News Thane

News Thane Daily News update of Thane District, Thane city.

17/01/2025

एन के टी महाविद्यालयाचा कला महोत्सव “ सोनोरस ”ला मोठ्या उत्साहात सुरुवात

#ठाणे

17/01/2025

ठाण्यातील शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम

17/01/2025

सीजीएचएसचे वेलनेस सेंटर ठाण्यातील चरई येथे सुरू होणार,खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी प्रस्तावाला मंजूरी

#ठाणे

17/01/2025

समाजसेवक विकास दाभाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

17/01/2025

रस्ता सुरक्षा अभियानातर्गत सिग्नल बॉय संकल्पना

ठाणे दि : प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे व सिग्नल शाळा तीन हात नाका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने व प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हात नाका सिग्नल येते सिग्नल बॉय ही संकल्पना राबवण्यात येत आहे यामध्ये सिग्नल शाळा येथील विद्यार्थी व ठाणे आरटीओचे अधिकारी यांच्यामार्फत तीन हात नाका सिग्नल येथे सिग्नल ला थांबलेल्या वाहनांना रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येत आहे तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे व सिग्नल बॉय यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा संदेश वाहतुकीचे नियम व रोड साईन्स बाबत माहिती देण्यात येत आहे.यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे, सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक शिवली सोमवंशी, जयश्री झिने,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अवधूत पाटील, स्नेहा चौधरी, सिग्नल शाळेचे भटू सावंत आदिसह मान्यवर उपस्थित होते.

16/01/2025

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ‍शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

#ठाणे

16/01/2025

ठाण्यात ९०० हून अधिक महिला,युवा वर्गाकडून भाजपाचे सदस्यत्व

★ भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून रेल्वे स्टेशनबाहेर विशेष मोहीम

#ठाणे #भाजपा

16/01/2025

अभिनेता सैफ अली खान वरती हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद..

16/01/2025

लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा,
मालवणी महोत्सवात माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांचा मराठी माणसाला सल्ला

#ठाणे

16/01/2025

महिला बुवांची डबलबारी'

कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दि. १९ जानेवारी पर्यंत " मालवणी महोत्सव-२०२५चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. मालवणी महोत्सवात गुरुवार महिलांच्या डबलबारीचा जंगी सामना कोकणातील बुवा सौ.साची मुळम आणि कु. भारती पाळेकर* यांच्यात रंगला

सीजीएचएसचे वेलनेस सेंटर ठाण्यातील चरई येथे सुरू होणारखासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी प्रस्तावाला मंजूरीकेंद्रीय ...
16/01/2025

सीजीएचएसचे वेलनेस सेंटर ठाण्यातील चरई येथे सुरू होणार

खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी प्रस्तावाला मंजूरी

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने नववर्षाची भेट

ठाणे - सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन, ठाणे या केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ठाण्यात सीजीएचएसचे वेलनेस सेंटर (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरवा केल्यामुळे अवघ्या काही महिन्यांतच चरई येथील एमटीएनएल मधील जागा (वेलनेस सेंटर) आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहे. या निर्णयामुळे ठाणे जिल्हा आणि परिसरातील १ लाखाच्यावर विद्यमान केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.

सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन, ठाणे हे गेली अनेक वर्ष सीजीएचएसचे वेलनेस सेंटर ठाण्यात सुरु व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश मिळत नव्हते. एकदा हा प्रस्ताव केंद्र सरकारने नामंजूरही केला होता. असोसिएशनने शिष्टमंडळासह खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून चर्चा करत लवकरात लवकर हा प्रस्ताव मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय पातळीवर चक्रे फिरली. एमटीएनएलचे अधिकारी, सीजीएचएस अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तीन महिन्यांपूर्वी चरईतील जागेची पाहणी केली. त्यानंतर सीजीएचएसने याबाबतचा प्रस्ताव एमटीएनएलकडे पाठवला. एमटीएनएलने हा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य खात्याकडे पाठविला.

खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत जोरदार हालचाली करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाठपुरवा करुन ठाण्यातील चरई येथील एमटीएनएलचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. एमटीएनएल येथील जागा ही प्रशस्त ३००० चौरस फूटात आहे. या जागेपोटी एमटीएनएलला केंद्र शासनकडून खासदार नरेश म्हस्के यांनी वार्षिक भाडेही मंजूर करुन घेतले आहे.

रेल्वे विभाग सोडून केंद्र सरकारचे सर्व विभाग, कस्टम, आयकर, नेव्ही, बीएसएनएल, एमटीएनएल, एअर इंडिया, पोस्ट आदी सर्व विभाग तसेच संसद सदस्य यांना या आरोग्य केंद्राचा मोफत लाभ घेता येणार आहे. सरकार स्वास्थ्य आरोग्य योजने अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांचा यात समावेश आहे. या योजनेत सध्याचे कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा समावेश होतो. पात्र कुटुंब सदस्यांमध्ये जोडीदार, आश्रित पालक, 25 वर्षांपर्यंतची आश्रित मुले आणि अविवाहित मुलींचा या योजनेत समावेश आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

असोसिएशनने अध्यक्ष सुभाष पटवर्धन, सचिव शरद भोळे, उपाध्यक्ष अरुण राऊत, खजिनदार चंद्रकांत कांबळे यांनी संघटनेच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेत आभार मानले आहेत.

16/01/2025

मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर, गोटेघरजवळ नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दोन वाहनांना आणि उभ्या असलेल्या लक्झरी बसला धडक दिल्याने या भीषण रस्ता अपघाताचा 3 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.

#ठाणे #जिल्हा

16/01/2025

शिवाईनगर येथे आयोजित मालवणी मोहत्सवाला खासदार नरेश म्हस्के यांनी दिली भेट

#ठाणे

15/01/2025

अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात आर्थिक ई क्रांती...
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी उलगडला 'अटलजींचा वसा आणि वारसा'..

#ठाणे

15/01/2025

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

15/01/2025

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी उत्पन्न दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य धरणार

खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा यासाठीखासदार नरेश म्हस्के यांनी ‍शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्...
15/01/2025

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा यासाठी

खासदार नरेश म्हस्के यांनी ‍शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

ठाणे, ता. 15 : ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा व नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते. या पार्श्वभूमीवर आज (दिनांक 15 जानेवारी ) रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेवून खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकास मंजुरीसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. यामध्ये अतिरिक्त मनुष्यबळासह आवश्यक असलेल्या सर्व बाबींची मंजुरी देण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे खासदार श्री. म्हस्के यांनी नमूद केले. यामुळे आता ठाण्यातील धोकादायक इमारतीचा पुनर्विकासाचा मार्ग सुकर होणार आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगरअभियंता सुनील पाटील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, रविशंकर शिंदे, संगीता सामंत, ठाणे शहर पुनर्विकास समिती (टीसीआरए)चे विद्याधर वैंशपायन, महेश बोरकर, जतीन शहा, सुमेध पाटणकर, सचिन भोसले, आशुतोष म्हस्के, आदित्य वैंशपायन, ऋषिकेश दंडे, सचिन म्हात्रे, उमंग सावला आदी उपस्थित होते.

ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. पुनर्विकासासंदर्भात शहर विकास विभागाकडे अनेक प्रस्ताव सादर होत असतात. परंतु मनुष्यबळाअभावी यासाठी विलंब होत असतो, यामध्ये आवश्यक शुल्क भरुन बांधकाम परवाना मिळण्यासाठी विलंब होत असल्याने या विभागाकडे अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली असून यास आयुक्तांनी संमती दर्शविली आहे.

