठा मुहूर्त         पूर्वीचे आपले फिल्मवाले आपल्या मोठ्या चित्रपटाचा मुहूर्त एका...
20/10/2020

|| चित्रस्मृती ||

मोठा चित्रपट....भला मोठ्ठा मुहूर्त

पूर्वीचे आपले फिल्मवाले आपल्या मोठ्या चित्रपटाचा मुहूर्त एकाद्या सार्वजनिक सणासारखा साजरा करीत. कशा कशाची म्हणून कमतरता ती नाही....
ज्योतिषाकडून पंचांग पाहून काढलेल्या शुभ मुहूर्तावर ते कधीच होत नसत, पण त्यात काय तितकंस अशीच जणू भावना असे.
मुहूर्ताचे आमंत्रणही छान डिझाइन्स केलेले आणि ग्लाॅसी पेपरवरचे! मुहूर्त स्थळी किती फिल्मवाले, त्यांच्या भेटीगाठी, खरं खोटं हसणं याची गणतीच नाही.
कोणतीही गोष्ट मोजून मापून करायची नाही यात हे मुहूर्त कल्चर एकदम फिट.
काही असो. ते शानदार/जोरदार/ग्लॅमरस मुहूर्त बराच काळ लक्षात राहत.
असाच एक मुहूर्त 'रजपूत ' ( रिलीज १६ एप्रिल १९८२) या चित्रपटाचा!
चित्रपटाचा दिग्दर्शक विजय आनंद, म्हणजे साधे सुधे प्रकरण नाही. त्याचे अनेक प्रकारची थीम उत्तमरितीने पडद्यावर साकारण्याचे प्रगती पुस्तक वेगळे सांगायला नकोच. या चित्रपटाचे निर्माते मुशीर रियाझ. तेदेखिल मोठे प्रस्थ. त्यांनी कायमच मोठ्या स्टारचे चित्रपट निर्माण केले. दिलीपकुमारची तिहेरी भूमिका असलेला आणि दीर्घकाळ शूटिंग होत राहिलेला 'बैराग ' ( १९७४) त्यांचाच.
'रजपूत 'मध्ये धर्मेंद्र, राजेश खन्ना, हेमा मालिनी, विनोद खन्ना, रंजिता ( हे सगळे मुहूर्ताला हजर), त्याशिवाय टीना मुनिम, रणजित, रहेमान, इंद्राणी मुखर्जी, ओम शिवपुरी, नासिर हुसेन वगैरे वगैरे. आता एवढी मोठी स्टार कास्ट आणि मुख्य चेहरे 'आपल्याच मूड आणि वेळे'नुसार सेटवर येणारे. राजेश खन्ना आणि विनोद खन्नाचे याबाबत बरेच किस्से प्रसिद्ध. त्यातले तत्थ अशा मुहूर्ताला अनुभवायला मिळाले.
'रजपूत 'च्या मुहूर्त दृश्याचे दिग्दर्शन शक्ती सामंता यांनी केले ( अशी एक प्रथा होती, पाहुणा दिग्दर्शक नवीन चित्रपटाच्या मुहूर्त दृश्याचे दिग्दर्शन करे) आणि अमिताभ बच्चनच्या शुभ हस्ते मुहूर्त ( तो वक्तशीरपणासाठी ख्यातनाम. पण त्यालाही मुहूर्त उशिरा होऊ शकतो या सिस्टीमशी जुळवून घ्यावं लागले). गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची दखल महत्वाची.
जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये हा जंगी मुहूर्त रंगला. मुहूर्ताचे दृश्य म्हणजे थीमनुसार एकाद्या जोरदार संवादाचे दृश्य. ते होताच टाळ्या आणि उपस्थितांना हुकमी मोठा गोड्ड पेढा. अगदी दोन घेतलेत तरी चालेल. कारण, हा एक सणच हो.
..... असे असंख्य मुहूर्त होत होत आपल्या चित्रपटसृष्टीचा खूपच मोठा प्रवास सुरू राहिला ( त्यातील 'मजनून ', 'रुद्र ' वगैरे अनेक चित्रपट मुहूर्तालाच बंद पडले तो विषयच वेगळा)
..... असे होता होता असे जंगी मुहूर्त कधी कालबाह्य झाले हे समजलेही नाही. म्हणूनच ते असे आठवतात....

- दिलीप ठाकूर

|| चित्रस्मृती ||अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता?       चित्रपटाचे जग म्हणजे कधी कोणता आणि का आश्चर्याचा धक...
14/10/2020

|| चित्रस्मृती ||

अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता?

