Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र

  • Home
  • Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र

Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र टाइम महाराष्ट्र हे राजकीय आणि मनोरंजन बातम्यांसाठी महाराष्ट्रातील आगामी माध्यमांपैकी एक आहे. India's upcoming Media & Entertainment company.

Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News. It Brings together a blend of Media and IT skills backed by a deep understanding of global media and entertainment industry. Currently based in Mumbai with operations across pan India.

10/12/2024

लाखो बहिणींच्या पैश्यांवर येणार सरकारी प्रश्नचिन्ह। Ladki Bahin Yojana

१५ ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसकट प्रति महिना दीड हजार रुपये मिळाले खरे, पण यासाठी काही बंधन, मर्यादा आणि अटी सरकारने घालून दिल्या होत्या. आता आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ तीन महिन्यांमध्ये अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांच्या अर्जांची पडताळणी करणं शक्य नव्हतं. अशी सबब सांगत आता सरकारने पाच अटी पाळणाऱ्या बहिणींनाच येत्या १ एप्रिल पासून प्रति महिना २१०० रुपये मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. अर्थात या गोष्टीला सरकारने अजून अधिकृत दुजोरा दिला नसला तरी सरकारी स्तरावर सुरू असलेल्या हालचालीनुसार मात्र कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, घरातील चार चाकी वाहन, पाच एकर पेक्षा अधिक जमीन नसावी, एकाच लाभार्थ्यांनी दुसऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले नसावेत. या पाच अटी काटेकोरपणे तपासल्या जाणार आहेत असं समजतंय या अटींमधून पात्र असलेल्या महिलांनाच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे असं बोललं जातंय.

10/12/2024

‘दुकाने’ लावणाऱ्या आमदार- अधिकाऱ्यांना जमालगोटा, ठेकेदार आणि अधिकारीही ‘कामाला’ । Devendra Fadanvis.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या महापालिका ते जिल्हापरिषद योजनांची WorkOrder काढू नये अश्या सूचना नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. शिंदेंच्या योजना, त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना ‘कामाला’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘दुकानदारी’ करणाऱ्या आमदारांना समज देण्यात आली आहे. त्यामुळे आमदार, अधिकारी आणि ठेकेदार हे फडणवीस यांच्या नव्या अंदाजाने पार हादरून गेले आहेत. या सगळ्यांना हादरवणाऱ्या फडणवीसांना नेमका कोणावर सूड उगवायचाय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

10/12/2024

10/12/2024

कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात ७ जणांचा मृत्यू तर तब्बल ४८ जण जखमी | Kurla Bus Accident

कुर्ल्यात सोमवारी रात्री जे घडलं ते खूप आश्चर्यजनक होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या एका भरधाव बसने अनेक गाड्यांना धडक दिली आणि निष्पाप नागरिकांना चिरडले. या घटनेत ७ जणांनाच मृत्यू झाला आहे. तर ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

09/12/2024

कोण आहे कोणती भारी ? Devendra Fadnavis । Eknath Shinde । Ajit Pawar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली. महाविकास आघाडीचा महायुतीने दारूण पराभव केला आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आले. विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्रित काम केलं. महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर हे तिन्ही नेते पुढील पाच वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत दिसले असणार आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतबदल आता फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार त्याच भूमिकेत म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. या तिन्ही नेत्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​

09/12/2024

राहुल नार्वेकरांच्या कोणत्या निर्णयाने बदलली महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती.. | Rahul Narvekar

09/12/2024

09/12/2024

Eknath Shinde यांनी सभागृह गाजवलं! पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला घातला हात | CMO DF

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. निर्वावाद बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोणावरही फारशी टीका न करता आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाषा केली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करत ते नेमकं काय म्हणाले हे एका व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया

,

09/12/2024

मंत्रिमंडळाचा तोंडवळा कसा? फडणवीसांचा चेहरा जसा, जुन्या- नव्यांचा मेळ तसा !

मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी तिन्ही पक्षात नेत्यांची धावाधाव सुरू आहे. शिंदेंची Shivsena असो की पवारांची NCP दोन्ही पक्षातील नेत्यांनी आधी पासूनच फडणवीसांवर श्रद्धा ठेवत फिल्डिंग लावलीय.

09/12/2024

09/12/2024

विधानसभा विशेष अधिवेशन दिवस - ३ | Live

08/12/2024

Address

Pinnacle Corporate Park

Alerts

Be the first to know and let us send you an email when Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share