तसेच विकास प्रस्तावास मंजुरी देत असताना मेट्रो उपकर लागू करण्यात येतो, यासाठीचा देय असलेला एफएसआय यूडीसीपीआर 2020 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी या मागणीवर त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना मान्यता देत असताना यूडीसीपीआर 2020 नुसार आधारभूत एफएसआयची गणना करण्यासाठी टॅक्स असेसमेंटचे वर्ष आणि क्षेत्र प्रमाणित करण्यासाठी पुरावा म्हणून मुल्यांकन नोंदी विचारात घेतल्या जातात, परंतु त्या ठिकाणी अनधिकृत इमारत नसताना देखील केवळ क्षेत्रफळाचा आकार जास्त असल्यामुळे यावर अधिकचा आकार लावण्यात येतो, याबाबत दप्तरी नोंदीनुसार आकारणी करण्यात यावी असेही आयुक्तांनी नमूद केले.

विकासप्रस्तावामध्ये यूडीसीपीआर 2020 अंतर्गत टेलीकॉम रुम, ड्रायव्हर रुम यासाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे, परंतु कमी जागेमुळे हे शक्य होत नाही तरी 2 हजार चौ.मी पर्यतच्या भूखंडाना यामध्ये सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे आवश्यक पत्रव्यवहार करुन निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी नमूद केले. तसेच प्रस्तावित भूखंडाच्या मागे व लगत असलेल्या मोकळ्या जागेसंदर्भात आयुक्त स्तरावर निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

विकासप्रस्तावातंर्गत येणारे रस्ते व प्रॉपर्टी कार्ड हस्तांतरणाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. याबाबतचे शुल्क विकासकाकडून घेतल्यानंतर याबाबतची कार्यवाही महापालिका स्वत: करेल असा निर्णय आयुक्तांनी घेतला असून यामुळे विकासकांना दिलासा मिळणार आहे. पुनर्विकासाचे काम जलदगतीने व्हावी यासाठी यूडीसीपीआर 2020 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार ठाणे शहरातील विकासकाची संयुक्त समिती गठीत करणेबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

तसेच प्रस्तावित भूखंडामध्ये डीपी रोडसाठी जागा बाधित होत असेल तर यासाठीचा डीआर सदरच्याच इमारतीसाठी वापरण्यासाठी परवानगी मिळावी याबाबतची चर्चा देखील बैठकीत करण्यात आली, जर डीआर त्याच विकास प्रस्तावात वापरला जाणार असेल तर त्याला त्वरीत परवानगी देण्यात यावी असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच ड्रेनेज, पाणी, उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना-हरकत दाखला एक खिडकी योजनेतंर्गत देण्यात यावा अशीही सूचना आयुक्त श्री. राव यांनी यावेळी दिली.

ठाणे शहरातील जीर्ण इमारतीचा पुनर्विकास विनाविलंब व जलदगतीने व्हावा यासाठी आज झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत शिष्टमंडळासह खासदार नरेश म्हस्के यांनी सविस्तर चर्चा केली. शहरातील जुन्या इमारतींमध्ये अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्य कुटुंबे राहत आहेत, या नागरिकांना पुनर्विकासामध्ये मोफत घरे दिली जातात, त्यासाठी संबंधित विकासाला कमीत कमी नफ्यामध्ये सदरचे काम करावे लागते त्यामुळे या पुनर्विकासासाठी सद्यस्थितीत अस्त‍ित्वात असलेल्या अटी जाचक असल्याने बहुतांश प्रकल्प मार्गी लागत नाही, त्यामुळे याबाबत काही अटींमध्ये शिथिलता देणे गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर आजची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेवून तसे आदेश शहरविकास विभागास दिले आहेत त्यामुळे आता जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न जलदगतीने मार्गी लागणार असल्याचा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला व आयुक्तांचे आभार मानले. यावेळी ठाण्यातील ठाणे शहर पुनर्विकास समितीच्या सर्व मुख्य विकासकांनी ठाणे शहरातील जीर्ण इमारतींचा रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले.

14/01/2025

ठाण्यातील जोशी - बेडेकर महाविद्यालयात सिंधु संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन

#ठाणे

Address

Thane
400602

Telephone

9821705565

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Thane:

Videos

Share

Category