चित्रपटाचे जग म्हणजे कधी कोणता आणि का आश्चर्याचा धक्का बसेल ते सांगता येत नाही.... त्यामागची कारणे तद्दन फिल्मी असू शकतात.
अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता हे त्याचे निस्सीम भक्त वगळता फारसे कोणाला माहितच नाही असे लक्षात येते. अनेकांना 'बेनाम ' म्हणजेच 'फरार ' वाटतो. पण तसे नाही. 'फरार ' ( रिलीज २१ नोव्हेंबर १९७५) ला अजिबात यश लाभले नाही त्यामुळे त्याची तशी चर्चाच कधी झाली नाही. या चित्रपटातील अमिताभ आणि शर्मिला टागोर या जोडीवरचे 'मै प्यासा तुम सावन ' हे गाणे लोकप्रिय आहे, संगीत उपग्रह वाहिनीवर ते सतत दाखवले जाते, ( राजेन्द्र कृष्ण यांनी लिहिलेल्या या गाण्याला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत आहे) पण तरीही हा चित्रपट पटकन लक्षात येतच नाही.
याचे कारण म्हणजे, या चित्रपटाला समिक्षक व प्रेक्षकांनी त्या काळात पूर्णपणे नाकारले. आणि अशाच अनेक फ्लाॅप्स चित्रपटांकडे सहज दुर्लक्ष करण्याचाच मानवी स्वभाव आहे.
हा चित्रपट गुलजार यांनी लिहिला असूनही दुर्लक्षित राहिलाय हे आणखीन एक आश्चर्य. गुलजार यांच्या गीतलेखन, पटकथा आणि संवाद लेखन आणि दिग्दर्शन या प्रत्येक भूमिकेची स्वतंत्र ओळख आहे. कधी त्या भूमिका एकाच चित्रपटात एकत्र दिसल्या. या चित्रपटात त्यांचा लेखक होता, तर दिग्दर्शन शंकर मुखर्जी यांचे होते. तोपर्यंत त्यांचा बराच दिग्दर्शनीय प्रवास होतांना देव आनंद त्यांच्या चित्रपटातील हुकमी हीरो होता. बारीश ( १९५७), प्यार मोहब्बत ( ६६), महल ( ६९), बनारसी बाबू ( ७३) हे या जोडीचे उल्लेखनीय चित्रपट.
दिग्दर्शक शंकर मुखर्जी यांनी 'फरार 'साठी संजीवकुमार ( पोलीस इन्स्पेक्टर), त्याची पत्नी ( शर्मिला टागोर) आणि तिचा माजी प्रियकर ( अमिताभ) या तीन व्यक्तिरेखा भोवतीचा ड्रामा रचला. या चित्रपटात इतरही लहान मोठ्या भूमिका आहेत. एका प्रकरणात पोलीस मागे लागले असतानाच गुन्हेगार एका घरात आश्रयाला शिरतो, नेमके तेच घर त्याच्या एकेकाळचा प्रेयसीचे असते. त्याला जखमी अवस्थेत पाहून त्याला ती मदत तर करेत पण तिचा प्रश्न आहे की, याच्या मागे पोलीस का लागलेत? आपल्या प्रशस्त घरात त्याला किती दिवस लपवणार? तर तो सांगतोय, मी निर्दोष आहे..... हा प्लाॅट रंगतदार आहे, पण तरीही रंगला नाही. संकलक बाबू लवंदे यांनी आपली कैची उत्तम चालवली. पण प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही आणि या चित्रपटाचे मेन थिएटर मराठा मंदिरची गर्दी लगेचच ओसरली आणि हा चित्रपट फार काळ तग धरणार नाही हे स्पष्ट झाले.
या अपयशाला आणखीन एक किनार आहे. सतराम रोहरा दिग्दर्शित 'जय संतोषी मा ' ( रिलीज ३० मे १९७५) आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले ' ( १५ ऑगस्ट १९७५) या दोन्ही चित्रपटांनी एकूणच वातावरण बदलून टाकले होते आणि त्यात इतर कोणत्याही चित्रपटाला स्पेस आणि महत्व मिळत नव्हतेच. अनेक चित्रपट प्रदर्शित होताच काही आठवड्यातच 'फरार ' होत होते.
याच्या नावातच 'फरार ' होता.
असो. चित्रपटाची गुणवत्ता महत्वाची असतेच पण त्याच्या प्रदर्शनाचे 'टायमिंग 'ही परफेक्ट हवेच. चित्रपटाचा इतिहास अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गोष्टीने घडत असतो तो हा असा.
संजीवकुमार, शर्मिला टागोर व अमिताभ बच्चन ही स्टार कास्टही जबरा आहेच. पण तरीही काही गोष्टी जुळून आल्या नाहीत....

-- दिलीप ठाकूर

//चित्रस्मृती//'दाग 'चा मुहूर्त.....      एका अतिशय प्रतिष्ठित आणि एस्टॅब्लिज चित्रपट निर्मिती संस्थेतून बाहेर पडायचे, ज...
12/10/2020

//चित्रस्मृती//

'दाग 'चा मुहूर्त.....

एका अतिशय प्रतिष्ठित आणि एस्टॅब्लिज चित्रपट निर्मिती संस्थेतून बाहेर पडायचे, ज्या संस्थेत आपण दिग्दर्शक म्हणून घडताना केलेल्या काही प्रयत्नांना उत्तम यशही आले आणि इतकेच नव्हे तर आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची साथ सोडायचीय....
दिग्दर्शक यश चोप्रा यांनी असेच स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत आपले बंधु बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्मस या बॅनरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपली 'यशराज फिल्म ' ही निर्मिती संस्था स्थापन करून आपला पहिला चित्रपट 'दाग ' ( रिलीज १९७३) चा दिलीपकुमारच्या शुभ हस्ते मुहूर्त केला....
बी. आर. फिल्म या बॅनरसाठी यशजीनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील 'धुल का फूलʼ ( १९५९)मध्ये सर्वधर्मसमभाव याचा संदेश दिला. 'वक्त '(१९६५) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट रंगवला. तर 'इत्तेफाक ' ( १९६९) हा गीतविरहित रहस्यरंजक चित्रपट नाट्यपूर्ण साकारला.
आपल्याला ज्या संस्थेने घडवले त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे पन्नास वर्षांपूर्वी खूपच अवघड होते. पण ते गरजेचेही असते. यशजीनी यशराज फिल्मची स्थापना करताच चित्रपती व्ही शांताराम यांनी आपल्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत त्यांच्या ऑफिसला जागा दिली. आणि यशजीनी त्यानंतर पुढील पंचवीस वर्षे याच स्टुडिओत आपल्या चित्रपटाचे मुहूर्त केले आणि बरेचसे चित्रीकरणही केले.
'इतेफाक 'च्या वेळी राजेश खन्नाशी सूर जुळल्याने 'दाग 'मध्ये तो हीरो असणे स्वाभाविक होते तसेच त्या काळात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर या जोडीचे क्रेझ असल्याने तीच जोडी 'दाग 'मध्ये आणि जोडीला राखी. आणि २७ सप्टेंबर १९७१ रोजी मुहूर्त रंगला.
त्या काळात अशा दोन नायिका एकाच चित्रपटात एकत्र म्हणजे गाॅसिप्सला उधाण आलंच. या दोघींचे सेटवर पडत नाही, राजेश खन्नाच्या जवळकीवरुन वाद वगैरे वगैरे. अर्थात, गाॅसिप्सच ते. त्यात काहीही शिजू शकते.
'दाग 'चे मुंबईतील मेन थिएटर मिनर्व्हा होते, भव्य प्रीमियरने दणक्यात सुरुवात झाली आणि सिनेमा सिल्हर ज्युबिली हिट झाला. बीबीसी ( लंडन) ने त्या काळात राजेश खन्नाच्या क्रेझवर बनवलेल्या माहितीपटात 'दाग 'चा भव्य प्रीमियर पाह्यला मिळतो....

