15/12/2022
नांदेड जिल्हा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आमदार मा.श्यामसुंदर शिंदे साहेब, माननीय सर्व माजी खासदार, आमदार, अंतेश्वरचे भूमीपुत्र मा.संजयजी कराळे, मा. बाळासाहेब कराळे, मा. सतीश कराळे व ज्या ज्या राजकीय पक्षात, विविध संघटना, संस्था स्तरावर जे जे मान्यवर कार्यरत आहेत, त्या सर्वांनी अंतेश्वरच्या सर्वांगीण विकासाबरोबरच "तीर्थक्षेत्रीय गतवैभव पुन:स्थापनेसाठी" सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन प्रयत्न करावेत ही माझी मनोमन इच्छा आहे. पवित्र तीर्थक्षेत्र व श्रध्दास्थानं विकसित करण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर विविध योजना कार्यान्वित आहेत. त्यांचा लाभ घैऊन अंतेश्वरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करावे आणि गतकालीन तीर्थक्षेत्राचे वैभव या माध्यमातून पुन्हा प्राप्त करुन घ्यावे असे मलाच नव्हे तर कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. गावोगावी न भूतो न भविष्यातही असा विकास बहुतांश श्रध्दास्थानांचा व तीर्थ क्षेत्राचा विकास साध्य करण्यासाठी समस्त गावकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना दिसून येत आहे. मग आपणच या कामी का म्हणून मागे राहायचे, याचा (माफ करा) राजकीय अहंकार, वैचारिक मतभेद बाजूला सारुन व खांद्याला खांदा लावून करुन घेतल्यास भावी पीढ्या नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत.
आपला जन्मगाव, श्रध्दास्थान व पावित्र्य जपतांनाव त्याचा लोकाभिमुख असा विकास साधून घेताना कधीच राजकारण आडवे न आणता शासन स्तरावरील योजनांचा फायदा सर्वांनी मिळून घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी या कामी आवर्जून सहकार्य करावे ही माझी विनम्र प्रार्थना आहे.