MCN News

MCN News MCN NEWS -ओळख मराठवाड्याची

मागील 16 वर्षापासून अविरत..अखंडितपणे औरंगाबाद सह मराठवाड्यात
(69)

MCN NEWS -ओळख मराठवाड्याची

मागील 16 वर्षापासून अविरत..अखंडितपणे औरंगाबाद सह मराठवाड्यात निर्भिड व निपक्ष पत्रकारितेचं तप mcn न्युज चॅनलने पूर्ण केलं आहे. प्रत्येक सामान्य माणसाचा आवाज म्हणून MCN NEWS CHANNELमराठवाड्यात ओळखलं जात..स्थानिक वृत्तवाहिनी म्हटलं कि MCN NEWS हे जणू समीकरणच.
मराठवाड्यातील एकमेव डिजिटल प्रक्षेपण, अत्याधुनिक न्युज स्टुडिओ, उच्च दर्जाचं तंत्रज्ञान, अन

ुभवी टीम व मराठवाड्यातील जनतेची साथ हीच mcn ची बलस्थान आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,नांदेड,लातुर, हिंगोली या संपूर्ण परिसरात हॅथवे एम. सी.एन. ने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे.त्यामुळे 10 लाखापेक्षा जास्त प्रक्षेकवर्ग हा नियमित ठरलेला ..
मराठी बातमीपत्र व उर्दूबातमीपत्र याशिवाय प्राइम टाईम,मित्र खाकी वर्दीतला, रणरागिणी, खास बात, खास चर्चा खास डॉक्टरांसोबत, साहित्ययात्री, माझा वार्ड माझं व्हिजन अशे असंख्य लोकप्रिय शो, मुलाखतपर कार्यक्रमाची बौद्धिक मेजवानी दर्शकांसाठी mcn वर अखंडित सुरु आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील प्रत्येक बातमीला न्याय देणार चॅनेल म्हणून mcn न्युज प्रत्येक कसोटीवर खरं उतरलं आहे..त्यामुळेच MCN NEWS ला "ओळख मराठवाड्याची" हे स्लोगन समर्पक ठरलंय यापुढेही मराठवाड्यातील तळागाळातील प्रत्येक माणसाचा आवाज बनत आम्ही पत्रकारितेचा धर्म पाळत राहू...आणि सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष कायम ठेवू..हवीय फक्त आपली साथ

छत्रपती संभाजी नगर च्या पोलीस आयुक्तपदी “प्रवीण पवार -भा.पो.से.” यांची नियुक्ती.
25/06/2024

छत्रपती संभाजी नगर च्या पोलीस आयुक्तपदी “प्रवीण पवार -भा.पो.से.” यांची नियुक्ती.

Doctor SPECIAL SHOW
19/06/2024

Doctor SPECIAL SHOW

MCN News Aurangabad

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वारीत सहभागी होणार आहेत. आषाढी वारीत वारकऱ्यांसोबत ...
19/06/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वारीत सहभागी होणार आहेत. आषाढी वारीत वारकऱ्यांसोबत ते चालणार आहेत. ७ जुलै रोजी बारामती ते सणसर दरम्यान वारी असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वारीत सहभागी होणार आहेत. आषाढी वारीत वारक.....

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या कामातून कार्यमुक्त करूनसुद्धा मुंबई महापालिकेचे 4 हजार 393 कर्मचारी अधिकारी अजूनही कामावर रुज...
19/06/2024

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या कामातून कार्यमुक्त करूनसुद्धा मुंबई महापालिकेचे 4 हजार 393 कर्मचारी अधिकारी अजूनही कामावर रुजू झाले नाहीत. कार्यमुक्त करूनसुद्धा महापालिकेच्या कामावर रुजू न झालेल्या मुंबई महापालिकेच्या 123 कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलं आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या कामातून कार्यमुक्त करूनसुद्धा मुंबई महापालिकेचे 4 हजार 393 कर्मचारी अधिकारी अजूनही का.....

अंबड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. काल ओबीसी आंदोलकांन...
19/06/2024

अंबड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. काल ओबीसी आंदोलकांनी आक्रमक होत धुळे सोलापूर महामार्गावरती टायर जाळून निषेध केला. लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासाळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे काल ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक दिली, आज या ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.