दिलीप ठाकूर

|| चित्रस्मृती ||'शोले ' बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे ( फक्त)         'शोले 'च्या वेळेस मिनर्व्हा थिएटरमध्ये तिकीट दर त...
09/10/2020

|| चित्रस्मृती ||

'शोले ' बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे ( फक्त)

'शोले 'च्या वेळेस मिनर्व्हा थिएटरमध्ये तिकीट दर ते किती होते असा अनेक जण प्रश्न करतात.
स्वाभाविकच आहे ते. एक तर तो सर्वकालीन बहुचर्चित चित्रपट आणि आजही कुठे एखाद्या गावात टाकीवर चढून कोणी उडी मारण्याची धमकी देतो अथवा राजकारणात एकादी उपमा द्यायची असेल तर हमखास 'शोले 'चेच प्रसंग आठवतात. रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही हे संदर्भ उपयुक्त ठरताहेत यात बरेच काही येते. त्यामुळे तेव्हा तिकीट दर ते किती होते याबाबत कुतूहल हवेच.
त्यात मी गिरगावकर आणि त्या काळात मेट्रोपासून मराठा मंदिर थिएटरपर्यंतचा एरिया म्हणजे मेन थिएटरचे विश्व. असंख्य चित्रपट येथे ज्युबिली हिट झाले. पंचवीस/पन्नास/शंभर आठवडे चाललेत....
'शोले 'साठी मिनर्व्हा थिएटरमध्ये अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे तिकीट दर होते. ( सोबतचे तिकीट बघा). मिनर्व्हात 'शोले ' दिवसा तीन खेळ याप्रमाणे १५ ऑगस्ट १९७५ ते ३१ ऑगस्ट १९७८ असा आणि त्यानंतर तेथेच आणखीन दोन वर्षे, म्हणजे एकूण पाच वर्षे चालला. या काळात हे दर होते.
आज हे तिकीट दर चिल्लर वाटतात पण तेव्हा ते महाग होते. याचे कारण म्हणजे ताडदेवच्या सुपर टाॅकीजमध्ये स्टाॅल एक रुपया पासष्ट पैसे, अप्पर स्टाॅल दोन रुपये वीस पैसे असे दर होते. पण तेव्हाचे चित्रपट भरपूर आनंद देत. हाऊसफुल्ल गर्दीत ते एन्जाॅय करण्यात रोमांच असे.
'शोले 'ची क्रेझ अशी काही भारी होती की अनेक फिल्म दीवाने पुन्हा पुन्हा तो पाहत. मिनर्व्हाचा सत्तर एमएमचा पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम हा तेव्हा वेगळा अनुभव असे. पांछी दिग्दर्शित 'अराऊंड द वर्ल्ड ' ( १९६७) हा खरं तर आपल्याकडचा पहिला सत्तर एमएम चित्रपट. पण एवढा मोठा स्क्रीन वापरायची थीम आणि कौशल्य त्यात नव्हते. दिग्दर्शक रमेश सिप्पीने नेमके तेथेच बाजी मारली आणि खणखणीत यश मिळवले.
आपला चित्रपट पडद्यावर कसा दिसेल याचे व्हीजन असणे केव्हाही चांगलेच. 'शोले 'पासून आजही बरेच काही शिकण्यासारखे आहे ना? तिकीट दराच्या निमित्ताने जाता जाता तेही सांगावेसे वाटले....

दिलीप ठाकूर

सिदपासून आयेशापर्यंत... आयेशापासून सिदपर्यंत...!- संदेश कुडतरकर.बायोमेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना हॉस्पिटलमध्ये ट्र...
06/10/2020

सिदपासून आयेशापर्यंत... आयेशापासून सिदपर्यंत...!

- संदेश कुडतरकर.

बायोमेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगसाठी घालवलेले सहा महिने अजूनही आठवतात. एखाद्या दिवशी कुणीच सर्व्हिस इंजीनिअर येत नसे. आमच्या ट्रेनर बाई मग आम्हांला तिथल्या लोखंडी कपाटातली प्रॉडक्ट्स मॅन्युअल्स वाचायला लावायच्या. मी चक्क झोपून जात असे. कॉलेजला लॉजिक सर्किट्सचं लेक्चर असलं की माझ्या पोटात कळ यायची. इंजीनिअर वगैरे व्हायचंच नव्हतं कधी. पण पुढे काय करायचंय हेही माहीत नव्हतं. अभ्यास करताना झोपणारा, बाबांच्या ऑफिसमधून पळून जाणारा सिद मेहरा म्हणूनच जवळचा वाटतो.

'वेक अप सिद' चित्रपटगृहात तर पाहायचा राहून गेला. पण नंतर मात्र त्याची पारायणं केलीत. जिच्या घरी पळून जाता येईल, अशी आयेशा बॅनर्जी आयुष्यात नसली तरी एखाद्या कंटाळवाण्या लग्नसमारंभात जेव्हा "तुमचा मुलगा काय करतो? किती पगार आहे त्याला?" टाईप प्रश्नांची सरबत्ती अनोळखी नातेवाईकांकडून सुरु होते, तेव्हा तिथून सिदसारखा बऱ्याचदा पळ काढावासा वाटला आहे. आईबाबांशी तारस्वरात भांडणं होतात, तेव्हा स्वतःचं काहीएक करता येत नसतानाही सिदसारखं घर सोडून जावंसं वाटलं आहे. आवडत्या कामात स्वतःला झोकून दिल्यावर आणि त्या कामाच्या मोबदल्याचा पहिला चेक मिळाल्यावर सिदला जसा आनंद होतो, तसाच आनंद कुठल्याही वर्तमानपत्रात, वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखासाठी जेव्हा मानधन मिळतं, तेव्हा होतो. अशा अनेक क्षणांतून सिद भेटत राहतो. धडका देत राहतो. माझ्यातलं स्वतःचं अस्तित्त्व अधूनमधून दाखवून देत राहतो.

