Maharashtra News Check

Maharashtra News Check Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra News Check, Media/News Company, Pune, Chinchwad.

News Check is Maharashtra’s leading News channel, and the Yash Group, Maharashtra’s leading news Chanel for - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel.

10/08/2024

*राज्यात राबवली 'मुख्यमंत्री योजनादूत' योजना :*

➡️राज्य सरकारने राज्यातील तरुणांसाठी 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत ही योजना राबवली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

➡️सरकारच्या या योजनेअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार देखील करावा लागणार आहे. तसेच राज्य सरकार या कामांसाठी पुढील 6 महिन्यात तब्बल 50 हजार युवकांची नेमणूक देखील करणार आहे. तसेच या तरुणांना दरमहा प्रत्येकी 10 हजार रुपये इतके मानधन देखील दिले जाणार आहे.

*📌योजनेचा लाभ घेण्यासाठी अट काय आहे?*

➡️याशिवाय या सर्व 50 हजार युवकांना मुख्यमंत्री योजनादूत असे संबोधले जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच तरुणांना दिलेले कामकाज शासकीय सेवा म्हणून गृहीत देखील धरले जाणार नाही. या योजनेसाठी तब्बल 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.

➡️सरकारने राबवलेल्या या योजनेत ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी 1 मुख्यमंत्री योजनादूत म्हणून व्यक्तीची नेमणूक केली जाणार आहे. तसेच शहरी भागात देखील प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 व्यक्तीची नेमणूक केली जाणार असल्याचे आदेश सरकारने काढले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे य योजनेसाठी अर्जदार तरुण हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच त्या उमेदवाराचे वय देखील 18 ते 35 वय वर्ष असणे आवश्यक आहे.

25/05/2024

रेडझोन मोजणी दोन लाख कुटुंबांच्या मुळावर, खरेदी-विक्री बंद होणार,बांधकामे ठरणार अवैध, बाजारभावही कोसळणार

दिघी-भोसरी तसेच देहूरोड-रुपीनगर-तळवडे या दोन्ही रेडझोन चा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्याची कुठलीच लक्षणे अद्याप दिसत नाहीत. आता या क्षेत्राची मोजणी करण्याचे काम २४ आणि २६ मे रोजी होत असल्याने उलटपक्षी हे जुने दुखणे अधिक चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संरक्षण विभागाने एक इंचही जागा सोडणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वीच उच्च न्यायालयाला दिल्याने हद्द कमी करण्याचे बाजुलाच राहिले उलट यापुढे जागा तसेच घरांचे खरेदी-विक्री व्यवहारसुध्दा अधिकृतपणे कायमचे बंद होतील, सर्व बांधकामे अवैध ठरतील तसेच बाजार भाव कोसळण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही रेडझोनची मोजणी ही तब्बल दोन लाख कुटुंबांच्या थेट मुळावर आली आहे.

संरक्षण विभागाच्या दारुगोळा निर्माणी, खडकी प्रशासनाने रेड झोन सर्वेक्षणाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला. भारतीय संरक्षण विभागाच्या देहू ॲम्युनेशन डेपो व दिघी मॅगझिन डेपो या भागातील ‘रेडझोन’ चे मार्किंग झालेले नाही. त्यामुळे रेड झोनची मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली होती.

शहरात दिघी-भोसरी, देहूरोड-रुपीनगर-तळवडे तसेच तिसरा नव्याने जाहीर करण्यात आलेला किवळे-रावेत रेडझोन आहे. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपरीगाव, कासारवाडी, दापोडी या भागांना लागूनही लष्करी आस्थापना आहेत. मात्र, देहूरोड दारूगोळा कारखाना आणि दिघी मॅगझीन डेपोमुळे रेडझोन क्षेत्र जाहीर केले आहे. देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या सीमा भिंतीपासून २००० मीटर तर दिघी मॅगझीन डेपो सीमा भिंतीपासून ११४५ मीटर असे संरक्षित क्षेत्र म्हणजेच रेडझोन आहे. या हद्दीत कुठलेही बांधकामे करता येत नाही. काही राजकीय कार्यकर्ते याच क्षेत्रात प्लॉट पाडून लोकांची फसवणूक करत असल्याने राज्याच्या नोंदणी महानिरिक्षकांनी जाहीर प्रकटन काढून या भागातील खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध लादले होते. प्रत्यक्षात त्यानंतरही ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हे व्यवहार सुरू राहिले. महापालिकेने रस्ता, पाणी, वीज, ड्रेनेज सुविधा पुरविल्याने राजकीय आशिर्वादाने हजारो घरांच्या मोठ मोठ्या वसाहती निर्माण झाल्या. देशाच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. लष्कराने त्याबाबत प्रशासनाला वांरवार सांगूनही दुर्लक्ष झाल्याने आता मोजणी होऊन कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी महापालिकेने इंंद्रायणी नदी पूररेषेतील तसेच रेडझोन मधील अवैध बांधकामे भुईसपाट केली. निवडणूक काळात नव्याने झालेली सर्व अवैध बांधकामे पाडायची मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. रेडझोन मोजणी झाल्यावर ते सर्व क्षेत्र लष्कराच्या संरक्षित क्षेत्रात अधिकृतपणे येणार असल्याने त्या जागेवर आजवर झालेली सर्व बांधकामे अवैध ठरणार आहेत. आगामी काळात तब्बल ५० हजारावर अशा बांंधकामांवर बुलडोझर चालवला जाऊ शकतो. भोसरी, दिघी, आळंदी रोड, चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर, वडमुखवाडी, साई मंदिर परिसर, मोशी खाण रस्ता दरम्यानच्या सर्व बांधकामांना हा धोका संभवतो. तिकडे देहूरोड रेडझोन मुळे रुपीनगर, तळवडे, आयटी पार्क, त्रिवेनीनगर, यमुनानगर, भक्तीशक्ती चौक, प्राधिकरण पेठ क्रमांक २१ ते २५ पर्यंतच्या घरांचा परिघ रेडझोन मोजणीत येणार आहे.