अंबड:ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. काल ओबीसी आं.....

मुंबई: मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संघट...
19/06/2024

मुंबई: मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेची स्थापना केली. तो दिवस होता 19 जून 1966. या संघटनेला आता 58 वर्षे झालीत. या 58 वर्षात अनेक गोष्टी बदलल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेची दोन शकले झाली. एक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहीली तर दुसरी एकनाथ शिंदेंकडे. शिवसेनेतल्या फुटीनंतर होणार हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याचीही दुसरी वेळ आहे. या 58 वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले. शिवसेना विभागली गेली. दोन गट पडले. पण त्यातून साध्य काय झाले याचाच विचार मराठी माणूस करत असेल. ज्याच्या न्याय हक्कासाठी ही संघटना स्थापन झाली होती.

मुंबई: मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यां.....

पुणे: बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आत्महत्य...
19/06/2024

पुणे: बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच आता एका मराठा आंदोलकाने आयुष्याची अखेर करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद देठे असे या तरुणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्यामागणीसाठी त्यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे.

पुणे: बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांन...

वायनाड: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल उत्तर प्रदेशा...
18/06/2024

वायनाड: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल उत्तर प्रदेशातील रायबरेलीसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही विजयी झाले होते. विशेष म्हणजे राहुल वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते. तर रायबरेलीतून त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकली होती. संसदेच्या नियमानुसार राहुल गांधी यांना दोन्हीपैकी एक मतदारसंघ सोडणे आवश्यक होता. त्यामुळे त्यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. आता राहुलच्या जागी त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वायनाडची पोटनिवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यांनी त्यांचा निर्णय जाहीर करताच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झालीय. विरोधी पक्ष भाजपासह काँग्रेसच्या मित्रपक्षानंही राहुल गांधींच्या निर्णयावर टीका केली.

वायनाड: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल उत्.....

मुंज्या:बॉलीवूडमध्ये सध्या मराठी दिग्दर्शकांचा दबदबा पाहायला मिळतोय. समीर विद्वंस, आदित्य सरपोतदार  यांसारख्या दिग्दर्शक...
18/06/2024

मुंज्या:बॉलीवूडमध्ये सध्या मराठी दिग्दर्शकांचा दबदबा पाहायला मिळतोय. समीर विद्वंस, आदित्य सरपोतदार यांसारख्या दिग्दर्शकांच्या गोष्टी बॉलीवूड आणि प्रेक्षकांना आवडत असल्याचं चित्र असून त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसतोय. नुकताच आलेला आदित्य सरपोतदारचा 'मुंज्या'हा सिनेमा त्यातीलच एक आहे. कमी बजेट, मोठी स्टारडम नसतानाही मुंज्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलीये. अवघ्या चारच दिवसांत या सिनेमाने त्याचं बजेट कव्हर केलं. पण मराठी दिग्दर्शकाचा हा सिनेमा मराठीत का तयार झाला नाही? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय. त्यावर स्वत: दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने बोलताना भाष्य केलं आहे.

मुंज्या: बॉलीवूडमध्ये सध्या मराठी दिग्दर्शकांचा दबदबा पाहायला मिळतोय. समीर विद्वंस, आदित्य सरपोतदार यांसारख्या...

वसई: वसईमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. भर रस्त्यात एक तरूणीची हत्या करण्यात आली आहे. लोखंडी पाना तरूणीच्...
18/06/2024

वसई: वसईमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. भर रस्त्यात एक तरूणीची हत्या करण्यात आली आहे. लोखंडी पाना तरूणीच्या डोक्यात वार करण्यात आले. त्यात त्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. आरती रामदुलार यादव असं तरूणीचं नाव आहे. ती 22 वर्षाची होती. तर रोहित रामनिवास यादव याने या तरूणीचा खून केला. त्याचे वय 29 वर्ष आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे.

वसई:वसईमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. भर रस्त्यात एक तरूणीची हत्या करण्यात आली आहे. लोखंडी पाना त....