गंमत म्हणजे आयेशा बॅनर्जीही तितकीच जवळची वाटत राहते. तिच्या प्रामाणिकपणाशी रिलेट करता येतं. सिदने "घरापासून एवढ्या दूर या अनोळखी शहरात एकटी राहतेस तू. तुला भीती नाही वाटत?" असं विचारल्यावर उगाच तो आपल्याला जज करेल, या भीतीपायी ती खोटं सांगत नाही. ती बिनधास्तपणे सांगते की, "भीती अर्थातच वाटते." पण आपल्या स्वातंत्र्याची आपणच मोजलेली ही किंमत आहे, हे ती पक्कं जाणून आहे. लेखिका बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेली आयेशा 'बॉम्बे बीट्स'मध्ये ऑफिस असिस्टंटची नोकरी पत्करते. तिच्या बॉसने 'हे तुझ्या प्रोफाईलला मॅच होणारं नाही', हे स्पष्टपणे सांगूनही. त्यातूनच ती आपला मार्ग शोधते. बॉसच्या टेबलवर आपले लेख ठेवत राहते. कधीतरी तो ते वाचेल, या आशेवर. सिदच्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध असलेली आयेशा सिदशी सहज मैत्री करते. आपल्या जगात त्याला सहज सामावून घेते. तरीही आपलं सिदवर प्रेम आहे, हे तिला फार उशिरा कळतं. मी स्वतःपुरता विचार करत असताना मलाही हेच जाणवतं बऱ्याचदा की, "जवाब इतने दिनों से मेरी आँखों के सामने था. बस मैं ही पहचान नहीं पा रहा था."

आयेशा स्वाभिमानी तर आहेच, पण चित्रपटात तिच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दिसतात. सिदच्या मित्रांनी तिला नवीन घरात सेटल व्हायला मदत केलेली असली, तरी तिच्या परवानगीशिवाय सिदने आपल्या मित्रांना तिच्या घरी बोलावणं तिला खपत नाही. शेजारी राहणाऱ्या सोनियाशी तिचा एक वेगळा कम्फर्ट झोन आहे. आपल्या बॉससह - कबीरसह - जॅझच्या मैफिलीला गेल्यावर कंटाळलेली ती सिदबरोबर कॅरिओकेला जाते, तेव्हा आपल्याला गाता येत नाही हे माहीत असूनही प्रेक्षकांसमोर 'पहला नशा' म्हणते. सिदला ती आपल्या घरात आसरा देते, पण त्याच वेळेला "तू काय करतोयस स्वतःच्या आयुष्याचं? एवढा बिझनेस आहे तुझ्या वडिलांचा आणि तू माझ्या घरात बसून ऑम्लेट्स बनवतोयस?" हेही सांगत त्याला वेळीच जागं होण्याचीही जाणीव करून देते.

अयान मुकर्जीचा हा चित्रपट म्हणजे नातेसंबंधांची खोलवर रुजलेली पाळंमुळं शोधत त्यांतल्या ओलाव्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. आपल्याबरोबर टवाळक्या करूनही रिषी पास झाल्यावर सिद चिडतो, तेव्हा त्यांच्या मैत्रीला गेलेला तडाही इथे स्पष्ट दिसतो. त्याचप्रमाणे नापासाचा शिक्का बसल्यामुळे स्वतःला पराभूत समजणाऱ्या सिदला आपण स्वतःही रोज डाएट करायचं ठरवतो आणि नापास होतो, हे सांगणारी, कुठल्याही परिस्थितीत त्याच्या सोबत असणारी लक्ष्मीही दिसते. सिदवर राग असणारी डेबीही तो रेस्टॉरंटमध्ये कठीण प्रसंगात सापडल्यावर त्याला मदत करताना दिसते. आयेशावर डाफरणाऱ्या म्हातारीला सिद मात्र तिचे फोटो काढत सहज हसवू शकतो. एकीकडे सोनिया आणि छोट्या संजूच्या आईची लटकी भांडणं आहेत, तर दुसरीकडे संजूचे फोटो काढण्यासाठी सिद आणि आयेशाला त्याच वरकरणी भांडकुदळ वाटणाऱ्या बाईने पोहे खायला घालणंही आहे. जसा आयेशा आणि तिचा बॉस कबीर यांच्यातल्या नात्याचा अॉकवर्डनेस आहे, तसाच सिद आणि तानियाच्या नात्याचाही लग्नसमारंभातल्या भेटीपासून 'आपण एकमेकांसाठी नाही' या जाणिवेपर्यंतचा प्रवास आहे.

