Rajput Rang weekly newspaper is dedicated to facilitate the coordination and better communication between Rajput community which is spread in Maharashtra state. आदरणीय समाज बांधवांनो आणि भगिनींनो,
ज्या समाजात आपण वावरतो, ज्या समाजात आपल्या मुलाबाळांचे लग्न होणार त्या समाजाची एकूण किती गावे आहेत? त्या पैकी किती लोकांना आपण ओळखतो? आपल्या समाजातील किती मुले-मुली उच्च-शिक्षण घेत आहेत? दर शेकडा मुलांच्
या मागे मुलींचे प्रमाण किती आहे? हे प्रमाण इतके जास्त आहे का, कि मुलींना हुंडा द्यावा लागावा? हे व या सारखे असंख्य प्रश्न आहेत..
आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कार्यरत आहोत, अपल्या वयक्तिक, कौटुंबिक प्रगती समवेत अपना सार्वांवर आपल्या समाजाचीही तेवढीच जबाबदारी आहे. आपल्या सामाजिक समस्येंसाठी, समाज हितासाठी वर्षातील एक महाराणा प्रताप जयंती पुरेशी आहे का? खरंच का आपला राजपूत बाणा फक्त वर्षात एकंच वेळ जागृत होतो? बंधू-भगिनींनो, वेळीच आपण समाज संघटनेचे कार्य न केल्यास आपली अधोगती अटळ आहे..
आपल्या समाजात योग्य समन्वय घडून आणण्यासाठी दस-याच्या पावन पर्वावर, महाराणा प्रतापसिहच्या उदयपुरस्थित वंशज भिसा महाराणी पद्माजाजीच्या सहाय्याने प्रकाशित होणा-या साप्ताहिक ‘राजपूत रंग’ ला तन-मन-धनाने एकत्रित येउन भर-भरून प्रतिसाद द्या....
“हम मृत्यू वरन करनेवाले जब जब हथियार उठाते है, तब पाणी से नाही शोणित से अपनी प्यास बुझाते है, हम राजपूत विरोंका जब सोया अभिमान जागता है, तब महाकाल भी चारानोंपे प्राणो कि भिक मांगता है.”