मुंबई: राज्यात उद्यापासून 17 हजार 471 जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत. विशे...
18/06/2024

मुंबई: राज्यात उद्यापासून 17 हजार 471 जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत. मात्र, ही भरतीप्रक्रिया जनी 2022-23 ची असून दीड ते 2 वर्षे उशिराने जाहिरात निघाली आहे. त्यामुळे, सुमारे 2 ते 3 लाख उमेदवार एजबार झाले आहेत. त्यामुळे, त्यांना या भरतीप्रक्रियेत अर्ज करता येत नाही. त्याच, अनुषंगाने या उमेदवारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, उत्पादन शुल्क मंत्री शुभराजे देसाई यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावर, मंत्री महोदयांकडून आश्वासन देण्यात आलं आहे.

मुंबई : राज्यात उद्यापासून 17 हजार 471 जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत. विशेष म.....

माढा: लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या खटके उडताना दिसत आहेत. अनेक मत...
18/06/2024

माढा: लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या खटके उडताना दिसत आहेत. अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत. माढ्यात हा वाद आता वाढताना दिसतोय. भाजपचे माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही स्थिती राष्ट्रवादीचे काम करणार नाही अशी भूमीकाच घेतली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेली ही दरी कशी भरून काढायची यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा कस लागणार आहे.

माढा: लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या खटके उडताना दिसत आहे.....

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटामध्ये प्र...
18/06/2024

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटामध्ये प्रत्येकी 3 पक्ष आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात जागावाटपाचा पेच निर्माण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरची जागा महायुतीसाठी डोकेदुखी बनलीय.

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटाम...

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील अशा चर्चा जो...
16/06/2024

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील अशा चर्चा जोरदार रंगली होत. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडी कडून नवीन उमेदवाराचे नाव समोर आलं. यानंतर राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली. मात्र आता निवडणुकीनंतर या लोकसभेत महाविकास आघाडी कडून माझी फसवणूक करण्यात आली असा, आरोप राजू शेट्टींनी केला आहे. निवडणुकीपूर्वी सकारात्मक चर्चा झालेली असताना सुद्धा जे करायचं तेच महाविकास आघाडीने केलं असं शेट्टी म्हणालेत.

कोल्हापूर:लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील अश....

जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते  लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण सुरू आहे.  आमरण ...
16/06/2024

जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनाची गरज नसल्याचं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडेंनी व्यक्त केलं आहे. त्यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तायवाडे यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण सुरू आह....

दिल्ली: लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत सभापतीपदावरून एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षां...
16/06/2024

दिल्ली: लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत सभापतीपदावरून एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये शाब्दिक हल्ले सुरुच आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहेत. दुसरीकडे JDU ने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

दिल्ली(Delhi): लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत सभापतीपदावरून एनडीए आणि इंडिया आघाडी....

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे.  यूट्युबवर व्हिडीओ अपलोड करत बिश्नोई गॅंग नावाने ही धमकी दे...
16/06/2024

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे. यूट्युबवर व्हिडीओ अपलोड करत बिश्नोई गॅंग नावाने ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील बुंदीमधून अटक केली आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे. यूट्युबवर व्हिडीओ अपलोड करत बिश्नोई गॅंग नावाने ही ध....

टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8(T20 World Cup Super 8)फेरीसाठी इंग्लंडचा संघ क्वालीफाय झाला आहे. आतापर्यंत 7 संघ सुपर 8 साठी ...
16/06/2024

टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8(T20 World Cup Super 8)फेरीसाठी इंग्लंडचा संघ क्वालीफाय झाला आहे. आतापर्यंत 7 संघ सुपर 8 साठी पात्र झाले आहेत. आता बांगलादेश की नेदरलँड कोणता संघ सुपर 8 मध्ये जाणार हे पाहावं लागेल. बांगलादेशचा संघ पात्र होण्याची शक्यता दाट आहे. कारण बांगलादेशचा संघ नेपाळविरोधात भिडणार आहे. हा सामना जिंकताच बांगालादेश सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. येत्या 19 जूनपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8(T20 World Cup Super 8)फेरीसाठी इंग्लंडचा संघ क्वालीफाय झाला आहे. आतापर्यंत 7 संघ सुपर 8 साठी पात्र झाले आ...