पालक आणि मुलांमधले नातेसंबंध या चित्रपटात अगदी सहजपणे येतात. भवतालातून टीपकागदासारखं सगळं शोषून घेतल्यासारखे. आयेशाच्या आईचं नखही चित्रपटात दिसत नाही. फक्त एका दृश्यात सिद घरातून निघून गेल्यावर आयेशा आपल्या आईशी फोनवर बोलताना दिसते. घरापासून दूर राहत स्वतंत्र आयुष्य जगतानाही तिने कुटुंबाशी असलेली नाळ तोडलेली नाही. याउलट सिदचे वडील राम मेहरा आणि आई सरिता मेहरा यांच्याशी सिदचं नातं तणावांनी भरलेलं आहे. आपण कष्ट करून इथवर पोहोचलो आहोत आणि याची तुला जराही जाणीव नाही, असं म्हणणारे सिदचे वडील कठोर भासत असले, तरी सिदचं बालपण त्यांनी त्याच्या फोटोंमधून जपल्याचं दिसतं, तेव्हा त्यांच्या मनाचा हळवा कोपरा उलगडतो. सिदची आई सरिता त्याच्यावर मनापासून प्रेम करतेय, पण नवऱ्याच्या पाठीशीही ती खंबीरपणे उभी आहे. सिद नापास झाल्यावर ती रागावते, मात्र तो घर सोडून गेल्यावर आयेशाच्या घरी ती त्याच्यासाठी स्वतः आंबे पाठवते. आयेशा तिला म्हणते की, "सिद और मैं... हमारे बीच वैसा कुछ है नहीं." त्यावेळी सरिता तिच्या गालावरून हात फिरवते. त्या स्पर्शात अनंत गोष्टी सामावल्या आहेत. विश्वास आहे. प्रेम आहे.

पिझ्झावर तुटून पडणाऱ्या सिदला ती प्रेमाने म्हणते, "ये सब क्यूँ खाते हो? घर में कितना अच्छा खाना बनता है", तेव्हा माझीच आई दिसते मला तिच्यात. नायकापेक्षा वयाने मोठ्या नायिकेबरोबरच्या प्रेमकथा नवीन नाहीत रुपेरी पडद्याला, पण इथे सिद आणि आयेशाचा रोमान्स खरा वाटतो. चित्रपटातील कॉस्मोपॉलिटन मुंबई, आयेशाचं ऑफिस, आयेशाचं घर, सिदच्या वडिलांचं ऑफिस, सिदचं घर, मरीन ड्राईव्ह, पाऊस, पब्ज हे सगळं इथे सिद आणि आयेशाच्या हळुवार फुलणाऱ्या प्रेमकथेचा अविभाज्य भाग म्हणून येतं आणि मग या सगळ्या निर्जीव गोष्टींमध्येही प्राण फुंकला जातो. इतक्या वर्षांनंतर पाहूनही पहाटे फुललेल्या फुलांसारख्या टवटवीत वाटणाऱ्या या चित्रपटाने स्तंभाची सुरुवात करण्याचं कारणही तसंच खास आहे. आयेशा म्हणते त्याप्रमाणे, "मेरा रायटर बनने का सपना पूरा हुआ जब मुझे ये कॉलम लिखने को कहा गया." तिच्या स्वप्नाप्रमाणेच आज माझ्या यादीतलं एक स्वप्न पूर्ण होतंय. बाकी अजून काही सापडतंय का, हे शोधण्याचा प्रयत्न मात्र चालूच राहील. सिदपासून आयेशापर्यंत... आयेशापासून सिदपर्यंत... संदेश कुरतडकर

आपल्या परखड वैचारिक आणि कृतिशील सामाजिक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्पाबाई भावे यांचे आज निधन झाले! प्रभात चित्र मंड...
03/10/2020

आपल्या परखड वैचारिक आणि कृतिशील सामाजिक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्पाबाई भावे यांचे आज निधन झाले! प्रभात चित्र मंडळ आणि वास्तव रुपवाणी बरोबर त्यांचा ऋणानुबंध होता.प्रभातच्या कार्यक्रमांना त्यांची सन्माननीय उपस्थिती असायची.गणेश मतकरींच्या चौकटी बाहेरचा सिनेमा या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.पुष्पाबाई ना प्रभात चित्र मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

||चित्रस्मृती ||समिक्षकांनी व्हॅम्पची तारीफ केली......          होय, कधी कधी काही गोष्टी अपवाद ठरतात आणि म्हणूनच तर चित्...
28/09/2020

||चित्रस्मृती ||

समिक्षकांनी व्हॅम्पची तारीफ केली......

होय, कधी कधी काही गोष्टी अपवाद ठरतात आणि म्हणूनच तर चित्रपटाच्या जगाबद्दलची उत्सुकता वाढत राहते.
अशीच ही गोष्ट आहे, अनेक समिक्षकांनी चक्क खलनायिका अथवा व्हॅम्पचे कौतुक केल्याची!
बरं, दिलीपकुमारची दुहेरी भूमिका आहे. त्याची नायिका साकारण्याचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून शर्मिला टागोर आहे ( संपूर्ण सिनेमाभर ती त्याच आनंदात वावरल्याचे सतत जाणवते हे दिलीपकुमारचे यश), चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची पुन्हा वेगळी उजळणी नको. त्यांनी आपलाच यशस्वी चित्रपट 'अफसाना ' (१९५१) ची रिमेक म्हणून हा 'दास्तान ' ( १९७२) पडद्यावर आणला, पण मूळ चित्रपटाला यश लाभले म्हणजे ते रिमेकलाही मिळेलच असे अजिबात नसते. दोन्ही वेळच्या प्रेक्षकांच्या मानसिकता आणि अपेक्षेत फरक असतोच.
'दास्तान 'ला समिक्षक आणि प्रेक्षक अशा दोघांनीही नाकारले ( असेही अधूनमधून होत असते, बरं का?) पण अतिशय जहालपणे खलनायिका साकारलेल्या बिंदूचे भरभरून कौतुक केले.
बिंदू म्हणताक्षणीच सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटातील अतिशय कपटी, बेरकी, धूर्त अशा व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सहज आठवली असेलच. आपल्या एकूणच देहबोलीतून आणि तेही कमी पडतेय असे वाटले तर जहाल जळजळीत कटाक्ष आणि मुद्राभिनय यांची जोड देणार. कटी पतंग, जंजीर, जोशीला इत्यादी चित्रपटात तिच्या वाटेला क्लब डान्सही आला आणि तिने तो आणखीन प्रभावीपणे साकारला.
'दास्तान 'मधील एका दिलीपकुमारची नायिका शर्मिला टागोर तर दुसरा दिलीपकुमार बिंदूचा पती. तिचे नाव माला. ती पतिनिष्ठ अजिबात नाही, तर तिचा जिवलग मित्र राजन ( प्रेम चोप्रा) याला तिने सर्वस्व अर्पण केले आहे जणू. 'ये मै की करा ' ( पार्श्वगायिका आशा भोसले) या गाण्यात ते अधिकच स्पष्ट होते. आपल्या अशा बदफैली पत्नीमुळे सुनिल विष्णू सहाय्य ( अर्थात दिलीपकुमार) प्रचंड डिस्टर्ब आहेत, दुःखी आहेत....
बिंदूच्या या भूमिकेची खरं तर अभिनयाची तात्कालिक समिक्षकांनी विशेष दखल घेतली, खूपच तारीफ केली. ( अवघ्या एका ओळीत तिची दखल घेतली नाही हे आठवतेय.) भलेही निगेटीव्ह व्यक्तिरेखाना ती सरावली असेल, पण येथे तिने जास्त प्रभावी अस्तित्व सिद्ध केले. समोर अथवा सोबत दिलीपकुमार असल्याचा कसलाही तणाव तिने घेतला नाही ( अनेकांनी तो घेतला हे कधी 'इज्जतदार 'च्या मुहूर्ताला गोविंदाचे जे काही झाले तेव्हा प्रत्यक्ष अनुभवले, तर अनेक चित्रपटात पडद्यावर पाहिले). अशाच व्यक्तिरेखा साकारताना खरं तर आव्हान असते, तेव्हा अपेक्षित भडकपणा साध्य करतानाही एक मर्यादा पाळावी लागते. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनाही याचे श्रेय जाते, म्हणून बिंदूचे महत्व कमी होत नाही...
दुर्दैव असं की, हा चित्रपट फस्ट डे फर्स्ट शोलाच फ्लाॅप झाला. त्यामुळे फार कमी प्रेक्षकांनी तेव्हा तो पाह्यला. कालांतराने दूरदर्शनवर प्रक्षेपित झाला तेव्हा बिंदूचा अभिनय अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचला. तेच तर महत्वाचे आहे.
-- दिलीप ठाकूर