मोजणीची ही प्रक्रिया आज २४ मे रोजी दिघी आणि दि.२८ मे रोजी देहूरोड येथे होणार आहे. संरक्षण विभागाच्या ‘एनओसी’ ने जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात महापालिकेच्या पथकाच्या माध्यमातून मोजणी होईल. त्यामुळे ‘रेड झोन’ ची हद्द निश्चित होणार आहे. यमुनानगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, निगडी आणि तळवडे यासह दिघी, भोसरी आणि चऱ्होली येथील रेड झोन बाधित मिळकती निश्चित होणार आहेत.

निवडणूक आली की रोडझोन –

गेल्या २५-३० वर्षांपासून रेडझोनचा प्रश्न कायम आहे. प्रत्येकवेळेला लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूक आली की या प्रश्नावर नेते आश्वासने देतात. प्रत्यक्षात अनेक बैठका, चर्चा, आश्वासने झाली मात्र आजवर हा प्रश्न जैसे थेआहे. पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीला हा प्रश्न सुटला नाही म्हणून या भागातील लोक दहा वर्षापासून मोठ्या आशेने भाजपला मतदान करतात. भाजपचा बोलघेवड्या नेत्यांनी २०१४ व २०१९ च्या विधानसभेत व त्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकित रेडझोन रद्द करण्याचे आश्वासन देऊन मते मिळवली. केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता दहा वर्षे अखंड आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्तेची सूत्रे तर महापालिका भाजपच्या ताब्यात होती. भाजपच्या नेत्यांनी रेडझोन च्या मुद्यावर भोसरी ताब्यात ठेवली, पण आज पर्यंत तो प्रश्न सुटलेला नाही. केवळ मतांसाठी रेडझोन सोडवणार असा कांगावा करायचा आणि निवडणूक संपली की पुन्हा त्या विषयावर बोलायचेच नाही. आता त्याच तिकीटावर तोच खेळ पुन्हा सुरू झाला

02/04/2024
15/03/2024

सूचना और प्रसारण मंत्रालय (I&B) ने अश्लील और अश्लील सामग्री के प्रसार का हवाला देते हुए 18 ओवर-द-टॉप (OTT) प्लेटफार्मों को ब्लॉक कर दिया है. केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर ने क्रिएटिव एक्सप्रेशन की आड़ में अश्लीलता को बढ़ावा देने से बचने के लिए इन पर कार्यवार् की गई है. अनुराग ठाकुर ने इन प्लेटफार्मों की जिम्मेदार ठहराया था जिसके बाद आज इस कदम को उठाया गया है.

15/03/2024

ज्या कंपनीचा फायदा 4-5 करोडही नाही ती कंपनी 1-1.5 हजार करोडोचा इलक्टरोल बॉण्ड कसा घेऊ शकते...??

म्हणजेच भाजपाला नक्कीच कोणीतरी गैरमार्गाने पैसे देत आहे याची चौकशी करावी...??

हा गैरमार्गाचा पैसा भाजपाला सरकारी कामातील टक्केवारीतून मिळाला असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जनतेचा पैश्याचा गैरमार्गाने जात असल्याची नक्कीच चौकशी झाली पहिजे....!!

12/03/2024

Ravindra Waikar
भ्रष्टाचाराच्या
आरोपातून मुक्त
(ED कडून कारवाई मागे)

परिस्थिती कितीही रसातळाला गेलेली असो, 😃 रसा तळाला जाईपर्यंत मटण खाण्याची जिद्द असली पाहिजे...
11/03/2024

परिस्थिती कितीही रसातळाला गेलेली असो, 😃 रसा तळाला जाईपर्यंत मटण खाण्याची जिद्द असली पाहिजे...

मला वडिलांनी विचारले होते की इंजिनिअरिंग की मेडिकल? इंजिनिअरिंग घेतले रिझल्ट आला आणि मार्क्स आले 52 टक्के.  BSC केले, जे...
11/03/2024

मला वडिलांनी विचारले होते की इंजिनिअरिंग की मेडिकल? इंजिनिअरिंग घेतले रिझल्ट आला आणि मार्क्स आले 52 टक्के. BSC केले, जे जे कॉलेजमध्ये आर्किटेक्ट घेतले आणि नापास झालो : आशुतोष

11/03/2024

कलकत्ता हाई कोर्ट के पूर्व जज जस्टिस अभिजीत गंगोपाध्याय बीजेपी में शामिल

Address

Pune
Chinchwad
411044

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra News Check posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share