भिवंडी: तेलंगणातील भाजप आमदार आणि हिंदू धर्माचे प्रचारक आमदार टी. राजा यांचा भिवंडीतील दौरा अगोदरच वादग्रस्त ठरला होता. ...
16/06/2024

भिवंडी: तेलंगणातील भाजप आमदार आणि हिंदू धर्माचे प्रचारक आमदार टी. राजा यांचा भिवंडीतील दौरा अगोदरच वादग्रस्त ठरला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टी. राजा यांच्या भाषणाला परवानगी न देण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही भिवंडीत त्यांचा नियोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी, केलेल्या भाषणातून त्यांनी पु्न्हा एकदा 400 पारच्या नाऱ्यावर भाष्य केलं. भाजपने 400 पारचा नारा दिला, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला असा दावा महायुतील सहकारी पक्षांच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यात, आता टी राजा यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आमदार टी. राजासिंह यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.

भिवंडी: तेलंगणातील भाजप आमदार आणि हिंदू धर्माचे प्रचारक आमदार टी. राजा यांचा भिवंडीतील दौरा अगोदरच वादग्रस्त ठरल...

जळगाव: रक्षा खडसे यांची केंद्रीय क्रीडा व युवा राज्यमंत्री पदी वर्णी लागली. त्या रावेर लोकसभेतून त्यांनी हॅटट्रिक केली आ...
15/06/2024

जळगाव: रक्षा खडसे यांची केंद्रीय क्रीडा व युवा राज्यमंत्री पदी वर्णी लागली. त्या रावेर लोकसभेतून त्यांनी हॅटट्रिक केली आहे. एककडे राज्यात भाजपच्या दिग्गजांना पराभवाची चव चाखायला मिळत होती. त्याच वेळी रक्षा खडसे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्याचे बक्षिसही त्यांना केंद्रात मिळाले. त्यांच्यावर क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच जळगावात आल्या. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले गेले. त्यानंतर त्यांनी जी एक कृती केली त्याने सर्वच जळगावकरांची मने त्यांनी जिंकली.

जळगाव: रक्षा खडसे यांची केंद्रीय क्रीडा व युवा राज्यमंत्री पदी वर्णी लागली. त्या रावेर लोकसभेतून त्यांनी हॅटट्रि...

नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे ,भाजप आमदार रा...
15/06/2024

नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे ,भाजप आमदार राहुल ढिकले देवयानी फरांदे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र या बैठकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे ,भाजप .....

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सभागृहात बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या ...
14/06/2024

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सभागृहात बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली 17 जून रोजी होणारा बकरी ईद हा सण हिंगोली शहरात शांततेत साजरा करण्याच आवाहन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केलं

MCN News AurangabadMCN NEWS | हिंगोलीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बकरी ईद निमित्त शांतता समितीची आढावा बैठक संपन्न.....

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा.वसंतराव चव्हाण हे खासदार झाल्यानंतर आज शुक्रवारी नरसी येथील बालाजी मंदीर येथे स...
14/06/2024

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा.वसंतराव चव्हाण हे खासदार झाल्यानंतर आज शुक्रवारी नरसी येथील बालाजी मंदीर येथे सपत्नीक दर्शन घेतले

MCN News AurangabadMCN NEWS | खा.वसंतराव चव्हाण यांचा भिलवंडे परीवाराकडून सत्कार ....

झाडे लावा झाडे जगवा या युक्ती म्हण कळणार नाही सिमेंटची कीतीही मोठी बिल्डिंग बांधली तरी आपल्याला सावली हे झाडे च देतात म्...
14/06/2024

झाडे लावा झाडे जगवा या युक्ती म्हण कळणार नाही सिमेंटची कीतीही मोठी बिल्डिंग बांधली तरी आपल्याला सावली हे झाडे च देतात म्हणून झाडे किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना संवाद साधताना उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स येथे शाळेच्या पहिल्या दिवशी अकराशे विविध (३४) प्रजातींची झाडे वृक्षारोपण वृक्ष वाटप करण्यात आली यावेळी ते बोलत होते

MCN News AurangabadMCN NEWS | अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स येथे अकराशे विविध ३४ प्रजातींची झाडे वृक्षारोपण

यंदा हवामान खात्याने पावसाचे चांगले संकेत दिले असले तरी तालुक्यामध्ये अद्याप  मोठा पाऊस झालेला नाही  परंतु मागील दोन दिव...
14/06/2024

यंदा हवामान खात्याने पावसाचे चांगले संकेत दिले असले तरी तालुक्यामध्ये अद्याप मोठा पाऊस झालेला नाही परंतु मागील दोन दिवसात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्याने खते बी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाल्याचे दिसून येते.