||चित्रस्मृती ||तिरुडा तिरुडा हा मणीरत्नमचा सिनेमा त्यांच्या इतर सिनेमांसारखं सामाजिक किंवा राजकीय विषयावर भाष्य करत नाह...
25/09/2020

||चित्रस्मृती ||

तिरुडा तिरुडा हा मणीरत्नमचा सिनेमा त्यांच्या इतर सिनेमांसारखं सामाजिक किंवा राजकीय विषयावर भाष्य करत नाही किंवा तसे संदर्भही या सिनेमात नाहीत. त्यांनी नेहमीच्या गंभीर विषयांपासून ब्रेक घेऊन केवळ मनोरंजन करण्यासाठी हा सिनेमा बनवला असावा असं वाटतं. विशेष म्हणजे सिनेमाची कथा राम गोपाल वर्माने लिहिली आहे. क्राईम फिक्शनच्या मनी हाईस्ट या केपर प्रकारात हा सिनेमा येतो. सिनेमाचं कथानक दरोडा आणि गुन्हेगाराचा पाठलाग यावर आधारित असल्यामुळे हा सिनेमा थ्रिलर झाला आहे. ऍक्शन, गाड्यांचे, घोड्यांचे चेस सिक्वेन्सेस, रेल्वेवरचा थरार, ठराविक वेळानंतर हवेत उडणाऱ्या गाड्या यामुळे सिनेमा रंजक झाला आहे. पी सी श्रीराम यांचं छायांकन आणि सिनेमातील स्पेशल इफेक्ट्स भारी आहेत. स्पेशल इफेक्ट्ससाठी फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
प्रशांत आणि आनंद यांनी भुरट्या चोरांच्या भूमिका भारी केल्या आहेत. प्रशांतला आपण जीन्स या सिनेमामुळे ओळखतो. आनंद तमिळ टीव्ही इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे.
हीरा राजगोपालने दोन मुलांच्या प्रेमात अडकलेल्या रासाथी या गावठी मुलीची भूमिका छान केली आहे. सिनेमाचं आकर्षण आहे अनु अगरवाल ! नुकतंच आशिकीद्वारे तिनं जोरदार पदार्पण केलं होतं त्यामुळे तिला सिनेमात घेतलं असावं.
एस पी बालसुब्रमण्यम आणि मलेसिया वासुदेवन हे त्याकाळात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले गायक महत्वाच्या भूमिकेत आहेत. दोघांनीही अप्रतिम कामं केली आहेत.
सलीम गौसने सिनेमाचा व्हिलन दमदारपणे साकारला आहे.

