Marathwada Update
- Home
- India
- Aurangabad
- Marathwada Update
मराठवाड्याचं हक्काचं असं आपलं व्यासप
(2)
Address
N-7, Cidco
Aurangabad
431003
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Marathwada Update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Marathwada Update:
Shortcuts
Category
मराठवाडा अपडेटची सुरूवात
साधारण २०११-१२ साली मी नोकरी निमित्ताने पुण्यात राहात असताना मला नेहमी औरंगाबादची आठवण यायची. वाटायचं औरंगाबादमध्ये काय सुरू आहे. काय घडतंय, काय बदल होताहेत. नवीन काय सुरू झालंय, काय बंद पडलंय असे एक ना हजारो प्रश्न मनात येत होते. औरंगाबाद पाहिलं तर तसं मोठं शहर, मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे आणि भौगोलिक अडचणींमुळे मात्र ते इतर शहरांच्या मागे पडले. परिणामी इथल्या तरूणांना रोजगारासाठी शहरसोडून बाहेर पडावं लागलं. त्यातलाच मी एक. मात्र औरंगाबादमधून बाहेर पडलेल्या प्रत्येकामध्ये औरंगाबादविषयीची आत्मियता नेहमी कायम राहिली. उलट मी म्हणेल की शहराबाहेर पडलं की शहराबद्दलची ओढ अजून वाढते. तसंच काही माझं झालं. मी मिडियामध्ये काम करत असल्याने मला औरंगाबादमध्ये जे काही घडतंय ते कळत होतं. मात्र इतरांच तसं नव्हतं. ते तर शहरापासून पार तुटलेलेच झाले होतेे. तेव्हा फेसबुकचं जग नवनवंच होतं. मुंबई-पुण्यात फेसबुकने चांगले पाय पसरले होते. मात्र औरंगाबादकरांना अजून हे जग नवं नवंच होतं. त्यामुळे मी ठरवलं की, 'औरंगाबाद अपडेट' नावाने एक ग्रूप सुरू करून या व्हर्च्यूअल जगातल्या तरूणांना जे शहरापासून दूर आहेत, त्यांना औरंगाबादमध्ये काय घडतंय ते सांगूया. आणि मग २१ ऑगस्ट २०११ ला हा ग्रूप मी सुरू केला. सुरूवातीला माझ्या ओळखीच्या काही लोकांना यात मी अॅड केलं आणि हा ग्रूपमग वाढू लागला. जसजसे दिवस पुढे जात होते तसं तसे या ग्रूपशी जोडून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि आज ९ वर्षात औरंगाबाद अपडेटचं हे कुटुंब ३०,००० सदस्यांचं होत आहे. आता या कोरोनाच्या काळात जिथे आपण शेजाऱ्यांनासुध्दा भेटू शकत नाही. तिथे दूरवर असलेल्या आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना आपल्या शहरात काय घडतंय हे जाणून घेण्याची प्रचंत आतूरता असते. तेव्हा त्यांच्या मदतीला औरंगाबाद अपडेट आलं. आणि शहरातील प्रत्येक घडामोडीची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवली. या सर्वामध्ये तुमची साथ खुप मोलाची राहिली. हे सर्व घडत असताना आम्हाला अनेक अशा विनंत्या आल्या की, तुम्ही इतर जिल्ह्यांबद्दली काही तरी सांगा. आमचे नातेवाईक या जिल्ह्यात अडकले आहेत, त्या जिल्ह्यात अडकले आहेत. आमच्या गावात काय सुरू आहे हे सांगा.. अशा अनेक सुचना, विनंत्या आम्हाला आल्या. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण आता औरंगाबादच्या पुढे काही तरी विचार करायला हवा. संपूर्ण महाराष्ट्राबद्दल काम करण्यासाठी अनेक न्यूज चॅनल्स आहेत. मात्र मराठवाडा हा असा भाग आहे जो माध्यमांमध्ये दुर्लक्ष ठरलेला आहे. त्यामुळे आम्ही मराठवाड्यावर फोकस करायचं ठरवलं. तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून रोजगारासाठी, शिक्षणासाठी, उपचारांसाठी औरंगाबादमध्ये अनेक नागरिक येतात. त्यामुळे आम्ही मराठवाड्याचं पेज सुरू करायचं ठरवलं. सध्या आम्ही सुरूवातीच्या टप्प्यात आहोत. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. जसं तुम्ही औरंगाबाद अपडेटला मोठं केलं, तसंच तुम्ही या सुध्दा पेजला मोठं करावं. वारंवार या पेजला भेटी द्याव्यात. या पेजवरील पोस्ट इतरत्र शेअर कराव्यात, जेणे करून मराठवाड्यातील सर्वच नागरिकांपर्यंत हे पेज पोहोचेल. तसेच तुमच्या काही सुचना असतील तर त्याही सांगा. आम्ही त्यावरही विचार करू. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि तुम्ही ते कराय अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद! आपला ॲडमिन मित्र मराठवाडा अपडेट