MCN News AurangabadMCN NEWS | वाशीमध्ये बी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी......शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू

शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकाची शाळा मोहिमेतंर्गत आज पैठण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र तसे च स्टेट बँक ऑफ इंडि...
14/06/2024

शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकाची शाळा मोहिमेतंर्गत आज पैठण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र तसे च स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रोहीदास नगर व भाजी मंडी यासह पैठण औरंगाबाद जालना ग्रामीण बँकेच्या शाखेत जाऊन पीक कर्ज प्रकरणाची माहिती घेतली.आणि उबाठा शिवसेनेच्या वतीने शहरातील बँकेसमोर जोरदार आंदोलन केले.

MCN News AurangabadMCN NEWS | पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांच्या समोरउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकां.....

वैजापूर तालुक्यातील लाडगाव रस्त्यावरील पॅथॉलॉजी लॅब मध्ये भर दिवसा प्रवेश करत २५ हजार रुपयांची रोख रक्कम पळवल्याची घटना ...
14/06/2024

वैजापूर तालुक्यातील लाडगाव रस्त्यावरील पॅथॉलॉजी लॅब मध्ये भर दिवसा प्रवेश करत २५ हजार रुपयांची रोख रक्कम पळवल्याची घटना उघडकीस समोर आली आहे.

MCN News AurangabadMCN NEWS | पॅथॉलॉजी लॅबमधून भरदिवसा पळविली रक्कम चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद..... वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथी.....

बालाजी इव्हेंट अँड एंटरटेनमेंट कंपनी यांच्या वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या इंडिया फॅशन फीस्ट मॉडेलिंग फॅशन शो 2024 मध्...
14/06/2024

बालाजी इव्हेंट अँड एंटरटेनमेंट कंपनी यांच्या वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या इंडिया फॅशन फीस्ट मॉडेलिंग फॅशन शो 2024 मध्ये छत्रपती संभाजी नगरच्या स्वप्निल गुडेकर यांनी द्वितीय पदक पटकावले

MCN News AurangabadMCN NEWS | छत्रपती संभाजीनगरच्या अभिनेत्याने मारली बाजी..... पुण्यात आयोजित इंडिया फॅशन फीस्ट मॉडेलिंग फॅशन शोमध....

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबविल...
14/06/2024

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबविला जात आहे या आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महानगरपालिका मधील वर्ग एक आणि वर्ग दोन मधील 56 अधिकाऱ्यांची मनपाच्या 56शाळासाठी पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे

MCN News AurangabadMCN NEWS | मनपा शाळासाठी 56 पालक अधिकारी यांची नियुक्ती ....प्रवेशोत्सव उपक्रमात होणार सहभागी.....

आचार संहिता काळात परिक्षा न घेताच समाज कल्याण विभागाने वृध्द कलावंताच्या 100 फ़ाईलीनां मंज़ूरी कशी दिली असा प्रश्न उपस्थ...
14/06/2024

आचार संहिता काळात परिक्षा न घेताच समाज कल्याण विभागाने वृध्द कलावंताच्या 100 फ़ाईलीनां मंज़ूरी कशी दिली असा प्रश्न उपस्थित करत विविध मागण्यांसाठी वृध्द संघटनेच्या वतीने आज छत्रपती सभाजीनगर जिल्हाधिकारी यांना नीवेदन देत संबंधिताची चौकशी करण्याची मागनी केली .

MCN News AurangabadMCN NEWS | आचार संहिता काळात परिक्षा न घेता समाज कल्याण विभागाने वृध्द कलावंताच्या 100 फ़ाईलीनां मंज़ूरी दिली कशी...

Address

MCN News
Aurangabad
431003

Telephone

+918805495555

Alerts

Be the first to know and let us send you an email when MCN News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MCN News:

Videos

Share

Nearby media companies


Other Aurangabad media companies

Show All

You may also like