मणीरत्नमच्या इतर अतिशय गाजलेल्या सिनेमांच्या गर्दीत हा सिनेमा दुर्लक्षित राहिला तसंच सिनेमाचं संगीतही दुर्लक्षित राहिलं. रोजा नंतर ए आर रहमानचा हा दुसराच अलबम आहे. रोजाचं यश हे वन हिट वंडर नव्हतं आणि रहमान इथं घट्ट पाय रोवणार आहे हे या अलबमद्वारे सिद्ध झालं. संगीताचं डिजिटायजेशन नुकतंच सुरू झालं होतं. रहमाननं सिनेमा संगीतात इलेक्ट्रॉनिक साऊंडचा वापर करून भारतीय लोकांची संगीतातील अभिरुची बदलायला सुरुवात केली. पारंपरिक वाद्यमेळाला सरावलेल्या भारतीय लोकांना 'कोंजम नीलवू' या टेक्नोपॉप गाण्यात वापरलेले साऊंड आणि त्याचे लेयर्स डिकोड करता येत नव्हते. सेपरेट करता येत नव्हते. हे काहीतरी नवीन होतं. फ्रेश होतं. या गाण्यातून रहमानने अनुपमा आणि चायनीज गायिका कॅरोलीन यांना इन्ट्रोड्यूस केलं. 'रासाती' हे अजून एक प्रायोगिक गाणं ! ही एक कॅपेला आहे. कॅपेला म्हणजे कुठल्याही वाद्यसंगती शिवाय गायलेलं गीत. शाहूल हमीदने गायलेल्या या गाण्याला ऑपेरासारखी ट्रीटमेंट दिल्यामुळे हे गाणं कायच्या काय भारी झालं आहे.
'थी थी...' या गाण्यात वेस्टर्न आणि इंडियन क्लासिकल यांचं फ्युजन केलं आहे. या गाण्यात तबल्याचा अप्रतिम वापर केला आहे. 'वीरपांडी कोट्टयिले' हे अजून एक खास गाणं.
वीररसाने ओथंबून वाहणारं हे गाणं ऐकताना आपली पावलं थिरकल्याशिवाय राहत नाहीत. मानो या गायकाचा पहाडी आवाज अंगावर शहारे आणतो. हिंदीमध्ये 'प्यार कभी ना तोडेंगे !...' असा या गाण्याचा अनुवाद केला आहे. 'पूथं पुथु भूमि...' आणि 'अथंकुलं अयिरा मीनू' ही गाणीसुद्धा रहमानचं आगमन झालंय याची साक्ष देतात. हा सिनेमा 'चोर चोर ' या टायटलने यु ट्यूबवर उपलब्ध आहे. तिथेच मूळ तमिळ सिनेमाही Thiruda Thiruda सर्च केल्यास मिळेल. सोबत कोंजम नीलवू या गाण्याची लिंक आहे. सत्तावीस वर्षांनंतरही हे गाणं फ्रेश किती वाटतं !

नारायण अंधारे
अधिक माहितीसाठी आम्हाला या क्रमांकावर व्हॉट्सअप करा!
Whatsapp Number:+91-9820374093
http://www.prabhatchitramandal.org/index.htm

||चित्रस्मृती ||पुस्तक वाचकाशी   संवाद साधतात, लेखकाचा अनुभव शब्दात मांडून वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव देतात. चित्रपटाच्...
21/09/2020

