Atul Bansode

Atul Bansode Be Happy

09/09/2024

मुख्यमंत्री योजनादूत'च्या माध्यमातून काम
जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराची उत्तम संधी..

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.

या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी त्यांचे नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून आपला अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत करावा.

09/09/2024

मराठवाड्यात बनणार 180 वंदे भारत स्लीपर ट्रेन. लातूरमध्ये 351 एकरात आहे प्लांट. 10000 लोकांना मिळणार रोजगार.

09/09/2024
09/09/2024
09/09/2024
09/09/2024
09/09/2024

गणेशोत्सवाच्या आगमनाची वर्षभर आपण आतुरतेने वाट पाहतो.. यंदा 'तेरणेचा राजा' गणेशोत्सवातून गणरायाचा नाविन्यपूर्ण आणि आदर्श असा उत्सव आपण साजरा करणार आहोत.. श्री गणेशाची सर्वांवर कृपा राहावी हीच प्रार्थना..

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

#गणेशोत्सव

09/09/2024
09/09/2024
09/09/2024
09/09/2024

लेडीज क्लबच्या वतीने गौरी-गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन : हजारोंची बक्षीस जिंकण्यासाठी नक्की सहभागी व्हा!

लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आपले कलाविष्कार सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

यावर्षी दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती आगमनानंतर दि.१० सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. जिल्हाभरात गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो.
महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यामध्ये लेडीज क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. याच अनुषंगाने लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषक रु.१०,००१ असून दुसरे पारितोषिक रु.७००१ तर तिसरे पारितोषिक रु.५००१ ठेवण्यात आले आहे. दि.११ व १२ सप्टेंबर २०२४ रोजी परीक्षक हे स्वतः येऊन परीक्षण करतील. त्यानंतरच विजेत्यांची नावे जाहीर होतील. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील महिला या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. तरी जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खालील नंबर वर संपर्क करावा. श्री.गडकर- ७९७२२३९९२०, श्री.लक्ष्मण माने-८१६९५६६५१७, श्री.अतुल अदमाने- ९४२०४७७८८७, श्री.अविराज खांडेकर -७६६६५८१४५१, श्रीमती सर्जे मॅडम- ८९९९३८५४८६ , सौ.अस्मिता कांबळे - ९९७५२२७७७४, सौ.अर्चना पाटील - ९८२१३३९३९०

#गौरी #गणपती #महिला #स्पर्धा #धाराशिव

09/09/2024

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. ९० दिवसांसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार!

केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे..

त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल अनुदान द्यावे या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ९० दिवसांकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे..

#महायुती_सरकार #निर्णय #सोयाबीन #हमीभाव

08/09/2024

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

देशभरात गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. नकारात्मक विचारांना नाहीसा करणारा हा उत्सव आपल्या सगळ्यांच्या घरी सुख, समृध्दी, ऐश्वर्य, शांती आणि आरोग्य घेऊन येवो हीच गणराया चरणी प्रार्थना..

#गणेशोत्सव

08/09/2024

लेडीज क्लबच्या वतीने गौरी-गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन : हजारोंची बक्षीस जिंकण्यासाठी नक्की सहभागी व्हा!

आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या पुढाकारातून लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आपले कलाविष्कार सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

यावर्षी दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती आगमनानंतर दि.१० सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. जिल्हाभरात गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो..

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यामध्ये लेडीज क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. याच अनुषंगाने लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषक रु.१०,००१ असून दुसरे पारितोषिक रु.७००१ तर तिसरे पारितोषिक रु.५००१ ठेवण्यात आले आहे. दि.११ व १२ सप्टेंबर २०२४ रोजी परीक्षक हे स्वतः येऊन परीक्षण करतील. त्यानंतरच विजेत्यांची नावे जाहीर होतील. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील महिला या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. तरी जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत भाग घ्यावा..

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खालील नंबर वर संपर्क करावा. श्री.गडकर- ७९७२२३९९२०, श्री.लक्ष्मण माने-८१६९५६६५१७, श्री.अतुल अदमाने- ९४२०४७७८८७, श्री.अविराज खांडेकर -७६६६५८१४५१, श्रीमती सर्जे मॅडम- ८९९९३८५४८६ , सौ.अस्मिता कांबळे - ९९७५२२७७७४, सौ.अर्चना पाटील - ९८२१३३९३९०

#गौरी #गणपती #महिला #स्पर्धा #धाराशिव

08/09/2024

धाराशिवचे सुपुत्र श्री.चेतन सपकाळ यांनी जागतिक डेफ नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत २५ मीटर (रॅपिड फायर पिस्तूल) मध्ये ब्राॅंझ पदकाची कमाई केली या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन..

२०२४ जर्मनी (हॅनहोअर) येथे सुरू असलेल्या दुसऱ्या जागतिक डेफ नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत चेतनने तिसरे स्थान प्राप्त करून २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मध्ये वैयक्तीक ब्राॅंझ पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतील चेतनचे हे दुसरे पदक आहे.

चेतन हा गेल्या सहा वर्षांपासून पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुलमध्ये तर गेल्या वर्षापासून भोपाळ येथील राष्ट्रीय क्रिडा संकुलाच्या रेंज मध्ये सराव करीत आहे.

प्रशिक्षक जयवर्धनसिंह, पी.एन.प्रकाश, कॅप्टन सी.के.चौधरी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एन.आर.ए.आय च्या प्रशिक्षक प्रिती शर्मा यांनी चेतनला मार्गदर्शन केले आहे.

चेतनने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून त्यामुळे देशात धाराशिव शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन.

#जर्मनी #डेफ_नेमबाजी_चॅम्पियनशिप

08/09/2024

आद्यपूजेचा मान असणारा गजानन हा स्वतः अत्युच्च प्रगतीचे आणि विकासाचे एक प्रतीक आहे. त्याच्या आशीर्वादाने प्रगतीसाठी कटिबद्ध होऊया..

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
..गणपती बाप्पा मोरया!!

#गणेशोत्सव

Address

Tuljapur
413501

Telephone

+918563118962

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Bansode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Atul Bansode:

Share

Category

Nearby media companies


Other TV Networks in Tuljapur

Show All