24/12/2024
सध्या अनेकजण सांताक्लॉजवर तूटून पडत आहे जणूकाही तो एकटाच हिंदू धर्म बुडवायला निघाला आहे. त्या ऐवजी हिंदू धर्मातील विविध देवी, देवता यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना जागृत करणे हे हिंदू धर्म टिकवण्यासाठी हिताचे आहे. हिंदूत्व आणि हिंदू धोक्यात आहेत आणि ते गेली हजारो वर्षे धोक्यातच आहेत पण सध्या आपल्या धर्माचे आणि धार्मिक संकल्पनांचे ज्ञान आपण विसरलो आहोत हा परधर्मीयांपेक्षा मोठा धोका आहे.
सांताक्लॉजकडून भेटवस्तू घेतल्याने कोणाचे धर्मांतरण होत नाही पण स्वतःच्य़ा धर्माबद्दल असलेलेल अज्ञान हेच धर्मांतरणाचे खरे आणि मुख्य कारण आहे.
व्देषाने पेटलेल्या लोकांना त्याच्या पलिकडे काहीच दिसत नाही. ज्यांना खरोखर धर्माचे रक्षण करायचे आहे त्यांना डोके खुप शांत ठेवावे लागते. शस्त्र उगारुन निशस्त्र व्यक्तीवर चालून जाणाऱ्याला सनातन धर्मात अतायाती म्हंटले जाते. कोणाची हत्या करण्यास निघालेला, स्त्रीच्या अब्रुवर घाला घालणारा, परद्रव्य चोरणारा, नशेत स्वतःचे भान विसरलेला, गोवध करण्यास निघालेला, गुरु वध करण्यास निघालेला असे सहा अतायाती हिंदु धर्मात सांगितले आहेत आणि यांचा निषेध करताना या सहा प्रकारच्या लोकांना ठार मारणे हिंसा नाही असे सांगितले आहे. (संदर्भ भगवद गीतेचे विज्ञाननिष्ठ निरुपण – डॉ. प. वि. वर्तक)
परमेश्वराने एक मजेशीर रचना केली आहे, आपले मन किंवा आपली बुध्दी यापैकी एकच एकावेळी सक्रिय असते, तूम्हाला धर्मयुध्द जिंकायचे असेल तर मनाच्या शक्तीपेक्षा बुध्दीची शक्ती अधिक गरजेची आहे. बुध्दी हि योग्य, अयोग्य याचा निर्णय घेऊ शकते, धर्मातील सुक्ष्म गोष्टी समजू शकते.
बुध्दीचा वापर केला तर सदसद विवेक वापरता येतो अन्यथा मन हे मनुष्याला भरकटवणारे असते. एकदा मनाने आपला ताबा घेतला कि बुध्दीऐवजी भावना कामाला लागतात. भावनेच्या भरात मनुष्य बेफाम होतो आणि भयंकर कृत्ये करतो.
मनाला नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, यासाठी ध्यानधारणा, सत्संग, संतसाहित्याचे वाचन असे पर्याय उत्त्तम आहेत.
मानसिक ताणतणाव तज्ञ, पुष्पौषधी तज्ञ
आदित्य भागवत (मो) 9029581590