||चित्रस्मृती ||

पुस्तक वाचकाशी संवाद साधतात, लेखकाचा अनुभव शब्दात मांडून वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव देतात. चित्रपटाच्या प्रेक्षकाला मात्र दिग्दर्शकाच्या नजरेतून प्रतिमाच अवलोकन करावं लागतं. सराईत प्रेक्षक त्या प्रतिमां मागील अन्वयार्थ समजून घेतो. चित्रपट आणि साहित्य ही दोन्ही माध्यम प्रेक्षक व वाचकाला घडवत असतात, उन्नत करत असतात. चित्रपटाचा इतिहास उणापूरा एकशे तेवीस वर्षाचा आहे पण साहित्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. चित्रपटातील गोष्ट सांगण्याचा घटक साहित्याकडूनच आलेला आहे. जगभरात निर्माण झालेल्या साहित्यावर अनेक चित्रपटांच्या कथावस्तू उभ्या राहिल्या आहेत. मारिया पुझोच्या गॉडफादर पासून अँगथा क्रिस्तीच्या मर्डर ऑफ द ओरिएंटल एक्सप्रेस सारखी असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील.
चित्रपट आणि साहित्य याचं नात घट्ट असलं तरीही लेखक म्हणून एखाद्या व्यक्तीची होणारी जडणघडण, साहित्य लिहिण्यासाठी त्याला मिळणारी प्रेरणा, त्याच्या स्वतःच्या अनुभव विश्वातून तो करत असलेली साहित्य निर्मिती व त्या साहित्य निर्मितीचे वाचकांवर होणारे परिणाम या आणि अशा अनेक गोष्टींच्या मागे दडलेल्या वास्तव आणि रंजकतेचं चित्रण चित्रपट माध्यमात झाल्याची उदाहरणं अगदी मोजकीच आहेत. लेखकाच्या कथनातून अनेक चित्रपट तयार झालेले असले तरीही लेखकाने लिखाणासाठी पात्र व त्यांच्या परिस्थितीचा घेतलेला धांडोळा द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी असं लांबलचक शीर्षक असलेल्या चित्रपटात आपल्याला पहायला मिळतो. डान्स विथ स्ट्रेन्जर, फोर वेडिंग्ज् अँड फ्युनरल यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक माईक नेवेल या अनुभवी दिग्दर्शकाने निर्माण केलेला हा चित्रपट त्यातील कथामुल्यामुळे भावतोच पण त्यातील लेखिकेची मुख्य व्यक्तिरेखा व तिने आपल्या संभावित पुस्तकासाठी घेतलेला पात्रांचा शोध हे या चित्रपटाचं आगळ वैशिष्ट्य आहे. लेखकाची पात्रांमधील मानसिक गुंतवणूक चित्रपटाला अनोखा पैलू प्राप्त करुन देते.
ज्युलिएट अँश्टन(लिली जेम्स्) या लेखिकेला द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी या बुक क्लब बद्दल माहिती मिळते. या बुक क्लबच्या मेंबर्सना भेटून त्यांच्याविषयी पुस्तक लिहां अशी तिची योजना असते. या बुक क्लबची स्थापना झालेली असते दुसरं महायुद्ध सुरु असताना, १९४१ साली !
गर्नसी हे युरोपातलं एक निसर्गरम्य बेट. हिटलरचे नाझी अधिकारी गर्नसीला आपल्या अधिपत्याखाली घेतात. गर्नसी मध्ये राहणा-या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. डॉसे अँडम, एलिझाबेथ, इसोला, इबेन आणि एमिली ही मंडळी एका रात्री फिरत असताना नाझी त्यांना घेरतात. कर्फ्युचा भंग केल्याबद्दल जबर शिक्षाब होणार याचा अंदाज येऊन एलिझाबेथ त्यांना आपण द गर्नसी लिटररी अँडज पोटॅटो पील पाय सोसायटी या बुक क्लबचे सदस्य असून त्यांच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्याची थाप ठोकते. नाझीच्या अत्याचारापासून बचाव करण्यासाठी त्याकाळात युरोपमधील सुसंस्कृत समाजाने ज्या क्लृप्त्या केल्या त्यापैकीच एक म्हणजे गर्नसी मधील हा एक बुक क्लब.
महायुद्ध संपल्यानंतर ज्युलिएटला डॉसे अँडमशी पुस्तकांबाबतीत पत्रव्यवहार करताना या बुक क्लब विषयी माहिती मिळते. गर्नसीतल्या नागरिकांचे नाझींच्या काळातले अनुभव कसे असतील याबद्दलची तिची उत्सुकता वाढते. गर्नसीला प्रत्यक्ष जाऊन, बुक क्लबच्या मेंमबर्संना भेटून त्यांचे अनुभव शब्दबद्ध करावे असं ती आपल्या प्रकाशकाला स्टार्कला सांगते. काहीशा नाखुशीनेच तो तिला परवानगी देतो. आपल्या भावी पतीचा, मार्कचा निरोप घेऊन ती गर्नसीमध्ये येऊन दाखल होते.
ज्युलिएटचं सुरुवातीस बुकक्लबच्या मेंबर्सनी केलेलं स्वागत व त्यानंतर ज्युलिएटने त्यापैकी काही सदस्यांशी मैत्रीचे, विश्वासाचे संबंध प्रस्थापित करणं, नाझीच्या काळातील जीवघेणे अनुभव तिला सांगण या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. ज्युलिएटच्या लिखाणाला मदत करण्यासाठी इबेन रॅमसे तिला आपल्या नातवाशी झालेली ताटातूट व त्यावेळीच्या मनस्थितीचं कथन करतो मात्र होऊन गेलेल्या घटनांवर बोलण्यास, जखमांवरील खपली काढून त्या पुन्हा जिवंत करण्यास एमिली तयार नसते. एमिलीच्या वागण्याचा अंदाज लावताना ज्युलिएटला एलिझाबेथ गर्नसीतून गायब असल्याचं लक्षात येतं. डॉसे अँडम जिचा सांभाळ करतोय ती किट एलिझा बेथची मुलगी आहे हेही तिला कळतं. किटचा पिता कोण? डॉसे अँडम की अजून कोणी या प्रश्नांचा शोध घेताना तिला एलिझाबेथ या व्यक्तीबद्दल वेगवेगळी माहिती मिळू लागते. नाझीच्या फौजेत असलेले काही सह्रद अधिकारी ,त्यांच्याशी नागरिकांचे निर्माण झालेले सलोख्याचे संबंध हा अनपेक्षित धागा सुद्धा तिच्या हाती लागतो. एलिझाबेथचा शोध घेण्यासाठी ज्युलिएट मार्कची मदत घेते.महायुद्धानंतर स्वाभिमान जपणा-या लोकांची झालेली ससेहोलपट एलिझाबेथच्या व्यक्तिरेखेतून तिला उमगते.
ज्युलिएटचं गर्नसीमधील वास्तव्य आणि महायुद्धा दरम्यान घडलेल्या घटना यांची सुरेख सरमिसळ पॉल टोथिलच्या संकलनामुळे आपल्याला पहायला मिळते. दोन्ही काळामध्ये साधारण पाच वर्षांचा असलेला फरक झॅक निकोलसने त्याच्या प्रकाशचित्रणातून अचूकपणे टिपलाय. गर्नसी बेटांच्या निसर्गरम्य अवकाशात ज्युलिएट आपल्या पुस्तकाची रचना करत असतानाच तिच्या व डॉसे अँडम मध्ये फुलणा-या हळूवार प्रेमाचा आविष्कार देखील या चित्रपटात पहायला मिळतो. एका पुस्तकाच्या निर्मितीसाठी लेखकाने स्वतःला झोकून देणं,पात्रांच्या मानसिकतेचा शोध लावता लावता स्वतःच्या अस्तित्वाचाही शोध लावणं ही मनोहारी प्रक्रिया द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटीच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येते.
लिली जेम्स व मिशेल हुसमन या दोन सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्यांनी ज्युलिएट आणि अँडमच्या भूमिका केल्यात, लिली जेम्स अतिशय सुंदर दिसते त्याच बरोबरीने लेखिका म्हणून असलेली ज्युलिएटची समाजातील प्रतिमा, गर्नसीमध्ये गेल्यानंतर तिच्यातील शोधक वृत्ती व मार्कला नकार देऊन डॉसे अँडम मध्ये भावनिकरित्या गुंतून जाणं ह्या सर्व छटा तिने छानपणे व्यक्त केल्यात. जेसिका ब्राऊन फिन्डली च्या वाट्याला एलिझाबेथची छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका आलीय. गर्नसी बुक क्लबची फाऊंडर आणि नाझींना सडेतोड उत्तर देणारी एलिझाबेथ जर्मनांनी कैद केल्यानंतर प्रेक्षकांपुढे येत नाही पण तिचं अस्तित्व शेवटपर्यंत जाणवतं. लेखिका म्हणून ज्युलिएटने न भेटलेल्या एलिझाबेथच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणं अधिक अर्थपूर्ण ठरतं. शेवटी लेखक वास्तव व कल्पना यांच्या संयोगातून त्याचं साहित्य वाचकांकडे सोपवत असतो. वाचकही मग त्याचा अन्वयार्थ आपापल्या क्षमतेप्रमाणे लावतात. द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी आपल्याला या साहित्य प्रक्रियेचा अनुभव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते.

संतोष पाठारे

अधिक माहितीसाठी आम्हाला या क्रमांकावर व्हॉट्सअप करा!
Whatsapp Number:+91-9820374093
http://www.prabhatchitramandal.org/index.htm

Address

Dadar East
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Roopwani Magazine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Roopwani Magazine:

Videos

Share

Category


Other Magazines in Mumbai

Show All

You may also like